मालिका - असे हे कन्यादान

Submitted by भगवती on 26 January, 2015 - 18:53

नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.

बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज तर डॅन्स च्या नावावर नुसत्या कवायती सुरू होत्या Uhoh

आणि राजहंसाला किती वेळे रिहर्सल ला जायला. Uhoh

लवकरच लाखाचं बारा हजार करणार बेनं Proud

आज तर डॅन्स च्या नावावर नुसत्या कवायती सुरू होत्या >>
दक्षे ती आपली जुनी परंपरा आहे, बॉलीवुड (आणि भारतातले इतर सगळे वुड्स) मध्ये पण नाही का हिरो-हिरोविनी आणि त्यांच्या मागे पाच- पन्नास जणा-जणींचा घोळका कवायत करत असतो ते Wink

आदित्य पाठक, हे नाव कुठेतरी ऐकलय.अ ओ, आता काय करायचं >>>>

रश्मीताई , बस क्या ???

मायबोलीवरचा वन ऑफ द मोस्ट टॉकड अबाउट पर्सन आहे तो Sad

आइइइग्ग्ग्ग.... काय भयंकर आहे ही मालिका!!!! महत्प्रयासे दोन मिनिटं बघितली.. तुम्ही खरंच बघता??? कोपरापासून दं ड व त!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

काल तीन सेकंदच पाहिली ही मालिका. त्यात "बाबा आज जाम मूड मधे दिसतायत ताई मला आणखी एक पोळी दे!" असं भन्नाट वाक्य 'दिसलं'. पोळी ही सेलिब्रेशन कँडिडेट झाल्याबद्दल पोळी टोळीचे हार्दिक अभिनंदन. (या बाबांचा मूड टिपीकल रेंजपलीकडे बदलू शकत नाही हे ठसवण्यासाठी पोळीची निवड झाली असा खुलासा लेखन समितीकडून आला तर एक आठवडा तेही सलग! ही मालिका पाहायचं वचन देते!) Lol

मायबोलीवरचा वन ऑफ द मोस्ट टॉकड अबाउट पर्सन आहे तो <<
ही कुठल्या समांतर विश्वातली मायबोली आहे का? मी या बाफवर हे नाव पहिल्यांदा वाचलं.

चनस, धिक्कार धिक्कार धिक्कार त्रिवार धिक्कार !
असा विचारही कोणी कसा करू शकतो Wink

रश्मीताई , आप आदित्य पाठक नही जानते ???
क्रेडेन्स कॉर्प चा एम.डी आहे तो

<पापण्यांची फडफड करणारी बाहुली >

माफ करो जनाब .. गल्तीसे मिश्टेक हो गया ..

आधीचे पोस्ट नाही वाचले नि सिरीअल पण बघत नाही.. म्हणुन मला खरचं आहे की काय असं वाटलं Happy

माझे पण नीधप सारखेच झालेय. सध्या कादम्बर्‍या बाजूला आहेत निवान्त वाचण्यासाठी. खरे तर मायबोली प्रशासन आणी माबो लेखक यान्चे आभार मानलेच पाहीजे असे सुरस लेखन वाचायला देत आहेत त्याकरता.

धन्यवाद स्वस्ति.:स्मित:

काल च्या एपिसोडात मैत्रिणींची चिडवा चिडव आणि त्या बदकाला कुणी फोन करावा यावरून लागलेली लाडिक भांडणं पाहून ओकारीच आली Proud

हो कारण त्याला 'राजहंस ' म्हणणं जीवावर येतंय माझ्या >>>>>> Lol
मग या लॉजिक ने किर्तने परफेक्ट आहेत .
दोघेही बाप-लेक येता जाता कोणा ना कोणाला , कशा न कशा वरून किर्तन ऐकवत असतात Sad

काल च्या एपिसोडात मैत्रिणींची चिडवा चिडव आणि त्या बदकाला कुणी फोन करावा यावरून लागलेली लाडिक भांडणं पाहून ओकारीच आली फिदीफिदी >>> बदक??? Lol Lol भारीच!

ती नायिका असे भयानक कपडे का घालते? ए. भा. प्र.

पोपटी जॅकेट, पिवळा स्कर्ट...

आई तर एकदमच चिंचोळ्या चेहर्‍याची बाई आहे. मुलगीच मोठी वाटते.
आणि हिंदी मूवी सारखं, गोल गोल फिरत(मुलीला प्रदक्षिणा घालत) तो धमक्या का देतो? Proud

आणि कुठले कॉलेज आहे तिथे तीन बावळट मैत्रीणी बोर्ड कडे बघत नायकाने लिह्लेला मेसेज बघत बसल्या होत्या?

अभ्यासाचं काय? यंदा पास होइल का नायिका? बरीच पुस्तकं आत- बाहेर्(बॅगेत थोडी, हातात थोडी , एकदम १९६० मधली हिरोइन)

मला बरेच प्रश्ण पडलेत.

>>> हळूहळू सोडवा.. ४०० ते ५०० एपीसोड होईपर्यंत पुर>>><<
मार्क्स किती मिळतील त्यावर पण आहे ना.:फिदी:

गोगा, चिपोका गेली का? Wink
का इथे तुम्ही काकाची माया द्यायला येणार आहात?

(ह. घ्या.)

Pages