निसर्गाच्या गप्पा (भाग -२४)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 27 December, 2014 - 06:09

निसर्गाच्या गप्पांचा धागा २४ व्या भागामध्ये पदार्पण करत आहे. सगळ्या निसर्गाच्या गप्पांच्या सदस्यांचे हार्दिक अभिनंदन.

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला
मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी
शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत
नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज
असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच
महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंतीची फुले, मधुमालतीचे गुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी
चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे
कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या
शुभेच्छा!

(वरील लेखन व फोटो मायबोलीकर बी यांच्यातर्फे.)

नि.ग. च्या धाग्याची सुरुवात झाली आहे ५ डिसेंबर २०१० रोजी पासून.

निसर्गाच्या गप्पांचे मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सोनटक्क्याचा फोटो मी मध्यंतरी कोकणात गेले असताना काढला आहे.गडबडीत असल्याने मलाही रोप आणता आले नव्हते!
सॉरी,पुढच्या वेळी मिळाल्यास तुमच्यासाठीही नक्की आणेन.

सोनटक्क्याचा फोटो मी मध्यंतरी कोकणात गेले असताना काढला आहे.गडबडीत असल्याने मलाही रोप आणता आले नव्हते!
सॉरी,पुढच्या वेळी मिळाल्यास तुमच्यासाठीही नक्की आणेन.>>>> Sad
मला हवय रोप असे लिहायला आले तर ही कमेंट.
कसला सही आहे तो फोटो.

मानुषी, नारळ अन खराट स्टोरी मस्त.

खराटानारळ( हे लिहिताना खणानारळाने ओटी असं काहीतरीच आठवतंय :फिदी:) इष्टोरी आवडलेल्यांना धन्यवाद.
तरीही खरे खराटे झावळ्या जरा ओल्या असतानाच सुरू करतात. असं त्या स्टाफचं म्हणणं. जागुले ...कुठे आहेस गं?

असो....नारळाचं सगळं जे काही पडत रहातं ते पाहून काहीतरी रिसायकलिंग करावं असा विचार येतोच पण करणार काय? चुलीवरचा स्वयंपाक किंवा बंब पेटवणे हे शक्य आहे का?

व्वा मनुषि ताई मस्तच.. आपल्या घरच्या फळा/ फुलांची वाटप केल्याशिवाय त्याचा आनंद द्विगुणित होतच नाही... वाटप करण्यातही तितकेच सुख आहे हो..
छंदाला मोल नाही. +++ अगदी अगदी
शरदला(त्यानेच एका बैठकीत सगळे २०/२५ नारळ सोलले. (फोडले नाहीत.)+++ शरद ची कमाल आहे..
खराटा खासच...

मानुषी, बंब ठेवायला मोकळी जागा आहे कि तूमच्याकडे. गरम पाणी मिळेलच शिवाय राख पण झाडांसाठी मिळेल.
बंबाच्या कढत पाण्याने अंघोळ करण्यासारखे सुख नाही.

तसे नको असेल तर भांडी विसळायला पण उपयोगी पडते पाणी ते. !

गोव्यात करवंट्यांचे चमचे ( कुलेर ) बनवतात, पण जास्त कल्पक उपयोग करतात तो केरळात. मी चक्क अंगठी बघितलीय करवंटीपासून केलेली.

नारळ सोलल्यावर त्यातला एक भाग, मालवणला आमच्या घरी जमिनीवरचे धान्य वा जात्याबाहेर पडलेले पिठ गोळा करायला वापरत असत.

मानुषीताई मस्तच.

मी पण केलेला खराटा पूर्वी, नालासोपारा येथे राहत होते तेव्हा. मी नारळाचे झाड लावलं होतं. मस्त झालं होतं पण नारळ यायला लागले तेव्हा आम्ही नासो सोडून श्रीरामपूरला गेलो. अर्थात सोसायटीच्या आवारात लावलं होतं. त्यामुळे मालकी सोसायटीची.

कोकणात पावसाळ्यात हिर काढून खराटेच करतात.

हे सकाळी वॉक ला गेले तेव्हा दिसले..
हे कोणते फुल आहे? पाहात्या क्षणी प्रेमात पडले.. मंद सुवास देखिल आहे...
कस सजवु? कुठे ठेव?? उद्या पण मिळेला का? कोणाला दाखवु? अस होतय,,
सकाळ पासुन मी खुप खुष आहे :)... याच्याच मागे घुटमळते आहे.. Happy
flower.JPGflower1.JPGflower3.JPG

सायलि, ते कुंकवाचे झाड किंवा बिक्सा अनोटा. त्यात त्रिकोणी फळात बिया असतात व त्याभोवती भडक केशरी किंवा लाल रंगाचे द्रव्य असते. खाण्यासाठी अगदी सुरक्षित रंग आहे तो. बहुतेक खाद्यपदार्थात तो वापरतात, तसेच औषधे व प्रसाधने यातही वापरतात. अगदी थेट खाद्यपदार्थात घातला तरी चालतो.

