अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आताच एका भाजपाच्या मित्राकडून ऐकले की अमित शहांना फारच मोठा धक्का बसला आहे आणि काही दिवस ते मिडीयीपासून लांब राहणार आहे मोदी आणि जेटलीच मिडीयाला फेस करणार आहेत
खरं आहे का? अरेरेरेरे फार वाईट झाले

सुरक्षा का नको? इतर मुख्यमंत्र्यांना जे मिळतं ते त्यांनाही मिळावं. अश्या महत्वाच्या पदांवरील लोकांना सुरक्षा देतातच. कुणाचा धोका असो वा नसो.

इतर मुख्यमंत्र्यांनाही मिळू नये असं माझं मत आहे. लोकप्रतिनिधींना लोकांपासून कसली भिती?
(अर्थात हा अतिआदर्शवाद नजीकच्या भविष्यात तरी अशक्य आहे ह्याची कल्पना आहे)

असं नाहिये मिर्ची. त्यांचं पद त्यांना लोकांपासून वेगळं बनवतं. राजकारणात अगदी सगळ्याच पक्षांच्या लोकप्रतिनिधींना शत्रू असू शकतात. हा अतीआदर्शवाद नाहिये, हा वेडेपणा आहे. राजकारणात कुणीच अजातशत्रू नसतो. मोदींना भरघोस यश मिळाल्यानंतर त्यांनाही भरपूर शत्रू निर्माण झालेच. सामान्य लोक फक्त चडफडाटावर थांबतात पण खुनशी लोक काहीही करु शकतात. राजीव गांधींचं काय झालं?

हो, हेही पटतं. (असं असू शकतं :))
पण तशी तर राजीव गांधींना/इंदिरा गांधींना होतीच की सुरक्षा. उगीच खर्च वाढवायचा आणि मुख्य म्हणजे नेता-जनता ह्यांच्यात दुरावा कशाला वाढवायचा?

नॉट सो शुअर.

असे वाचण्यात आलेय कि केजरींच्या मंत्रिमंडळात मनीष शिसोदिया हे उपमुख्यमंत्री असतील. शिसोदिया यांनी आप च्या वाढीसाठी खूप प्रयत्न केले आहेत. केजरीवाल यांच्यावरील कामाचा भर कमी होवून ते दिल्लीबाहेर पक्ष वाढवायला काही वेळ देवू शकतील असे एक कारण आहे मात्र माझ्या मते आणखी एक संदेश केजरीवाल देवू पाहत असावेत. मोदींसारखे आपण सरकार आणि पक्षात हुकुमशाही रूप धारण करणार नाही. सहकार्यांवर जबादारी, विश्वास आणि स्वातंत्र्य असेल हा संदेश. मोदी आपल्या सरकारमध्ये मास लीडर घ्यायला फारसे इच्छुक नसतात (मुंडेंना पण ते घ्यायला तयार नव्हते!). जे काही घेतले आहेत त्यांना नियंत्रणात ठेवण्यात आणि जास्त अधिकार पीएमओकडे ठेवण्यात मोदींना स्वारस्य आहे. आठवा काही महिन्यापूर्वीचे मंत्र्यांवर पाळत प्रकरण! (राजनाथ यांचे गृह विभागातील मोठ्या बदल्यांचे अधिकार काढून पीएमओला दिले आहेत तर सुषमा फक्त जवळचे छोटे देश दौरे करतात किंवा मोठे देश दौरे करून आलेल्या मोदींना विमानतळावर रिसीव करायला जातात.)मोदींना स्मृती इराणी सारखे होयबा लोक पाहिजेत. पक्ष संघटनेत आपला उजवा हात अमित शहा! मंत्रीमंडळात आपल्याला कोणी डोईजड होवू नये म्हणूनच सरंक्षण मंत्रिपद ६ महिने रिक्त होते. लोकसभेत विरोधी पक्षनेतेपद द्यायला अजून ते राजी नाहीत, लोकसभेत त्यांची उपस्थिती कमी असते याला कारण 'मनातून असुरक्षित ( इनसेक्युर)' असणे हेपण असू शकते (विरोधी पक्षनेते पदाला १०% ची अट असली तरी सभापती आपल्या अधिकारात ते शिथिल करू शकतात. झाला तेवढा तमाशा बस झाला , कॉंग्रेसला पुरेसे तंगवले आहे आता विपनेतेपद द्यायला हवे. लोकशाहीत विरोधी पक्षनेता नसणे भूषणावह नाही मात्र मोदींना कोण समजावणार? ). या पार्श्वभूमीवर केजरीवाल आपल्या सहकार्याला उपमुख्यमंत्रीपद देवून 'सत्तेचे विकेंद्रीकरण' करून आपल्यात आणि मोदिंमध्ये काय फरक आहे हे दाखवून देवू पाहत आहेत असे वाटते.

