समद्या सातारा जिल्हयची खादाडी

Submitted by गौतम७स्टार on 22 June, 2009 - 10:51

मित्रहो,

आपल्या साताराची खादाडी ईथे सान्गा.

१ पेढे

आशोक मोदी, लाटकर स्वीट मार्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

१दम बरोबर योगेश ...

गावकर्र्यानो, प्रतिसाद द्या हो !!!

Happy

शुक्रवार पेठेत स्थालीपाक नावाचे एक घरगुती जेवण देणारे धनींचे मेस टाईप रेस्टॉरंट आहे. तिथे ४०-५० लोकांचे कार्यक्रम नीट करता येतात. साधे सुधे मराठी जेवण ही यांची खासियत होती. आता जेवण एकदम बकवास करतात. मी घरातील २ कार्यक्रम येथे ठेवले होते. दोन्हि वेळेला जेवण एकदम बकवास. त्याच पैशात प॑कज / अल॑कार ला जेवण देता आले असते. वाढताना एकदम पुणेरी स्टाईल चमच्याने वाढणार. वाढपी तर चुकुन जास्त वाढले आणि वेळेत वाढले तर मालक आपल्याला पगार देणार नाहीत असे वाढ्तात. मी कमीतकमी १५ कार्यक्रमा साठी तेथे गेलो आहे पण कायम हाच प्रकार. पैसे गेल्याचे वाईट वाटत नाही पण service & quality तशी पाहिजे ना.
हा माझा Personal Experiance आहे. तुमचा कदाचित वेगळा असु शकतो.

.

मला अभयच्या पोस्टमधे काही चुकीचे वाटले नाही. त्याला जे अनुभव आले ते त्याने लिहीले. मला तरी काही उताविळपणा वाटला नाही. पुणेरी स्टाइल हे जनरल विधान आहे आणि पुण्यात अशा जागा भरपुर आहेत. तेव्हा अभयची पोस्ट हा वादाचा विषय नाही.

मंदार

योगेश,
एकदा वाईट अनुभव आल्यावर मी तर परत जाणे शक्य नाही पर॑तु इतराना तोच अनुभव येउ नये म्हणुन लिहले आहे. जसे आपण चा॑गले पदार्थ कुठे मिळतात ते सा॑गतो तसेच कुठे मिळत नाहीत हे पण सा॑गायला पाहीजे. प्रत्येक वेळी अक्कल विकत घेउ नये असे मला वाटते. पुणेरी स्टाइल हे सर्वसामान्य जनरल विधान आहे आणी खुप जणानी त्याचा अनुभव सुद्धा घेतला असेल. पुण्यात ली मेरिडियन पासुन आगदी बादशाही बोर्डीग पर्यत सगळीकडचा अनुभव घेतला आहे. पण पुणेरी स्टाइल बद्दल माझे मत कायम आहे. आणखी महत्वाचे म्हणजे हा माझा Personal Experiance आहे. तुमचा कदाचित वेगळा असु शकतो असे मी पहिल्या॑दाच सा॑गितले आहे.

.

इथे खादाडी संपुन वादाडी सुरू झाली कि काय ? Happy
मला कराड सातारा रोडवरच्या एका ढाब्यावरचा अख्खा मसूर खूप आवडला होता.
ढाब्याचे नांव लक्षात राहीले नाही. पण बहुतेक फार प्रसिध्द असावा. बरीच गर्दी होती. Happy
मी तसा अख्खा मसूर घरी करायचा खूप प्रयत्न केलाय पण कधीच जमला नाही ! Sad
______________________________________________
प्रकाश

अरे प्रकाश... वाईट वटुन घेऊ नकोस. हॉटेल सारखे पदार्थ जर घरी करता आले असते तर हॉटेल चालले असते का?
.... हॉटेल सारखा साधा चहा सुध्दा करता येत नाही.

Pra

प्रकाश,
कराड- पाटण रोड ला लागुन शिवराज ढाब्यावरचा अख्खा मसूर चा॑गला आहे. मला तो आवडला. तसेच तिथला बैगन मसाला पण चा॑गला आहे. शिवाय सोबत मटक्यातील दही. पदार्थ स॑ख्या कमी आहे पण क्वलिटी चा॑गली आहे.

