कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे?...गोडे वरण

Submitted by नाना फडणवीस on 5 March, 2015 - 10:15

कोकणस्थ स्टाइल चे वरण - कसे करायचे? कोणी मदत करील काय....?? गोडे वरण

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोडं वरण म्हणजे घोटताना गूळ एवढंच ना? मला तरी तेवढंच माहितीये.

फोडणीचं वरण हे वरण नाहीच. ती आमटीच असे आमचे ठरलेले आहे. Wink

हा पण मुगाच्या डाळीचं फो चं व केलं तर त्याला आमटी म्हणत नाही. फो चं व असेच म्हणतात.

पुरणासाठी चणाडाळ शिजवल्यानंतर डाळ उपसून पाणी वेगळे काढले जाते. त्या डाळीच्या पाण्याला कट म्हणतात. ह्या कटात थोडंसं पुरण, चिंच, सुकं खोबरं वगैरे घालून कटाची आमटी करतात.

पुरण घोटून झाल्यावर जी डाळ मागे राहाते, त्याची आमटी म्हणजे कटाची आमटी. त्यात आमसूल (कोकम) / चिंच घालून करतात.
बाकी कट म्हणजे मिसळीचा... Happy

>>>> लिंबू राहिलं. <<<<< देवकि, तूच एक माझी मायबोलीवरची सख्खी मैत्रीण Proud
... @ टण्या.... तूप संपत आल की.... Lol

खरा कोकणस्थ चिंचगुळ वापरणारच, पण त्याहुनही चिंचेऐवजी आमसुल असेल तर अधिक बहार.

फोडणी दिल्यावर ते "वरण"च कसे राहील? वरण बिनाफोडणीचेच. अन कोकणस्थी असेल तर ढोपरभर पाणी हवेच त्यात... अन तरीही चवदार !

आंबट वरण- ज्यात चिंचेचा कोळ असतो, गूळ कमी असतो, फ़ोडणी नसते.

फोडणीचं वरण असा काही प्रकार नसतोच. बरोबरय नीचं. ती आमटीच. उगाच आपली नावं एकेक! Proud

एकदा चव घेऊन बघा . छान चव असते .
उगाच नाव ठेवण्यात काय अर्थ आहे? <<
तू कोकणस्थांना कसली चव घेऊन बघायला सांगते आहेस? आणि नाव ठेवण्यावरून कोकणस्थांना उपदेश? लाहौलबिलाकुवत बिवत!!
कोकणस्थ स्वतःच स्वतःला केलेला उपदेश पण फाट्यावर मारतात. दुसर्‍याचे ऐकतील? ह्यॅट्ट! Wink

जाई, बुरा ना मानो होली है!

कोकणस्थांनो, दिवे संपले.

अगो आणि योकू कटाच्या माहितीबद्दल धन्यवाद.

@ पूनम

<< फोडणीचं वरण असा काही प्रकार नसतोच. >>

हॉटेलात दाल फ्राय / दाल तडका या नावाने काय मिळतं? त्यालाही आमटीच म्हणायचं का?

लाहौलबिलाकुवत बिवत!! कोकणस्थ स्वतःच स्वतःला केलेला उपदेश पण फाट्यावर मारतात. दुसर्याचे ऐकतील? ह्यॅट्ट!>>>> अर्र ! Wink मग बरोबर ..

बुरा ना मानो होली है >>> हा ! ते आहे ग . एकदम हे योग्यच नाही वगैरे आल म्हणून तसे लिहिले .

योग्य नाही? कोण म्हणालं?

विचारणार्‍याने कोकणस्थी स्टाइल वरण विचारलंय तर कोकणस्थ थोडीच सरळ आणि प्रेमळपणे सांगणारेत?

आमच्या विदर्भात साधं वरण म्हणजे बिना फोडणीचं, आणि फोडणीचं वरण म्हणजे फोडणीचं. Proud
घ्या- तेवढीच येक व्याख्या राहून जायला नको तौलनिक अभ्यासात.
तिकडे फोडणी देताना गॅसवर फोडणी सुखनैव ठेवलेली असते आणि मालकिणबाई हळूच भूलाबाई पाय टाकत अंगणात जाऊन गोडलिंबाची पाने ( म्हणजे कढीपत्ता) तोडून मग फोडणीचे वरण करतात. आधीच का पानं तोडुन तयार ठेवत नाहीत असे विचारु नये. येवढे ऑर्गनायईज्ड विदर्भातले देशस्थ कुठले असायला ?

