निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!
मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!
कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!
धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:
ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.
परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!
गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्याखुर्या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!
..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!
(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
अन्जू.. सगळे व्हॉट्स अॅप वर
अन्जू.. सगळे व्हॉट्स अॅप वर असतात आता !
वा दिनेशदा, शून्याची मस्त
वा दिनेशदा, शून्याची मस्त माहिती. मी खेळायची क्वचित गोट्या पण नेम चांगला नव्हता म्हणून हरायचे नेहेमी.
कोहळ्याचा असाही उपयोग करतात? नवीन माहिती.
ओके whats app मुळे इथे येत
ओके whats app मुळे इथे येत नाहीत का जास्त.
पण मला हेच जास्त सोयीचे
पण मला हेच जास्त सोयीचे आहे.
त्याच माहितीपटात केरळमधे इन्फिनिटी आणि पाय या गणितातील संज्ञांचा कसा विचार झाला होता, ते पण दाखवलेय.
अरे वा शुन्याची माहिती छान!
अरे वा शुन्याची माहिती छान! माझ्या आजोळी बुलढाणा जिल्ह्यात ह्याला काशीफळच म्हणतात व सायली जी म्हणतेय त्या चक्रीची भाजी खूप केली जायची कारण पूर्वीच्या काळी फ्रीज नव्हते व इतक्या विविध प्र्कारच्या भाज्या खेड्यात मिळायच्या नाही .. ह्या अश्या भाज्या खूप दिवस टिकतात ना
दिनेशदा यु ट्यूबवर असेल का तो
दिनेशदा यु ट्यूबवर असेल का तो माहितीपट.
काशीफळ नाव मीपण ऐकलय जुन्या काळी असंच म्हणायचे बहुतेक पण ह्याला आम्ही मोठा भोपळाच म्हणतो.
मंजुताई विविध प्रकारच्या भाज्या लिहिल्यात त्यावरून आठवला, दुर्गा भागवत यांचा एक लेख.
त्या जेव्हा मध्य प्रदेशात दुर्ग येथे होत्या तेव्हा एका मराठी familyने त्यांना जेवायला बोलावले होते आणि दारातल्या भोपळ्याचे असंख्य प्रकार केले होते.
दुर्गा भागवत ह्या निमित्याने
दुर्गा भागवत ह्या निमित्याने आठवल्या. खूप छान लिहायच्या वेगवेगळ्या विषयांवर.
मी लहान असताना महाराष्ट्र टा. मध्ये दर आठवड्याला विविध ठिकाणचे खाण्याचे पदार्थ अशावर लेखमाला होती, नाव आठवत नाही पण छान होती. मी वाचायचे आवर्जून.
आपल्या इथल्या मोठ्या
आपल्या इथल्या मोठ्या भोपळ्यांना हिंदीमध्ये काशीफळ असे म्हणतात हा शोध मला मंगला बर्वेंच्या काशीफळ का रोगनजोश हा पदार्थ वाचून लागला.
सायलीने दाखवलेल्या भोपळ्याला आमच्या दुकानात म्हणजे रीलायान्स रिटेल मध्ये डिस्को भोपळा असे नाव आहे. माझ्या नाशिकच्या मित्राची बायको याला चक्की म्हणते. हे चक्की प्रकरण माझ्या डोक्यावरून गेले होते. प्रत्यक्ष भोपळा पाहिला तेव्हा कळाले चक्की काय चीज आहे
अन्जू.. सगळे व्हॉट्स अॅप वर
अन्जू.. सगळे व्हॉट्स अॅप वर असतात आता !
टोमणा आला बरे लक्षात
काशीफळ, ते डिस्को भोपळा. अरे
काशीफळ, ते डिस्को भोपळा. अरे बापरे.
नाही ग टोमणा नाही. नि ग
नाही ग टोमणा नाही.
नि ग शोधायला लागला तर बरं नाही वाटत.
अगं तुला नाही गं मी दिनेशना
अगं तुला नाही गं मी दिनेशना म्हणाले. मघाशी व्हॉअॅ वर ते म्हणाले की निग वर फोटो टाका, त्यांच्या मोबाईलवर डाऊनलोड होत नाही. मी आता इथे आले तर त्यांची कमेंट पाहुन मला मजा वाटली.
मला लॅपटॉपवरुन थेट प्रतिसाद द्यायला काय प्रॉब्लेम आहे कळत नाही., मराठी उमटतच नाही. मग आधी . द्या, मग तो प्रतिसाद संपादित करुन प्रतिसाद द्या. खुप कटकटीचे वाटते. आणि मोबाईलवरुन मायबोलीवर थेट फोटो टाकता येत नाहीत. त्यात माझा मोबाईल जुना त्यामुळे मोबाईलवरुन पिकासा अपलोड थेट करायला लागले तर पुढचे शतक उजाडेल पण फोटो अपलोड होणार नाहीत अशी परिस्थिती
खुप फोटो जमा झालेत, टाकते इथे जराश्याने. पिकासावर अपलोड करतेय. लॅपटॉपवरुन पिकासा अपलोड व्हायला वेळ लागतो. बरं लॅपटॉप बंद करुन कॉम्पवर जावे तर घरातल्या इतरांचे वायफाय बंद पडते त्यामुळे कॉम्प चालु करायला विरोध. सगळीच गंमत आहे ह्या आधुनिकीकरणामुळे.
