मालिका - असे हे कन्यादान

Submitted by भगवती on 26 January, 2015 - 18:53

नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.

बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काल या सिरियल मधला एक भाग दृष्टीपथास पडला. स्टेजवर नाचाचे नमुने सादर केले जात असतात...हिर्विनीला नाचण्यासाठी तो नाच्या (डान्स सर) इन्वाइत करतो आणि हि जाते, बदक तिला ओल द बेस्ट म्हणतो आणि हिचा नाच सुरु होतो. बाई .........काय तो नाच त्या अनुष्काने पाहिला असता (हो तिच्याच 'रब ने बना दि जोडी' च्या फ़ेमस गाण्यावर नाचल्या म्याडम) तर जीव दिला असता हिर्वीन अगदीच काम्ब्रेखाळून जाडी वाटत होती आणि तो नाच.....डान्स सर चक्क इतका एक्साईट होतो कि बस रे बस ... आणि बदक मधेच तिच्या मम्मीला हाय काय करतो वैगरे वैगरे

तो रोज डे वाला सीन पाहिला तुनळीवर .

त्या बदकाला खरच काही काम नाही . सारखा कॉलेजमध्ये पडीक असतो .
आणि नेहमीच त्याच्या चेहर्यावर काहीतरी विचित्र भाव असतात . तोंड उघड टाकून त्या गायत्रीकडे अधाश्यासारखा बघत असतो .

रोज किंग साठी एकच नाव होतं . आणि तो मुलगा पण शिखर धवन च्या मिशांपेक्शा जाड मिशा असलेला वगैरे होता .
मुलींना एकंदरच ऑपश्न्स फार कमी होते वाटते.
रोज क्वीन्साठी मात्र ४-५ नाव वाचण्यात आली , का?

किमो खान डोक्याला वात आणायला लागला आहे .

गायत्री नेहमी "गुड गर्ल" च्या पवित्र्यात का असते ? ती नेहमी इतकी लाडात का बोलते ?

ती नेहमी इतकी लाडात का बोलते ?>>>>>>>>सिरियल मधल्या सगळ्या हिरविनि लाडातच असतात Blush , आणि खलनाइका रागावलेल्या Angry ........:P Proud Proud

रोज किंग साठी एकच नाव होतं . आणि तो मुलगा पण शिखर धवन च्या मिशांपेक्शा जाड मिशा असलेला वगैरे होता .>>>>>>>>>>>>.बदक न्हवता का उभा उमेदवार म्हणून. का तो या कोलेजात शिकत नाही.

सदाशिव किर्तने............
सदाशिवुनको भजने पण चालुन जावे.

गायत्रीला नाचता येत नाही म्हणून तिच्या डान्स पेक्षा इतरांची तोंडंच जास्त दाखवत होते.
आणि आता तर प्रेमाचा त्रिकोण होणार अनु म्हणजे तिसरा कोन.

हिरोईन नि तिच्या मैत्रिणी येडचाप आहेत. हिरोईन तर काय लग्नात घालतं नाहीत असा डिझाईनर घागरा आणि त्यावर एक ट्रॅडिशन्ल ओव्हरकोट घालुन, साईड बन त्यात मॅचिंग हेअरपिन्स लावुन कॉलेजला येते!! तेही नॉर्मल दिवशी! >>>>>>>> आता चेंज केली ड्रेसिंग स्ताइल Sad Sad Sad
.

पहिल्याच एपिसोडमध्ये त्या अदितीला बघूनच मी मालिका बघायची नाही ठरवलं. ती स्टार प्रवाहच्या चारचौघी मध्ये पण होती. मला तिथेही आवडली नव्हती (दोन चार एपिसोड बघितले होते त्या शिरेलीचे).

आणि म्हणे ल्यापटोप वर काम करते. येडचाप जिला ऑफिसच्या वस्तूंचे किंवा स्वताच्या नोकरीचे महत्व जावेला पटवून देता येत नाही ती काय म्हणून टीम लीडर बनणार.

नाही, आता अनु बदकाला पटवण्याचा प्रयत्न करतेय.
नाहीतरी तो हिरविणीला आवडत नाहीच ना. मग ही तरी कशाला चान्स सोडेल.

काल दोन सीन पाहिले.

१) कीरतने पतिपत्नीमधील रोमान्स चा सीन. ती बायको अगदीच लहान वाटते वयाने. तो पिट्स आहे एकदम.

२) कोण तो हीरो त्याच्या घरचा सीन. : हे मराठी कल्पने प्रमाणे श्रीमंत बिझनेस म्यान व फॅमिली दाखवली आहे. एक बिन्डोक बाई त्याची आई. वडील मित्रा म्हणतात मुलाला आणि मुलगा बाबांना डूड म्हनतो. ते फारच सिरीमंत आहेत म्हणून मधून मधून इंग्रजी बोलतात कसेतरी. वडील व मुलगा एकद्म कार्टून. आई आव्डाबाईसारखी लैच मेकप केलेली पांढरी धुप्प. आणि स्टुपिड बोलणारी. मग आजी आली की तुझे लग्न लाव्णार वगैरे चालू होते. हॉरिबल हॉरीबल.

आता हे राजहंस आणि तिकडे ते गोखले दोन् श्रीमंत उद्योगपती असून राजहंसांच्या घरची श्रीमंती अती वाटते. वाढायला आणि कोट काढा/ घालायला माणसं. आणि गोखल्यांकडे बाया राबतायत नुस्त्या.

आता ते रात्री १०.३० ला दिल दोस्ती दुनिया दारी सुरू झाल्यअने खंडेरायअ ११ ला येतात आणि दुरावा ११.३०. कन्या आणि सून हरवल्यात.

राजहंसीण बाईंचा संवादः जेव्हा तुम्ही टेन्डर पास व्हायची वाट बघत होता तेव्हा तुमच्या मुलांची टेन्डर मी पास करत होते Uhoh

बऱ्याच दिवसांत या धाग्यावर काही अपडेट नाही. Sad अजुन कोणी बघतं का हि मालिका? Happy
मालिकेसंबंधी ही बातमी
http://maharashtratimes.indiatimes.com/cinemagic/tv/ase-he-kanyadan/movi...

मी आज अगदी शेवटी पाहिली... बदकीण आणि मैत्रीणींसमोर बदक वळवळुन काहीतरी सांगत होता. असह्य होऊन मी उठून आले तिथुन. Angry

इथेही गुढी पाडवा विशेश वाटत .
पण हिरविणीच्या तिन्ही सख्या छान दिसत होत्या , काठपदराची साडी , गळ्यात पारंपारिक . मस्त .
बदकाच्या सदर्याचा रंग छान होता . तोही आलेला भला मोठा टिळा लावून . पण जाता जात परत त्याने नेहमीचा गॉगल लावला . एक्दम यक्क्क

Pages