Submitted by नाना फडणवीस on 5 March, 2015 - 10:15
कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे? कोणी मदत करील काय....?? गोडे वरण
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे? कोणी मदत करील काय....?? गोडे वरण
कोकणस्थी वरण म्हणजे कसं ते
कोकणस्थी वरण म्हणजे कसं ते माहीत नाही पण आमच्याकडे तूरडाळ कुकरला लावताना थोडा हिंग, हळद घालायची.
मग शिजल्यावर घोटून पाणी घालून उकळत ठेवायची. त्यात मीठ, गूळ हवाच. वरण अती पातळ किंवा अती घट्ट नको.
वरण म्ह़णजे गोडे वरण? की आमटी
वरण म्ह़णजे गोडे वरण? की आमटी म्हणायचंय तुम्हाला?
प्रत्येक प्रश्नाला नवा धागा
प्रत्येक प्रश्नाला नवा धागा काढण्याऐवजी http://www.maayboli.com/node/42617 इथे प्रश्न विचारू शकता.
सुमेधाव्ही.....हो गोडे वरण
सुमेधाव्ही.....हो गोडे वरण
सिंडरेला |.....मी नवीन प्रश्न
सिंडरेला |.....मी नवीन प्रश्न वर क्लिक केलं होतं......
मी करतो ती पद्धत - तुरीची डाळ
मी करतो ती पद्धत - तुरीची डाळ शिजवून घ्यायची. नीट शिजायला हवी, डाळिंब्या राहायला नकोत अजिबात. जरा गार झाली की, पाणी असेल तर वेगळं काढून ठेवायच (पाण्यात नीट घोटली जात नाही). आता त्यात हळद, हिंग, गूळ, मीठ घालायचं अन अगदी व्यवस्थित घोटायची. बाजूला काढलेलं पाणी घालायचं. कन्सिस्टंसी पाहून अजून लागलं तर साधं पाणी घालायचं. मग दणदणीत उकळायचं, तुपाबरोबर, गरम भातावर घ्यायचं; बरोबर ताजं कोबीचं/गाजराचं लोणचं/ बटाट्याची काचरा भाजी घ्यायची. ओरपायचं मस्तपैकी. नंतर पानावरच हात वाळवत गप्पा हाकलायच्या!
तुपाबरोबर गरम भातावर घ्यायचं;
तुपाबरोबर गरम भातावर घ्यायचं; ओरपायचं मस्तपैकी>>>> लिंबू राहिलं.
आमच्याकडे गोड वरण करताना सायो
आमच्याकडे गोड वरण करताना सायो म्हणाली तस वरण कुकरला चिमुटभर हळद लावून शिजवून घेतात . चांगली घोटवून मग तूप जिर्या ची फोडणी करून मीठ घालून घट्ट / पातळ हव असेल तस शिजवतात. कोथिंबीर , टोमॅटो , हिमि हे added घटक .
कुकरला शिजवलेली तुरीची डाळ
कुकरला शिजवलेली तुरीची डाळ घोटुन नंतर त्यात हळद, हिंग, मीठ, गुळ आणि आवश्यक असल्यास थोडे पाणी घालुन उकळी आणली तरी चांगली गोडसर चव येते.
डाळ शिजताना हींग घातल्यास डाळ
डाळ शिजताना हींग घातल्यास डाळ शिजायला वेळ लागेल असे वाटते. बाकी कृती अशीच आहे.
जाई, 'फोडणी घातल्यावर वरण
जाई, 'फोडणी घातल्यावर वरण म्हणतात का?'
हा माबोवरचा एक सदाहरित प्रश्नं आहे.

आम्ही वरणात गूळ / साखर जरा
आम्ही वरणात गूळ / साखर जरा ही नाही घालत.
फक्त हिंग, हळद आणि मीठ. खाताना मात्र वरुन तूप आणि लिंबू.
टाटा आयशक्ती डाळ चांगली आहे. चव आणि स्वाद दोन्ही छान आहे.
सगळीकडेच गूळ घालत नसावेत पण
सगळीकडेच गूळ घालत नसावेत पण गुळाशिवाय चव खास लागत नाही वरणाची.
साधं गोडं वरण असतं त्याला
साधं गोडं वरण असतं त्याला फोडणी नसते. आरतीच्या संपूर्ण पोस्टला अनुमोदन. आमच्याकडे वरण तसंच करतात.
