उकडलेले बटाटे, जीरे, लवंगा, दालचीनी, ओवा, मीरे, तिखट, फोडणीसाठी तुप, चवीप्रमाणे मीठ आणि चिमुटभर साखर.
पंजाब्यांमध्ये आपल्यासारखे उपासाचे भरमसाठ पदार्थ करत नाहीत. बहूतेक हे लोक भरमसाठ उपास पण करत नाहीत. गेल्या ७-८ वर्षांमध्ये मी तरी खूप कमी उपास बघितले आहेत आमच्या घरात.
करवा चौथ (हा अगदी कंपल्सरी सगळ्या बायका-पोरी आणि हल्ली बरेच पुरूषही करतात). टिव्ही/सिनेम्यांमूळे या उपासाबद्दल सगळ्यांच माहिती आहे. यात काहीच खात नसल्याने उपासाचे स्पेशल पदार्थ पण नसतात. करवा चौथला स्पेशल म्हणजे फक्त नमकिन आणि मिठी मठ्ठी आणि सुतरफेण्या. असाच अजून एक उपास दिवाळीच्या आधी आया त्यांच्या मुलांसाठी करतात. त्याचं नाव होई का व्रत. यात पण काहीच खात-पीत नाहीत. याच्या स्पेशल मठ्ठ्या असतात, गुळ आणि थोडी बडीसोप घातलेल्या गोड पुर्या टाइपच्या.
अजून एक संक्रातीच्या आसपास असतो उपास. त्यात मुलांसाठी कच्च्या तिळाचे लाडू करतात बहूतेक. याबद्दल जास्त माहिती नाहीये मला कारण या उपासाच्या आसपास मी कधीच सासरी गेले नाहीये. आम्हाला आमच्या नावाचे लाडू फक्त पाठवले जातात. (मी ते सुद्धा चाखले नाही, कारण लाडू सुद्धा फक्त मुलांच्याच नावचे असतात म्हणे. सुनांनी खायचे नसतात ते. :अओ:)
या उपासांच्या शिवाय आमच्या गावी केले जाणारे उपवास म्हणजे नवरात्र आणि शिवरात्र. नवरात्रात सप्तमीपर्यंत उपास करून अष्टमीला कंचक (कुमारिका) पुजतात.
दिल्लीत नवरात्रात उपासाची म्हणून स्पेशल थाली मिळते बर्याच ठिकाणी. पण दिल्लीतले पंजाबी व्रत का खाना म्हणून बरंच काय काय खातात. उदा. टॉमॅटो, दुधी, पालक आणि अजून बर्याच भाज्या. फक्त या भाज्या बिना कांदा-लसणाच्या आणि हळदी शिवाय करतात इतकंच.
आमच्या घरी मात्र हे पदार्थ चालत नाहीत उपासाला. आपल्याकडे चालणारेच सगळे पदार्थ सासरी पण चालतात. मी २-३ पदार्थच नेहेमी हौसेनी सासरी सगळ्यांना खाताना बघितलंय. साबुदाण्याची खीर (आताशा आमच्याकडून खिचडी आणि वडे शिकलेत बनवायला, पण उपासाला हमखास खीरच करून खातात), व्रत के आलू आणि सियोल म्हणजे आपला राजगीरा.
आज साबांनी त्यांच्या उपासानिमित्त व्रत के आलू बनवले होते. तर त्याची ही रेसेपी. तशी खूप काही स्पेशल नाहीये, पण मला खूप आवडतात या पद्धतीचे व्रत के आलू.
कृती:
बटाटे जरा जास्त मऊसर उकडून मध्यम आकाराच्या फोडी करून घ्यावेत. मसाल्याचे पदार्थ (तिखट आणि ओवा सोडून) तव्यावर थोडे गरम करून मिक्सरमध्ये वाटून घ्यावेत. कढईमध्ये फोडणीसाठी तुप (थोडंसं जास्तंच) घ्यावं आणि त्यात जीरे आणि ताजा केलेला गरम मसाला टाकावा. लगेचच बटाट्याच्या फोडी, तिखट,ओवा, मीठ घालून व्यवस्थित मिक्स करावे. यात चिमूटभर साखर घालावी. (साबा घालत नाहीत. ही माझी अॅडीशन आहे.). भाजी अगदी व्यवस्थित हलवावी. हलवतानाच चमच्याने थोडे बटाटे मॅश करावेत. नंतर कढईत भाजीवर घट्ट बसेल (अजिबात वाफ जाणार नाही. माझ्या साबा कढईच्या आत बसेल अशी छोटी ताटली वापरतात.) असं झाकण ठेवावं. २-५ मिनीटांनी कढईतून चर्र्र्र्र्र्र्र्र्र्र असा आवाज येईल. आवाज जास्त येवून भाजी करपते की काय वाटलं की झाकण काढून परत ५-७ मिनीट भाजी व्यवस्थित परतावी. भाजी व्यवस्थित खरपुस झाल्यासारखी वाटल्यावर गॅस बंद करावा.