उगीच खर्च वाढवायचा आणि मुख्य म्हणजे नेता-जनता ह्यांच्यात दुरावा कशाला वाढवायचा? >>>> मनाचा दुरावा नसावा. सुरक्षेसाठी दुरावा असला तरी तो भल्याचाच असतो.

नुसता एवढ्या लहानश्या मायबोलीवरचा भयानक मोदीद्वेष पाहूनसुद्धा एक क्षण मोदींसाठी भिती वाटली होती. जशी पंतप्रधानांची सुरक्षा महत्वाची तशी कुणाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुरक्षा महत्वाची. जर केजरीवालांबद्दल इथे किंवा बाहेरही असा भयानक द्वेष पाहिला तर त्यांच्यासाठीही भिती वाटेलच. हा मनाचा कमकुवतपणा नाही. ही काळजी आहे.

शपथविधीला मोदी जाणार नाही Happy

ज्या माणसाला भर सभेत नक्षली, अराजक, भगोडा असे संबोधले अश्या माणसाच्या प्रचंड बहुमताच्या सरकारच्या शपथविधिला कोणत्या तोंडाने जाणार Lol

माझ्या मनात आल ते अस-
पडसाद निसर्गाचे

हिमालयात बर्फवृष्टी, मैदानी राज्यात गारपीट,
अवकाळी वृष्टि शेतीवरती. फळे कांदा अन्न नासती.
दुखि सगळे कष्टकरी, उभी समॊरी उपासमारी.
उमटले राजकारणी पडसाद तसे,
दिल्लीला झाली गारपीट_ अन् झाडूची बरसात,
बिहार- यूपी थरथरतात, शरद लालू नितिष वेगात
भाजपाचे मास्टर स्ट्रोक, उद्धव पाजरे हाती आसूड
बघतील कोण जनतेचे हाल कि देतिल व्यर्थ सवाल
म्हणे केले दोन हत्ती जेरबंद. निरंकुश नेते मस्त-धुंद !

माझ्या मनात आल ते अस-
पडसाद निसर्गाचे

हिमालयात बर्फवृष्टी, मैदानी राज्यात गारपीट,
अवकाळी वृष्टि शेतीवरती. फळे कांदा अन्न नासती.
दुखि सगळे कष्टकरी, उभी समॊरी उपासमारी.
उमटले राजकारणी पडसाद तसे,
दिल्लीला झाली गारपीट_ अन् झाडूची बरसात,
बिहार- यूपी थरथरतात, शरद लालू नितिष वेगात
भाजपाचे मास्टर स्ट्रोक, उद्धव पाजरे हाती आसूड
बघतील कोण जनतेचे हाल कि देतिल व्यर्थ सवाल
म्हणे केले दोन हत्ती जेरबंद. निरंकुश नेते मस्त-धुंद !

शपथविधीला मोदी जाणार नाही स्मित

ज्या माणसाला भर सभेत नक्षली, अराजक, भगोडा असे संबोधले अश्या माणसाच्या प्रचंड बहुमताच्या सरकारच्या शपथविधिला कोणत्या तोंडाने जाणार हाहा

१४ फेब्रुवारीला महत्वाची भेट आहे तिकडे बारामतीमध्ये मोदी-पवार यांची!

काँग्रेसला विरोधीपक्ष दिले नाही भाजप अहंकारी बनले. त्यांना वाटु लागले कशी जिरवली.
देवाने अहंकाराचे फळ लगेच दिले. मज्जा मज्जा आली. आता कुठल्या तोंडाने विरोधीपक्षपद मागणार ?
तरी उदारपणाने केजरीवाल यांनी त्यांना देउ केले. पण ते नाकारुन अजुन अहंकार जिरला नाही हे दाखवुन दिलेच

भाजपाने महाराज, साध्वी, .....पासुन थोडे लांबच रहावे बराच फरक पडेल.
लोकांना जात-पात, मंदिर-मस्जिद पेक्षा बिजली, सडक,पानी हे महत्वाचे वाटू लागले आहे हेसगळ्या पक्षांनी ओळखावे.

