निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.
डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!
मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!
कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!
धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:
ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.
परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!
गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्याखुर्या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!
..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!
(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)
नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.
निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.
(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

हॅल्लो निगकर्स.. मदत हवी
हॅल्लो निगकर्स.. मदत हवी आहे.. गुलाबाचं रोप आणलं होतं त्याला २-३ फुलं आली होती.. नंतर सगळी पानं गळुन फक्त खोडं उरलयं .. नवीन पानंही नाही आलं..काय करु ? रोप पुर्वेला आहे फक्त सकाळचं १० पर्यंतच ऊन डायरेक्ट येतं.. नंतर नारळ नि आंब्याची सावली प्ण असते
चनस - ऊन जास्त पाहिजे
चनस - ऊन जास्त पाहिजे (दुपारचे ३-४ तास)- तसेच माईल्ड खते पाहिजेत व आवश्यक क्षारही पाहिजेत (नत्र, पोटॅश व सल्फर) - कुंडीतली माती उकरणे - मुळानां धक्का न लावता. तसेच कुंडीतील पाण्याचा निचरा होतोय का ते ही पहाणे. जवळपासच्या एखाद्या बागकामाचे साहित्य, खते विकणार्याकडे चौकशी केल्यास तो सांगेलच खतांची नावे. ऑल दि बेस्ट.
रासायनिक खते नको ना पण?
रासायनिक खते नको ना पण? गांडूळ खत उत्तम. एक गांडूळ खत सगळे क्षार पुरवू शकतं आणि पाणीही चांगलं धरुन ठेवू शकतं.
खास गुलाबांच्या झाडासाठी पण
खास गुलाबांच्या झाडासाठी पण खत मिळते. ऊन मात्र हवेच .
ठीकै.. नर्सरीवाल्याकडुन
ठीकै.. नर्सरीवाल्याकडुन आणलेलं जैविक खत घालतेय.. आता जागा बदलुन बघेन
ही काही फुले - फ्रॉम आवर वावर
ही काही फुले - फ्रॉम आवर वावर (वर्हाड निघालंय इष्टाईल ...
) -
आवडलं तुमचं वावर.
आवडलं तुमचं वावर.
अर्रे, सगळेच्या सगळे तिकडे
अर्रे, सगळेच्या सगळे तिकडे "वॉट्स अप" वर वावरताय त्यामुळे इकडे अग्दी शुकशुकाट झालाय .....

शशांक, वावरातले पक्षी काय
शशांक, वावरातले पक्षी काय म्हणताहेत ? तूझे नि माझे इवले गोकूळ, वगैरे गात असतील !
शशांकजी ती मधली फुले लिलीची
शशांकजी ती मधली फुले लिलीची आहेतना.
माझ्याकडे ती एप्रिल एंड किंवा मे मध्ये येतात.
वावर छान.
शशांकजी, वावर सुंदर.
शशांकजी, वावर सुंदर.
शशांकजी ती मधली फुले लिलीची
शशांकजी ती मधली फुले लिलीची आहेतना. >>>> येस्स - ती लिलीची फुले आहेत आणि अशी एप्रिल - मे मधे फुलतात...
http://www.thelilygarden.com/ - ही साईट तुम्हा सर्वांनाच आवडेल पहायला ...
शशांक, वावरातले पक्षी काय
शशांक, वावरातले पक्षी काय म्हणताहेत ? >> आता ते - "पंछी बनू उडके फिरु मस्त गगनमें" च्या मूड मधे आहेत आणि आई मात्र डोळे पुसत पुसत हसतीये .....

वावरात सध्या याचाही वावर
वावरात सध्या याचाही वावर वाढलाय ...
त्याचा योग्य वेळेत बंदोबस्त करायला पाहिजे - याचा मोठा जातभाई (का बहिण ??) - घूस - फार धुडगुस घालतोय ..
धिस माऊस इज माय टी पी - फ्रॉम
धिस माऊस इज माय टी पी - फ्रॉम माय न्यू सेल्फोन फंक्शन - स्केच ...
- स्केच्ड युजिंग माय फिंगर ...
ही अजून काही फुले ...
ही अजून काही फुले ...
पाकोळीच्या घर्ट्याचा फोटो
पाकोळीच्या घर्ट्याचा फोटो पोस्ट करायला उशीर झाल्याबद्दल सॉरी, खुपच कोपर्यात घरटे असल्याने फोतो फार चांगला नाही काढता आला तरीही प्रयत्न केला आहे. त्यात एक पाकोळीण बसुन होती.

