मालिका - असे हे कन्यादान

Submitted by भगवती on 26 January, 2015 - 18:53

नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.

बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लिम्बुकाका , तुम्ही आणि मी दोन वेगवेगळ्या माणसाबद्दल बोलतोय का? Happy

तो बिचारा मला थोराड वगैरे अजिबात वाटत नाहि

नाही स्वस्ति, त्या एकाच "कार्तिक" बद्दल बोलतोय, फक्त आता माझि नजर बरेच उन्हाळेपावसाळे बघुन अंमळ जास्तच चिकित्सक झालीये इतकेच.

sorry कोणाच्या व्यंगाबद्दल बोलू नये पण मला हि मधुरा चकणी वाटायची, कॉमेडीची बुलेट ट्रेनची anchor होती तेव्हा. >>>>आमच्या घरचे लोक पण हेच बोलत होते. पण चकणे लोक सॉलिड लकी असतात. आशा पारेख वगैरे.

आजच झीवरचा "आम्ही सारे खवय्ये" पहाण्याचा पाहाण्याचा योग आला. अ‍ॅन्कर मुलगा सारखा "होकिनी" हो किनी" असं पाहुण्यांना विचारत होता. बाप लेकांची एक जोडी पदार्थ बनवायला आली होती.
त्यातल्या बाबांना हा अ‍ॅन्कर विचारतो.............तुम्ही झी मराठीवरची कन्यादान पहाता का?
म्हटल्यावर बाबां काय काय बोल्ले.........अगदी ही सीरीयल बघून त्यांना भरून आलं होतं. आणि बापलेकीचं नातं कसं असावं याचा उत्तम संदेश देणारी सिरियल इ.इ. नंतर त्यांनी कन्यादान बघितल्यावर काही ओळी स्फुरल्या : Angry देवाने दिले मला वरदान मी करणार कन्यादान अशी आपली प्रतिभा पाजळली. Angry

मानुषीतै.. अब आये ना लाईन में.. बघणार नै म्हणाला होतात ना .. कस्सं पकडलं झीवाल्यांनी Wink Proud

बाकी मुक्ताफळांबद्द्ल नो कमेंटस..

चनस नाही गं....कन्यादान बघण्याइतकी माझी कुवत/हिम्मत नाही..........मी आम्ही सारे खवय्ये पहात होते तेव्हाचं हे वर्णन आहे...नीट वाच ना........: स्मितः Proud

नाही स्वस्ति, त्या एकाच "कार्तिक" बद्दल बोलतोय, फक्त आता माझि नजर बरेच उन्हाळेपावसाळे बघुन अंमळ जास्तच चिकित्सक झालीये इतकेच. >>> Happy

तुला माझ्याशी लग्न करण्यापासून कोणी ही वाचवू शकत नाही <<< सभ्य माणूस असो वा असभ्य...

या वाक्यात उघड उघड धमकी आहे... ही व्यक्ती 'खलनायक' असेल तर ठिक पण नायक असेल तर लेखक / दिग्दर्शकाला भर चौकात चपलेने हाणण्याला पर्याय नाही....

मग यापुढे 'अपहरण करेन', 'अ‍ॅसिड टाकेन' असल्या धमक्या 'प्रेमाचे लक्षण' म्हणून दाखवायला हरकत नसावी...
Angry

या वाक्यात उघड उघड धमकी आहे... ही व्यक्ती 'खलनायक' असेल तर ठिक पण नायक असेल तर लेखक / दिग्दर्शकाला भर चौकात चपलेने हाणण्याला पर्याय नाही....>>>>>>> धिस इस द करेक्ट एक्स्प्रेशन! +१००

"तुला माझ्याशी लग्न करण्यापासून कोणी ही वाचवू शकत नाही." डोंबल वाचवू म्हणे.. "तुला माझ्याशी लग्न करण्यापासून कोणी ही अडवू शकत नाही." किंवा रोखू शकत नाही असं काहीस नको होतं का हे ? सिरिअल बघत नाही पण जाहिरातीत परवापासून हे वाक्य बघून मनात आलं म्हणून इथे तुम्हाला विचारलं.. मला तर बाई हल्ली मराठी काही केल्या समजेनासंच झालंय.. शिक्शान कोणत्या भाषेत घेतलं होतं आणि आता कानावर कोणती भाषा आदळत्येय ह्या टि.व्ही मुळे ! Sad

>>> मग यापुढे 'अपहरण करेन', 'अ‍ॅसिड टाकेन' असल्या धमक्या 'प्रेमाचे लक्षण' म्हणून दाखवायला हरकत नसावी... <<<<

गोगा... अगदी अगदी...! चपलेनेच हाणायला पाहिजे नै त्या भिक्कार मवाली गुंडाछाप गोष्टींच्या प्रचार प्रसिद्धि अन उदात्तीकरणासाठी.. !

