अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शेवटी भेट झालीच तर ! Happy
AK-modi.jpg

"भारत बड़ा विचित्र देश हैं यहाँ देश का प्रधानमन्त्री एक नक्सली, गद्दार, AK 49 और अराजकतावादी को खुद चाय पे बुला कर गुलदस्ता देता हैं !!" Wink

++++भारत बड़ा विचित्र देश हैं यहाँ, एक नक्सली, गद्दार, AK 49 और अराजकतावादी, दिल्लीका मुख्यमन्त्री बन सकता है, तो उसे चाय पे क्यों नही बुलाया जा सकता है !!" ++++++++++

Wink Wink Wink

महेश,

>> खरेतर १५ वर्षांनंतर मोदी लाटेमुळे वातावरण चांगले तयार झाले होते, पण या लोकांनी अण्णांना हाताशी धरून त्या
>> परिस्थितीचा फायदा उचलला.

असहमत. दिल्लीत भाजपने स्थानिक नेतृत्वाची उपेक्षा केली. त्यामुळे भाजप एक स्थानिक पक्ष म्हणून विस्तारू शकला नाही. साहेबसिंग वर्मांचे पंख छाटण्यात भाजपच्या तथाकथित 'राष्ट्रीय' नेतृत्वाचा हात होता. एकंदरीत दिल्लीत 'राष्ट्रीय पक्षांना' कोणी स्थानिक नेता वरचढ झालेला आवडत नाही. यामागे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यास मिळणारी अतिप्रसिद्धी हे कारण आहे. काँग्रेसच्या शीला दीक्षित याही 'बाहेरच्या' होत्या.

सांगायचा मुद्दा काये की दिल्ली विधानसभेचं एव्हढं मनाला लावून घेऊ नका.

आ.न.,
-गा.पै.

>> खरेतर १५ वर्षांनंतर मोदी लाटेमुळे वातावरण चांगले तयार झाले होते, पण या लोकांनी अण्णांना हाताशी धरून त्या
>> परिस्थितीचा फायदा उचलला .>>

Infact the BJP has taken the advantage of Anna Andolan to come to power (there is nothing wrong in it). Kejriwal is most important part of Anna Andolan so he can take advantage of that. He is the one who gave proper direction to that Andolan.

>>सांगायचा मुद्दा काये की दिल्ली विधानसभेचं एव्हढं मनाला लावून घेऊ नका.
गापै, भाजप दिल्लीमधे प्रबळ स्थानिक नेतृत्व उभे करू शकले नाही हे तर एक मोठे कारण आहेच.
पण मनाला कसे लावून घेऊ नका ? निट विस्ताराने लिहिण्याएवढी माहिती नसल्याने जास्त काही लिहू शकत नाहीये आत्ता, पण का कोण जाणे, मन फार म्हणजे फारच साशंक आहे. Sad

मिर्ची ताई,

आआप ने मुंबई मनपा निवडणुक लढवण्याचे ठरवले तरी दिल्लीचे निकाल बघता बरीच पळापळ होइल इकडे.

ममता बॅनर्जी आणि बीजेपीचे बरेच विरोधक बीजेपी हरल्यामुळे आनंदित आहेत. हाच आआप बंगाल मधे निवडणुक लढवण्यासाठी आला तर त्याची प्रतिक्रिया मनोरंजक नक्कीच असेल.

बीजेपी का हरले याच्या बरर्‍याच कॉन्स्पीरसी थिअरीज असतिल एनालिसीस असतिल.

आआप ला २०१३ पेक्षा २४% मते जास्त मिळाली. २०१३ चा खेळ खंडोबा करुन सुद्धा त्याची मते लोकसभे पासुन सातत्याने वाढली. बीजेपी लोकसभेत मिळालेली मते टीकवु शकले नाही , सत्तेत असल्या मुळे त्यांच्या विरुद्ध नाराजी असेल, बीजेपी कम्युनल वाटल्या मुळे लोकांपासुन दुरावली असेल आणखीन बरेच काही.

दुसरी बाजु बघायला गेल तर बाकीचे पक्ष कम्युनल नाहीत तरी ते सुरक्षित नाहीत, आपली मते टीकवु शकलेले नाहीत. कॉंग्रेस सत्तेत नाही केंद्रातही नाही आणि रज़्यात पण नव्हती तरी परतुन सहानुभुती मिळवु शकत नाही.

