कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे?...गोडे वरण

Submitted by नाना फडणवीस on 5 March, 2015 - 10:15

कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे? कोणी मदत करील काय....?? गोडे वरण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१०३ पोस्टींमध्ये कुठ्ठेही वाचलं नाही म्हणून लिहितेय, वरण चांगलं एकजीव शिजण्यासाठी डाळ १०-१५ मिनिटं भिजवून घ्या.

१. वर कोणीतरी लिहिलंय की वरण शिजतानाच हळद-हिंग घालायचं त्याला + १.
२. गोडे वरण म्हणजे गूळ हवाच असं लिहिलंय त्याला + १००. शिजलेल्या वरणात गूळ्+मीठ+पाणी घालून छान उकळून घ्यायचं.
३. वरणभातावर तूप-मीठ-लिंबू अस लिहिलंय त्याला +२०००.
४. फोडणीचं वरण म्हणजे हिंग-जिरं-लसणीची फोडणी घातलेलं वरण. त्यात गोडा मसाला घालून उकळलं की आमटी. आंबट वरण म्हणजे फोडणीच्या वरणात कैरीची बाठ घालतो आम्ही. (आम्ही = कर्‍हाडे+देशस्थ+कोकणस्थांचं हायब्रीड)
५. थंडीच्या दिवसात वरण शिजताना मेथ्या घाला चमचाभर.
६. वरण भात, तूप, मीठ, लिंबू यातलं वरण किंवा नैवेद्याच्या पानातलं वरण हे तुरीच्या डाळीचं असतं. पण हल्ली आम्ही मुगाची डाळ वापरतो. किंवा मूगाची+तुरीची डाळ एकत्र शिजवतो.

फा Biggrin

डाळीचं काय सीमंतिनी, एका माणसाला अर्धी वाटीही पुरेल.
नाना मात्र त्यांनी गोडं वरण केलं की नाही आणि केलं असल्यास कशाप्रकारे.. ह्या बाबतीत मूग गिळून बसलेत. Wink

तीन वर्षाच्या मुलाला मूठभर डाळ घेऊन केलेलं वरण आणि २ मुठी भात दुपारच्या जेवणाला पुरतं असा अनुभव ३-४ वेळा आला आहे. दुसऱ्यांदा प्रमाण बदललं नाही याचा अर्थ सगळं संपलं. घरात तराजू नाही त्यामुळे योग्य प्रमाण सांगता येत नाही. आता लावा त्रौराशिक (tri नाही लिहिता येत). Happy

>>हो ना एवढी सढळ अनुमोदने? को़कणस्थ आता पूर्वीसारखे राहिले नाहीत.

Rofl आता बाकीच्या पोस्टी वाचाव्याच लागतील.

अमितव कोणाची मूठ हे गुपित बंद आहे Wink

अमितव, दुसर्‍यांदा प्रमाण बदलल नाही म्हणजे नक्की काय? Happy मुलाचे प्रमाण देण्याने त्रैराशिक लागेलच Wink वर्ष दोन वर्षाने मूल वाढेल तर हळूहळू प्रमाण वाढवावे लागेल की. सायोचे प्रौढ व्यक्ती प्रमाण पटले.

सीमंतिनी तुझ्या इतर बीबी वरच्या पाककृती इ. प्रतिक्रिया बघता तू प्रमाण गम्मत म्हणून विचारतेयस असं वाटलेलं. खरंच हवं असेल तर मी वाटीभर २.५ माणसांसाठी घेतो. सो (अर्धीवाटी - ०.५ मूठ) हे एका माणसाचं प्रमाण होईल. Happy
अर्थात भूक किती आहे, घरात डाळ किती आहे, तूप आणि लिंबू आहे ना यावर भूक ठरणाऱ्या माणसाला भूक किती आहे, कमी पडलं तर भूकबळी भूकबळी करून बोंब मारणाऱ्या माणसाला भूक किती आहे असे आणखी प्रश्न विचारून स्टेट मशीन बनवलं की प्रॉब्लेम सोल्विंगचं सुख मिळून शांत झोप लागू शकते. मुक्तीचे सोपान यावरचं पुस्तक वाचा.