काही दिवसांपूर्वी वाचनात आला
काही दिवसांपूर्वी वाचनात आला हा शब्द.. .' पानगळी जंगल' आणी पानगळी वृक्ष ..पण अर्थ समजला नाही
काय असतं पानगळी जंगल??
वर्षू, जिथे थंडीच्या
वर्षू, जिथे थंडीच्या महिन्यात झाडांची सर्व पाने गळतात ते पानगळी जंगल.
आपल्याकडे ब्रिटीशांनी नागपूर भागात सागाची मोठी लागवड केली. सागाची सर्व पाने गळालेली असतात. तिथल्या उन्हाळ्यात सगळा रखरखाट असतो.
पण या जंगलातही आंब्याची आणि
पण या जंगलातही आंब्याची आणि जांभळाची झाडे आहेत. ती मात्र सर्व पाने गाळत नाहीत. या झाडांमूळेच प्राण्यांना थोडी सावली व आडोसा मिळतो.
पानांची दाटी नसल्याने प्राणी दिसायची शक्यता जास्त असते.
शशांक... यांच्या बंदोबस्ताला
शशांक... यांच्या बंदोबस्ताला तूमच्या मनिमाऊ कामाच्या नाहीत. जालिम उपायच करायला हवा !
सारीका, स्वॉलो पक्षी ना ?
सारीका, स्वॉलो पक्षी ना ? निळसर काळ्या रंगाचा असतो तो ?
हाँ .. पण पानगळी जंगलात
हाँ .. पण पानगळी जंगलात सर्वच झाडं अशी असतात? नागपूर जबलपूर बाय रोड अनेक वेळा गेलेय , त्या रस्ता च्या कडेने मैलोमैल लांब पळसाचे वृक्ष दिसतात, मार्च एप्रिल मधे फुलांचा बहर ही.. हिंदीत ज्यांना टेसू के फूल म्हणतात.. फ्लेम ऑफ फॉरेस्ट
मग आपल्याकडले पानगळी वृक्ष कोणकोणते आहेत?
शशांक घूस एकदा घुसली ना
शशांक घूस एकदा घुसली ना वावरात........मंग काय खरा नाय!
टूपा( ट्यूबा), बलप(बल्ब....:फिदी:) घाला कुटून, त्यांच्या बिळात ह्ये भरपूर पानी सोडा काय बी उपेग न्हाय.
असो........
पानगळ जंगल हा शब्द रेन फॉरेस्ट या सारखा वाटतो. अर्थ नव्हे....शब्दाचा टाइप.
वर्षावन हा हिंदी डिस्कवरी चॅनलवरचा सुंदर हिंदी शब्द.
हिंदी डिस्कवरीवरचं हिंदी अगदी शुद्द्ध आणि श्रवणीय असतं.
आपल्याकडचे बरेचसे वृक्ष अशी
आपल्याकडचे बरेचसे वृक्ष अशी सर्व पाने गाळतात, पण त्यांचा काळ मागेपुढे असतो. आंबा कधीच पुर्ण निष्पर्ण होत नाही आणि जांभूळही. कैलाशपति सारख्या झाडात तर हा निष्पर्ण असण्याचा काळ एवढा कमी असतो कि तो जाणवतच नाही.
जिथे थंडी जास्त तीव्र तिथे शक्यतो सर्व पाने गळतात मग यात मेपल पासून अॅपल पर्यंत सर्वच आले. ( फॉल कलर्स म्हणतात ते काय उगीच ? )
घुशीला नैसर्गिक शत्रु नाहीच
घुशीला नैसर्गिक शत्रु नाहीच बहुदा !
परदेसीयोंसे ना अखियॉ
परदेसीयोंसे ना अखियॉ मिलाना...
गुजरेगा फिर कैसे पतझड का जमाना !
आपल्या कडचं पानगळी झाड म्हणजे
आपल्या कडचं पानगळी झाड म्हणजे पांढरा चाफा.
उंदिर .घुशींसाठी एक मार्ग
उंदिर .घुशींसाठी एक मार्ग म्हणजे बिळं असतिल तिथे पुदिना लावायचा. त्यांना म्हणे तो वास आवडत नाही असे कुठेसे
वाचलं.
माझ्या संकुलात मुलांसाठी एक community गार्ड्न बनवलेय. तिथे एका ठिकाणी खुप बिळं होत रहायची आणि मी बुजवत रहायचे. शेवटी पुदिना लावला. आता तिथे बिळं दिसत नाहीत. कदाचित रोज पाणी मारल्याचापण उपयोग. होत असेल. तुम्ही लाऊन बघा.
माझ्या कॉपुटरवरुन मायबोली वर काही लिहीणं फार काठीण झाले आहे. एक्सप्लोरर वर इंग्रजी उमटतं व क्रोम्वर फाँट चांगला दिसत नाही.
.अदिती.. पुदीन्याचा उपयोग छान
.अदिती.. पुदीन्याचा उपयोग छान आहे.
क्रोमवर फाँट नीट दिसला नाही तरी चालेल, इतरांना व्यवस्थित दिसतो तो.
Pages