अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिक्युरिटी बाबत - केजरीवाल यांचा भर थेट लोकसंपर्कावर असतो. आता मुख्यमंत्री झाल्यावर सिक्युरिटी मुळे जर त्यांना आणि लोकांना एकमेकांना भेटण्यास अडचणी येऊ लागल्या तर ते त्यांच्या एकूण इमेज आणि कार्यपद्धतीच्या विरुद्ध जाऊ शकते. प्रमाणात (moderate) सिक्युरिटी असायला हरकत नाही.

एक प्रश्न मनात आला - आता शासनकर्ता झाल्यामुळे केजरीवाल आणि इतर निवडून आलेल्या 'आप' नेत्यांवर जे 'आप' च्या राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य आहेत, काही बंधने येतील का? जर राष्ट्रीय किंवा इतर राज्य स्तरावरील एखाद्या भ्रष्ट्राचारासंदर्भात 'आप'ला पाठपुरावा करायचा असल्यास त्यात हे निवडून आलेले सदस्य भाग घेऊ शकतात का? जर नसल्यास 'आप' मध्ये असे प्रभावी पर्यायी नेत्रुत्व आहे का?

केजरीवालांच्या झेड सुरक्षेबद्दल तुमची काय मते आहेत? मी निकालानंतर सुद्धा मुलाखतींमध्ये ऐकलंय की त्यांनी सिक्युरिटी घ्यायला नकार दिला आहे.
-----
झेड सुरक्षा घेणे अत्यन्त जरुरीचे आहे.... आणि हे ते स्वतः साठी नाही तर दिल्ली ह्या महत्वाच्या प्रदेशाचे मु म म्हणुन. त्याचसोबत देशाच्या राजकारणाला महत्वाची दिशा धोरण देताना श्री. केजरीवाल यान्ना अनेक राजकारण्यान्ना उद्द्योगाना दुखवावे लागणार आहे...

वर्षानुवर्षे विनासायास चालत येणारा (काळा) पैशाचा स्त्रोत अचानक बन्द झाल्यावर, बन्द होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर ते (काळे पैसे उद्योजक) त्यान्ची रोजी रोटी वाचवण्यासाठी सैरा वैरा धावतील... काय वाट्टेल ते प्रयत्न करतील. नन्तर पश्चाताप करण्यापेक्षा काळजी घेणे सर्वात चान्गले.

आआप सरकार ने (केजरीवाल सरकार नाही) संजीव चतुर्वेदी यांना दिल्लीच्या अँटीकरप्शन डिपार्ट्मेंट चीफ बनवले.

आत्ताच्या न्युज नेशनच्या बातमी नुसार : घुमजाव भाग २

१. ह्या वेळेला जनता दरबार घेतला जाणार नाही,
२. मंत्र्यांना सचिवालयात (ठरावीक वेळा सोडुन ईतर वेळी) सर्व सामान्य लोकांना भेटता येणार नाही.
३. मंत्र्यांच्या घरीही ठरावीक वेळेतच भेटता येईल,

Rofl

रश्मी, Lol
सो सॉरीचे बरेच व्हिडिओज धमाल आहेत.

<<एक प्रश्न मनात आला - आता शासनकर्ता झाल्यामुळे केजरीवाल आणि इतर निवडून आलेल्या 'आप' नेत्यांवर जे 'आप' च्या राष्ट्रीय कार्यकारीणीचे सदस्य आहेत, काही बंधने येतील का? जर राष्ट्रीय किंवा इतर राज्य स्तरावरील एखाद्या भ्रष्ट्राचारासंदर्भात 'आप'ला पाठपुरावा करायचा असल्यास त्यात हे निवडून आलेले सदस्य भाग घेऊ शकतात का? जर नसल्यास 'आप' मध्ये असे प्रभावी पर्यायी नेत्रुत्व आहे का?>>

अशी काही बंधनं असण्याचं खरंतर कारण नसावं. भ्रष्टाचाराविरुद्ध पाठपुरावा करणं निवडून आलेल्या, न आलेल्या प्रत्येकाचीच जबाबदारी आहे. पण अधिकृत माहिती नाही.
नेतृत्वाबाबत माझं निरीक्षण असं आहे की स्थानिक पातळीवर नेतृत्व उभं करण्यावर आपचा जोर असेल. शिवाय दिल्लीच्या विजयानंतर देशभरातील आप कार्यकर्त्यांचा आत्मविश्वासही नक्कीच वाढला असेल.
देशभरात बर्‍याच ठिकाणी आपचे कार्यकर्ते (उघड दिसत नसले तरी) कामं करत आहेत. आत्ताच एक बातमी वाचली. आपच्या मंगलोर कार्यकर्त्यांनी पाण्याच्या मीटर्सचं रॅकेट उघडकीला आणलं.

जिथे जिथे गरज पडेल तिथे अके किंवा इतर नेते जातीलच असा अंदाज आहे. पण सध्या तरी त्यांनी मिशन दिल्लीवरून नजर हटवू नये. आश्वासनं पूर्ण करण्यावर भर द्यावा. नाहीतर आप सुद्धा फक्त 'जुमला पार्टी' व्हायला वेळ लागणार नाही.

<<वर्षानुवर्षे विनासायास चालत येणारा (काळा) पैशाचा स्त्रोत अचानक बन्द झाल्यावर, बन्द होण्याची शक्यता निर्माण झाल्यावर ते (काळे पैसे उद्योजक) त्यान्ची रोजी रोटी वाचवण्यासाठी सैरा वैरा धावतील... काय वाट्टेल ते प्रयत्न करतील.>>
हम्म. तीच भिती वाटते.
हळूहळू मी पण "सुरक्षा घ्यावी" च्या गटात यायला लागलेय.