खर तर हा वेकप कॉल प्रत्येक राजकिय पक्षाला आहे. ते ज्या प्रकारचे राजकारण करत आहेत ते कोणालच नको आहे. आआप सारखा पर्याय मिळाला तर प्रत्येकावर पेन्शन घेण्याची वेळ येईल. अर्थात केजरीवाल त्यांचा कर्य काळ कसा पूर्ण करतात आणि किती वेगाने आआप राष्ट्रीय पक्ष म्हणुन नावारुपाला येतो यावर अवलंबुन आहे.

म्हणुनच आआप ला मिळालेल यश हे anxiety निर्माण करत. Anxiety अशसाठी कारण यावर केवळ आआपच अस्तित्व नाही तर भारतिय राजकारणात काही तरी चांगल आणि नैतिक होउ शकत याच्या आशावादाच अस्तिव सुद्धा पणाला लागलेला आहे.

या साठीच आआपचा पंखा नसलो तरी केजरीवाल यानि यशस्वि पणे आपला कर्य काळ पूर्ण करावा असेच मनापसुन वाटते.

युरो, सहमत ! Happy

पण तरी अगदी साधी राहणी साधी राहणी करून गांधींसारखी प्रसिद्धी मिळवायचा जो भडिमार चालू आहे तो नाही पटत. माझे वैयक्तिक मत आहे की पंप्रसारख्या व्यक्तीने दिमाखात राहिले तर हरकत काय आहे ?
कधी नाही ते भारतासाठी कोणीतरी एक चांगली इमेज बिल्डिन्ग करत होते, तो बिचमे टांग अडाना जरूरी था क्या ?
मोदींनी खर्चिक कपडे घातले म्हणुन झालेला गहजब मला तरी अनाठायी आणि बालिश वाटला. Happy

खर्चिकपेक्षापण स्वतःचे नाव एम्बोस करून केलेला प्रकार अगदीच भपकेबाज वाटला. होस्नी मुबारक स्टाइल प्रकार अत्यंत बटबटीत वाटला. मोदींनी असला भपकेबाज पणा सोडावा. एवढ करूनपण ओबामांनी त्यांना रॉकस्टार म्हणत चिमटा काढलाच आणि परतल्यावर सहिष्णुतेचे आगावू सल्ले पण दिले.आपला पंतप्रधान मुत्सद्दी, स्टेट्समन ओळखला जावा असे लोकांना वाटते, त्याला रॉकस्टार किंवा त्याची अमेरिकेच्या फस्ट लेडीच्या फ्याशन सेन्सबरोबरची तुलना ऐकण्यात पब्लिकला रस नसतो.

म्हणुनच आआप ला मिळालेल यश हे anxiety निर्माण करत. Anxiety अशसाठी कारण यावर केवळ आआपच अस्तित्व नाही तर भारतिय राजकारणात काही तरी चांगल आणि नैतिक होउ शकत याच्या आशावादाच अस्तिव सुद्धा पणाला लागलेला आहे.

या साठीच आआपचा पंखा नसलो तरी केजरीवाल यानि यशस्वि पणे आपला कर्य काळ पूर्ण करावा असेच मनापसुन वाटते.>>>>> अनुमोदन.

म्हणुनच आआप ला मिळालेल यश हे anxiety निर्माण करत. Anxiety अशसाठी कारण यावर केवळ आआपच अस्तित्व नाही तर भारतिय राजकारणात काही तरी चांगल आणि नैतिक होउ शकत याच्या आशावादाच अस्तिव सुद्धा पणाला लागलेला आहे.

या साठीच आआपचा पंखा नसलो तरी केजरीवाल यानि यशस्वि पणे आपला कर्य काळ पूर्ण करावा असेच मनापसुन वाटते.>>

हो, केजरीवालांचा पंखा नसले तरी त्यांचे शासन पाच वर्षे निर्धोक टिकावे, काही चांगले व्हावे असे वाटतेय ते याचसाठी.

अहो ते तर मला आधी पण वाटत होते आणि अजुनही वाटते आहे की पाच वर्षे यांना मिळून एक टर्म पुर्ण करून दाखवावी. पण आता कायेना की यांनी काय वाट्टेल ते केले तरी एक तर कोणाला कळणार पण नाही आणि दुसरे म्हणजे सरकार पडायची भितीच नाही अजिबात. Happy
काय होते ते पहात रहावे लागणार अन काय.