हाये! सिरीयल पहाण्या ऐवजी लोक ती भलतेच वळण लावुन बाफ पुढ पळवतायत.:फिदी::दिवा:

असल्या बीनबुडाच्या सिरीयल मध्ये पोन्क्षे साहेब वाया गेलेत.

लिम्बुकाका ,
काल बघितला एक भाग ऑन्लाईन . तो हिरो कॉलेजमध्ये फिरत असतो गायत्री कुठे आहे म्हणून सगळयाना विचारत .
आणि नंतर स्वतःच्या अंगावर कोल्डिन्क्र ओतताना .
आता मला तो वेडसर वाटायला लागला आहे .खरतर ती गायत्रीच त्याच्यापेक्शा उंच आणि मोठी वाटते .
ती पियु त्याला मॅच आहे . सुबक ठेंगणी

>>> असल्या बीनबुडाच्या सिरीयल मध्ये पोन्क्षे साहेब वाया गेलेत. <<<< अगदी अगदी... अन ते देखिल त्या ओव्हर की अंडरएज्ड रोमिओसमोर !

>>> आता मला तो वेडसर वाटायला लागला आहे <<<< Lol Rofl
पियु म्हणजे त्याची "बहिण" दाखवली आहे तीच ती ना? ती छान दिसत्ये.

काल काहीतरी होर्डिंग वरुन वाद दाखवित होते. मी कंटाळून डोळे अन कान मिटून डुलकी काढली, एकतर दिवसभराचा ताणतणाव, थकावट, अन त्यात यांची कथा डोक्याला त्रास देऊ लागली.

पियु म्हणजे त्याची "बहिण" दाखवली आहे तीच ती ना? ती छान दिसत्ये. >>>>
नाही. पियु म्हनजे गायत्रीची मैत्रिण .

त्या होर्डिन्ग आणि देशपांडेच्या राजिनाम्यावरून किर्तनेनी किती किर्तन केलं .
पार देशभक्ती ,भ्रष्टाचार , देशातील अत्याचार , निष्ठा , गांधीजी विविध गोष्टींबद्दल बोलले ते .

अमि, अग पण आपण आपल्या घरात बसून तीच सिरियल बघतो हे कसे कळते टीआरपी मोजणार्‍यांना?

त्यांची काहितरी मॉनिटरींग सिस्टम असते. मागे मी वाचले होते. आता पटकन आठवत नाही.
<<<<
so limbutimbu या लिंक वरून एक idea येऊ शकते

http://www.loksatta.com/daily/20030223/rv03.htm

त्या झी मराठीला माहिती पडलं असेल की कोणी नाही तरी अर्धे मायबोलीकर खिल्ली उडवण्यासाठी का होईना आपल्या शिरेली बघतात आणि उरलेले अर्धे निदान वाचायला तरी येतात हा का ना का Wink Lol

आणि राजहंस टेक्स्टाईल्स च्या मालकाकडे आपल्या एक्स कॉलेजात जाऊन हवा तितका वेळ वाया घालवण्यासाठी असू शकतो? Uhoh
आणि ते कॉलेज आर्ट्स कॉमर्स चं आहे ना? आणि याच्याकडे निदान मॅनेजमेंट ची डिग्री तरी असेल ना? मग त्या कॉलेजात जा म्हणाव ना. इथे काय करतोय? ज्युनियर कॉलेजात.

"कार्तिक ची किर्ती सगळ्यात वरती " अशी काहीतरी टॅगलाईन आहे ना त्याची .

राजहंस टेक्स्टाईल्स च्या मालकाकडे आपल्या एक्स कॉलेजात जाऊन हवा तितका वेळ वाया घालवण्यासाठी असू शकतो? अ ओ, आता काय करायचं >>>>>

दक्शुताई , तो काही आदित्य पाठक नाही ,केबिनमध्ये बसून काम करायला

Pages