कबीर,
संजीव चतुर्वेदींची बातमी अधिकृत आहे का? असेल तर मस्तच. भ्रष्टाचाराविरुद्ध एक स्ट्राँग मेसेज जाईल.

रमाकांत,
तुम्ही घुमजाव कशाला म्हणत आहात हे कळलं नाही.
"१. ह्यावेळेलाही जनता दरबार घेणार ?
२. सर्व सामान्य लोकांना कुठल्याही प्रहरी सचिवालयात मंत्र्यांना भेटता येईल?
३. मंत्र्यांच्या घरी कुठल्याही वेळेत भेटता येईल?" असं आधी म्हटले आहेत का ते ? लिंक द्या.

हे आवडलं Happy --- AAP leaders, leader aspirants & volunteers should pledge to avoid indulging in such defacing acts (and culture).

आणि हे बघून आश्चर्य वाटलं. अचूक राजकीय अंदाज? की सिक्स्थ सेन्स? की निव्वळ योगायोग ?

उद्योगविश्वासाठी आप अनुकूल नाही हा समज बर्‍याच लोकांचा आहे. थोडं वेगळं मत -
Arvind Kejriwal is scrupulously honest, stunningly intelligent & brave: Rajiv Bajaj
I have seen no evidence of Arvind being anti-business at all.

दिल्लीतील कॉन्व्हेंट शाळेवर झालेल्या हल्ल्याचा ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी कडक शब्दांत निषेध नोंदविल्यामुळे ‘बॅकफूट’वर गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या घटनेची तत्परतेने दखल घेणे भाग पडले. यापूर्वीच्या पाच हल्ल्यांनंतर मोदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती.
http://maharashtratimes.indiatimes.com/nation/AAP-Modi/articleshow/46238...

जियो केजरीवाल जियो

कबीर Happy
<<दिल्लीतील एखाद्या 'चोरी'च्या घटनेची दखल घेत खुद्द पंतप्रधानांनी पोलिस आयुक्तांना पाचारण करण्याचा दुर्मिळ प्रकार शुक्रवारी घडला.>>

पण गृहमंत्र्यांना बायपास करून पंप्र का बरं लक्ष घालत आहेत? असो. असली दुष्कृत्ये करणार्‍यांना मेसेज गेल्याशी कारण.

आज सुट्टी घेऊन शपथसमारोह बघावासा वाटतोय. भ्याऽऽऽऽऽ

गृहमंत्र्यांना बायपास करून पंप्र का बरं लक्ष घालत आहेत? >>> सबकुछ मै हु! आणि ते लक्की पण आहेत ना! Wink

कबीर.,

गेले इत्येक वर्षे देशभरात होणाऱ्या देवळांतल्या चोऱ्यांबद्दलही मोदींना खेद वाटो.

आ.न.,
-गा.पै.

ओहो. म्हणजे आनगापैंना चर्च-कॉन्व्हेंट्वरील हल्ले चोर्‍यांसाठी होत आहेत असे वाटते तर. असो.

२००० प्रतिसाद आले
मिर्चीताईंची मेहनत ७ महिन्यानंतर फळास आली. १४ जुन रोजी धागा काढण्यात आलेला बरोबर ७ महिन्यांनी आज केजरीवाल प्रचंड बहुमताच्या सरकारचे मुख्यमंत्री म्हणुन शपथ घेत आहेत. गेल्या ७ महिन्याचे प्रतिसाद वाचल्यावर बरेच काही बदल झालेले दिसुन आलेत

मिर्ची, अ‍ॅडमिनला सांगून हा बीबी बंद करा आणि नवीन उघडा.

२००० पोस्टींसाठी अभिनंदन. संयतपणे आपलाच मुद्दा मांडून चर्चा केल्याने तसेच इतरांची खिल्ली न उडवल्याने धागा कसा व्यवस्थित चालू राहतो आणि अ‍ॅडमिनवर वाहता धागा करायची वेळ कशी येत नाही याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा बीबी ठरावा.

२००० पोस्टींसाठी अभिनंदन. संयतपणे आपलाच मुद्दा मांडून चर्चा केल्याने तसेच इतरांची खिल्ली न उडवल्याने धागा कसा व्यवस्थित चालू राहतो आणि अ‍ॅडमिनवर वाहता धागा करायची वेळ कशी येत नाही याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा बीबी ठरावा. >> +१

खुजलीवाल यांना दिल्लीचा दुसर्‍यांदा "मुख्यमंत्री" झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!

गेल्यावेळेसारख यमुनेत उडी मारुन, वाराणसीला गंगेतुन बाहेर येण्याचा प्रयत्न, पंतप्रधान या पदाच्या लालसेतुन त्यांनी करु नये एवढीच इच्छा.

विदुषक

विदुष्क ..

वीदुषक ....

Proud आता संभाळुन लिहा नैतर विदुशक सहा टिंबा असा नवा अवतार. घ्यावा लागेल

२००० पोस्टींसाठी अभिनंदन. संयतपणे आपलाच मुद्दा मांडून चर्चा केल्याने तसेच इतरांची खिल्ली न उडवल्याने धागा कसा व्यवस्थित चालू राहतो आणि अ‍ॅडमिनवर वाहता धागा करायची वेळ कशी येत नाही याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे हा बीबी ठरावा. >> +१

मिर्चीताई, आता आजपासून अरविंद केजरीवालची नवी इनिंग चालू होत्येय तर इथेही सीझन टू चालू करा.

Pages