केजरीवाल ला पुढील 5 वर्ष नाईलाजाने प्रजासत्ताकदिनी बोलवावे लागणार तेही भाजपात न जाता Wink याला म्हणतात देवाच्या काठीचा आवाज कसला दणका दिला व्वा

पंप्रसारख्या व्यक्तीने दिमाखात राहिले तर हरकत काय आहे ? कधी नाही ते भारतासाठी कोणीतरी एक चांगली इमेज बिल्डिन्ग करत होते, तो बिचमे टांग अडाना जरूरी था क्या ? >> Lol चांगले कपडे (तेही स्वतःचं नाव लिहिलेले) घालून कोणी जर देशाची चांगली इमेज होते असं समजत असतील तर जागे व्हा लवकर. यांच्या पेक्षा जास्त चांगला फॅशन सेन्स, फिजिक असलेले इतर देशातही अनेक नेते आहेत Happy त्यांनी स्वतःच्या खर्चानं कसलेही कपडे घालावेत पण त्यामुळं जर इमेज बिल्डिंग होतं तेही देशाचं असं जर तुम्ही समजत असाल तर धन्य आहे Happy

आणि केजरीवाल मुख्यमंत्री बनल्यानं भारताची इमेज कशी काय खराब होते ते तुम्ही वेळ काढून सविस्तर लिहाच.

युरोच्या पोस्टबद्द्ल आगाऊ +१ ..

पण आता कायेना की यांनी काय वाट्टेल ते केले तरी एक तर कोणाला कळणार पण नाही .>>> हे नाही कळालं. ३ सीट्स मिळाल्यात की भाजपाला. आणि आपने त्यांना विरोधी पक्षनेता बनवा म्हणून सांगितलंय (जरी ७ पेक्षा कमी सीट असल्या तरी). भाजपाच्या आमदारांनी किमान विरोध तरी करावाच चुकीच्या प्रकारांना. आणि मला असं वाटत नाही की भाजपाचे तिन आमदार अगदी चुप बसून सगळं बघतिल आणि बाहेर कुणाला काहीच कळू देणार नाहीत.

उलट आप सगळ्या गोष्टी पब्लिकली करण्यावर भर देत आहे. Happy

सरकार पडायची भितीच नाही अजिबात>>> हे पण चांगलंय की. किमान आता पळता येणार नाही ना त्यांना राजिनामा देवून. राजिनामा दिला त्यावेळी पण टिका केली आता ५ वर्ष कार्यकाल टिकवणार तरी सरकार पडायची भिती नाही याची काळजी वाटतेय तुम्हाला.
सरकार पडायची भिती तर केंद्र सरकारला पण नाहीये की. Happy

हे पण चांगलंय की. किमान आता पळता येणार नाही ना त्यांना राजिनामा देवून. राजिनामा दिला त्यावेळी पण टिका केली आता ५ वर्ष कार्यकाल टिकवणार तरी सरकार पडायची भिती नाही याची काळजी वाटतेय तुम्हाला.।>>>> +१.

मी आआप पेक्षाही केजरीवालबद्दल साशंक आहे. केजरीवाल जर "मसीहा" झाला (आणि आपलं मीडीया तेच करतंञ) तर पक्षाची अवस्था कठीण आहे. आप हा केजरीवालचा पक्ष याऐवजी त्या त्या भागातल्या आमदार खासदाराचा पक्ष म्हणून ओळखला जावा अशी मला आशा आहे. केजरीवालची व्यक्तीपूजा चालू झाली तर मात्र सगळंच कठीण आहे.

पण आपल्या लोकांंअध्ये व्यक्तीपूजेचे अवास्तव स्तोम इतके आहे की, असं न होणं फार दुरापास्त वाटतंय.

सरकार पडायची भिती तर केंद्र सरकारला पण नाहीये की >> ते तसं नाहिये.. आआपनं किंवा दुसर्‍या कुठल्या पक्षानं खरंच चांगलं काम करून दाखवलं तर पुढच्या निवडणुकीत आताच्या केंद्रातल्या सत्ताधारी पक्षाला धोका आहे ना म्हणून वेगळीच भिती आहे Wink

महेश तुम्ही ऐकाबाजुने म्हण्ता की मी भाजपाच / नमोच अंधभक्त नाही. पण ऐकंदरीत तुमचे प्रतिसाद पहाता तुम्ही ठरऊन अंध भक्ति करताय असच वाटतय.
दिल्ली निवडणुकांचे निकाल भाजप पेक्षा जास्त महत्वाचे काँग्रेससाठी आहे. भाजप सध्या केंद्रात आणि महाराष्ट्र / गुजरात सारख्या महत्वाच्या राज्यांमधे सत्तेत आहे. काँग्रेस सध्या कुठेही दिसत नाहीये. हे खुपच चिंताजनक आहे.
दिल्लीतला निकाल ऐव्हडा ऐकतर्फी लागायला नको होता. विरोधी पक्षाच काहीतरी नामोनिषाण असायला हव होत.
भाजपने दिल्ली निवडणुकांच्याबाबतीत अति केल आणि हसु करुन घेतल अस वाटतय.

