सरकारच्या त्रुटींऐवजी राहुल गांधींना शोधा - अमित शहा

Submitted by बाळू पॅराजंपे on 3 April, 2015 - 22:24

केंद्रातील भाजपप्रणित एनडीए सरकारच्या चुका शोधण्यापेक्षा कॉंग्रेसने राहुल गांधी यांचा शोध घ्यावा, असा टोला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज (शुक्रवारी) येथे लगावला. दरम्यान, भाजप पुढील दहा ते वीस वर्षे सत्तेत राहील, असा दावाही त्यांनी केला.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=MFGZD

यानिमित्ताने केलेले एक मुक्त चिंतन

:सचिन पगारे मोड ऑन:

भारतीय जनता पक्षाचे सरकार येऊन दहा महीने झाले आहेत. निवडणुकीपूर्वी शंभर दिवसात काळा पैसा भारतात आणू असं रामदेव बाबांनी भाजपच्या प्रचारसभांमधून सांगितलं होतं. मोदींनी तर काळा धन परदेशात ठेवणा-यांना जेल मधे टाकू असं निवेदन दिलं होतं.

कोळसा गैरव्यवहारात दोषी असलेल्यांना अटक करू, सीबीआय ही संस्था विसर्जित करू, आयबी कार्यक्षम करू, गुप्तहेर संस्था कार्यक्षम करू अशी अनेक आश्वासनं सरकारने दिली. न खाउंगा न खाने दुंगा असं म्हणत खाण घोटाळ्यात गाजलेल्या येड्या अप्पांना उपाध्यक्ष बनवले. कायदा सुव्यवस्था, सुशासन यांचे आश्वासन देत श्रीमान तडीपार स्पॉट नाना यांना अध्यक्ष बनवले.

तोपर्यंत सरकारवर टीका होऊ लागली. एक एप्रिल हा जागतिक मोदी दिवस म्हणून साजरा झाला. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बंगळुरू येथे झाली. राष्ट्रीय कार्यकारिणी मधे पक्ष सरकारपुढील आव्हाने आणि त्यांचा मुकाबला कसा करावा याबद्दल चिंतन करतो. पण भाजपची ही बैठक याला अपवाद ठरली. शेतक-यांमधील असंतोष, काळा पैसा शंभर दिवसात आणण्यात आलेले अपयश, त्यानंतर ३१ मार्चच्या आत काळा पैसा भारतात आणू हे कोर्टाला दिलेले आश्वासन पाळले गेले नाही. उत्तर प्रदेशात गुजरात मधे डबल शिफ्ट करून सहा महीने पगारी सुटी दिली जाईल हे आश्वसन ही हवेतच विरले आहे. लोकांनी ही आश्वासने कानाने ऐकली आहेत. आता या आश्वासनांची आठवण करून दिली की भाजप्ये लोकांना शिव्याशाप देऊ लागले आहेत. त्यांना भिकारी म्हणू लागले आहेत. फुकटे म्हणू लागलेले आहेत. भाजप्यांचा तोल खरं तर सरकारवर होत असलेल्या टीकेमुळे ढळताना दिसत आहे. टीका मोदींच्या आश्वासनांवरच होत असल्याने खरं तर त्यांची अवस्था तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी होताना दिसत आहे.

म्हणूनच सरकारने पुन्हा एकदा विरोधी पक्षाची भूमिका स्विकारली आहे. हे सरकार चालवणे आपल्याला शक्य नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्या दृष्टीने पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव झाला की राहुल गांधींनाच सरकार चालवायला सांगू म्हणजे त्यांच्या चुका होतील आणि आपण त्यावर टीका करू. कारण ज्याचे काम त्यानेच करावे. सरकार चालवण्याचे काम काँग्रेसचे आहे , टीका करण्याचे काम आपले आहे. टीका झेलण्याची सवय नसल्याने कार्यकारीणीत हा ठराव बहुमताने संमत झाला. त्या दृष्टीने अमित शहांनी राहुलजी गांधींना संदेश पाठवण्याची तयारी केली खरी, पण राहुलजी गांधीजी सापडले नाहीत, त्यामुळे भाजपच्या गोटात सरकार चालवावे लागते की काय या शंकेने अस्वस्थता पसरली आहे. त्यामुळेच मग राहुल गांधी सापडावेत या उदात्त हेतून सरकारने नेहमीप्रमाणे पातळी सोडून टीका सुरू केली आहे. नेहमीचे काम स्विकारल्याने मोदींचे भाषणही खुलले.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=MFHHQ
पक्षाचे आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही खुलले असूनपुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच पातळी सोडून टीका करण्याला आता कुठलेही बंधन राहणार नाही याचा आनंद त्यांना झालेला आहे. अर्थात सत्तेत येऊनही अर्ध्या लोकांना स्विच ओव्हर करता न आल्यानेच सरकारमधे राहणे अवघड असल्याचे भाजप्ये बोलून दाखवत असल्याचे दिसून येत आहे. स्पॉट नाना यांनी आपल्या सैन्याच्या मनातील भावना उघड केल्यात फक्त.

राहुलजी गांधीजी कुठे आहेत ?