अरे sorry साधना, तू दिनेशदाना
अरे sorry साधना, तू दिनेशदाना म्हणालीस.
आमच्या इथल्या तळ्यातली गुलाबी
आमच्या इथल्या तळ्यातली गुलाबी कमळे
आणि हे आमचे तळे. लोटस लेक, बेलापुर. खुप मोठे आहे. गुगलवर लोटस लेक गुगल केले तरी दिसेल. अजुन हिरवे आहे. थोड्या दिवसात गुलाबी गुलाबी होऊन जाईल.
साधना मस्त आहेत, कलर कित्ती
साधना मस्त आहेत, कलर कित्ती गोड आहे.
साधना, खूप सुंदर कमळ.... ते
साधना, खूप सुंदर कमळ.... ते छिद्र वालं... त्याला काय म्हणतात माहित नाही.. पण छत्तीसगढ्मध्ये असताना विकायला होते .. त्याचा फोटो टाकला होता... त्यात जो पांढरा भाग असतो तो खातात . छान लागतो..
व्वा! सुंदर आहे कमळाचं तळं.
व्वा! सुंदर आहे कमळाचं तळं.
सगळीच गंमत आहे ह्या आधुनिकीकरणामुळे. + 100 साधनाला.
माझा आय पॅड आणि माझं वाय फाय यांचं जमेपर्यंन्त नाकी नऊ आले.
आता जमलंय.
अग तिथे बिया तैयार होतात.
अग तिथे बिया तैयार होतात. त्या बिया सुकव्ल्यावर त्यांच्या लाह्या बनवतात. तेच मखणे. तू बहुतेक कोवळ्या बिया खाल्ल्यास
खूप दिवसांनी आले. रोमात होते.
खूप दिवसांनी आले. रोमात होते. वाचत होते.
बंब. खराटे, भोपळे, कोहाळे सगळच मस्त.
आमच्या गावाला त्रिपुरी पौर्णिमेचा उत्सव असतो महादेश्वराच्या मंदिरात. त्या दिवशी मोठ्ठा कोहाळा वरुन कापतात आणि थोडासा कोरुन त्यात कणकेचा मोठ्ठा दिवा ठेवतात आणि तो दीपमाळेवर सर्वात वरती ठेवतात. कोहाळा हा काही मुद्दाम कोणी लावत नाही तो शुभ नाही समजत, अशाच बिया पडून त्याचे वेल येतात. पण ह्या दिवशी तो लागतोच.
दिनेश दांची शून्याची माहिती इंटरेस्टिंग
नागपुरात तुती , बेलापुरात कमळं.... वाचुन सुदधा छान वाटलं
From rajasthan- marwad
कसलं आहे हे फुल ?
हे गेलार्डिया वाटते पण त्यात
हे गेलार्डिया वाटते पण त्यात इतका सुन्दर रंग मी कधी पाहिला नाही. इथे हारात असतात गेलार्डिया. मळक ट पिवळ्या रंगात
साधना.. खर्रच सह्हीये तुझ्या
साधना.. खर्रच सह्हीये तुझ्या कडलं कमळाचं तळं...
ते फ्लेमिंगो चे ही टाक नं इकडे..
कोहळा .. म्हंजे ज्याला एम पी मधे पेठा म्हणतात ?तो हिरव्या सालीचा असतो ना, आणी ज्याच्यापासून आग्र्या ची फेमस पेठा मिठाई तयार होते??
तो वरचा फोटोतल्या भोपळ्याला इथे चक्री भोपळा म्हणतात असे अगदी अलीकडेच कळले..
अन्जू, आवडत्या दहात टाकून ठेव, निग शोधायला अजिब्बात वेळ लागणार नाही... वीकेंड ला जर्रासा मागे जातो
हा धागा..
" बी " ला हॅप्प्पी बड्डे
" बी " ला हॅप्प्पी बड्डे च्या हार्दिक शुभेच्छा!
बी , वाढदिवसाच्या हार्दिक
बी , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तुला!!!
बी happy birthday. ओके
बी happy birthday.
ओके वर्षुताई. गुड आयडिया.
बी , वा दि हा शु.
बी , वा दि हा शु.
Happy birthday बी!
Happy birthday बी!
बी, वाढदिवसाच्या हार्दिक
बी, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
बी, वा. दि.हा.शु. साधना क म
बी, वा. दि.हा.शु.
साधना क म ळे खुप सुरेख..
बी , वाढदिवसाच्या हार्दिक
बी , वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !
हॅप्पी बर्थडे बी ! साधना, हे
हॅप्पी बर्थडे बी !
साधना, हे फोटो इतके सुंदर आहेत कि नुसते मोबाईलवर बघणे हा त्यांचा अपमान आहे. खुप सुंदर टिपली आहेस कमळे ( हो ही कमळेच )
अन्जू.. यू ट्यूबवर आहे तो माहितीपट.
Pages