उकडलेले बटाटे, जीरे, लवंगा, दालचीनी, ओवा, मीरे, तिखट, फोडणीसाठी तुप, चवीप्रमाणे मीठ आणि चिमुटभर साखर.
पंजाब्यांमध्ये आपल्यासारखे उपासाचे भरमसाठ पदार्थ करत नाहीत. बहूतेक हे लोक भरमसाठ उपास पण करत नाहीत. गेल्या ७-८ वर्षांमध्ये मी तरी खूप कमी उपास बघितले आहेत आमच्या घरात.
करवा चौथ (हा अगदी कंपल्सरी सगळ्या बायका-पोरी आणि हल्ली बरेच पुरूषही करतात). टिव्ही/सिनेम्यांमूळे या उपासाबद्दल सगळ्यांच माहिती आहे. यात काहीच खात नसल्याने उपासाचे स्पेशल पदार्थ पण नसतात. करवा चौथला स्पेशल म्हणजे फक्त नमकिन आणि मिठी मठ्ठी आणि सुतरफेण्या. असाच अजून एक उपास दिवाळीच्या आधी आया त्यांच्या मुलांसाठी करतात. त्याचं नाव होई का व्रत. यात पण काहीच खात-पीत नाहीत. याच्या स्पेशल मठ्ठ्या असतात, गुळ आणि थोडी बडीसोप घातलेल्या गोड पुर्या टाइपच्या.
अजून एक संक्रातीच्या आसपास असतो उपास. त्यात मुलांसाठी कच्च्या तिळाचे लाडू करतात बहूतेक. याबद्दल जास्त माहिती नाहीये मला कारण या उपासाच्या आसपास मी कधीच सासरी गेले नाहीये. आम्हाला आमच्या नावाचे लाडू फक्त पाठवले जातात. (मी ते सुद्धा चाखले नाही, कारण लाडू सुद्धा फक्त मुलांच्याच नावचे असतात म्हणे. सुनांनी खायचे नसतात ते. :अओ:)
या उपासांच्या शिवाय आमच्या गावी केले जाणारे उपवास म्हणजे नवरात्र आणि शिवरात्र. नवरात्रात सप्तमीपर्यंत उपास करून अष्टमीला कंचक (कुमारिका) पुजतात.
दिल्लीत नवरात्रात उपासाची म्हणून स्पेशल थाली मिळते बर्याच ठिकाणी. पण दिल्लीतले पंजाबी व्रत का खाना म्हणून बरंच काय काय खातात. उदा. टॉमॅटो, दुधी, पालक आणि अजून बर्याच भाज्या. फक्त या भाज्या बिना कांदा-लसणाच्या आणि हळदी शिवाय करतात इतकंच.
आमच्या घरी मात्र हे पदार्थ चालत नाहीत उपासाला. आपल्याकडे चालणारेच सगळे पदार्थ सासरी पण चालतात. मी २-३ पदार्थच नेहेमी हौसेनी सासरी सगळ्यांना खाताना बघितलंय. साबुदाण्याची खीर (आताशा आमच्याकडून खिचडी आणि वडे शिकलेत बनवायला, पण उपासाला हमखास खीरच करून खातात), व्रत के आलू आणि सियोल म्हणजे आपला राजगीरा.
आज साबांनी त्यांच्या उपासानिमित्त व्रत के आलू बनवले होते. तर त्याची ही रेसेपी. तशी खूप काही स्पेशल नाहीये, पण मला खूप आवडतात या पद्धतीचे व्रत के आलू.
कृती:
बटाटे जरा जास्त मऊसर उकडून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यावेत. मसाल्याचे पदार्थ (तिखट आणि ओवा सोडून) तव्यावर थोडे गरम करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. कढईमध्ये फोडणीसाठी तुप (थोडंसं जास्तंच) घ्यावं आणि त्यात जीरे आणि ताजा केलेला गरम मसाला टाकावा. लगेचच बटाट्याच्या फोडी, तिखट,ओवा, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. यात चिमूटभर साखर घालावी. (साबा घालत नाहीत. ही माझी अॅडीशन आहे.). भाजी अगदी व्यवस्थित हलवावी. हलवतानाच चमच्याने थोडे बटाटे मॅश करावेत. नंतर कढईत भाजीवर घट्ट बसेल (अजिबात वाफ जाणार नाही. माझ्या साबा कढईच्या आत बसेल अशी छोटी ताटली वापरतात.) असं झाकण ठेवावं. २-५ मिनीटांनी कढईतून चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र असा आवाज येईल. आवाज जास्त येवून भाजी करपते की काय वाटलं की झाकण काढून परत ५-७ मिनीट भाजी व्यवस्थित परतावी. भाजी व्यवस्थित खरपुस झाल्यासारखी वाटल्यावर गॅस बंद करावा.
या भाजीबरोबर नमकिन आणि मिठी सियोल्/सियुल (राजगीर्याच्या लाह्या) खातात. व्रत के आलू, नमकिन सियुल, मिठी सियुल असाच बेत असतो घरी.