आणि कोकणस्थ पद्धत वगैरे अशी काही नसते. आम्ही देशस्थ आहोत पण आम्हीही वरण असंच करतो.
आमची पद्धत- तुरडाळ शिजवुन
आमची पद्धत-
तुरडाळ शिजवुन घोटुन घ्यायची. ओलं खोबरं,मिरच्या, जीरं, कोथिंबिरीच वाटण करायचं. तुपावर वाटण परतुन त्यात डाळ घालायची नंतर त्यात गुळ हळद मीठ घालुन ऊकळी काढायची
सेम सायोची पद्धत. आम्ही
सेम सायोची पद्धत. आम्ही दोघीही कोकणस्थ असल्याने बिंधास्त प्रमाण माना
अर्र, मी कोकणस्थ नाही.
अर्र, मी कोकणस्थ नाही.
हो का? एकारान्त आडनावानी
हो का? एकारान्त आडनावानी गोंधळ केला
अहो नाना, तुम्ही माझ्या आणि
अहो नाना, तुम्ही माझ्या आणि राखीच्या संवादाकडे दुर्लक्ष करा पण आम्ही म्हणतोय तसंच गोडं वरण करा.
आम्हीही गुळ नाही घालत हो
आम्हीही गुळ नाही घालत हो मनीमोहोर सारखा .. तसं केलेलं वरणही अजिबात आंबट, तुरट , करपट वगैरे लागत नाही .. मस्त लागतं ..
माझे माहेर एकारांत कोब्रा पण
माझे माहेर एकारांत कोब्रा पण आम्ही पण बाकी भाज्या आमट्या उसळीत गूळ घातला तरी वरणात नाही घालत, हिंग आणि मीठेही नाही घालत, आणि सासर देशस्थ तर इथे घालतात गूळ.

वरणात मी शिजवताना ४ दाणे मेथी पण घालते आणि २ थेंब तेल.
आता पुरेसे गोंधळला असाल ही आशा
मनीमोहोर यांच्या
मनीमोहोर यांच्या पद्धतीप्रमाणेच आम्ही वरण करतो. फक्त मीठ वरणात नाही घालत. वरण-भात कालवताना मीठ घालतो.
कोब्रा असूनही गुळ घालत नाही वरणात, आमटी केलीतर गुळ घालतो.
बाकी पद्धत वर सायोने
बाकी पद्धत वर सायोने दिल्याप्रमाणेच, पण तूरडाळ शिजताना त्यात थोडीशी मूगडाळ घातली तर वरण छान घट्ट मिळून येते..
माप सांगा, किती माणसांसाठी
माप सांगा, किती माणसांसाठी किती डाळ वापरता
अरे बापरे.. स्मित. एक वाटी
अरे बापरे.. स्मित. एक वाटी तूरडाळीला पाव वाटीहून कमी मूगडाळ...
सायोची कृती बरोबर.
सायोची कृती बरोबर. आमच्याकडेही असंच करतात गोडंवरण.
कोकणस्थ कोण फिरकेनात इकडे
कोकणस्थ कोण फिरकेनात इकडे जास्त. बाकीचेच रेस्प्या द्यायला लागलेत
टण्या, हा अन्याय आहे!
टण्या, हा अन्याय आहे!
ट्ण्या तू नाही दिलीस ते...
ट्ण्या तू नाही दिलीस ते...
आमची रेस्पी मोठी आहे. आधी तूप
आमची रेस्पी मोठी आहे. आधी तूप संपत आले पाहिजे. मग थोडेच उरले किंवा बरणी पूर्ण रिकामी झाली की मग जे बरणीला आतून लागलेले तूप असते तिथून रेस्पी सुरू होते. फडणवीसांच्याकडचे तूप संपत आले असेल तर सांगतो माझी रेसिपी!
जब सीधी उंगली से जब घी नही
जब सीधी उंगली से जब घी नही निकलता है तब टण्या की रेसिपी शुरू होती है
तूरडाळ, हिंग, हळद, मेथी दाणे
तूरडाळ, हिंग, हळद, मेथी दाणे (गूळ न घालता) पाणी घालून शिजवायचे. झालं वरण.
