कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे?...गोडे वरण

Submitted by नाना फडणवीस on 5 March, 2015 - 10:15

कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे? कोणी मदत करील काय....?? गोडे वरण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धधा करण्यात वाडगं भर :)अर्घा फुट बाय एक फुट लाकडी पाटावरची लोखंडी खवणी त्याखाली खवलेल्ला नारळाचा ढीग मांडी ठोकून बसलेली आरती पदराने घाम पुसतेय बाजूला चुलीवर वरण उकळायला ठेवलंय .... वरण उकळायला अर्धा ssssss तास आहे तोपर्यंत रेशिपी लिहून टाकते बाई म्हणत ..... आरती स्टईलने वरण नक्की करीन ... आरामात..

साडी नेसते का आरती ते विचारा<<<< अन्जू मी पण हाच विचार करत होती. Lol आणि आमच्याकडे जेवण बनवताना घाम येत नाही. Wink फक्त एप्रिल, मे महिना सोडला तर तेही फक्त दुपारच्या वेळी रात्री थंड असत.

१/२ तास आटवून वरण नाही पिठलंच बनेल. कोब्रांकडे इतका गॅस फुकट घालवत नाहीत हां ( मी जन्माने कोब्रा आहे हे ध्यानात ठेवा Proud )

अगं साडीच म्हटलं जे सुसंगत नाहीये.... चूल , भलीमोठी खवणी, चूल ... तर मग नव्वारी पाहीजे ना.. आरतीकाकू अहो नारळ खवून घाम फुटलाय...

मंजूडी, माझा किंवा सीमंतिनीचा ढाई किलोचा हात असला तरी ती मूठ त्या ३ वर्षाच्या पोराची आहे. Proud
आणि डब्यात हात नाही घालायचा डबा उलटा करून हातात ओतायचा. आता बाजूला पडणाऱ्या दाण्याचा हिशोब कसा करायचा विचारशील. तर त्या ठिकाणी असलेले गुरुत्वाकर्षण, डबा आणि दाण्यांचा आकार, इनक्लीनेशन कोन, डब्याचा तोंडाचा आकार, वाऱ्याचा वेग झालंच तर ओतणारऱ्याची मानसिक परिस्थिती बरं ओंजळीचा आकार कोन्स्टट घेऊ. आता ३ रड डिग्री पोलिनोमिअल डिफरन्शिअल एलीप्टीकल समीकरण करून matlab मध्ये घालायचं. उकळी आली की दीड एक पीएचडी आणि ४-५ पिअर रीव्हूड जर्नल पेपर नक्की सुटतील. Light 1 Proud

ज्जे बात अमितव ! Happy मॅटलॅब पोस्टीत आणली म्हणजे मला आज मोक्षाची गॅरंटीच हो! Biggrin
इथे वरणाबद्द्ल इतका डेटा गोळा झाला आहे की ह्यातून नक्कीच एक रिव्ह्यू पेपर होईल. को- ऑथर आहेत का कुणी? Biggrin

बघा, स्त्री संशोधिका काळाची गरज का, ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं.
वरणावर, सांबारवर अगदी अंडं उकळण्यावर पण संशोधन होईल.
Light 1

कोब्रांकडे इतका गॅस फुकट घालवत नाहीत हां <<<<<संपदा, हे वाक्य अजून कस नाही आल हाच विचार काल करत होते वरची पोस्ट लिहून झाल्यावर. Lol

चूल , भलीमोठी खवणी, चूल ... तर मग नव्वारी पाहीजे ना.. आरतीकाकू अहो नारळ खवून घाम फुटलाय...<<<< मंजूताई Rofl

आंमच्याकडे डाळ कुकरला लावतानाच त्यात हळद हींग घालतात व नंतर वरण करताना त्यात गुळाचा खडा टाकतो.छान गोडं कोकणस्थी वरणाची मी तरी हीच पद्धत बघीतली आहे.

नंतर वरण करताना >>> पण डाळ कुकरात टाकली, पाणी घातले आणि गॅस ऑन केलाय याची खात्री केली (मी अनेक वेळेस अर्ध्या तासाने शिट्टी का होत नाही बघायला गेल्यावर थंड कूकर व आतले डाळ व तांदूळ कोर्टाने स्टे ऑर्डर आणल्यासारखे जैसे थे परिस्थितीत दिसलेले आहेत म्हणून हे), की वरण आपोआप होते ना? मी तरी त्यालाच वरण समजत आलोय इतके दिवस Happy

आरती.ने लिहिलेल्या कृतीने वरण केल्यास आम्ही त्याला 'तोय' म्हणतो. Proud
फक्त त्यात गूळ घालत नाही पण डाळ शिजवताना भरपूर आले घालतो किसून आणि १/२ तास उकळत नाही.
वरून मस्त लिंबू पिळायचा.
यम्मी तोय तयार. Happy

प्राची, अन्जू Proud 'तोय' लिहिल की नाना म्हणतील मला कोकणस्थ स्टाईलचच वरण हव आहे. Wink

अजून एक टीप ह्या मध्ये १ टे.स्पून तांदूळाच पीठ कोरड भाजून घेऊन पाण्यात कालवून वरण किंवा सांबारमध्ये घालायच. मस्त टेस्ट येते. Happy

आता उन्हाळा आहे तर टोमॅटो. लिंबू पिळून घालण्याएवजी लोणच्यासाठी कैरी कापली की कोय डाळ शिजत असताना घालायची. मस्त चव येते. सांबार आणि वरण (तोय) दोन्हीमध्ये घालतात. ही कोय खायला मस्त वाटत.

@ कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे? >>> सोप्प आहे. मुठभर डाळ पातेलंभर गरम पाण्यावरनं मिठमिर्च्यां सारखी ओवाळुन काढली, की झालं! Lol

@ कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे? >>> सोप्प आहे. मुठभर डाळ पातेलंभर गरम पाण्यावरनं मिठमिर्च्यां सारखी ओवाळुन काढली, की झालं! Lol

Pages