कुठला बोर्ड? ICSE, CBSE की SSC

Submitted by केदार on 16 July, 2009 - 10:30

सध्या भारतात परत जाणारे मित्र वाढत आहेत. दरवेळी चर्चा कुठल्या शाळेत टाकावे वरुन सुरु होऊन ती मग कुठल्या बोर्डाची शाळा असावी ह्यावर येते. इथे राहून तिथे कुठल्या शाळेत घालायचे हा प्रश्न प्रत्येकालाच पडतो पण नीट उत्तर मात्र मिळत नाही. कुणी आयसीयस्सी म्हणतं तर कुणी सिबीय्सी तर कुणी आपले जुने एसेस्सी बोर्ड. सध्या भारतात कुठल्या बोर्डाचे शिक्षण चांगले आहे? (तुलनेने).

तुम्ही भारतात जाताना तुमच्या पाल्याला कुठल्या बोर्डाच्या शाळेत घालाल?

बोर्ड निवडीचा तुमचा निकष काय होता?/आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगली चर्चा

माझी मुलगी एस.एस.सी आठवीत आहे... शेजार्‍यांची मुलगी आय.सी.एस.सी. नववीत आहे. सगळी पुस्तके व अभ्यास क्रम कंपेअर केला. माझे मत

१. आमच्या शाळेत स्टुडंट शिक्षक रेशो चांगला आहे ( एका वर्गा त जास्तित जास्त ४० मुले). त्यांच्या शाळेत साधारण ४५ मुले एका वर्गात. सध्या फी सेम आहे साधारण २३००० वर्षाला. ( आमची शाळा एडेड नाही.)

२. त्यांच्या शाळेत भाषा ह्या विषयावर फार भार आहे. साधारण आय.सी.एस.सी ची प्रत्येक शाळा स्वतः ची पूस्तके स्वतः निवडते. त्यांना त्याची मुभा त्यांच्या बोर्डाकडुन आहे. मुलिच्या शाळेने सुरेख सुवर्ण्मध्य काढला आहे. ते भाषेचे क्रमिक पुस्तक शिकवतातच..पण पहिली पासून त्यांनी ग्रामर व इतर गोष्टी तिन्ही भाषांसाठी, वेगळी बाहेरची पूस्तके ठेवुन शिकवायला सुरुवात केली. त्यामुळे ग्रामर व भाषा सौंदर्य खुप छान करुन घेतले. तसेच वर्गांमधुन खुप वेगवेगळे गट तयार करुन प्रत्येक महिन्याला छान छान अ‍ॅक्टिव्हीटी करुन घेतात.... परिणामी ह्यांच्या शाळेतिल बरीच मूले इंटर स्कूल स्पर्धांना बक्षिसे मिळवतात ( उदा. वादविवाद, वक्त्रुत्व (शब्द गंडला), एकांकिका....). हल्ली भाषेचे सगळे प्रश्ण हे कॉप्रिहेंशन ह्या प्रकारात विचारत असल्याने ( ८वी पासून) क्रमिक पुस्तक काय आहे ह्याच्याशी संबंध नाही. तसेच ग्रामर ही ह्याशाळा हवे तसे शिकवु शकतात. हल्ली लँग्वेज स्किल्स कडेच एस.से.सी चे प्रश्ण असतात. ( कोण कोणास म्हणाले वगैरे बाद झाले). एक पद्य व एक गद्य प्रश्ण फक्त क्रमिक पूस्तकातुन येतो ( फक्त मराठी व हिंदी साठी) त्यात बहूतेक करुन संदर्भासहित स्पष्टीकरण असते.

३. संस्कुत ची पातळी आमच्या शाळेची चांगली आहे.

४. इतिहास व भुगोला ची परिस्थीती दोन्ही कडे सारखी आहे ..... म्हणजे सारखीच वाईट आहे.... तरी आमच्या शाळेत हिस्टरी टॅलेंट व भुगोल टॅलेंट सारख्या स्पर्धांना सगळ्या मुलांना कंपल्सरी बसवतात.... नीदान पुस्तक परत परत वाचले जाते. आमच्या कडे व तिकडे दोन्ही शाळां मधे रट्टा मारावाच लागतो.

