मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्‍या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय?

Submitted by मदत_समिती on 13 September, 2009 - 20:01

मायबोलीकरांनी गेल्या काही वर्षांमध्ये स्वतःचे असे खास वेगळे शब्द निर्माण करून वा शब्दांची लघुरुपे वापरात आणून ती नेहमीची केली आहेत. या शब्दांची सूची व त्यांचे अर्थ समजून घेण्यासाठी "मायबोलीवरील विशेष शब्द" हा आपली मायबोली या ग्रुपमधला दुवा पहावा. तसेच वेळोवेळी या दुव्यावरील संकलनात भर घालावी.

होय पु पु चा अर्थ पुण्यातले पुणेकर. आणि टेक इट लाईटली म्हनजे दिवे घ्या. रच्याकने म्हनजे रस्त्याच्या कडेने म्हणजे बाय द वे. मायबोलीकरांचे सरासरी मानसिक वय हे १३- १४ दरम्यान असलेने असले शाळकरी विनोद करायची त्याना संवय आहे. तुम्हीही शिंगे मोडून वासरात शिरा म्हनजे एथे खपून जाल ... हाकानाका? (हाय काय अन नाय काय)

नमस्कार मी एक नवीन सदस्य आहे.
एलदुगो म्हणजे काय ? इथे सारखा हा शब्द वापरला जातो. मी सात्विक वातावरणात वावरत असल्याने हा शिवीसदृश्य शब्द अस्वस्थ करतो.

Kiran../उपग्रह प्रशासक नावाच्या नवीन सदस्या,
तो शब्दच नाही तर त्याबद्दलच्या इतरही बर्‍याच गोष्टी बर्‍याच जणांना स्वस्थ/अस्वस्थ करत असतात.......
तू अजून लहान असल्याने, अशा गोष्टींकडे लक्ष न देता, आरत्या, सिनेजगतातील गप्पा, विडंबने अशा ठिकाणी लक्ष केंद्रित करावेस.........

Biggrin
एलदुगो म्हणजे काय ?
सात्विक वातावरणात, शिवीसदृश्य शब्द >>>
अहो शुध्द सात्विक साहेब, एका लग्नची दुसरी गोष्ट नावाची एक सिरियल चालू आहे कोणत्यातरी मराठी वाहिनीवर. त्याची ती अद्याक्षरे आहेत.

एजोटाझापा >>
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत! Happy
(प्रेरणा: झी सारेगमप फेम पल्लवी जोशी)

'हुर्डा' हा शब्द सगळ्यानाच माहिती आहे....

पण 'हुर्डा' या शब्दाचा शब्दशः अर्थ माहित असल्यास सांगा... संदर्भ असेल तर अधिक चांगले..

'हुरडा' हा शब्द माबोवर वापरतात का?

डु आय्डींचा प्रश्न निकालात निघावा का? नावं ठेऊन आजकाल कोणाला काही वाटत नाही.

टडोपा > ट्चकन डोळ्यात पाणी
कोतबो > कोणाशी तरी बोलायचंय
विबासं > विवाहबाह्य संबंध
रच्याकने > बाय द वे > रस्त्याच्या कडेने
शो ना हो > 'शोभत नाय हो' असं हेल काढून म्हणायचं आहे :p

Pages