वर जाईनी लिहिलंय त्याला आम्ही आंबट्रोण म्हणतो ज्याना आवडत नाही ते तुरटवणी म्हणतात.
फा, सीधी उंगली च्या ऐवजी टेढी
फा, सीधी उंगली च्या ऐवजी टेढी उंगलीसे भी असं पाहीजे
सायो, राखी + १/२ टण्या +१
सायो, राखी + १/२
टण्या +१
गोड/गोड-गोड /गोडअ /गोडं/गोड्ड
गोड/गोड-गोड /गोडअ /गोडं/गोड्ड वरण यात फरक असतो.
माप सांगा, किती माणसांसाठी
माप सांगा, किती माणसांसाठी किती डाळ वापरता >>> हा हा हा ..... सीमंतीनी.
आंबट्रोण >>>
अमित , आंबट लागत नाही रे. गोड
अमित , आंबट लागत नाही रे. गोड असत वरण. मोबाईल वरुन टाइप करताना गडबड़ झाली. तूप गरम करून जिर ,हिमि,कोथिंबीर , मीठ टाकून त्यात वरण टाकतात. जस हवे असेल तसे घट्ट /पातळ ठेवायच.
गूळ घालून एकदा चव कशी लागते
गूळ घालून एकदा चव कशी लागते ते पाहायला हव
प्रत्येक जण आपआपल्या
प्रत्येक जण आपआपल्या पद्धतिप्रमाणे स्वयंपाक करतो . त्याला एवढं नाव ठेवायच प्रयोजन कळाल नाही. असो
वरच्या सर्व पाकृंना 'मम'
वरच्या सर्व पाकृंना 'मम' म्हणते. आमच्याकडे वरणाचे यातले बरेचसे प्रकार आलटून पालटून होत असतात. गोडं वरण म्हणजे वरणात हिंग, मीठ, हळद, गूळ व्यवस्थित हवा. अनेक ठिकाणी गूळविरहित अगोड वरण खाल्लं आहे. पण ते समहौ अपील होत नाही. तरी गूळविरहित वरणात आणखी एक व्हर्शन म्हणजे त्यात कढीपत्त्याची पाने घालायची. वरण हे कायम घोटून घोटून करायचे. अगदी कितीही पातळ केलेत तरी!
आमच्याकडची हमखास यशस्वी गोडसर अशा फोडणीच्या वरणाची रेसिपी म्हणजे तूर+मूगडाळ शिजवून व घोटून घ्यायची. डाळीचे मेण झाले पाहिजे. फोडणीत तेल गरम झाले की मोहरी+जिरे, हिंग, हळद, किंचित तिखट घालून घोटलेली डाळ घालायची. हवे तेवढे पाणी. कढीपत्ता. मीठ, गूळ. वरून हवी असल्यास कोथिंबीर. झाले वरण.
आमच्याकडची हमखास यशस्वी गोडसर
आमच्याकडची हमखास यशस्वी गोडसर अशा फोडणीच्या वरणाची रेसिपी म्हणजे तूर+मूगडाळ शिजवून व घोटून घ्यायची. डाळीचे मेण झाले पाहिजे. फोडणीत तेल गरम झाले की मोहरी+जिरे, हिंग, हळद, किंचित तिखट घालून घोटलेली डाळ घालायची. हवे तेवढे पाणी. कढीपत्ता. मीठ, गूळ. वरून हवी असल्यास कोथिंबीर. झाले वरण.>>>> अरु , exactly .आमच्याकडे तेलाएवजी तूप आणि तिखट, गूळ गायब
मनीमोहोर + १. हिंग आणि हळद
मनीमोहोर + १.
हिंग आणि हळद कुकरला डाळ लावतानाच घालायचे अशी टिप हमखास असते. नंतर घातले तर उग्र चव येते.
आमच्याकडे तर अजूनच शॉर्टकट असतो. मी हल्ली डाळ-तांदूळ.हिंग-हळद घालून एकत्रच शिजवून घेते. एक सपाट वाटी डाळीला अर्धी वाटी तांदूळ हे प्रमाण. शिजवल्यावर घोटून मीठ, तूप, लिंबू आणि सारखं करायला पाणी घालून छान घोटून घ्यायचा. असा तयार आयता कालवलेला गरम वरण-भात खायला मजा येते. मात्र हा गार होईल तसा आळत जातो त्यामुळे गरमगरम खाण्यातच मजा आहे.