५. खरा फरक येतो तो गणीत व सायंस मधे!!!! आमच्या शाळेत गणित+सायंस ८ वीचे बरेच सोप्पे आहे.... ९वी दहावी महा कठिण..... त्यामुळे मुले बिचकतात.... पण निभावुन नेतात.... त्यांच्या शाळेत हेच कठिण गणित+सायंस त्यांनी दोन वर्षां ऐवजी तीन वर्षात म्हणजे ८,९ व १० वी मधे विभागले आहे... ताण कमी पडतो. स्टेप्स पेक्षा उत्तरांना जास्त मार्क आहेत. आमच्या कडे स्टेप्स ना ही मार्क आहेत. आमचा गणिताचाव सायंस चा पॅटर्न आता बदलला आहे. दहावीला साधारण ६०% पेपर सगळ्यांना सोडवता येइल असा असतो. अगदी ग्रामिण विभागही ह्यात चमकावा ही अपेक्षा असते. ( इकडे ग्रामिण भागातिल मुलांच्या बुद्धी बद्दल शंका नाही. त्यांना मिळणार्‍या सुविधा मर्यादित आहेत). उरलेल्या ४०% मध्ये २०% हे जरा कठिण प्रश्न असतात. व सधारण २० मार्कांना "हॉट्स" म्हणुन प्रकारातले प्रश्न येतात. जे पूर्ण पणे कस लावणारे असतात. म्हणजे ज्यांचा कंन्सेप्ट क्लीअर आहे अशांनाच ह्याची उत्तरे देता येतात. ते ऑब्जेक्टिव्ह प्रकारातले प्रश्न असतात. त्या मुळे पूर्ण पणे गुगली असु शकतात. हे प्रश्न जो सोडवतो तो विद्यार्थी ९०% वर मार्क मिळवतोच. जी खरी हूशार असतात ती ह्यात चांगली कमाई करतात.....

६. हल्ली वर चर्चिल्या प्रमाणे जी मुले आय.सी.एस.सी व सी.बी.एस.सी मधुन नॉर्मल ११वी १२ साठी येतात त्यांना इकडचे ११/१२ कठिण जाते. त्यामुळे सगळ्या आय.सी.एस.सी व सी.बी.एस.सी शाळां मधुन ११/१२ सुरु करण्याचे बंधन कोर्टाने घातले आहे. ( मुदत माहित नाही पण कायदा मात्र आहे). आता पालकांच्या मनसिकते मधे अजुनही बदल झालेला नसल्याने लोक अजुनही मेन स्ट्रीम च्या चांगल्या कॉलेजात प्रवेश घेण्याची गर्दी करतात. हे जर नीट धसास लगले तर कॉलेज प्रवेष हा प्रकार सुकर होइल..... परत मुलेही कॉलेज लाइफ एंजॉय करणे ह्या मानसिकते मधे असतात....असो...

हे मला दिसलेले चित्र.... रोजचा संबंध असल्याने व एकंदरीतच हल्ली ह्या विषयीची खूप चर्चा होत असल्याने हा मागोवा काढला..... मलातरी वाटते की सीर सलामत तो पगडी पचास.... आर्थात तुमचे मुल कुठेही गेले तरी मूळ बुद्धी व मेहेनत करायची तयारी असेल तर काहीही अडत नाही.... व्यवस्थित नीभावुन नेतात....वर म्हंटल्या प्रमाणे आमची शाळा एस.एस.सी ची असली तरी खुपच प्रयत्न वादी आहे. त्यामुळे मुलीचे रोपटे छान रुजले आहे....

(मी स्वतः अतिषय प्रतिष्टीत आय.सी.एस.सी. बोर्ड व आय बी बोर्ड च्या ३ शाळांची ६ वर्षे मानद ट्रस्टी व सल्लागार म्हणुन काम पाहिले आहे. शक्य असूनही मुद्दामुन मुलीला त्या शाळेत घातले नाही. कारण आय.सी.एस.सी च्या मुख्याधयापिका बाईंनीच मला तसा सल्ला दिला की लावलेले रोप उखडु नको.... मी तो मानला...)