१४ फेब्रुवारीला महत्वाची भेट आहे तिकडे बारामतीमध्ये मोदी-पवार यांची!> विनापावसाची धरण कशी भरायची याचे अजित पवार प्रात्यक्षित देत आहेत का ? Rofl

साकल्य , मुद्दे असे काही ख़ास नव्हते . मनीष सिसोदियांना उपमुख्यमंत्री करणार अस टीव्ही वर पाहिल. एकुणात नवीन चेहरे आहेत असे वाटते . सोमनाथ भारती यांच्या मंत्रीपदाबाबत उत्सुकता आहे . मागच्या वेळी बराच गदारोळ झालेला त्यांच्या पोलिस धाडीवरुन

आपमध्ये बहुतेक तरी उच्च शिक्षित आहेत . झालाच तर फायदाच् होईल मंत्रीमंडळाला

कबीर , मोदींची भेट पूर्वनियोजित होती अस वाचल आहे .

http://maharashtratimes.indiatimes.com/international/Modi/articleshow/46...
'दिल्लीतील भाजपचा पराभव हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पराभव आहे,' असे 'न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले आहे.
'अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांच्यासोबतच्या यशस्वी चर्चेनंतर राजनैतिक उंचीवर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशांतर्गत राजकारणाने जमीनीवर आणले आहे,' असे 'न्यूयॉर्क टाइम्स'च्या संपादकीयात म्हटले आहे.

फारच

ते काय आहे ना. जयललिताच्या शपथविधीसाठी पुर्वनियोजित कार्यक्रम बाजुला काढता येतात. पण . असोच

अवांतर- 'बारामतीकर अजून काका- पुतण्याच्या गुलामीतून मुक्त झाले नाहीत, एनसीपी- न्याचुरली करप्ट पार्टी इत्यादी' प्रचारातील पल्लेदार वाक्ये प्रधान सेवक विसरले असतील मात्र पब्लिक नाहि.

<<< ते काय आहे ना.जयललिताच्या
शपथविधीसाठी पुर्वनियोजित कार्यक्रम
बाजुला काढता येतात>>> ओके समजले

अरविंद केजरीवाल यांना दिलेले वचन पुर्ततेसाठी १८२५ दिवस मिळाले आहेत, त्यात त्याना

५०० नविन शाळा
२० नविन कॉलेजेस
१५,००,००० कॅमेरे
२,०० ००० पब्लिक टॉयलेट
बनवायचे आहेत,
प्रत्येक शाळा ३.६५ दिवसात एक ह्या प्रमाणे,
प्रत्येक कॉलेज ९१.२५ दिवसात एक
कॅमेरा प्रती २ मिनीटास एक
पब्लिक टॉयलेट १३ मिनीटास एक ह्या प्रमाणे,
ह्या शिवाय ५०% विज दर आणि फुकट पाणी,
आता तुम्हीच विचार करा ?

वेदिका२१ | 27 January, 2015 - 20:31
आपचं अभिनंदन दिल्लीतील विजयासाठी स्मित जरी मेजॉरिटीला सीट्स कमी पडल्या तर काँग्रेस सपोर्ट करेल असं शीला दीक्षितांनी सांगितलं आहेच. त्यामुळे आता केजरीवाल पुन्हा मुख्यमंत्री होणं ही केवळ औपचारिकता बाकी आहे. आता भाजप काही करु शकत नाही..फक्त गप्प बसू शकतं.

शांताराम कागाळे १ | 27 January, 2015 - 20:40
वेदिका२१,

अनुमोदन !!

ही निवडणुक फक्त औपचारीकताच राहीली आहे.

----------------------------

सगळी चर्चा वाचत असताना फक्त या दोन जणांनाच सत्य परिस्थिती कळाली होती. अश्या हुशार लोकांचे आभार मानायलाच हवे.

निदान ही आश्वासने कॅलक्युलेट तरी करता येत आहेत, लोकसभेत निवडून आलेल्यांनी तर तेवढेही केलेले नाही. ५६ इंच, मॅडमजी, चायवाला इ.इ.इ. बडबड आणि प्रत्येक मुद्द्यावर यूटर्नसाठी भरपूर जागा सोडून केलेले इतर सर्व वायदे.

Wink Wink Wink

Pages