>>>> लिंबू राहिलं. <<<<< देवकि, तूच एक माझी मायबोलीवरची सख्खी मैत्रीण >>>> लिंबूटिंबू, हहडोपाआ.

अगो साठी हे ऑथेन्टिक(हेमावैम) आंबट वरण. अर्थातच कोकण्स्थांचा काही संबंध नाही इथे(पुन्हा :दिवा:)

पूनम...........नुस्तं चिंच गूळ घालून नाही बनत हो ते आंबट वरण............त्याला पाहिजे ही रेस्पी (इथेही पुन्हा :दिवा:)

http://www.maayboli.com/node/6563

मात्र हा खास उन्हाळ्यासाठीचा पदार्थ आहे. अप्रतीम लागतो.

हो ना. ( विदर्भात ) आमटी म्हणजे तूरडाळ सोडून ज्या कशाची होते ती आमटी. कडधान्य असो नाहीतर मटारची असो Happy

आमच्याकडे बरीच व्हेरीएशन्स आहेत पण फेवरेट वरणाच्या रेसिपीत फोड्णी मस्ट आहे. आणि त्या फोडनीत लाल लाल झालेला लसूण, सुकी मिरची आणि कढीपत्ता पण मस्ट आहे. शिवाय जिरे मोहरी, मेथीदाणे. हिंग हळद नाही. ती वरणातच शिजवताना घालायची.

आमचं आंबट वरण वेगळं असतय Lol
तूर डाळ आणि मसूर डाळ एकत्र शिजवायची, १:१ प्रमाण. शिजवताना त्यात हळद, हिंग, मसाला, अर्धा कांदा, पाव पळी तेल घालयचं. नंतर घोटून घऊन (पार पीठ करायच नाही) तेलावर फक्त आणि फक्त लसणीची सणसणीत फोडणी करायची. २-३ आमसूल, चार(च) दाणे साखर किंवा तितपतच गूळ, मीठ, घालून एक उकळी घ्यायची

मानुषी आणि मनी, धन्यवाद Happy

मानुषी, वेगळीच आहे कृती. आता उन्हाळा येतोच आहे तेव्हा नक्की करुन बघेन. गारच प्यायचं असतं का हे वरण की ताक घातल्यावर परत गरम करायचं ?

मनी, मी जे आंबट वरण खाल्लं होतं ते साधारण ह्याच चवीचं असणार. खूप वर्षं झाली त्यामुळे नीट आठवत नाहीये पण ते पुरेसं आंबट नव्हतं त्यामुळे त्याला आंबट वरण का म्हणायचं असाही प्रश्न पडल्याचं आठवतं.

मला वाटतं आंबट वरण ही सीकेपी किंवा सारस्वतांची खासियत आहे. चूभूद्याघ्या.

.

वरणं म्हणजे साधं वरण. (ते वर लिहीलय तस, हळद, हिंग, मीठ गुळ)
आमटी म्हणजे आंबट गोड वरण. मग त्यात, चिंच, आम्सुल किंवा कटाची आमटी ई.

बाकी फोडणीची वरणं कांद्याची फोडणी, कांदा-टोमॅटो, लसणाची फोडणी ई.

आणि वरणाचा गोळा म्हणजे सकाळच्या उरलेल्या घट्ट गोळ्यामधे कच्च तेल, गोडा मसाला, कांदा-कोथिंबीर एकत्र करुन ज्वा.भाकरी / पोळी बरोबर खाणे. हे मस्त लागतं.

गोड्या वरणावर ८० प्रतिसाद बघून मेरी तो आंखे भर आयी. (मायबोलीचा विजय असो)
आता गुरगुट्या भात असा बीबी निघाल्यास त्याचीही लाज राखा म्हणजे झालं. Proud

तिकडे फोडणी देताना गॅसवर फोडणी सुखनैव ठेवलेली असते आणि मालकिणबाई हळूच भूलाबाई पाय टाकत अंगणात जाऊन गोडलिंबाची पाने ( म्हणजे कढीपत्ता) तोडून मग फोडणीचे वरण करतात. आधीच का पानं तोडुन तयार ठेवत नाहीत असे विचारु नये. येवढे ऑर्गनायईज्ड विदर्भातले देशस्थ कुठले असायला ?<<<<<<<<

रैना, अगदी अगदी. सासर माहेर दोन्हीकडच्या आठवणी ताज्या झाल्या. लसणाची, कांद्याची, हिरव्या पातीची कसलीही फोडणी द्या- ते विदर्भात फोडणीचं वरणच....आमटी म्हणजे फक्त पुरणाचा स्वैपाक असेल त्या दिवशीची कटाची आमटी.

