गोवंश हत्या बंदी कायद्यासाठी महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन

Submitted by नितीनचंद्र on 4 March, 2015 - 01:01

कालच्या बातम्यात महाराष्ट्रात गोवंश हत्येला बंदी घालण्याच्या विधेयकाला राष्ट्रपती महोदयांनी मंजुरी देऊन आता महाराष्ट्रात गोवंश हत्या बंदी लागु होईल.

हा कायदा महाराष्ट्रात युती शासन ( भाजप - शिवसेना १९९५ -१९९९ ) काळात पास झाला होता आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी गेला होता. दरम्यान च्या काळात युतीचे शासन जाऊन काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन १५ वर्षे सत्तेवर होते.

हा कायदा आमलात येण्यापुर्वी मा. राष्ट्रपती महोदयांनी सांगीतलेल्या काही तांत्रीक बाबीची पुर्तता करण्यास काँग्रेस- राष्ट्रवादीचे शासन धजावले नाही. याचा संबंध मुस्लीम समाजाच्या मताशी असल्याचा काँग्रेस- राष्ट्रवादीचा समज असल्याने त्यांनी चालढकल केली. ह्या उलट २०१४ च्या विधानसभेच्या आधी मुंबईत गोवंश हत्येला परवाना देऊन एकप्रकारे आपले धोरण तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अधोरेखीत केले.

आता महायुतीचे शासन आल्यावर त्यांनी पाठपुरावा करुन हा कायदा अस्तित्वात आणला ह्या बाबत त्यांचे अभिनंदन.

काही मायबोलीकर महाभाग लगेच आता गाय ही उपयुक्त पशु आहे असे स्वा. सावरकरांचे शब्द आठवुन याला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न करतील.

ह्या लेखाचा उद्देशही तोच आहे. भाकड झालेला गोवंश शेणखताच्या निर्मीतीसाठी सुध्दा उपयुक्त असतो. या दृष्टीने शेतकरी जर या कडे पाहील तर रासायनीक खते त्याचे दुष्परीणाम , त्याची किंमत आणि उपलब्ध होण्यासाठी करावी लागणारी याता यात पहाता शेणखत कितीतरी चांगला पर्याय निसर्गाने निर्माण केल्याचे लक्षात येईल.

दुसर्‍या बाजुला मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला.

आता त्याची री ओढुन कसाई गोवंश खरेदी करुन हत्येसाठी शहरात आणतात. याला परवानगी देणे म्हणजे ग्रामीण शेतीप्रधान अर्थव्यवस्थेला हानी पोचवण्याचे काम तकालीन सरकार करत होते.

यावर सातत्याचे भाजप- सेना सरकारने पाठपुरावा करुन हा कायदा आमलात आणुन चांगले काम केलेल आहे. जर शासन दुष्काळात चारा छावणीसारखे प्रयोग करेल तर कोण शेतकरी ही गोवंश विकायला पुढे येईल ?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अ‍ॅडमीन प्लीज याना असले फोटो टाकायला बन्दी घाला. बाळु भाऊ पुरावे आहेत हे मान्य आहे, पण ते पाहुन मळमळते याचे काय? त्या गुन्हेगाराना शिक्षा हवी.

अजुन एक विधि च चित्र आहे. एका ठाकुरनीला बर करायसाठि एका जनावराला (हरिन ) पाच सहा जनांनी धरलंय. त्याची मान चिरुन रक्त ठाकुरनिच्या तोंडात पडतंय. ब्राम्हन मंत्र म्हनतोय आनि कांडि फिरवतोय. यज्ञात अजुन मुंडकी आहेत.

दुस-या चित्रात ब्राम्हण कुठला तरी यज्ञ करतात आहेत. एका मानसाने धारदार परशूसारख्या मोठ्या हत्याराने पाच हजार म्हशीची मुंडकी उडवलीत. त्या हौदात रक्ताचा सडा पडला आहे.

ही चित्र म्हनत असाल तर टाकतो.

त्या गुन्हेगाराला कोन शिक्शा करनार ? राजरोस चालतय. उत्तर प्रदेहात कायदा झालाय म्हटल ना ? तिथल चित्रये ते.

बन्दी घातली तर एकाच धर्माला बोल लावनार लोक. हे पन माहीतीत असु द्या. बोलताना दोन्हिकडुन बोललं जातं.

मुस्लीम धर्मग्रंथात गोवंश मारुन खावा असे कुठेही लिहलेले नसताना मुस्लीम शासकांनी गोहत्येचा उपयोग त्यांनी भिती निर्माण करणे आणि सैन्याच्या पोटापाण्याची व्यवस्था लावण्यासाठी केला..

....

काय हो नितीन्चंद्र भौ ,

म्हशी खा , शेळ्या खा हे हिंदुंच्या कोणत्या धर्मग्रंथात लिहिले आहे हे समजु शकेल का ?

लब्बाड कुठले !

दूध प्यायचं म्हशीचं ! तिला बिनधास्त कापायचं !

आणि मुसलमान गायी कापतात म्हणुन भगव्या आरोळ्या ठोकायच्या ?

तुमच्यापेक्षा मुसलमान परवडले .