उरलाच तर परत पाणी घालून पातळ करायचा आणि मावेच्या भांड्यात काढायचा. मग होत नाही घट्ट आणि परत गरम करुन खाता येतो.
आता बाकीच्या पद्धतीनींही करुन
आता बाकीच्या पद्धतीनींही करुन बघेन.
माझ्या माहेरी( अस्सल कोकणस्थ
माझ्या माहेरी( अस्सल कोकणस्थ
) आणि आमच्या नातेवाईकांमध्ये गोडं वरणात कधीही गूळ नसतो. मनीमोहोरच्याच पद्धतीने आम्ही गोडं वरण करतो. ( ह्याला वरण न म्हणता आम्ही गोडं वरण म्हणतो
)
अगो, तुझ्या पद्धतीने नागपूरला माझ्या सासरी तुरीची खिचडी केली जाते. मात्र भातावर घ्यायला हिंगाचं तेल हवंच :). काहीजण त्या तेलात सांडगी मिरच्यासुद्धा घालतात. खिचडी पानात घेऊन त्यावर तेल घालून मिसळून खिचडी मस्त ओरपायची.
माझ्याही माहेरी वरणात गूळ
माझ्याही माहेरी वरणात गूळ नसतोय. हिंग, हळद, तूप थेंब घालून शिजवून घ्यायचे. घोटायचे.
मग भातावर (भात हा गिच्च गोळाच्या एक पाऊल अलिकडे असेल इतपत मऊ हवा. हाटेलातला फडफडीत नको) घेताना तूप, मीठ, लिंबू. बास.
यापेक्षा जास्त काही घातले तर त्याला आमटी म्हणतात आमच्यात.
गोड वरणाच्या मस्त पाकृ
गोड वरणाच्या मस्त पाकृ मिळाल्या . एकच पदार्थ किती वेगवेगळ्या पद्धतीने करता येतो . मस्त
प्रीति, तू दिलेल्या पद्धतीप्रमाणे वरण एका मैत्रिणीकड़े खाल्ल आहे.छान चव होती त्याला
अहो 'गोडं वरण' असलं की गूळ
अहो 'गोडं वरण' असलं की गूळ असतोच. 'साधं' वरण असलं की गूळ कटाप!
हळद, हिंग कधीही, म्हणजे शिजताना वा शिजल्यानंतर घातली तरीही चालते. त्याच वरणाची संध्याकाळी आमटी होणार असेल, तर मीठ घालत नाहीत. वरण वरण म्हणूनच खाल्ले जाणार असले तर मीठ घालतात.
गोड्या वा साध्या वरणात मिरची, कोथिंबीर, कढीपत्ता असलं काही नसतं. प्लेन वरणच असतं.
कढीपत्ता, मिरची, जिर्याची
कढीपत्ता, मिरची, जिर्याची फोडणी दिलेलं ते फोडणीचं वरण ( कांदा-टोमॅटो-लसूण ऑप्शनल ) ह्यातही गूळ नाही.
वरणातच गोडा मसाला आणि वरुन फोडणी घातलेलं एक 'बैठं वरण' आई करायची. फोडणीत वरण न ओतता ( कुकरच्या भांड्यात ) बसलेल्या वरणात कढल्यातली फोडणी घालायची म्हणून ते बैठं असणार. ह्यात गोड्या मसाल्याची चव अगदी ठळक आठवतेय. फोडणीच्या वरणात गोडा मसाला नाही. गूळ असावा. खात्री करायला हवी पण. बर्याच वर्षांत खाल्लं नाहीये.
संपदा, मला माहीत नव्हतं
एक आंबट वरण करतात. ते कसं करायचं असतं ?
पिवळं दिसलं की वरण .... लाल
पिवळं दिसलं की वरण .... लाल दिसलं की आमटी
अगो त्या बैठ्या वरणाला
अगो त्या बैठ्या वरणाला चांदण्याच /पळी फोडणी वरण म्हणतो . वरुन फोअडणी घातली की तेलाच्या चांदण्या तयार होतात
.. संपदा म्हणते तशी तुरीच्या डाळीची खिचडी करतो तिला मुलं ' य्यल्लो' खिचडी अन मुगाची 'ग्रीन खिचडी' ...
Pages