या भाजीबरोबर नमकिन आणि मिठी सियोल्/सियुल (राजगीर्याच्या लाह्या) खातात. व्रत के आलू, नमकिन सियुल, मिठी सियुल असाच बेत असतो घरी.
नमकिन सियुल म्हणजे ताकातल्या राजगीर्याच्या लाह्या. दह्याचं जरा घट्टसर ताक करून त्यात मीर्याची पुड, हिरवी मिरची आणि पुदिन्याचं वाटप, मीठ आणि चिमुटभर साखर घालावी. नंतर यात राजगीर्याच्या लाह्या घालाव्यात. लाह्या फुलल्या की नमकिन सियुल तयार.
मीठी सियुल करताना दुधात राजगीर्याच्या लाह्या, साखर, किसमीस, बदाम-काजू (ओबडधोबड वाटून ) घालून शिजवतात. मिठी सियुल तयार.
उपास नसेल तर साबा व्रत के आलू बनवताना तुपाऐवजी सरसो का तेल वापरतात. आणि फोडणीत जीर्यांबरोबर थोडी भिजवलेली मुगाची आणि चण्याची डाळ आणि कढिपत्ता घालतात. बाकी पद्धत आणि मसाले सेम. या आलूंची खरी मज्जा त्यांना भरपूर परतल्यामूळे जो खरपुसपणा (साबांच्या भाषेत आलू करारे होने चाहिये) येतो त्यात आहे.
मस्त आहे पाकृ. मिठी मठ्ठी >>>
मस्त आहे पाकृ.
मिठी मठ्ठी >>> याचा उल्लेख बहुधा 'कभी खुशी कभी गम' मधे आहे काय असतं हे? गोड पुर्या का?
भारीच वेगळी..
भारीच वेगळी..
बटाटा अत्यंत आवडता असल्यानं
बटाटा अत्यंत आवडता असल्यानं नक्कीच करणार खरपुस बटाटे काय मस्त लागत असतील.
रच्याकने, बटाट्याचीच भाजी असल्यानं यात बटाट्यांऐवजी बटाटे घालू का हा प्रश्न येणार नाही
सिंडी, प** घालू का हा प्रश्न
सिंडी, प** घालू का हा प्रश्न येऊ शकतो. मग ती व्रत की भाजी राहणार नाही
मस्तच पाककृती आहे! लवकरच करता
मस्तच पाककृती आहे! लवकरच करता येईल.
>>बटाट्याचीच भाजी असल्यानं यात बटाट्यांऐवजी बटाटे घालू का हा प्रश्न येणार नाही
याच कृतीत बटाट्यांऐवजी खीमा घातला तर चालेल का?
मठ्ठी = मठरी. करवा चौथला
मठ्ठी = मठरी. करवा चौथला किंवा इतरही वेळा लग्नकार्यांमध्ये घरात मिठी आणि नमकिन दोन्ही प्रकारच्या साठवणीच्या मठर्या /मठ्ठ्या बनतात.
होई च्या उपासाच्यावेळी मात्र घारग्यांसारख्या ( भोपळा न घालता) गुळ आणि बडीसोप घालून (ती मधून मधून दाताखाली येणारी बडीसोप आणि खमंग गुळाची चव मस्त असते. आम्ही दिवाळीला घरी गेलो की आमच्यासाठी प्रसादाच्या काढून ठेवलेल्या मठ्ठ्या मिळतात खायला) केलेली जाड पुरी असते मिठी मठ्ठी म्हणजे. ही पण १०-१२ दिवस टिकतेच.
सिंडी, प** घालू का हा प्रश्न
सिंडी, प** घालू का हा प्रश्न येऊ शकतो. मग ती व्रत की भाजी राहणार नाही>> प** चालतं उपासाला.