नाना फडणवीसांनी शेवटी कोकणस्थी स्टाइल वरण केले की नाही? >> अस्सल कोकणस्थी उत्तर असे अपेक्षित आहे - "करायचे नव्हतेच, फक्त चौकशी करायची होती की कसे करतात" Happy

तू कोकणस्थांना कसली चव घेऊन बघायला सांगते आहेस? आणि नाव ठेवण्यावरून कोकणस्थांना उपदेश? लाहौलबिलाकुवत बिवत!!
कोकणस्थ स्वतःच स्वतःला केलेला उपदेश पण फाट्यावर मारतात. दुसर्‍याचे ऐकतील? ह्यॅट्ट! डोळा मारा

जाई, बुरा ना मानो होली है!

कोकणस्थांनो, दिवे संपले. >>> :D. दिवे संपले सोडून बाकी पोस्टशी सहमत, कारण मुळात दिवे घ्या हेच सांगावे लागायची गरज नाही.

रैना आणि सुपरमॉम, बरोबर. Lol
तुरीची डाळ, हळद (मेथी दाणे ऑप्शनल) घालून शिजवायची.
शिजलेल्या डाळीत हिंग, मीठ, पाणी घालून उकळायचं. हवं तर गुळ. हे झालं साधं वरण.
पाणी न घालता शिजलेली डाळ घोटायची आणि फोडणीत घालायची (फोडणीत मिरची/लसुण्/गोडामसाला/तिखट्/कांदा-टो वगैरे हवे ते मालमसाले). हे झालं फोडणीचं वरण.
चिंच गुळ घालून म्हणजे आंबट-गोड वरण.
आमटी म्हणजे कटाची किंवा शेंगदाण्याची.
पण हे सगळं विदर्भातल्या देशस्थांकडलं. मग इथे कशाला लिहिलं म्हणता? वैदर्भिय देशस्थी भोंगळ कारभार, अजून काय?

अस्सल कोकणस्थी उत्तर असे अपेक्षित आहे - "करायचे नव्हतेच, फक्त चौकशी करायची होती की कसे करतात" >>>>>> Proud Proud

कोकणस्थांमध्ये तूर डाळ शिजवली कि ते झाले वरण आणि त्याला फोडणी दिली कि त्याला आमटी म्हणतात .
त्यामुळे कोकणस्थ स्टाइल चे वरण करायचे असले तर नुसती तूर डाळ शिजवा कि झाल वरण Lol

गोड वरण म्हणजे तिखट+ मीठ+ मसाला ( गोडा मसाला ) + चिंच ( कोळ ) आणि गुळ हे पाच पदार्थ घातले कि त्याला "गोड वरण" म्हणतात पण कोकणस्थांमध्ये त्यालाच "आमटी" म्हणतात Happy

आमी बी त्या गोड्या वरणाला आमटीच म्हणतो. मग त्यात चवीनुसार गुळ्+चिन्च किन्वा गुळ्+आमसुल टाकतो/घालतो. फोडणी मात्र खमन्ग हवी. मला जरा साग्रसन्गीत लागत. म्हणजे कढीपत्ता व कोथिम्बीर निदान ९५ % तरी हवीच.

साबुना आधी वरणभात हवा म्हणून साधे वरण ( डाळीत हिन्ग + हळद घालुन शिजवुन मग डाळ घोटुन मीठ व गुळ घातलेले) आणी आम्हाला हे फोडणीवाले वरण.( मी आमटीच म्हणते बाबा)

ओ नाना, आता तिकड कैर्‍या मिळाल्या तर कैरीची कोय आणी गुळ घालुन फक्कडपैकी वरण अर्र सॉरी आमटी करा आणी ओरपा. कैरी आधी किसुन त्याला मीठ + तिखट व फोडणी घालुन त्याचे तात्पुरते लोणचे करा. फार लिहीले रे मी. हाणतील मला आता. पळा.

Pages