समद्या सातारा जिल्हयची खादाडी

Submitted by गौतम७स्टार on 22 June, 2009 - 10:51

मित्रहो,

आपल्या साताराची खादाडी ईथे सान्गा.

१ पेढे

आशोक मोदी, लाटकर स्वीट मार्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

यात मनाजोगे खायला मिळते. >> अगदी अगदी योगेश.. मी एक वर्ष त्यावरच जीवंत होतो कराड मधे..
त्यात फिस्ट्/स्वीट डिश लै भारी असायची, आणि तुंबडुन खायचो आम्ही... कारण कॉलेज ची मेस एकदम फालतू होती.

सज्जन्गडावरचे प्रसादाचे जेवण खुप चांगले असते असे ऐकले आहे..तसेच गोंदवल्याचे सुद्धा.

गोंदवल्याचा प्रसाद अगदी अप्रतीम... फक्त वेळेत आपण तिथे असणे एवढेच महत्वाचे...
सज्जनगडावर ७०० पायर्‍या चढून गेल्यानंतरच खरी प्रसादाची चव समजते.. खूपच छान,
अक्कलकोटच्या प्रसादाची देखील तुलना होऊ शकत नाही..

.

.

कराडला असले मेसवाले खुप होते आमच्या भागात. आबुचा पोरगा पराडकर क्लासेसमधे माझा विद्यार्थी होता त्यामुळे इंजिनीरिंग कॉलेजला शिकवत असताना कधी जर आबुच्या कँटिनला गेलोच तर पैसे नाही घ्यायचा. काहिपण खावा मॅडम अशी 'ट्रिटमेंट' होती.
कोल्हापुरला होस्टेलला असताना जेवणाची प्रचंड वाट लागलेली. आणि आम्हाला होस्टेलची मेस कम्पलसरी होती Sad लै वाईट दिवस होते.

.

बजेट हाही प्रकार असायचाच ना रे. म्हणजे पप्पांनी दिलेल्या महिन्यच्या बजेटमधे ३०० रुपये मेसला घालवायचे मग कय शिल्लक असेल त्यात कराडला जायच्या यायच्या बसचे भाडे आणि मग उरलेल्या पैशांची चैन असा प्रकार होता Happy त्यातुन रूमवर स्टोव चालायचा पण हॉटप्लेट आणि गॅस चालायचा नाही त्यातुन अजुन म्हणजे रॉकेल मिळवणे वगैरे जिकिरीचे होते. एकुणातच हॉस्टेलमधले रहाणे आणि आठवणी असा बी बी काधायला हवा!

.

कोल्हापूरला तुझी जेवणाची वाट का लागावी? >> योग्या मिनोतीचे बरोबर असेल.. कारण कोल्हापुरात मेस अश्या चांगल्या नाहीत.. त्यात शाकाहारी लोकांची लय वाट लागते रे..कारण काही अपवाद वगळता कराड्-कोल्हापुर सातारा भागात पुण्या सारखे शाकाहारी जेवण विशेष चांगले मिळत नाही हा माझा वैयक्तिक अनुभव.. Sad

त्या कॉपरेटिव्ह मेस च्या बाया मधल्या मधे वस्तु मारायच्या, पण त्याशिवाय दुसरा option पण नव्हता..आणि त्याची सगळ्यात चांगली गोष्ट कुठली असेल.. तर गरम-गरम पोळ्या तव्यावरुन काढुन डायरेक्ट पानामधे मिळायच्या Proud ..दोन घास जास्त जायचे तेवढेच.. भाकरी पण असायची कधी-कधी...

.