नमकिन सियुल म्हणजे ताकातल्या राजगीर्याच्या लाह्या. दह्याचं जरा घट्टसर ताक करून त्यात मीर्याची पुड, हिरवी मिरची आणि पुदिन्याचं वाटप, मीठ आणि चिमुटभर साखर घालावी. नंतर यात राजगीर्याच्या लाह्या घालाव्यात. लाह्या फुलल्या की नमकिन सियुल तयार.
मीठी सियुल करताना दुधात राजगीर्याच्या लाह्या, साखर, किसमीस, बदाम-काजू (ओबडधोबड वाटून ) घालून शिजवतात. मिठी सियुल तयार.
उपास नसेल तर साबा व्रत के आलू बनवताना तुपाऐवजी सरसो का तेल वापरतात. आणि फोडणीत जीर्यांबरोबर थोडी भिजवलेली मुगाची आणि चण्याची डाळ आणि कढिपत्ता घालतात. बाकी पद्धत आणि मसाले सेम. या आलूंची खरी मज्जा त्यांना भरपूर परतल्यामूळे जो खरपुसपणा (साबांच्या भाषेत आलू करारे होने चाहिये) येतो त्यात आहे.
छान आहे रेसिपि.
छान आहे रेसिपि.
मस्त रेसिपी. बटाटा फारच प्रिय
मस्त रेसिपी. बटाटा फारच प्रिय असल्याने करून बघणार नक्की.
अकुची रेसिपीसुद्धा मस्त वाटतेय. कोणतीही कढाई व्हेजिटेबल करताना मी भरड चुरडलेले धने गरम तेलात टाकते, फार सुंदर चव येते.
कोणतीही कढाई व्हेजिटेबल
कोणतीही कढाई व्हेजिटेबल करताना मी भरड चुरडलेले धने गरम तेलात टाकते, फार सुंदर चव येते. >> हे माझा नवरा पण करतो.
धण्याची टिप लक्षात ठेवणार!
धण्याची टिप लक्षात ठेवणार!
अकु,कढाई पनीर करताना असे
अकु,कढाई पनीर करताना असे धने अगदी अवश्य घाल, फार मस्त लागते.
अल्पना, मी पंजाबी खासियत भाज्या आणि डाळी ह्या उषा पुरोहितांच्या पुस्तकात ही टीप वाचली होती, ऑथेंटिक पंजाबी भाज्या फार मस्त दिल्यात त्यात. आता ती टीप सुद्धा ऑथेंटिक असल्याचे सिद्ध झाले म्हणायचे :).
वा! छान लागत असणार ही भाजी!
वा! छान लागत असणार ही भाजी! करते लवकरच!
आलू करारे होने चाहीये
आलू करारे होने चाहीये ऐकल्यावर बटाटे करारी थोबाड घेऊन वट्टारून पाहातायत असा भास झाला...
मस्तच आहे, करारे आलू अगदी
मस्तच आहे, करारे आलू अगदी समोर दिसले. करायला हवी.
अल्पना, मस्त रेसिपी. करुन
अल्पना, मस्त रेसिपी. करुन बघणार!
माझी आई बटाट्याची सुकी भाजी पण खूप परतून त्याला खरपूडी आणत असे. जाम आवडायची ती.
"आलू करारे होने चाहिये" >>> लयी भारी वाटलं वाचून!
नक्की करुन बघणार.
मस्त वाटतेय पाकृ, नक्की करुन
मस्त वाटतेय पाकृ, नक्की करुन पाहणार.
मस्त आहे रेसीपी. आवडली.
मस्त आहे रेसीपी. आवडली.
मस्त ! आवाक्यातली वाटतेय.
मस्त ! आवाक्यातली वाटतेय. व्रत न करता करण्यात येईल

मस्त वाटतेय रेसिपी. संपदा,
मस्त वाटतेय रेसिपी.
संपदा, धन्याची टीप लक्षात ठेवेन.
मस्तच आहे रेसिपी. करायला
मस्तच आहे रेसिपी. करायला सोपी आणि लागत ही छानच असेल. लवंग आणी दालचिनीचा वास बटट्याची चव खुलवेल असं वाटतयं
अर्धी वाटी दुधात आपला एक नॉर्मल राजगिरा लाडू दोन मिनीटं भिजत घालुन खायचा . मस्त लागतं. मिठी सियोल् दोन मिनीटांत तयार.
हेमाताईनी सांगितलं तसंच आई
हेमाताईनी सांगितलं तसंच आई उपासाच्या दिवशी राजगिरा लाडू दुधात घालून करते.
आज केलेच . व्रत के आलू
आज केलेच :). व्रत के आलू मस्तच झालेत, नेहमी करणार. मसाल्यात मी एकच अॅडिशन केली, अनारदाणे सुद्धा घातले. छान लागले :).
मस्त! ओवा सोडला तर बाकी थेट
मस्त! ओवा सोडला तर बाकी थेट आलू चलाके वाटताहेत.
मस्त आहे रेसिपी. बटाटा गुणी
मस्त आहे रेसिपी. बटाटा गुणी असल्यामुळे त्यात काहीही घातलं तरी छान लागतं. खरपूस बटाटे तर एक नंबर.
व्रत म्हणजे कांदा-लसूण वर्ज्य असेल फक्त मे बी
Pages