लहान मुलांना मुद्दाम दाखवायला हवे हे झाड. यापासून रंगपंचमीचाही रंग करता येईल.

नागफणी मधे खरेच नागाची फणी भासमान होते. ( ते वेगळे. आपल्याकडे रानावनात दिसते. भीमाशंकरला खुप आहेत ) वरचे झाड अळूच्या वर्गातले शोभेचे झाड आहे. आपल्याकडे १२/१४ एप्रिलला पूर्वाचलात यांचा महोत्सव असतो.

व्वा दा ..़कुंकवाचे झाड ... का कुणास ठाऊक वाटतच होते..
तुम्हीच पhilyaanda ओळ्ख करुन दिली होती... बhutek बाली प्र.चि. म धे ...
नार ळाचे प ण कीत्ती उपयोग आणि प टा प ट सांगीतले...

व्वा सायली मस्त फुलं. पुण्याच्या घरात मस्त नागफणी होती कुंडीत ...नंतर काही कारणाने गेली ती.
हो.......... दिनेश जागा भरपूर आहे. आता तर उन्हाळा सुरू झाला. पण पुढच्या हिवाळ्यात बंबाचा विचार करावा काय?
माझी लेक म्हणत होती.......... (जेव्हा घरातला बंब काढला तेव्हा).........हा बंब तिकडे (उसगावात) माझ्या हॉलमधे ठेवता आला तर मस्तच होईल! शो पीस म्हणून! :स्मितः

मानुषी, आपल्या बंबाचे डीझाईन खुप अनोखे आहे. अजिबात उष्णता वाया जात नाही त्यात शिवाय घरातला सुका कचरा त्यात जाळला जातोच. मधल्या पोकळ दांड्यातून उष्णता जात असल्याने सर्व पाणी एकदम गरम होते.

असेच डीझाईन छोट्या रुपात करुन बियर थंड ठेवायला वापरतात ( मधल्या दांड्यात बर्फ भरतात. )

असेच डीझाईन छोट्या रुपात करुन बियर थंड ठेवायला वापरतात (>>>>>>> मस्त.
लहानपणी बंबाचा खालचा झारा हलवून निखारे प्रज्वलित करायला खूप आवडायचं.
सायलीच्या नागफणीला झब्बू.

नागफणी मस्तच मानुषीताई.

सायली काशी कोहळे म्हणजे मोठे भोपळे का ग.

कोहळे आम्ही ते हिरव्या साली असतात त्यांना म्हणतो. ह्यांना लाल भोपळा किंवा आम्ही नुसतं भोपळा म्हणतो. फोटो मस्त आहे त्याचा.

कोहळे आम्ही ते हिरव्या साली असतात त्यांना म्हणतो. ह्यांना लाल भोपळा किंवा आम्ही नुसतं भोपळा म्हणतो. अन्जू ...मलाही हीच शंका होती.
कोहळ्याचा पेठा करतात आणि कोहळ्याचं पाणी पूर्वी पापडाचं पीठ भिजवायला घेत.
????

हो मानुषीताई करेक्ट. तेच कोहळे. त्याचा कोहळेपाकपण छान होतो. (हलवा).

श्रीरामपुरला बरेच जण दृष्ट लागू नये म्हणून घरावर बांधतात. हे तिथेच कळलं. असं काही असतं मला माहीतीच नव्हतं.

आ म्ही प ण त्याला को ह ळेच म्ह ण तो .. प ण या प्र का रा ला काशी किंवाl चkree को ह ळे म्ह ण ता त.. गंगा फ ळ दे खिल म्ह ण ता त

कोहळ्याला आणखी एक प्रतीक चिकटलेय.. चक्क नरबळी म्हणून दसर्‍याला कोहळा तलवारीने कापतात. अनेक प्रकारच्या अघोरी उपायातही तो वापरतात !

एखादा खळगा करून त्यात लहानपणी गोट्या खेळलेले आहेत का कुणी. अशा प्रकारचे खेळ अनेक देशांत मी बघितलेत. कधी कधी दगड पण वापरतात.. पण समजा खळग्यात काहीच नसले कि काय दिसते ? रिकामा गोलाकार दिसतो कि नाही ? अगदी शून्यासारखा !

भारतात शून्याचा शोध असाच रिकाम्या खळग्यामूळे लागला Happy

संदर्भ : बीबीसीची द स्टोरी ऑफ मॅथ्स ही डॉक्यूमेंटरी .. !

Pages