मी आआप पेक्षाही केजरीवालबद्दल साशंक आहे. केजरीवाल जर "मसीहा" झाला (आणि आपलं मीडीया तेच करतंञ) तर पक्षाची अवस्था कठीण आहे. आप हा केजरीवालचा पक्ष याऐवजी त्या त्या भागातल्या आमदार खासदाराचा पक्ष म्हणून ओळखला जावा अशी मला आशा आहे. केजरीवालची व्यक्तीपूजा चालू झाली तर मात्र सगळंच कठीण आहे. >>>> +१

<<म्हणुनच आआप ला मिळालेल यश हे anxiety निर्माण करत. Anxiety अशसाठी कारण यावर केवळ आआपच अस्तित्व नाही तर भारतिय राजकारणात काही तरी चांगल आणि नैतिक होउ शकत याच्या आशावादाच अस्तिव सुद्धा पणाला लागलेला आहे. >>

युरो +१. काण्ट अ‍ॅग्री मोअर ! Happy

अल्पना +१

<<मी आआप पेक्षाही केजरीवालबद्दल साशंक आहे. केजरीवाल जर "मसीहा" झाला (आणि आपलं मीडीया तेच करतंञ) तर पक्षाची अवस्था कठीण आहे. आप हा केजरीवालचा पक्ष याऐवजी त्या त्या भागातल्या आमदार खासदाराचा पक्ष म्हणून ओळखला जावा अशी मला आशा आहे. केजरीवालची व्यक्तीपूजा चालू झाली तर मात्र सगळंच कठीण आहे. >> +१

मिडियाने आता आपचा कौतुकसोहळा बंद करायला हवा. ९ महिने जसं ब्लॅकआऊट केलं होतं तसं केलं तरी चालेल.

महेश,
तुम्ही लिहाच वेळ काढून.

Wifi पानी इ. आधी केजरीवाल ने बरनोल फुकट वाटावे. बर्याच जणांना तुटवडा जाणवू लागला आहे

नंदीनी तुमच नमो नमो बद्दल काय मत आहे. नरेंद्र मोदींची व्यक्तिपुजा केली जात नाहीयेका? त्यांना भारताचा मसिहा म्हनुनच प्रोजेक्ट केल गेल नव्हत का लोकसभेच्या निवडणुकित?

मला हे मसिहा वगैरे करणच पटत नाहीये.
काँग्रेसच मसिहा घराणे - गांधी घराणे.... सध्या काँग्रेसची काय वाट लागलीये. यातुन बाकीच्या पक्षांनी अनुमान बांधावा जर ते पण असच ऐकाला कोणाला मसिहा म्हनुन प्रोजेक्ट करत राहिले तर लवकरच त्यांचीपण काँग्रेसच होणार.

राजदीप सरदेसाईंचा लेख - When kejriwal defeated media
"In the end, none of it mattered. AAP won an astounding 67 of 70 seats, one of the biggest victories in the history of Indian elections. The mainstream media's ambivalence to Kejriwal didn't matter. The AAP leader had gone over our heads, effectively used social media, but most importantly, gone directly to those who really mattered: the voter! Pompous editors, noisy anchors and a corporatised media ownership had all been defeated."

लोक्स,
केजरीवालांच्या झेड सुरक्षेबद्दल तुमची काय मते आहेत? मी निकालानंतर सुद्धा मुलाखतींमध्ये ऐकलंय की त्यांनी सिक्युरिटी घ्यायला नकार दिला आहे. आधी पण त्यांनी सुरक्षा नाकारणारी पत्रे गृहमंत्रालयाला पाठवली आहेत म्हणे.
आमच्या घरी ह्या मुद्द्यावर दोन गट पडले आहेत. मी म्हणत आहे - सुरक्षा घ्यायला नको. मी (आपच्याही) आधीपासून ह्याच्या विरोधात आहे.
दुसरा गट म्हणत आहे - घ्यायला हवी. स्वामी ओमजी सारख्या एखाद्या माथेफिरूने काही केलंच तर गोंधळ उठेल.

दुसरा गट म्हणत आहे - घ्यायला हवी. स्वामी ओमजी सारख्या एखाद्या माथेफिरूने काही केलंच तर गोंधळ उठेल.>>>मी दुसर्‍या गटाशी सहमत.

Pages