Happy गंमत म्हणून विचारले पण "त्रैराशिक" म्हणल्यावर इथे मूल, मूठ असे बरेच व्हेरियेबल्स दिसतात म्हणून जरा खोलात गेले Happy पण प्रमाणसाठी थँक्यू. प्रमाणाच्या बाबतीत कोकणस्थ वरण इतर वरणा सारखेच दिसतय. Happy

कोकणस्थांना डाळ कधीच कमी पडत नाही. घरात पाणी आहे तो पर्यंत पाहिजे तेवढ वरण होऊ शकतं . डाळीचा आणि वरणाच्या क्वांटिटिचा काय संबंध कोबांसाठी ? मी पण अर्थात एक कोब्राच आहे. ( स्मित )

अमितव,
तुझी मूठ आणि सीमंतिनीची मूठ सारखी असणार का? तुझा डाळीचा डबा आहे त्यात तुझा हात जाऊन डाळ भरून मूठ बंद करून बाहेर येणार तेव्हा डब्यात हात असताना मुठीतली डाळ आणि मूठ बाहेर काढून भांड्यात घातलेली डाळ याचं प्रमाण सारखं असणार का?
(अर्धीवाटी - ०.५ मूठ)>> ढाई किलो का पंजा की काय???

घरात पाणी आहे तो पर्यंत पाहिजे तेवढ वरण होऊ शकतं>> नाय बॉ! मी डिसअ‍ॅग्रीड आहे या वाक्याशी. आमच्याकडचं (आम्ही = क+दे+को हायब्रीड) वरण आमटीपेक्षा घट्ट असतंय. त्यात पाणी जास्त ओतलेलं आमास्नी चालत नाय.

पाणीदार वरण आमच्यातही करत नाहीत हां. खानावळींमध्ये असतं आमटी नावाने फोडणीचं पाणी. घरांमध्ये असं होत नसतं काही. कोणाच्याच.

नाना, नेमकी कोणती पद्धत वापरलीत तेही सांगा.

मानुषी, तुमचं आंबट वरण फारच कॉम्प्लिकेटेड आहे! (आमच्या पद्धतीपेक्षा) Happy

अजून चालूये.........??? बरं असो.........पण छानच चाल्लंय!
पूनम आमचं आंबट वरण करून बघ. सोप्पंय. उकळी काढण्याची एक स्टेप वाचलीये ना त्याच्यात!
वरणाला फोडणी घालायची . त्यात ताक + कच्चा कांदा घालायचा. झालं आंंबट वरण. ( ही रेस्पी बहुतेक शुद्ध कर्‍हाडे असावी. (:फिदी:)

नाना फडणवीस | 7 March, 2015 - 14:34

मी वरण करून पाहिलं.....थोडं जमलं ....थोडं बिघदलं.....पण इतके प्रतिसाद....hats off to maayboli...>>>>>>

लोक्स! नानांचं वरण करूनही झालं,तरी आपलं दळण चालूच.आता नानांनी कुठल्या प्रकारे केलं हे नाही सांगितले.

Wink Wink

धागा वाचून आज डब्यात चक्क आमटी भात. कांदा टोमाटो कोशिंबीर आणि तांदुळाची पापडी. साडेसहालाच कुकर लावला.

साधे वरण : काही न घालता नुसती शिजवलेली तुरीची डाळ. मौ भात तूप व बटाट्याची काचृया भाजी. आंब्याच्या लोणच्याची फोड.

नैवेद्याचे : शिजवताना हळद हिंग मीठ घालून.
आमटी : फोडणीत कढीपत्ता, हिंग मोहरी हळद. व आमटीत चिंच, गूळ, कोथिंबीर, गोडा मसाला तिखट मीठ. ही गरम भाता बरोबर तूप घालून. आणि दहि भाताबरोबर जबरी. बरोबर पोह्याचा पापड!!!

मी अगोंसारखा एकत्र वरण भात पण शिजवते. सोपा पडतो बोल मध्ये घेउन खायला.

नानांचं वरण करूनही झालं,तरी आपलं दळण चालूच.आता नानांनी कुठल्या प्रकारे केलं हे नाही सांगितले. >> +१०००

काही लोकांना फोड़नीच वरण जास्त चविच् लागलेल दिसतेय. दर पोस्ट मध्ये उल्लेख केल्याशिवाय राहावत नाहीये

हे बघा, हे असेच प्रतिसाद येत राहिले तर हा धागा 'धमाल धाग्यात' घालण्याची कारवाई करावी लागेल. नंतर मग बोलू नका. काय?

