अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग १

Submitted by मिर्ची on 14 June, 2014 - 03:09

सोयीसाठी धाग्याची प्रस्तावना पहिल्या प्रतिसादात टाकली आहे.

पान १७----केजी बेसिन घोटाळा नेमका आहे तरी काय?
पान २२----वीजदरात ५०% सवलत योग्य की अयोग्य? (दिल्लीतील वीजकंपन्यांचा घोटाळा)
पान ३४----'मोहल्ला सभा' बद्दल माहिती
पान ३५----अंजली दमानिया--Am I a land shark?

ह्या चर्चेचा दुसरा भाग इथे पाहता येईल.

.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

यादव यांनी आक्षेप मान्य केले यातच त्यांचे वेगळेपण दिसून आले नाही का ? भाजपचा कोणताही नेता असे आक्षेप मान्य करेल का?

Why BJP is not doing enquiry about these AAP donations? The central govt is of BJP, IT dept is under BJP. Do enquiry and send Kejriwal to jail or else these companies may be formed by BJP to frame AAP :-).

भाजपवर फारच रोष दिसत आहे सगळ्यांचा!

जरा रागवा बरे त्या लोकांना ज्यांनी वेड्यासारखी मते दिली ह्या पक्षाला!

काय चाललंय काय म्हणाव?

Aho Befikir I also voted for BJP. But the way BJP is handing election campain for Delhi is not right. Should we not point out the mistakes of BJP if we voted for them.

येस वुई शूड!

पण जितक्या मजेशीर लिंका आणि युक्तिवाद बी जे पी च्या विरोधात येथे केले जात आहेत तसेच सगळे आप आणि काँग्रेसच्या विरोधातही केले जाऊ शकतात, लोकांना तितका वेळ नसतो हे लक्षात घ्यायला पाहिजे.

Proud

त्यामुळे गंमत वाटते.

जरा रागवा बरे त्या लोकांना ज्यांनी वेड्यासारखी मते दिली ह्या पक्षाला!
<<
३१%वर अडकलेली रेकॉर्ड.
Happy

What I found against AAP is mostly personal attacks on Kejriwal, AK49 etc. nothing new.

Congress to mari padi hai. (no one care about congress incluing their leaders).

BTW today is very peaceful day as no songs of AAP, BJP, Cong on Radio.

अहो यादव यांच्या या मुलाखतीत प्रथमच नरमाईची भाषा दिसुन आली. वेगळेपण आहे, चांगले आहेच. पण सुरूवातीपासुन जे चालू होते की फक्त आम्हीच चांगले तो पवित्रा खटकत होता. असोच,

तर भाजप बद्दल बोलायचे झाले तर दिल्लीच्या कॅम्पेन मधे जे झाले ते फार काही योग्य होते असे मलाही वाटत नाही. एकतर पुर्ण भर मुद्द्यांवर द्यायला हवा होता गुद्द्यांवर नाही. आणि बेदी यांना आयात करण्याची कल्पना कितीही चांगली असली तरी लॉन्ग रन मधे महागात पडेल असे वाटते.

कोणत्याही व्यक्तीवर, पक्षावर विश्वास, प्रेम जरूर असावे पण ते अंध असू नये याची काळजी घ्या सर्वांनीच. Happy

