समद्या सातारा जिल्हयची खादाडी

Submitted by गौतम७स्टार on 22 June, 2009 - 10:51

मित्रहो,

आपल्या साताराची खादाडी ईथे सान्गा.

१ पेढे

आशोक मोदी, लाटकर स्वीट मार्ट.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नन्दिनी ते प्रान्जली असेल बहुतेक. तिथला थाट पन अगदी अस्सल मराठी. जेवन पन चान्गले आहे. कनसे नी कल्याण रेसोर्ट सुरु केले आहे. धाब्यावर फॅमिली न्यायला नको वाटते पन तिथल्या कजु करी ची सर कशालाच येत नाही. तशीच काजु करी त्यान्नी कल्याण रेसोर्ट वर बनवायचा खुप प्रयत्न केला पन जमला नाही. सन्तोष रजताद्री ची क्वालिटी एवढी राहिली नाही. वर यवतेश्वर च्या पुढे कधी गेलात तर व्हॅली व्ह्यु नावाचे एक होटेल आहे. बसण्यासाठी सुन्दर लोकेशन. त्याची थाली चान्गली असते. कन्हेर डॅम च्या बॅक वॉटर चा व्ह्यु आहे.

योग्या,
त्या गणेश राजस्थानी धाब्याचे नेमके ठिकाण सान्ग. उम्ब्रज सम्पल्यावर एक पुल आहे, नन्तर मसुर फाटा लागतो, तिथुन जवळपास आहे का?
पुण्यातुन निघाल्यानन्तर भुइन्ज नन्तर पुल ओलान्डला कि विरन्गुळा नावचे एक होटेल आहे. तिथे पन नाश्ता चान्गला मिळतो. BP च्या पेट्रोल पम्पाला लागुनच आहे विरन्गुळा.

यशवंत,
कराडला शिवराज ढाबा सुद्धा फक्त अख्खा मसूर साठी प्रसिध्द आहे, पाटण रोडला,
तिकडे सुद्धा जाऊन ये गेलास तर, आणी गणेश ढाबा नावात 'ठाकूर' बघून सुद्धा ओळखता येईल.

योग्या, मनोज व्ही ,
धन्यवाद. पुण्यातुन निघल्यावर कुठे जेवायचे हा नेहमीचा प्रश्न. सातारा गावात बरेच पर्याय आहेत पण एक तास सहज मोडतो. RTO office समोर एक हॉटेल आहे तिथे नाष्टा चान्गला मिळतो. कराड च्या अलिकडे अन्नपुर्ना मध्ये एकदा गेलो पन काहीच आवडले नाही. संगम व पंकज मधले खाणे आवडले.

पूर्वी ( हायवे सिंगल असतांना) सातार्‍याला गेलो आणि उशीर झाला तर राजतारा नावाच्या एका हॉटेलमध्ये कधी कधी रहावे लागे, त्यांच्या रेस्टॉरंटमध्ये गावरान कोंबडी आणि शेंगदाण्याचा म्हाद्या नावाचा पदार्थ चांगला मिळत असे.

मायबोलीकर आणी सातारकर, सगळ्याना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

आरे दिवाळीलातरी खादाडी बाफला मते मांडा !!!

>>कराडला शिकायला असताना आम्ही मेसवर जेवायचो. त्यावेळी संगम सारख्या हॉटेलांत जायची भीती वाटायची.
सहमत!!!

>>>>रजताद्रिपेक्षा कराडच्या चावडी चौकातल्या बॉम्बे रेस्टॉरंटमधील आंबोळी बेश्ट वाटली. कारण सोबत मिळणारी डाळ्याची चटणी. पण आता ती चव राहिली असेल की नाही, कुणास ठाऊक?
योगेश, अजूनही त्या आंबोळीची चव खरच मस्त आहे.....

कराडच्या घाटावरच्या भेळेसाठी वेडी आहे मी..... आईशप्पथ!!!! इतकी चटपटीत भेळ खाल्ली नाही कुठे अजून......

तू कोल्हापूरची राजाभाऊची भेळ किंवा सांगलीची भडंग भेळ, पाणीपुरी, एसपीडीपी >>
योग्या , कसली कसली नाव घेतोय्स रे... लाळेरे पण देत जा अश्या पोस्ट नंतर.. Proud
राजाभाउच्या भेळेचा खरच नाद्खुळा Happy , पण कराड ला घाटावर ची भेळ खाण्यात पण वेगळीच मजा यायची हे मात्र खर..