हां आता मृण्मयीनी लिहिल्याप्रमाणे खिमा घातला तर मग व्रत की भाजी रहाणार नाही. (खरपुस परतलेला खिमा पण मस्त लागतो हां)
ओह्ह.. पनीर चालतं होय! खरंच
ओह्ह.. पनीर चालतं होय! खरंच नव्हतं माहिती.
खिम्याची आठवण...! असो.
अगं पनीर दुग्धजन्य आहे ना.
अगं पनीर दुग्धजन्य आहे ना. व्रत स्पेशल थाली मध्ये पनीर कबाब, आलू की सब्जी, कुट्टू के आटी की पुरी, सलाद, साबुदाणा खीर, सामक के चावल (भगर) इ. असतं.
मला खूप दिवसांपासून ही व्रत की थाली ट्राय करायची होती. परवा साबांबरोबर शॉपिंगला गेले असतांना त्यांना फुडकोर्टात व्रत की थाली खाऊ घातली. मी नुसत्या चवी बघितल्या. आपल्याकडचे उपासाचे पदार्थ हजारो-लाखो पटींनी चवीष्ट असताता त्या थालीपेक्षा.
मस्तं आहेत व्रत के आलू!
मस्तं आहेत व्रत के आलू!
अल्पना, राईट! लक्षात नाही आलं
अल्पना, राईट! लक्षात नाही आलं
पण पनीर असं परतायला घेतलं तर
पण पनीर असं परतायला घेतलं तर चिवट होइल तेव्हा ते बादच
रच्याकने, ठाण्यात एका ठिकाणी बडिशेप घातलेली गूळपापडी मिळते, अशक्य भारी लागते. त्यामुळे तू म्हणतेस तशा पुर्यांच्या चवीची कल्पना आली.
अरे वा .. उपासाच्या
अरे वा .. उपासाच्या पदार्थांची माहिती मस्तच लिहीली आहे ..
मला कुठल्याही भाज्या परतून खरपूस वगैरे करता येत नाहीत .. पेशन्स् कमी पडतो ..
उपास म्हणजे पेशन्स हवाच
उपास म्हणजे पेशन्स हवाच
बट्टू अतीप्रिय; त्यामुळे करून
बट्टू अतीप्रिय; त्यामुळे करून पाहीन. मला असं वाटतं की कढईपेक्षा खोल तव्यात केली तर जास्त खरपूस होईल.
नमकीन सियुलही इंट्रेस्टिंग वाटतंय. आपल्याकडच्या कडक उन्हाळ्यात गार ताकात मसाले + राजगिर्याच्या लाह्या हे कॉंबो मस्तच लागेल. दहीबुत्तीऐवजी अजून एक चांगला अन पटकन होणारा पर्याय.
एक प्रश्न - या नमकीन सियुल ची कन्सिस्टंसी कशी असते? पळीवाढ की अजून दाट?
रेसीपी शेअर केल्याबद्द्ल धन्यवाद!
अल्पना, खूप मस्त माहिती
अल्पना, खूप मस्त माहिती लिहिली. पाकृचे अगदी ललित झाले
तुझे सासर पंजाबी आहे का?
राजगिर्याची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. दुध दही वा ताकात राजगिरा खाऊ शकतो हे मला माहिती नव्हते.
अल्पना, तू इकडची टोमॅटो
अल्पना, तू इकडची टोमॅटो घातलेली साबूदाण्याची खिचडी खाल्ली आहेस का? बापरे ! काय भयंकर लागते. साबुदाणा कसा भिजवावा आणि खिचडीत काय टाकू नये याची एक नियमावली झंडेवाला मंदिराने प्रकाशित करायला पाहिजे.
सध्या इथे नवरात्र चालू आहेत.( गुडी पाडवा ते राम नवमी असा कालावधी) त्यामुळे ऑफिसमध्ये सगळ्यांच्या डब्यात उपवासाचेच पदार्थ सापडतात. त्यापैकी मला भगरीची ( वर्याचे तांदूळ - सामक के चावल) खीर फार आवडली. कृती टाकेन सवडीने
मस्त अल्पना! भरपूर
मस्त अल्पना!
भरपूर परतल्यामूळे जो खरपुसपणा>> चव अगदी जीभेवर तरळली. लवंग दालचिनीचा स्वाद मस्त लागेल बटाट्यांबरोबर.
खीमा 'करारे होने चाहिये' हा बार गाठू शकेल का?
मस्त आहेत व्रत के आलू. करून
मस्त आहेत व्रत के आलू. करून पहाता येईल. माहितीही रंजक आहे.
