समद्या सातारा जिल्हयची खादाडी

Submitted by गौतम७स्टार on 22 June, 2009 - 10:51

मित्रहो,

आपल्या साताराची खादाडी ईथे सान्गा.

१ पेढे

आशोक मोदी, लाटकर स्वीट मार्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राजतारा मधे भाकरी थाळी घ्या त्यात येणारा शेंगदाण्याचा महाद्या माझा ऑल टाईम फेवरेट.
साधे जेवण हवे असेल तर नाक्यावरचे मराठा खानावळ (शाकाहारी) ज्वारीची भाकरी + मटकी उसळ + आमटी भात + एखादी कोरडी भाजी आणि ताक.
पेशवाई भेळ - कणसे ढाबा - मोदींचे कंदी पेढे - पालेकर जिरा बटर/ टोस्ट

शेंगदाण्याचा महाद्या उर्फ दाण्यांची आमटी उर्फ शेंगदाण्याचे पिठले ह्या वस्तुबरोबर मी १०० भाकरी खाऊ शकेल ! ( पिताश्रींना ते डोळ्यासमोरही नको असते )

Me khup aikle aahe ya "Mahadya" baddal. Konala mahit asel tar / jyala mahit aahe tyala vicharun yachi recipe takal ka plz.....

सातार्याची ट्रीप मस्त झाली. सोबतीला खादाडीही Happy

शनिवारी संध्याकाळी आम्ही मोती चौकात गेलो होतो. तिथे मसाले दुधवाला रात्री १० नंतर बसतो असे कळले.
तेवढा वेळ थांबणे शक्य नव्हते, म्हणून तिथुन जवळच असलेल्या राजवाडा चौपाटीवर गेलो. (चौपाटी म्हणजे खाऊ गल्ली)

चायनीज, वडापाव, भेल, दाबेली, आईसक्रीम, मसाला दुध अश्या खुप सार्या गाड्या लागलेल्या होत्या. त्यात एका गाडीवर भयंकर गर्दी दिसत होती. गाडी वरच्या पाटीवर लिहिले होते "सुपनेकरचा सुप्रसिध्द वडा"

गर्दीत घुसुन चिनीमातीच्या वाटीत बटाटेवडा नि चटणी मिळवला. १० रुपयाला एक वडा (साबुदाणा वडा किंवा बटाटा वडा) असा दर.

बटाटा वडा एकदम खमंग आणि क्रिस्पी होता. साबुदाणा वडा देखील मस्त होता. इथे मिळणारी चटणी युनिक आहे.

नंतर ऑल इंडिया भेल कडे मोर्चा वळ्वला. भेल मस्त होती. स्पेशल भेल उर्फ झंकार भेल मात्र खुप झणझणीत असते. इथल्या भेलच्या लिस्टच्या पाटीवर झंकार भेल असं लिहीलेले नव्हते. म्हणून आम्ही त्या विषयी विचारले . त्यांनी हे नाव कसे कळले असे विचारले. इंटरनेट वर वाचले असे सांगताच भेलवाले काका गालातल्या गालात हसुन म्हणाले की झंकार भेल म्हणजेच स्पेशल भेल!

वर मराठा खाणावळीचा उल्लेख आला आहे. हे ठिकाण आमच्या लिस्ट मध्ये नव्हते. राजवाडा चौपाटीवरुन रुमवर परत जाताना रिक्क्षावाल्याला विचारले की साधे आणि घरगुती जेवण कुठे मिळेल, तेव्हा त्याने हे "मराठा खाणावळीचे" नाव सुचवले. साधे पण रुचकर जेवण!

रविवारी संध्याकाळी पोवई नाक्यावरचा राज पुरोहितचा समोसा खाल्ला. समोश्यात डाळिंबाचे दाणे, मनुका टाकल्या होत्या. मला आवडला नाही.
पेशवाईची भेल मस्त होती. शिवाय दुकान देखील स्वच्छ आणि हायजेनिक!

रात्री कणसे धाब्यावर गेलो होतो. बांधकाम चालले होते. तेव्हा बाजुच्या पत्राच्या शेडसारख्या जागेत जेवायला बसलो. मित्र मित्र होतो म्हणून ठीक पण सहकुटुंब जाण्यासाठी ही जागा ठीक नाही वाटली. तसा अंडर कंस्टक्शन बिल्डींग मध्ये एका हॉलला फॅमिली रुममध्ये कन्व्हर्ट केले होते. पण तिथे गर्दी खुप होती.

इथला काजु मसाला मस्त होता. काजु भरपुर घातले होते. अक्खा मसुर ठीक वाटला. दाल तडका संपला होता. बाकी जेवण चांगले होते.
कणसे धाबा बराच दुर आहे. रिक्शाने गेलो होतो. रिक्शावाला पण म्हणत होता की कणसेची क्वालिटी आता पहिल्यासारखी नाही राहिली. आम्ही पहिल्यांदाच जात असल्याने खरे खोटे माहित नाही, पण बहुधा ते खरं असावे.

बाकी सातार्यातली माणसं एकदम चांगली आहेत. पत्ता विचारला की नीट मदत करतात. रिक्शावाले देखील उगीच अव्व च्या सव्वा भाडे सांगणे, लांबच्या रस्त्याने फिरवणे अशी फसवणूक करत नाहीत. (अर्थात हे माझे वैयक्तिक मत Happy )

Pages