प्रकाश, कुठे आहेस सध्या ?
तुझे फुलांचे फोटोग्राफ्स मस्त होते !

अरे पुणेरी स्टाइल मधे नुसतेच वाद घालु नका. कराडच्या स्टाइल मधे तरी भांडा. आणि हो पुणेरी स्टाइल वरुन कोणाला मिरच्या झोंबु नयेत. पुण्यात सर्व जण बाहेरुन आलेले आहेत.
असो....
पुसेसावळीला पुंड्या उसाचा रस फार छान मिळतो प्या आणि शांत व्हा.
... पंकज.

कराडच्या स्टाइल मधे तरी भांडा. >> कराडच्या स्टाईलने ऑनलाईन भांडता येत नाही.. Wink

.

योगेश, मर्दा सतार्‍याच्या माणसानं एवढं मनावर घेवू नी! Happy
अभय हो बहुधा तू म्हणतोस तोच ढाबा असावा. कारण मटक्यातलं (सायवालं)दहीही होतं बरोबर.
मनोज, धन्यवाद.....काय आजकाल कर्‍हाड्चा बाफ बंदच पडला कि काय ?

कराडकरानो असे भा॑ड्ताय काय? बघितले तर कराडातली खादाडी गजानन होटेल पासुन चालु होते आणी बॉम्बे होटेल पाशी स॑पते. स॑गम, प॑कज, गजानन आणी बॉम्बे होटेल सोडले तर नाव घेण्यासारखे कोणते होटेल आहे का? बरे या चार होटेल ची स्थिती वासरात ल॑गडी गाय शहाणी अशीच आहे. तेव्हा जेथे सा॑गण्यासारखे नाहीच आहे त्या साठी भा॑ड्ताय काय? डबक्यातुन बाहेर बघा........

टण्या, मिरजेत मार्केटात 'गोल्डन भेळ' येथे चांगली भेळ मिळते, (आता हे म्हणु नका की मिरजेत चांगली भेळ मिळतच नाही. मिळते हो तिथे पण :))बाकी या मताशी सहमत आहे.
मला पुण्यात कुठेही चांगली भेळ मिळाली नाही, आत्ता 'कल्याण भेळ' खायची आहे, बघू.

बाकी सातार्‍यात खाण्याच योग कधी आला नाही. पण येथील कंदी पेढे आवडतात.

कराड च्या होटेल बद्द्ल बरेच वाद दिसताहेत. मी आता कराडातील एक एक होटेल मधे जाऊन आपणास लेटेस्ट माहिती पुरवतो.

.

आर काय राव.
आमच्या वाईची मिसळ , नाव आठवत नाही . चौकातली. आणि जुन्या यष्टी स्टँड समोरची. बहुतेक हॉटेलच नाव लकी होत. पुलावरच्या गण्पती समोरच्या खाणावळीत्ले जेवण म्हणजे नुसता जाळ.
शिवाय खामकरांचे कंदी पेढे आणि कलाकंद.

.

मीही इंजिनीयरींग ची चार वर्ष कराडला होतो. अबुच्या कँटीन मधली मिसळ कित्येक वेळेला (ईलाज नव्हता म्हणुन) खाल्ली. अजून आहे का अबु ची कँटीन?
त्याकाळी हॉटेल पंकज आणि संगम जोरात होते. आणि स्टँड समोरचं अलंकार्...आमचीही कोऑपरेटीह्व मेस होती...फार्मसी कॉलेज ची काही मुलं आणि काही इंजिनीयरींग कॉलजची मिळून....

को ऑप्रेटिव्ह मेस काय प्रकार आहे / होता ?
कराडला एस्.जी.एम. कॉलेजला कमवा आणी शिका वाले विद्यार्थी कँटीन चालवत होते हे मला माहीत आहे. आणी सायन्स कॉलेजच्या बाहेरील शेट्टीला पण विसरु शकत नाही.

.

Pages