दुध दही वा ताकात राजगिरा खाऊ
दुध दही वा ताकात राजगिरा खाऊ शकतो हे मला माहिती नव्हते.>> बी अगदी अगदी .. मलापन नव्हत माहिती .
बापरे किती कै कै चालत उपासाला.. माझ्या घरी मी करायला गेली तर .. लवंग , दालचीनी , मीरे बाद ..
पुदिना नै जमत .. रादर फक्त आणि फक्त साबुदाणा , आलु , राजगिरा आणि शिंगाडा बस .. मसाला मधे फक्त जीरं आणि लाल हिरव्या मिरच्या .. फळ संपल..
तरी डिश आवडली .. वास्तविक आलु एवढे आवडत नै पण खायला मज्जा येईल अस वाटतय
अल्पना, मस्त रेसिपी. अशीच
अल्पना, मस्त रेसिपी. अशीच रेसिपी मध्यंतरी वहिनीने शेअर केली. त्यात सुके खोबरे, धणे, जिरे, लवंग, दालचिनी, बडीशोप हे तव्यावर / कढईत जरा वेगवेगळे परतून त्यांची मिक्सरमध्ये पूड करायची. उकडलेल्या बटाट्याच्या फोडी तुपात / तेलात फोडणीत घालून मग त्यावर ही पूड घालायची. खरपूस परतायचे. चवीनुसार मीठ, हवा असल्यास थोडास्सा गूळ आणि वरून भरपूर कोथिंबीर. मस्त चव लागते.
मी नेहमीची उकडलेल्या बटाट्याची भाजी करताना आजकाल फोडणीत धणेपूड घालून परतते व त्यात बटाट्याच्या फोडी घालते. खरपूस, खमंग होते भाजी!
रच्याकने, व्रताला पनीरपासून
रच्याकने, व्रताला पनीरपासून बनवलेल्या रोशोगोल्ला, साँदेश वगैरे मिठायाही चालतात (असं ऐकलंय!)... एका महाशिवरात्रीला अहमदाबादेत असताना, हलवायाच्या दुकानातील फराळी चिवडा, फराळी पकौडे, फराळी पुरी सब्जी सोडून फक्त व फक्त रसगुल्ले खाऊन उपवास केला होता!
मस्त रेसिपी
मस्त रेसिपी
एक प्रश्न - या नमकीन सियुल ची
एक प्रश्न - या नमकीन सियुल ची कन्सिस्टंसी कशी असते? पळीवाढ की अजून दाट? >> पळीवाढ. वाटीतूनच घ्यायचं खायला. करताना किंचीत पातळ ठेवायचं, कारण लाह्या फुलल्या की अजून दाटपणा येतो.
दिल्लीत व्रताला काहीही चालतं बहूदा. मी व्रत स्पेशल म्हणून पालक घालून कुट्टूचे पकोडे खाल्लेत शेजारणीकडून. फणसाची कांदा-लसूण,हळद विरहीत टॉमॅटो घातलेली भाजी पण खाल्लीये. परवा रेडिओवर एक बाबा उपासाला खायच्या पदार्थांची यादी सांगत होता. त्यात बटाटा, भोपळा, दुधी, दोडके, टॉमॅटो, फणस, अरवी, शलगम आणि चक्क वांगी पण सांगितली त्यानी. वांग्यांचं नाव ऐकल्यावर मात्र मी चॅनेल बदललं.
हो बी, माझं सासर पंजाबी आहे.
उपवासाच्या पदार्थांची यादी
उपवासाच्या पदार्थांची यादी
रेसीपी वाचायला मस्त वाटतेय कोणी करून दिली तर खायलाही मस्तच वाटेल
मिठी सियुल करताना त्यात
मिठी सियुल करताना त्यात तुपावर भाजून वाटलेली खसखस पण घालतात अशी अॅडीशन साबांनी आत्ता सांगितली आहे.
मस्त प्रकार.. आणि राजगिरा
मस्त प्रकार.. आणि राजगिरा उपासासाठी आदर्श पदार्थ आहे.
मस्त पाककृती. "आलू करारे होने
मस्त पाककृती.
"आलू करारे होने चाहिए" हे मात्र एकदम खरं खरपुसपणामुळे जी चव लागते आहाहा.......
मस्त रेसिपी..
मस्त रेसिपी..
अल्पना, मस्त रेसिपी. "आलू
अल्पना, मस्त रेसिपी.
"आलू करारे होने चाहिए">>> हे भारी आहे
Pages