<आमच्या शाळेत गणित+सायंस ८ वीचे बरेच सोप्पे आहे.... ९वी दहावी महा कठिण..... त्यामुळे मुले बिचकतात.... पण निभावुन नेतात>

स्टेट बोर्डात जनरल मॅथ्स सामान्य गणित आहे ते आठवीपर्यंतच्या गणिताचेच एक्स्टेंशन/ वरची पायरी आहे. पण बीजगणित भूमितीवाल्यांना मोठी लीप आहे हे बरोबर.

येस, अल्पना. वाचली तिथली चर्चा.
आधी म्हटल्याप्रमाणे प्रथमदर्शनी अशा प्रकारची असाईनमेंट 'टू मच' वाटू शकते. पण दोन मुद्दे विचारात घ्यावे लागतील.
पहिला म्हणजे काँटेक्स्ट- कोणत्या प्रकारच्या पूर्वतयारीनंतर हा होमवर्क आला आहे ते महत्वाचे आहे. यामध्येच उत्तर म्हणून काय आणि कुठेपर्यंत लिहिण्याची अपेक्षा आहे हे ही महत्वाचे.
दुसरे असे की या एका उदाहरणावरुन 'असले होमवर्क देणारे ते आयबी बोर्ड' हे जरा हेस्टी जनरलायझेशन होईल.
असो.

आगाऊ , दोन्ही मुद्द्यांत अमान्य होण्यासारखं काही नाही. पण रैना अनेकदा जे लिहितात त्यावरून ते एकच उदाहरण आहे असे वाटत नाही. तसंच तो त्या शाळेशी स्पेसिफिक मुद्दा नसून स्पेसिफाइड करिक्युलमचा भाग आहे असं तिथे वाचल्याचं आठवतं.

नोप, देन दॅट्स नॉट द केस फॉर शुअर.
आयबीच्या करिक्युलममध्ये असे इतके हार्ड अन फास्ट स्पेसिफिकेश्न्स मुळातच नसतात. प्रत्येक शाळेला आपल्या सोयीप्रमाणे विदिन स्पेसिफाईड लिमिट्स भरपूर मॉडीफिकेशन अलाऊड आहेत. त्यपर्टीक्युअललर केसमध्ये मला त्या शिक्षकाचा रोल जास्त महत्वाचा वाटतो.

आम्ही सध्या याच बोटीत असल्याने हा धागा वाचुन काढ्ला.
आय बी पी वाय पी पुर्ण केल्यावर मुंबईत येतोय त्यामुळे कोणते बोर्ड निवडावे याबद्द्ल शंका आहे.
पोदार इन्टर्नॅशनल स्कूल , जमनाबाई नरसी इन्टर्नॅशनल स्कूल किन्वा पार्ले टिळक आय सी एस सी चा कोणाला अनुभव आहे का?

पुण्यातली RIMS international school IGCSE जी NIBM रोड वर आहे त्याचा कोणाला अनुभव आहे का किंवा काही माहिती आहे का? symbiosis international school मध्ये पण IGCSE आहे पण ती लांब पडेल म्हणून ह्या शाळेचा विचार करतोय

कोणता बोर्ड निवडावा या विवंचनेत मी ही आहे म्हणून हा धागा शोधून काढला. मुलीला स्टेट बोर्ड मध्ये ऍडमिशन घ्यावे हे आम्ही आधीच ठरवले होते . मुलगी हुशार असेल तर कोणत्याही शाळेत गेली तरी फरक पडणार नाही असा विचार केला होता. पण ऑफिस / कॉलनी मध्ये सगळ्यांचा कल हा ICSE/IGCSE बोर्ड आहे. ICSE बोर्ड बघताना शाळा कशी आहे ते हि बघणे आवश्यक आहे. बोर्ड जरी ICSE असेल तरी त्या कॅलिबर चे शिक्षक शाळेत आहेत का हे कसे कळणार?
इतरांनी घेतले म्हणून आपण घ्यावे असे वाटत नाही पण आपल्या एक निर्णयामुळे मुलीचे नुकसान होऊ नये असे हि वाटते सायन , दादर या भागात खूप कमी स्टेट बोर्ड च्या शाळा आहेत. चेंबूर च्या स्वामी विवेकानंद या शाळेबद्दल कुणी सांगू शकाल का ?
स्टेट बोर्ड ची शाळा आहे .

Pages