मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्‍या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय?

Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01

मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.

ओह

कोंबडशेपटा > कॉकटेल्...
>>
Lol

चिपोका - गोष्टीगावचे Proud

रिक्षा फिरवणे म्हणजे?
<<
<<
स्वत:च्या धाग्याची, दुसर्‍या कोणाच्यातरी धाग्यावर केलेली जाहिरात.

रिक्षा फिरवणे म्हणजे? >>

@ फेरफटका हे पहा.

http://www.maayboli.com/node/53377

अशा पद्धतीने इतर धाग्यांवर स्वतःच्या लेखांची / कथांची / कवितांची लिंक देणे याला रिक्षा फिरवणे असे म्हणतात.

रिक्शा फिरवणे म्हणजे गल्लीगल्लीत रिक्षाला स्पीकर लावून कार्यक्रमाची अथवा प्रचारात जाहिरात केली जाते तसे स्वतःच स्वतःच्या लिखाणाच्या लिंका इतर बीबी - बीबी वर देत सुटणे .. Happy

तसेच एखाद्या बीबी वर वाद चालू असताना तो आरामात खुर्च्या टाकून पॉप कॉर्न खात नाटकासारका एंजॉय करणे याला 'खुर्च्या टाकणे' , 'पॉप कॉर्न 'असा शब्द आहे मात्र यात तुम्ही भाग घ्यायचा नसतो . नाहीतर तुम्ही प्रेक्षका ऐबजी 'पात्र 'बनता. तुमची जागा खुर्चीवरून स्टेजवर जाते व पॉप कॉर्न खाण्याऐवजी ऐवजी डायलॉग बोलावए लागतात....

हा एक नवीन :
' चा चा चो ' विषय = चावून चावून चोथा झालेला

Pages