यावेळी रंकाळ्याला गेलो की नक्की खाईन Happy

सातारला धावडे बन्धु (राजवाडा चोपाटी) आणी स्वाद ईविनिंग स्पोट (४ भिंती) येथे पण मस्त भेळ मिळते.

योगेश,
मी कोल्हापूरची राजाभाऊची भेळ खाल्ली आहे..... मी कोल्हापुरात डिप्लोमाची तीन वर्षं असचं "खादियात्रा" करत घालवली..... आणि त्या भेळेमुळे मी कराडच्या भेळेला miss केलं नाही....

राजारामपूरी १ ल्या गल्लीत जे भेळ-चाटचे गाडे लागतात ना, तिथला रगडा अप्रतिम असतो.....
तिथेच एक फालुद्याची गाडी लागते.... १ नंबर!!!!!!!! दुसरा शब्दच नाही!!!!!

पण काहिहि म्हटलं तरी कोल्हापूरच्या तांबड्या-पांढरया रस्श्याची चव दुसर्या कुठल्याच गोष्टीला येत नाही.....पद्मा वाले तर नाद खुळा!!!!!!!!!!!

गौतम, सातारची चारभिंती जवळ मिळणारी भेळ खाल्लीये... पण इतकी नाही आवडली... बहुतेक भेळेबाबत जिभेचा अनुभव जास्त असल्याने झालं असेल...

कराडला Y.C. College जवळ एक वडापावची गाडी लागायची. छान वडापाव मिळायचा तिथे....
अजून आहे का नाही कोणास ठाऊक????

नमस्कार,
मी नंदकुमार केळकर, केरळ मधील कोचीन या मध्यवर्ती ठीकाणी आमचे होम-स्टे आहे.
ज्याचा लाभ खुप लोकांना झाला आणी होत आहे. आपणाला पण तो व्हावा
म्हणुन त्याची माहिती पाठवत आहे.आपल्याला शक्य असल्यास ही माहिती
आपल्या परिचीत लोकांना तसेच मित्रमंडळींना कळवा.
अधीक माहितीसाठी सोबत एक फाईल जोडत आहे.
तसेच या लिंक पण तपासुन बघा
http://jahirati.maayboli.com/detail.php?id=1015
अथवा
http://nkelkar.spaces.live.com/

कळावे आपला विश्वासु
नंदकुमार केळकर

नमस्कार मंडळी........
सातारकरांनी खादीयात्रा बंद केली की काय?????
परवा मी "गडबड आईसक्रीम" खाल्लं...... हा प्रकार एव्हढा आवडतो ना मला की बस्स!!!!!!!!!!!

परवा मी "गडबड आईसक्रीम" खाल्लं >> ही काय भानगड आहे, पहिल्यांदाच नाव ऐकतोय. कुठे मिळेल अजुन माहिती अपेक्शीत आहे.

बाकी, तिकडे general बाफवर राजमलाई चोकलेट ची धूम आहे, ते सातार्‍यात पण मिळायचे आधी, कुणी खाल्लय का?

.

वाईला अल्टीमेट वडापाव मिळतो - तसा वडापाव कुठेच नाही खाल्ला!
प्रीती स्वीट होम वाल्याचे पेढे.
चौकातल्या खामकरांची मँगो मलई बर्फी..
खर्‍यांच्या चकल्या..
चिरोटे (हे करणार्‍यांचं नाव विसरले आत्ता लिहिता लिहिता.. आठवलं की टाकेन)
आणि गावातल्या कित्येक घरात होणारे भन्नाट पदार्थ (पण ते 'पब्लीक' नसल्यानं नाव नाही टाकतेय)

सातारच्या महाराजा हॉटेल मधे छान जेवण मिळतं - पण कधीच गर्दी नाही पाहिलेली तिथे!

कराडचं 'गोरे बंधू भडंग' (आणि भोरे बंधू सुद्धा Wink )

तशी खेड शिवापूरच्या कैलास हॉटेलातली भेळ खाल्लीये का? सुकी भेळ इतकी मस्त लागू शकते हे खाल्लं नसतं तर खरच नसत वाटलं.. ते भेळेला एक वेगळ्या प्रकारचा चिवडा वापरतात.. त्यात फक्त कांदा - मिरच्या - खूप खूप लिंबू पिळून! भन्नाट!

Pages