अमृततुल्य बासुंदी चहा :)

Posted
8 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
8 वर्ष ago

लोक वेगवेगळ्या प्रकारे चहा करतात. काही लोक वेगळ्याच पद्धतीने चहा करतात. म्हणजे पाण्यात साखर घालून उकळवून त्यात एक चमचा चहा घालून झाकण घालून गॅस बंद Uhoh आणि कपात दूध आणि वरून तो कोरा चहा ओततात. तो म्हणे खरा चहा. माझ्या मते तो फळकवणी लागतो Sad

मला तर चहा एकदम दाट, गोड आणि लाईट लागतो, स्ट्राँग चहा अजिबात आवडत नाही. Sad

कोल्हापूरला 'लम्सा' नावाचा एक चहाचा स्पेशल मसाला मिळतो. बाकी चहाचे मसाले म्हणजे टिपिकल सुंठ, आलं, वेलदोडा असे माहित असलेले वास असलेले असतात. लम्सा मात्र निराळा आहे. तो वापरून मी चहा असा करते.

साहित्य (2 कप चहा) : एक कप दूध, एक कप पाणी, ६ चमचे साखर, १ सपाट चमचा लम्सा, २ सपाट चमचे सोसायटी चहा.

कृती :

प्रथम भांड्यात दूध आणि पाणी दोन्ही मिक्स करून त्यात लम्सा घाला.
1Lamasa.jpg

मग २ सपाट छोटे चमचे चहा घाला. मी नेहमी सोसायटी वापरते. चविला एकदम लाईट आहे. स्ट्राँग नाही.
2Chaha.jpg

६ चमचे साखर. हे चमचे अतिशय छोटे आहेत आणि मला साखर कमी चालत नाही. त्यामुळे ६. आजकाल साखर अजिबात गोड नसते त्यामुळे ६ घातले तरिही गोड गिट्ट होत नाही चहा.
3Sakhar.jpg

खरंतर कोणताही पदार्थ कोणत्याही क्रमाने घातला तरी चालतो, मी आपले फोटो टाकलेत त्याप्रमाणे लिहिलंय.
पण शेवटी झकास उकळायचा चहा नीट. नंतर नंतर तो उकळून छान दाटसर दिसतो.
4Ukal.jpg

मग काय, कपात ओता, दोन बिस्किटं घ्या, सोबतीला वर्तमानपत्र आणि होऊन जाऊदे तरतरीत सकाळ किंवा संध्याकाळ.
Final.jpg

विशेष टिप : चहा करताना (सुरुवातीलाच) एक चमचा साय घातल्यास अजूनच मस्त लागतो चहा. (उकळल्यावर छान तुपकट होतो. ;))

तळटिप : लम्सा पुण्यात मिळत नसल्याने आपके कोपुचे माबोकर निपो यांनी मला वर्षभराचा लम्साचा स्टॉक भेट दिला आहे. अधून मधून काही माबो मैत्रिणी येऊन तो मसाला ढापून नेतात ही गोष्ट निराळी Proud

विषय: 
प्रकार: 

मी पैला! हा हा हा Happy

मी चहा करताना दोन वेळा उकळी काढतो. चहा पुडीची एकदा आणि दूध घातल्यानंतर दुसर्‍यांदा!

सायीची मजा साय खाणार्‍यंनाच कळल्ते. इतरांना नाही. आपुन तो सायभक्त है. कशातही साय घालून किंवा नुस्ती साय आपल्याला खूप आवडते. Wink

पण आपुनको मसाला अजाबात आवडत नाय.

मस्तं!
आमच्या गावात पण हा लम्सा खूप प्रसिद्धं आहे.
गावातल्या चहाच्या दुकानात सुट्टा चहा घेताना 'अर्दा किलो भुकणी हाक री, एक छटाक लम्सा हाकरी' असं करून मिक्स्चर बनवून घेतात.
दुकानदाराला लाडीगोडी लावून बायाबापड्या 'हिना थोडे लम्सा हाक री' असं करून चहापूडीच्या मिश्रणात थोडा लम्सा मिळवतात.

मला मात्रं त्या लम्साच्या वासानेच गरगरते.
मला वाटलं होतं हा खास आमच्या नॉर्थ कर्नाटकाचा स्पेश्यल आईटम आहे, तर चक्कं कोल्हापूरात पण लम्सा इतका वर्ल्डफ्येमस?
Wink

Happy रागावू नका. तुम्ही पेपर वाचा - सगळी पाने देते. तुम्ही पैले!
चहा तसही तुम्हाला नाय आवडणार, त्यात लम्सा आहे. त्यासाठी मी पैली Happy

वा वा! मस्तं!

>>लम्सा मात्र निराळा आहे
दक्षिणा, मसाल्यातले इन्ग्रेडियन्ट्स पुड्यावर लिहिले असतील तर कृपया इथे लिही. लम्सा ब्रँडचं नाव आहे की स्पेसिफिकली ह्या मसाल्याचं?

चहा आपला वीक पॉइंट! कसाबी, कवाबी, कुटंबी, कितीबी! तेव्हा आता लम्सा भारतातून निर्यात होतो का ते बघायला हवं. किंवा लोकल कोल्हापुरी मित्रमंडळात लापि वाजवावी लागेल.

मस्त!!! मला ही असा बासुन्दी चहा आवडतो. मस्त उकळून.... पण मी थोडा स्ट्रॉन्ग करते. उकळताना लवंग , आलं किंवा गवती चहा.
लम्सा ट्राय कारायलाच पाहिजे आता. Happy

चहा करताना पाण्यात जे काही मसाला वगैरे टाकायचे आहे ते टाकून उकळा (पाणी थोडे जास्त थोडे) उदा. आलं, वेलची, चहा मसाला इ. ३-४ मिनिट उकळल्यानंतर मग चहा पावडर आणि साखर टाका. त्याला पण व्यवस्थित उकळा त्यानंतरच दुध टाका.