भाजपाकरीता फारच वाईट वाटत आहे. एकाबाजुला प्रधानमंत्रींचे चित्र वापरुन निवडणुकीत उतरवणे. आमचे स्टार कॅम्पेनर मोदीसाहेबच आहेत असे सतत नेत्यांच्या तोंडी असणे. त्यांच्या मोठ्याप्रमाणात सभा रैली आयोजित करणे. इत्यादी. सगळे मोदींच्याच नावाने करत राहणे मोदी लहर मोदी लहरवर अवलंबुन राहणे.
तर दुसर्‍याबाजुला सर्वेत आआप पक्षाचे वर्चस्व दिसु लागल्यावर दिल्लीचा कौल हे मोदींवर कौल नाही मोदी मुख्यमंत्रीपदासाठी लढत नव्हते. केजरीवाल विरुध्द मोदी असा सामना नव्हता. अशी वक्तव्य केविलवाणी आणि दयनिय अवस्थेत भाजपांच्या नेत्यांना आता करावी लागत आहे. अवघ्या एका महिन्यात त्यांना अशी वक्तव्ये करावी लागणार कुणाला स्वप्नात देखील वाटले नव्हते. गेल्या २ दिवसांपासुन "बेदी बचाव" कार्यक्रम आता "मोदी बचाओ" कार्यक्रमात रुपांतरीत झाला आहे. खुद्द मोदींचा देखील संयम सुटू लागला आहे. ज्या सर्वेचे गुणगाण लोकसभा, महाराष्ट्र, काश्मिर, झारखंड, हरियाणा विधानसभेच्या प्रचारात मोदी गात होते. तेच मोदी आता त्या सर्वेंना "बाजारु" म्हणत आहेत. ही हताशा सभेत त्यांच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसुन येत आहे. सतत केजरीवाल केजरीवाल नावाचा जप करणे मोदींनी सोडुन द्यावे. आणि स्वतःच्या कामावर लक्ष द्यावे. ९ महिन्यात जनधन योजनेव्यक्तिरिक्त काहीच केले नाही. ओबामाला बोलवणे ही चाल त्यांच्याच अंगलट आली. प्रजासत्ताक दिवसाला ओबामा दिवस बनवला. अशी बरीच उलटसुलट चर्चा चालु झाली होती. त्यातच जाताना ओबामाने शालजोडीतला टोला हाणुन गेले. त्यामुळे जे ओबामांना २-३ दिवसांच्या भेटीवर दिसुन आले ते गरीब भोळ्या जनतेला दिसुन येत नाही हे दुर्दैव आहे. अराजक आहात तर नक्षलवादी बना असा चुकिचा संदेश/वक्तव्य एका देशाच्या पंतप्रधानाने केले हे जगाच्या इतिहासात पहिले आणि शेवटचेच उदाहरण असावे. हे वक्तव्य चुकिचे आणि खेदपुर्वक आहे.
त्यातच भाजपाच्या अध्यक्षाने १५ लाख अकाउंट मधे येणे हा तर निव्वळ निवडणुकित वापरलेला जुमला/जुगाड होता असे धक्कादायक वक्तव्य केले. याचाच अर्थ यापक्षातर्फे निवडणुकीत केल्या जाणार्‍या प्रचारात जे काही असेल ते सगळे जुमले/ जुगाडच आहेत सत्य परिस्थिती वेगळीच असेल असा अर्थ सुज्ञ जनता घ्यायला वेळ लावणार नाही. सत्तेचा माज आणि मस्ती किती धोकादायक असते हे भाजपाला लवकरच कळेल. काँग्रेसला फारच चांगल्या प्रकारे समजले आहे. वर्ल्डक्लास दिल्ली बनवु असा नारा सध्या दिला जात आहे . मग मागील ९ महिने काय झोपा काढत होतात? दिल्लीसाठी काय काय कामे चालु केली आहे? त्यांच्या समस्येसाठी काय उपाय योजले जात आहेत? केंद्रसरकार तर सगळ्यांच राज्यांसाठी आहे त्याराज्यात विकासकामे करण्याकरीता केंद्राला स्वतःचीच सत्ता राज्यात असायची गरज नाही आहे. की भाजपाचे असे म्हणणे आहे आमची सत्ता राज्यात आली तरच केंद्राकडुन मदत मिळेल? काही प्रचारांमधुन आणि आधींच्या देखील प्रचारांमधुन मोदी जनतेच्या गळी हेच उतरवत असल्याचे दिसुन येत आहे. हे देशाच्या संघराज्याच्या कल्पनेसाठी चुकिचे ठरु शकते. या गोष्टींचा मुद्दा जर कोणत्या पक्षाने जोरदार उचलला तर मोदी सरकारला सळो की पळो करुन सोडेल. "माझी केंद्रात सरकार आहे म्हणुन राज्यात माझ्याच पक्षाला सरकार द्या " हे सतत बोलणे चुकिचे देखील ठरु शकते याचे भान सध्या भाजपाला नाही आहे. केंद्र फक्त अश्याच राज्यांना अधिक मदत करणार ज्या राज्यात भाजपाचे सरकार स्थापन होईल अश्या अर्थाचे एका अहंकारी वक्तव्य ठरत आहे.
केजरीवालला दिल्ली हे पुर्ण राज्य हवे आहे. भाजपाला देखील हवे आहे. परंतु आता जर केजरीवालची सत्ता आली तर मोदी दिल्लीला पुर्णराज्याचा दर्जा देणार नाही. हा मुद्दा म्हणजे "धरले तर चावते आणि सोडले तर पळते" असे भाजपासाठी ठरु लागला आहे. राज्याचा दर्जा दिला नाही तर हा मुद्दा सत्तेत आल्यावर केजरीवाल सतत उचलत राहणार इतका की प्रत्येक गोष्ट केंद्रसरकारवर ढकलणार. आणि राज्याचा दर्जा दिला तर केजरीवाल त्याचे श्रेय स्वतःकडे घेणार आणि केंद्रसरकारला डोकेदुखी ठरु लागणार. त्यातच हरियाणाकडुन वेळेवर पाणी आले नाही तर त्याचा आरोप देखील केंद्रसरकार आणि हरियाणा सरकारवरच लावणार कारण दोन्ही कडे भाजपाचे सरकार आहे. निवडणुकीच्या पराभवाचा बदला भाजपा घेत आहे. असे म्हणायला केजरीवाल कमी करणार नाही Happy

