निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!
मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!
कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!
धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:
ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.
परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!
गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्याखुर्या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!
..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!
(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

ओह....अस्सं आहे काय्?अब ह्म
ओह....अस्सं आहे काय्?अब ह्म पुदिनेका जंगल लगाउंगा उस घूसके बीळ्के बाहर....अब हम नही छोडूंगा..
ठान्कू आदिती.
Dinesh, "I"don't like to read
Dinesh, "I"don't like to read on crome. The font is weird
So whenever I have to write something,I have to use crome ,login in and then type.
I don't use crome for maayboli browsing.I use explorer.
Sorry for english.
अदिती, माझ्या लॅपटॉपवरुन
अदिती, माझ्या लॅपटॉपवरुन वेगळाच त्रास आहे, मला प्रतिसाद मराठीतुन देता येत नाही पण संपादन मात्र मराठीत करता येते. मग आधी . द्या, आणि मग ते संपादित करा
आपल्याकडे दक्षिणेत शोलाज आहेत, निलगिरी पर्वतावरचे जंगल हे शोला या कॅटेगरीत येते. शोला म्हणजे साधारण सदाहरीत. जशी रेन फॉरेस्टस असतात तशी. तिथे पानगळ असते पण पुर्ण झाड उघडीबोडके होत नाहीत.
सह्याद्रीमध्ये मिक्स क्राऊड आहे, काही सदाहरीत तर काही पानगळ. वड, पिंपळ, बदाम ही नेहमीच्य पाहण्यात असलेली पानगळीची झाडे. ही झाडे पुर्ण उघडीबोडकी होतात.
मी नागपुरला ताडोबाला गेले होते ते पुर्ण जंगल पानगळीचे होते. त्या जंगलातली सगळी झाडे पाने गाळतात. आम्ही अप्रिल मध्ये गेलो होतो. आणि त्या महिन्यात जवळजवळ सगळेच जण पाने गाळुन बसलेले. खोल जंगलात गेलो तरी जंगलात आल्याचा फिल आलाच नव्हता. शेवटी मी विचारलेच, जंगलात कधी जाणार म्हणुन? उत्तर मिळाले, हेच जंगल आहे, फक्त झाडांनी पाने गाळलीत म्हणुन उघडे उघडे वाटतेय. तसेही तिथे हार्ट ऑफ जंगल मध्ये जायला परवानगी नव्हतीच, पण जे काही पाहिले ते सगळे झुडुपे या कॅटेगरीत मोडणारे.
निलगीरीला ट्रेकला गेलो तिथे मात्र महाकाय पर्वतासारखे वृक्ष, त्यांच्या फांद्या अगदी जमिनीपासुनच सुरू झालेल्या आणि पाने-फांद्या अगदी दाट. भर दुपारी सुद्धा जंगलात थंडी वाजते.
झाडाखालुन चालताना आपल्यावर सतत पाण्याच्या बारिक थेंबांचा वर्षाव होत असतो. भर उन्हाळ्यातही जंगलातली जमिन ओली असते. सह्याद्रीत मी जे साग पाहिलेत ते अगदी सडसडीत असे होते. तिथले साग असे विशाल की झाडाच्या बुंध्याल्या कवेत घ्यायचे तर दोघातिघांना एकमेकांचे हात धरावे लागतील 
पानगळीच्या झाडांचे निरिक्षण
पानगळीच्या झाडांचे निरिक्षण छानच दा...
हेमा ताई पळस पण आहे की..
सारिका पाकोळी म्हणजे स्व्यालो का..छान आहे फो टो..
श शांक जी छान फो टो...
हे आज सkaaLee उ म ल ले. आजुन च क्क १० क ळ्या आहेत..
़
स ध्या ब ह र कमी अ स तो ना, शेण खत घातले होते....
नि ग मुळे आत्ता झाडांची भाषा चांगलीच क ळ ते...
दिने श दा, सांगीतल्या पासुन रोज झांडाना भाज्यांची देठं सालं घालत अ स ते... फुलांच्या संखेत , आकारात, रंगात ब राच फ र क जाणवतो. .
शिवाय जागु, साधना, सु भा
शिवाय जागु, साधना, सु भा षी णी ताईं मुळे अjun ध्न्यानात भ र प ड ते आहे...
या कृष्ण कमळाला खूप गोड वास
या कृष्ण कमळाला खूप गोड वास असतो - प्रचंड संख्येने मुंगळे येतात मग या वेलावर ...
हो खुप द र व ळ होती स काळी
हो खुप द र व ळ होती स काळी आणि मुंग्यांची ये जा चालु होती
आमच्याकडे या मुंगळ्यांच्या
आमच्याकडे या मुंगळ्यांच्या प्रचंड संख्येला वैतागून शेवटी काढून टाकावा लागला हा वेल ... कारण जरा एखादा मुंगळा मानेवर - अंगावर पडला की इतका जोरात चावा घ्यायचा की कधी कधी त्याचे डोके अंगावर तसेच रहायचे, धड निघून जायचे - पुढे मग हे क्रीम लाव, कधी डॉ. कडे धावाधाव - या सगळ्याला कंटाळून वेलच काढून टाकला मग ...
सायली, ह्या दिवसात ही येतात
सायली, ह्या दिवसात ही येतात का ग कृष्णकमळाला फुलं ? मला वाटत होतं की श्रावणातचं येतात फक्त. फोतो मस्त. फुल तर माझ्या फारच आवडीचं .
ही आहेत अशीच रानफुलं पण ह्यांनाही मंद वास होता.
Hematai hi bahudha kudyachi
Hematai hi bahudha kudyachi fule asavit
हेमा ताई, फुल उमलल तेव्हा
हेमा ताई, फुल उमलल तेव्हा तुमची आ ठवण झाली... बुची ची फुलं पाहिलीत की तुमची आठव ण होते. .
कु ड्याची फुलं कीत्ती गो ड...
सर्वांना गुढीपाडव्याच्या
सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
शांकली, धन्यवाद नाव
शांकली, धन्यवाद नाव सांगितल्याबद्दल.
सायली, कृष्णकमळं भगून तुला माझी आठ्वण आली खूप छान वाटलं.
सगळ्यांना गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा !!!
ज्यांना आज सुट्टी नसते त्यांची आज चंगळ आहे. एंजॉय करा.
नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा
नववर्षाच्या हार्दीक शुभेच्छा !
मनीमोहोर, तो पांढरा कुडा आहे. त्याची मूळे व बिया औषधी असतात. फुलांची व कोवळ्या शेंगांची भाजी करतात.
दिनेश दा धन्यवाद. आमच्याकडे
दिनेश दा धन्यवाद. आमच्याकडे इथे आणि गावाला ही कुड्याच पाळं म्हणून एक घरगुती औषध असतं. ते उगाळुन घ्यायचं असतं . ते पोटाच्या कोणत्याही तक्रारीवर उत्तम समजलं जातं . तो हा कुडा का? गेली कित्येक वर्ष ते पाळ मी वापरतेय. पण ते हे झाड हे आज समजलं . अजून पर्यंत झाड मी ओळखत नव्हते. कारण कोणीतरी गडी माणसचं सड्यावरुन आम्हाला ते पाळ आणून देतात.
गुडी पाडव्याच्या हार्दिक
गुडी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! सायली, ममो फुलं छानेत..
येस कुड्याचा पाळ. पानेपण औषधी
येस कुड्याचा पाळ. पानेपण औषधी असतात त्याची.
गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना
गुढीपाडव्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
कृष्णकमळ व पांढरा कुडा मस्त.
Pages