निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!
मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!
कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!
धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:
ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.
परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!
गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्याखुर्या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!
..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!
(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

सरिवा, वा दि हा शु.
सरिवा, वा दि हा शु.
सरिवा, वा दि हा शु.
सरिवा, वा दि हा शु.
सारिका happy birthday.
सारिका happy birthday. एन्जॉय.
सरिवा, हार्दिक शुभेच्छा!
सरिवा, हार्दिक शुभेच्छा!
जिप्स्य फुले खुप गोड आहेत
जिप्स्य फुले खुप गोड आहेत रे
सरिवा वादिहाशु. तुमचे आयुष्य या फुलान्साराखे प्रसन्न राहो सदोदित !
सायालिने तुतिचे फोटो टाकुन
सायालिने तुतिचे फोटो टाकुन मला खुपच जळवले. माझ्या तर अंगणात तूती आहे . मी पण फोटो टाकुन जळव्नार
सद्या माझी अवस्था लंकेत सोन्याच्या वीटा सारखी आहे ही गोष्ट अलाहिदा:-(
सुदुपार निगकर्स सरिवा कुठे
सुदुपार निगकर्स
सरिवा कुठे आहेस? तुला हॅप्पीवाला बड्डे!(बिलेटेड)
हा फोटो इथे डकवला होता की नाही आठवत नाही.
हे काय आहे?
जिप्सी,फुले खरंच खूप सुंदर
जिप्सी,फुले खरंच खूप सुंदर आहेत.
जिप्सी ,सायली ,देवकी ,मनीमोहोर ,मंजूताई ,अंजू ,साधना व मानुषी मनःपूर्वक शुभेच्छांबद्दल सर्वांचे आभार.
एक विनंती आहे-प्लीज माझ्यासाठी आदरार्थी संबोधन वापरू नका!
बघ सरिवा..........मी केलं का
बघ सरिवा..........मी केलं का तुला अहो जाहो?
कसा झाला बड्डे?
अंगणातील फरशीवर जमा झालेल्या
अंगणातील फरशीवर जमा झालेल्या पाण्यात पडलेले प्रतिबिंब???
येस्स वर्षूला
येस्स वर्षूला १००/१००.
पाण्यात लोखंडी जिना आणि ख्रिस्मस ट्रीचं प्रतिबिंब.
मानुषी, नगरात परत पाऊस कि काय
मानुषी, नगरात परत पाऊस कि काय ?
दिनेश काल भरपूर पाऊस झाला. पण
दिनेश काल भरपूर पाऊस झाला. पण हा फोटो कालचा नाही.
काल एका मॅनेजमेन्ट इन्स्टिट्युटमधे महिला दिनानिमित्त ओपन थिएटर मधे एक अप्रतीम कार्यक्रम झाला. "तेजस्विनींचा प्रवास". यात वंदना गुप्ते आणि फैय्याज यांची मंगला खाडिलकरांनी मुलाखत घेतली. इतकी रंगली की सगळे पावसातच बसून राहिले.
पण शेवटी अजूनही १०/१५ मिनिटं चालली असती पण आवरती घ्यायला लागली अती पावसामुळे.
अजून २/३ दिवस पावसाचं भाकित आहे.
काल चुकून घाईघाईत सारिका
काल चुकून घाईघाईत सारिका लिहून गेले.
सरिवा happy birthday. एन्जॉय.
kaay he manushi, mi uttar
kaay he manushi, mi uttar denaar hote naa............. aamhi nahi jaa............
(No subject)
वॉव मस्त, मी ह्या कलरचा
वॉव मस्त, मी ह्या कलरचा पहिलाच नाहीये अजून.
साधना....उगी उगी..........
साधना....उगी उगी..........:फिदी:
सरिवा.. मस्त फोटो ! दुर्मिळ
सरिवा.. मस्त फोटो ! दुर्मिळ रंग आहे हा.. आता याचे रोप द्या म्हणून मागण्या होणार इथे !
सा धना.. अगा.. कोणा फुला
सा धना.. अगा.. कोणा फुला पानाला ओळखायचं नव्हतं ना म्हणून पटकावले १००% मार्क्स..
नाहीतर तुलाच मिळाले अस्ते बघ सगळे मार्कं..
सरिवा.. सुं>>>दर कलर.. सो रेअर...
पाकोळीच्या घरट्यात जोडपे
पाकोळीच्या घरट्यात जोडपे रहायला आले आहे
मला पाहिजे पिवळा सोनटक्का
मला पाहिजे पिवळा सोनटक्का
साधना पिवळा सोनटक्का..
साधना
पिवळा सोनटक्का.. वॉव..ंंमला हवाय..
सरिवा, म्हणालो नव्हतो.. लगेच
सरिवा, म्हणालो नव्हतो.. लगेच प्रत्यय आला ना !
दा सारिका वा छानच.. श
दा
सारिका वा छानच.. श क्य झाल्यास
फो टो टाका..
Sariva va di ha shu. Ani
Sariva va di ha shu. Ani pivla sontakka mala pan hava
मला पाहिजे पिवळा सोनटक्का
मला पाहिजे पिवळा सोनटक्का
वॉव सरिवा ...पिवळा
वॉव सरिवा ...पिवळा सोनटक्का!
प्रमाणे घेतले. फळ किडकं आहे म्हणत. आणि सगळा हिशोब करून नारळ उतरवण्याचे, साफसफाईचे काही पैसे घेतले नाहीत. असो........छंदाला मोल नाही.

सारिका पाकोळीच्या घरट्याचे फोटो डकव ना.
मध्यंतरी उतरवलेल्या नारळात १०० नारळ चांगले निघाले. ते उतरवणार्याने ५ रु.
आम्हाला घरातही २०/२५ नारळ मिळाले. आता हपिसातल्या स्टाफला, घरातल्या कामवाल्यांना, शरदला(त्यानेच एका बैठकीत सगळे २०/२५ नारळ सोलले. (फोडले नाहीत.)) काही.. अशी वाटावाटी चालू आहे. आता नारळ फोडून खवून डिपात ठेवणार. काही खोबर्यांचं दूधही काढून डिपात ठेवणार.
हपिसातल्या एका स्टाफने(हा बंगाली आहे) वाळलेल्या खाली पडणार्या झावळ्या साठवून कापून त्या घरी नेऊन त्याचे खराटे बनवले. ते त्याने काल आणून दिले.
.
.
मानुषी, नारळाची श्टोरी
मानुषी, नारळाची श्टोरी इंटरेस्टींग .. खराटा
सोनटक्का मस्तच!
Pages