अजुन उकळुन झालं नाही का वरण Uhoh
नाही प्रत्येक उकळीला धागा वर येतोय म्हणुन म्हटले Proud

आता मी मराठा स्टाईल वरण धागा काढावा का या विचारात आहे Wink

हे असेच प्रतिसाद येत राहिले तर हा धागा 'धमाल धाग्यात' घालण्याची कारवाई
करावी लागेल.>>> सीरियसली , मला हेच वाटल होते . ग्रेट माइंड्स थिंक अलाइक Wink

वर्षा Happy

चिमुरी स्टाइल वरण -
तुर्-मुग डाळ (हवा तो रेशो)/तुरडाळ्/मुगडाळ्/तुर-मुग्-मसुर डाळ (मसुर डाळ थोडी कमीच) + मीठ + पाणी + हळद + हिंग + तेल्/तुपाचा थेंब कुकरमधुन शिजवुन घ्यायचं..

घोटणं, न घोटणं मुडप्रमाणे..

पातेल्यात तुप तापवायचं.. त्यात मोहरी, जिरं, कढीपत्ता, हिमि चे तुकडे, लसुन्-खोबरं वाटलेलं फोडणी द्यायची अन त्यात शिजवलेली डाळ टाकायची. पाणी अन मीठ चवीप्रमाणे वाढवायचं.. ३-४ मिन उकळु द्यायचं...

योकु Proud हेतेढकल नै कै.. डाळींच्या अव्हेलेबिलिटी प्रमाणे Wink बाकी फोडणीत सगळे घटक मस्ट आहेत..

चि, मस्त रेसिपी. पण आमच्या जेवणात लसूण नसतो.
आता इतक्या सगळ्याजणांनी रेसिपी दिली आहे तर मी सुद्धा देते. Proud

तुरीची डाळ अगोदर कमीत कमी दोन तास तरी भिजत ठेवा. तुरीच्या डाळीत एक - दोन हिरवी मिरची उभी कापून घाला. कुकरला भात आणि तुरीची डाळ दोन्ही वेगवेगळ्या डब्यात लावायच.तीन शिट्या होऊ द्या.

तोपर्यंत ओल खोबर खवायला घ्या, आमच्याकडे नारळाचा वापर भरपूर त्यामूळे मोठ्या विळ्या असतात. खाली आरामात विळीच्या पाटावर बसून ओल खोबर खवणे. १/२ वाटी ओल खोबर + १/२ टी स्पून हळद थोड पाणी घालून मिक्सर वर बारीक वाटणे.

एका पातेल्यात शिजलेली डाळ घेऊन त्यात वाटलेल खोबर, थोड पाणी मिक्स करून ते पातेल लो फ्लेमवर गॅसवर ठेवून १/२ तास उकळवा. हव तर त्यात टोमॅटोच्या बारीक फोडी घाला, गूळ घाला. चवीपुरत मीठ घाला. १/२ तासाने गॅस बंद करून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. गोड वरण तयार. ह्याला फोडणी देतो पण त्याला आम्ही गोड वरणच म्हणतो. साजूक तूप छोट्या कढल्यात गरम करा. त्यात मोहरी, जिर, कढीपत्ता तडतडल की हिंग घालून् गॅस बंद करा. त्या कढल्यातील फोडणी वरणाच्या पातेल्यात घाला आणि लगेच पातेल्यावर झाकण ठेवा.

गूळ वापरतात पण मला आवडत नाही म्हणून मी घालत नाही.

त्यानंतर डावाने थोड वरण काढून कढल्यात घाला, चर्रर आवाज येईल आणि कढल्याला लागलेला हिंग वरणात मिळून येईल. हे वरण पुन्हा पातेल्यात घाला आणि लगेच झाकण ठेवा.

गर्म गरम भात, वरण, उसळ, कोशिंबीर, पापड. लोणच आणि एखादा गोड पदार्थ अस ताटात वाढून पूर्णान्न जेवा. Proud

आरती., शिजवलेल्या वरणात खोबर्‍याचं वाटण आणि थोऽऽडं पाणी घालून अर्धाऽऽऽऽऽ तास उकळायचं?? फारच लाड करत बुवा तुम्ही वरणाचे.

Proud

Light 1 Light 1 Light 1 Light 1

फारच लाड करत बुवा तुम्ही वरणाचे.<<<< हो मंजूडी, असेच लाड सांबारचेही असतात. Proud
सांबार आणि वरणाचा सुवास पूर्ण घरभर दरवळला पाहिजे.

मजा आहे तुमच्या घरात वरण आणि सांबाराची Proud

बरं, एक खरोखर भा.प्र., वरण बारीक गॅसवर उकळत ठेवलं तरी पाणी थोडंच असल्याने खाली लागत नाही का?

अधुन मधुन हलवावं लागतं.. बराच वेळ ठेवणार असाल तर थोडं जास्त पाणी घालायचं, आटवुन हव्या त्या कन्सिस्टंसीला आणायचं

Pages