खरं म्हणजे राहुलजी गांधीजी सापडत नाहीत हा त्यांच्या रणनीतीचा आणि दूरदृष्टीचा भाग आहे. सरकार अशी विनंती करणार हे त्यांनी ताडले होते. पण ज्याप्रमाणे पक्षाची सत्ता असतानाही त्यांनी नम्रपणे आपल्या पक्षातील ज्येष्ठ, अनुभवी आणि विद्वान व्यक्तीला सर्वोच्च पद दिले त्याप्रमाणेच पक्षाची सत्ता नसताना ते हे पद कसे स्विकारतील ? त्यामुळे भाजपला आता सरकार चालवण्यास भाग पाडावे आणि गुप्तहेर संस्थांचे सक्षमीकरण ते कसे करणार होते हे देशाला समजू द्यावे या हेतूने ते अज्ञातवासात गेलेले आहेत. ज्याप्रमाणे कौरवांना जंग जंग पछाडूनही पांडवांचा पत्ता लागला नाही त्याचप्रमाणे स्पॉट नाना आणि टीमला आजपर्यंत राहुल गांधी सापडलेले नाहीत. सरकार मधे असून, रॉ, सीबीआय, आयबी या संस्था हाताशी असूनही राहुल गांधी का सापडू नयेत हा प्रश्न आता सर्वसामान्य विचारू लागले आहेत याची सत्ताधारी पक्षाच्या धुरीणांना कल्पनाही नाही. ते आता स्वतःच खणलेल्या खड्ड्यात पडत आहेत.

राहुलजी गांधीजी यांच्या या मास्टरस्ट्रोकवर काँग्रेस पक्ष बेहद्द खूष आहे. भाजपचे सरकार जेव्हां जेव्हां येते तेव्हां वाचाळता, बेताल टीका याने ते आपोआप जाते हा पक्षाचा अनुभव असल्याने राहुलजी गांधीजी यांच्या आदेशानुसार पक्षाने वेट अ‍ॅण्ड वॉचची भूमिका स्विकारलेली आहे. सत्ताधारी पक्षाचे गिरीराज सिंह, साध्व्या आणि साधू हे काँग्रेस पक्षासाठी अनुकूल ठरतच होते पण आता खुद्द स्पॉट नाना सुद्धा काँग्रेस पक्षाला अनुकूल भूमिका घेताना दिसत आहेत. पुढील चार वर्षे पक्ष सत्ताशकट कसा हाकणार याची आता देशवासियांना उत्सुकता लागून राहीलेली आहे.

:सचिन पगारे मोड ऑफः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरकारपक्षात सामील असलेल्यांचंच नाही तर सत्ताधारी पक्षाला मदत करणा-या घटकपक्षांचेही दिवस सध्या फिरलेले दिसताहेत.

http://www.esakal.com/Tiny.aspx?K=uFHJY

यामुळे अच्छे दिन आयेंगे , तो कधी आयेंगे असा प्रश्न भाजप्यांच्या मनात आहे.

समजा राहुल गांधीना शोधले तरी पुढे काय? सरकारचे काम आहे देश विकासाची कामे करणे. सरकार निष्क्रिय बसलेले दिसले तर टीका होणारच ते सोडून भाजपचे अध्यक्ष विषयाला वेगळे वळण देत आहेत.

मंत्रीमंडळातले मोदींचे सहकारी काहीही बेताल वक्तव्य करत आहेत मोदी हे बराच काळ परदेशात राहत असल्याने सरकारवर त्यांचा अंकुश राहिलेला दिसत नाही . बाळू लेख आवडला मी जर लिहिला असता तरी भावना बर्याच अंशी अश्याच उतरल्या असत्या.

सध्याचे सरकार हे अत्यंत अकार्यक्षम वाटत आहे युपीए सरकारमध्ये जशी जनतेच्या प्रश्नांची जाण असलेले अनुभवी नेते उदा. शरद पवार साहेब, मनमोहन सिंग ह्यांच्यासारखा विद्वान, उच्चशिक्षित देशविदेशात मान असणारा प्रधानमंत्री, अत्यंत विकृत स्वरुपाची टीका होवूनही स्वताला सिध्द करणाऱ्या कर्तबगार नेत्या सोनियाजी, युवा नेते राहुलजी गांधी, चिदंबरम असे अनेक नेते होते त्याप्रमाणे सध्याच्या मंत्रिमंडळात असे नेते दिसत नाहीत आधीच्या तुलनेत हि टीमच कमकुवत भासते. त्यामुळे ह्या सरकारकडून माझ्या तरी अपेक्षा काहीही नाहीत .

हो, मात्र भाजपचा जाहिरात विभाग हा अत्यंत कार्यक्षम आहे ह्याबाबत वाद नसावा.

कारण ज्याचे काम त्यानेच करावे. सरकार चालवण्याचे काम काँग्रेसचे आहे , टीका करण्याचे काम आपले आहे.
अरे, हे मोदी गुजराती असून त्यांना जेनू काम तेनु धाय, बीजा करेसो गोता खाय ही म्हण माहित नव्हती? कशाला आले निवडून? आता खातील गोता.

कारण ज्याचे काम त्यानेच करावे. सरकार चालवण्याचे काम काँग्रेसचे आहे , टीका करण्याचे काम आपले आहे.

>>>>>

हाच डायलॉग मोदींनी दिल्ली विधानसभा निवडणूका प्रचारसभेत अरविंद केजरीवाल यांना मारला होता.

आमचे काम सरकार चालवणे, तुमचे काम धरणे धरायचे.

अंगाशी आला.