कराड चे डायनिंग हॉल्स जास्त माहित नाहीत.. पण पंकज मधे खुप वेळा पार्ट्या व्ह्यायच्या तेव्हा जायचो..
कोल्हापुरात शाकाहारी डायनिंग हॉल्स तसे अजूनही कमीच आहेत...आणि तू म्हणाला तसे, जे आहेत ते जास्तकरुन जैन-गुजराथी पद्धतीचे आहेत .. (जैन-गुजराथी लोक खुप आहेत कोल्हापुरात)

अरे आम्ही पण चटणी, तूप, लोणची वगैरे न्यायचो पण आम्हाला रूमवर ताटे आणायला परवानगी नव्हती. सकाळी चपाती, उसळ, आमटी, भात आणि दही हा 'मेनु' होता आणि रात्री पाणीदार वरण, भात, भाकरीचे रोट आणि कसलासा पाला भाजी म्हणून. भाकरी मला रोज घरी खायची सवय होती म्हणुन त्याचा त्रास व्हायचा नाही पण बाईच्या मैत्रीणीना प्रचंड त्रास व्हायचा. आणि आम्हाला ७.०० चा कर्फ्यु होता शनिवारी-रविवारी ७.३०. त्यामुळे त्याच्याआत बाहेरुन काही खाउन आले तरच नाही तर सकाळी ७ पर्यंत जगाशी संपर्क नसे!

हे सगळे आपण लिहुन काढुया कुठेतरी.

.

सज्जनगडावर नुकतेच जाऊन आलो.. प्रसादाच्या वेळी..
गरम भात, आमटी, वाटाण्याची उसळ आणि हरबर्‍याच्या डाळीची खीर होती प्रसादाला. अगदी तृप्त! Happy

पुरुषमंडळींना शर्ट वगैरे काढून बसायला लागते, ते मात्र अनेक जणांना अवघड वाटले! Happy

.

गोंदवल्याला प्रसादासाठी पानात पहिले वाढप पूर्ण होईपर्यंत 'जय जय श्रीराम' या मंत्राचा सामूहिक घोष करायला लावतात. >>> हो, हेही होते सज्जनगडावर.. मस्त वाटतं Happy

आता वाटतं लोकांना अवघड, काय करणार? Happy तिथल्या स्वयंसेवकांनी तसे सांगितल्यावर अनेक जण गोंधळले.. अनेकांना दोनदोनदा सांगावं लागलं.

.

गाडी परत सातार्यातील खादाडी कडे वळवा....कोल्हापुरात अंबाबाई च्या मंदीरा भोवती पेढे चांगले मिळतात, नाही....
आणि हो, माझे हॉस्टेल वरचे दिवस असा बा.फ. काढण्याची कल्पना मस्त आहे....चला, कोण काढतयं? कोणी नसेल तर मीच काढ्तो.....

.

कोल्हापुरात अंबाबाई च्या मंदीरा भोवती पेढे चांगले मिळतात?.... हो का? मला नव्हत माहित!
तिथे भवानी मंडपात चाट खुप सही मिळतो.... खुपदा खाल्लाय.... १ नंबर!

कोल्हापुरल अंबाबाईच्या देवळात दगडू बाळा भोसले यांचे पेढे अप्रतीम मंदिरातून महाद्वारातून बाहेर पडले की डाव्या बाजुला त्यांचे दुकान आहे. नलिनीच्या समोर.

आणि स्वरूप म्हणतो तसे विद्यापीठ हायस्कूल समोरील चाट.

.

.

खादाडी ला विकांताची सुद्धा सुट्टी नाही वाटते...
जोरात आहे... महाबळेश्वरचे फुटाणे खादाडीच्या यादीमध्ये वाढवा..
आणी डीसेंबर्/जाने. मध्ये मिळणारी रेवडी आणी चिक्की सुद्धा...

रेवडी आमच्या गावच्या(खंडोबाची पाली) यात्रेत खुप मस्त मिळते.....

कास रस्त्त्यावर प्रकृती रिझॉर्टमध्ये "पौष्टिक भेळ" खुप छान मिळते म्हणे.....
तिथला खास महाराष्ट्रीयन मेनु पण मस्त असतो Happy

Pages