जुने पर्यावरण मंत्री जयराम रमेश देखील मुसलमान आणि ख्रिश्चन लोकांना सल्ले देत आहेत- गोमांस वर्ज्य करा. का? तर कार्बन उत्सर्जन कमी करायला.
पण एकंदरीतच मांसाहार अधिक करणारे देश-जसे कॅनडा, अमेरिका वगैरे, या सगळ्या देशांनी गोमांस भक्षणाचे प्रमाण कमी करण्याचे मनावर घेतल्याचे दिसते आहे. किमान गोहात्येची दुकाने अन्यत्र हलवण्याचे तरी.
निमित्त आहे कार्बन उत्सर्जनाचे आणि हेल्थ कॉशस असल्याचे; पण 'निर्मिती' भारताला करू देत. आम्ही थोडे थोडे करत खाऊ आणि आमचे कार्बन उत्सर्जन कमी झाल्याचे जगाला कागदोपत्री दाखवू- असा काहीसा सूर दिसतो आहे प्रगत राष्ट्रांत. या पार्श्वभूमीवर योग्य पाउल आहे हे सरकारचे. भारतासारख्या उष्ण कटिबंधीय आणि विपुल पाउस असलेल्या देशात राज्यकर्ते योग्य नियोजन करतील तर प्राण्यांच्या मांसावर अवलंबित्व असणारी अर्थव्यवस्था उदयाला येणार नाही आणि पाश्चात्यांचे भारताला याबाबत 'फ्याक्टरी' बनवण्याचे मनसुबे फळास येणार नाहीत.

छटाकभर काही झाल्याबरोबर अभिनंदनाचे धागे काढणार्‍यांनी अतिरेक्याला सोडले यावर धागे काढले नाही. का?
ते कृत्य देशहिताचे होते काय ? की आवडत्या सरकारने केले म्हणुन ते योग्य आहे?

सदरहु निर्णय अगदी बरोबरच आहे व् त्यात गैर काही नाही अश्या गृहितकातुन काढला आहे का? असल्यास इथे तर्कसंगत मुद्द्यांस जागा असेल की नाही हे धागाकर्त्याने स्पष्ट करावे! म्हणजे पुढे कळपाट किती झिजवायचा , झिजवायचा की नाही हे मला नेमके ठरवता येईल.

रच्याकने, भाकड़ गाईंचा "शेणख़त" साठी उपयोग वगैरे निरतिशय बिना अभ्यास करता दिलेले सल्ले छान करमणूक करुन गेले!!, "आर्मचेयर फार्मिंग" हे बरेचसे पैरेलल यूनिवर्स गत आहे!! काय वाटेल ते होते इथे!! महाशय तौलानिक अभ्यास केला असतात तर एक बॅग यूरिया , पोटाश किंवा नत्र ह्याचे कार्य करण्यासाठी किती ट्रॉली शेणख़त लागेल त्याची वाहतूक धरून त्या भाकड़ गाईंस चारापाणी शेड मैनेजमेंट (गोठा व्यवस्थापन) इत्यादी खर्च जमेस धरून किती किंमत पडेल गृहितक धरा अन समीकरण सोंडवा!!! जन्मात कधी गाई ची सेवा न केलेल्या शेणमुताचे गोठे साफ न केलेल्या धर्मप्रेमी जनतेचे शेतकऱ्यांच्या बोडक्यावर भाकड़ गाई बसवल्या बद्दल अभिनंदन!!!

टिप :- हा निर्णय मूर्खपणा चा का आहे हे सांगणे बी मी माझेच कर्तव्य समजतो ३२ गाईचा गोठा दहाव्या वर्षी पासून ते बाविस वर्षपर्यंत संभाळला आहे मी!! आम्हाला जनावरे नाहीत क़सायाला विकायची इच्छा होत हो साहेब ! चारा शॉर्ट असला की पाडे वासऱ्या मांडी वर डोके ठेऊन पाय रगड़त मरताना पाहिले अन झेलले आहेत मी ह्या पेक्षा कसायाला दिले तर मुक्त होतील असे मला जवळ घेऊन धाय मोकलत रडणारे वडीलधारे बी पाहिले आहेत मी, चारा डेपो ला अंमलदारास २० ₹ न देता तो आपल्या बापासही चारा द्यायचा नाही ! आता बोला!! Sad

बाळू,

>> जर या कारमधलं गाईचं मांस देवळात टाकलं गेलं असत तर ?

हिंदू डुक्कर कापून मशिदीत टाकतील हेच तुम्हाला सुचवायचंय ना? गुजरातेत गेल्या १२ वर्षांत एकही दंगल झालेली नाहीये.

आ.न.,
-गा.पै.

अहो पहिलवान साहेब, तुम्ही स्वतः वाचलाय का प्रतिसाद ? मंदीरात म्हटलय, मशिदीत नाही. तुम्ही असा घोळ घातला तर तुम्हाला पक्षविरोधी कारवायांबद्दल काढून टाकतील.

ज्या पक्षाने गोहत्याबंदीची कास धरायची त्यांच्याच पक्षाच्या गाडीत गाईचं मास भरून ते कुठं चालले असतील ?

गेल्या १२ वर्षात दंगल झालेली नाही >>>>> १२ वर्षांपूर्वी झालेली पुरेशी नाही का ?

Biggrin

इब्लिस बोंबलु द्या त्यांना
त्यांना वाटते खोटे जोर जोरात बोलले की लोकांना खर वाटते. त्यांचे नेते पन तेच करतात
जुना भेकडपणा आहे.

अहमदाबादेत पण झाली होती. पण बारा वर्षापूर्वी जी दैदीप्यमान कामगिरी केली होती त्यापुढे हे काहीच नाही म्हणून कुणी दखल घेतली नाही. आता लोक छोट्या मोठ्या कामाची अपेक्षा नाहीत ठेवणार.

Lol

अल्पमतात गेल्यावर.
सध्या पाच वर्षे योग दिसत नाहीत. उप्र , बिहार मधे पुढच्या वर्षी होऊ शकेल.

Pages