चहाला आलं, वेलचीची चव वेगळी येते

लमसा नासिक ला पण मिळतो काही ठिकाणी.:स्मित: दुकान आठवत नाही. पण प्यायलेय हा चहा. छान लागतो. आता पुण्यात बघावा लागेल.

दक्षिणा ६ चमचे साखर नको घालु ग बाई. मला एका कपाला दीड चमचा पण जास्त वाटायला लागली आहे आजकाल.

आज घरी जाऊन पुडकं नीट पाहते आणि इन्ग्रेडियंट्स असतील लिहिलेले तर इथे टाकेन.

बाकी सिमंतीनी आणि साती प्रतिसाद खूप आवडले Happy

लम्सा मिळवायला पाहिजे दक्षीच्या घरी धाड मारून!
चहाला वेळ नसते; पण वेळेला चहाच लागतो! ह्या ह्या ह्या! Biggrin

पण साय नक्को!

माझ्या घरीही वर दिल्याप्रमाणे चहा होत होता. टंपाळभर पाणी, चहा पावडर अन नावाला साखर असं खळाखळा उकळवायचे. ते कपामध्ये घेऊन त्यात मग रंगापुरतं गरम दूध. त्यातही ते दूध म्हशीचच हवं अन ते ही गवळ्याकडचं. त्याला कसली आलिये प्रत डोंबलाची. त्या गवळ्याला मीच एकदा विहिरीवर दुधाच्या कॅनमध्ये पाणी घालताना पाहिलंय. आणि एकदा आरे च्या दुधाच्या पिश्व्या कॅनमध्ये ओततांना... एकूणात काय पारच फुळूकपाणी गर्मच्या असायचा. साखरही कमी अन दूधही बोअर मग चवच नसायची. शेवटी गवळी बंद झाला. आता मस्तपैकी क्रीम मिल्क घेतात. तरी पद्धतीत काही फरक नाही. पण दूध छान असल्यानी चांगला लागतो चहा.
मोट्ठा मग भरून चहा, पेपर Happy

मृण्मयी - ब्रँडचंच नाव लम्सा आहे. फ्लेवर्ड टी.
बाकि मला नव्हतं माहित की इतर शहरातही मिळतो हा ते.

रश्मे - लहानपणापासून माझं साखर आणि सायीशी सख्य आहे. सायीच्या पातेल्यात चमचाभर साखर घालून खरवडून खाणे हा आवडता छंद. मीठ आणि साखर...
साखर कमी चालत नाही आणि मीठ जरा ही जास्त चालत नाही मला Proud त्यात कोपु म्हणजे गुळ साखरेला काय कमी? एकूणातच कोपुला साखर सढळ हस्ते घालतात.

दक्षे!
साखर सहाssssssssssssss चमचे...
अग बाबो Happy
थोडी आणखी साखर टाकलीस तर त्या चहाला कपची पण गरज लागणार नाही..
Capture1.JPG

एक कप दूध, एक कप पाणी>>
दोन कप चहा एका वेळेसच Proud
Light 1

अरे ६ चमचे साखरेवरून किती तो गदारोळ Lol
मला चहा गोड लागतो म्हणजे लागतो. त्यात काही तडजोड करू शकत नाही मी. आणि आजकाल साखर अतिशय कमी गोड असते, कितीही घातली तरी गोडवा नीट येत नाही. ज्यांना ज्यांना ऑबजेक्शन आहे त्यांनी या एकदा माझ्याकडे मग मी ३ चमचे साखरवाला चहा देते आणि मग सांगा कसा लागतो ते.

अग्न्या मी एकावेळी एकच कप चहा पिते. एक माझ्या बाईसाठी ठेवते. Happy
मी स्पेशल चहा पित असले तरी दिवसातून दोनच कप पिते. एक सकाळी एक संध्याकाळी. मे चहाबाज नाही.

यावरून आठवलं; चहा पूर्ण झाल्यावर पाअत ओतण्याआधी त्यात अर्धा चमचा बोर्न्व्हिटा घालायचं. मस्त चव येते Happy

अरे यार, आता लम्सा बद्दल जाम कुतूहल निर्माण झालंय. आणि त्यात विषय चहाचा आहे Happy

>>>>
चहा, बिस्कीटे, पेपर!!! जियो दक्षिणा!!
( अबब, ६ चमचे!!! क्या यह तुम्हारी मिठास का राज है?)
>>>>>
+१ Happy

दक्षिणा, हा मसाला मिळतो पुण्यात. खूप ठिकाणी वाचलंय.. आत्ता दुकानांची नावं आठवत नाही. पुन्हा पाहण्यात आला तर इथे कळवते.
चहा माझाही फेवरिट! कधीही, कुठेही पण कसाही नाही!
दूध घातल्यावर चहा उकळला नाही तर चहा फुळकवणी होतो. हल्ली राहिलेल्या गाठ्या घालून जो चहा करते तो असा काही दाट आणि मधुर होतो की साखरेऐवजी नेहमीच गाठ्या वापराव्यात असं वाटू लागलंय! Happy

ओह्ह ह्यात तुझा आणि बाईचा असा दोन कप चहा होय! मला वाटल इतका उकळायचा की एकच कप होतो Biggrin
(एका कपाला ३ चमचे साखर! ६ नाही, हुश्श!!! Wink )

आमच्या कडचा चहा संपला आहे हो... थोडी चहा पावडर देता का?
लमसा टाकून द्या .... चालेल मला...! तेवढाच आपला शेजार धर्म Proud

Pages