इकडे आड तिकडे विहिर अशी परिस्थिती आहे. दोन्ही बाजुला भाजपाचेच नुकसान आहे

>>>> यादव यांनी आक्षेप मान्य केले यातच त्यांचे वेगळेपण दिसून आले नाही का ? <<<< त्यात कसले वेगळेपण? प्रत्येक गुन्हेगार स्वतःवरील आरोप नाकरतोच कोर्टात, त्यापेक्षा ते वेगळे ठरताहेत. पण ती मजबुरी आहे. आक्षेप अमान्य करणे स्वतःच्या पायावर धोन्डा पाडून घेण्यासारखे आहे येवढे कळते त्यान्ना.
मूळ प्रश्न रहातोच, इन्कम टॅक्सची पूर्तता न करणे या देशातील पगारी नोकरदारान्ना/व्यावसायिकान्ना किती महागात पडू शक्ते हे ज्यान्ना माहित आहे त्यान्ना पुढील प्रश्न पडतो की अशी पूर्तता न करुनही कोणतीही कारवाइ झाली नसेल, तर आपने "काय" मॅनेजमेंट वापरलीये? Proud

>>>> भाजपचा कोणताही नेता असे आक्षेप मान्य करेल का? <<< कधी कोणता रास्त आक्षेप मान्य केला नव्हता याचे उदाहरण द्याल का?

एक ट्विट

आप वालों! एबीपी, आज तक, एनडीटीव्ही देखो और खुश हो जावो!

बीजेपी वालों! आयबीएन ७, झी टीव्ही, इंडिया टीव्ही देखो और खुश हो जावो!

और कांग्रेस! पोगो है ना!

लिंबूदा लोकसभेच्या निवडणुकांनंतर देखील यांनी आयटी नियमांची पुर्तता केलेली नव्हती, मग यांना निवडणुक आयोगाने अटकाव कसा केला नाही. कदाचित काही तांत्रिक पळवाट असू शकेल त्यात असे वाटते.

<<अहो यादव यांच्या या मुलाखतीत प्रथमच नरमाईची भाषा दिसुन आली. >>

Uhoh यादव इतके दिवस नरमाईने बोलत नव्हते असं म्हणत असाल तर मज्जाच आहे. अर्थात तुमचं मत तसं असायला माझी काहीच हरकत नाही.
इनफॅक्ट ते नेहमीच जरा अतिच नरम बोलतात असं माझं वैयक्तिक मत आहे. कधीकधी डोक्यात जातं.

<<पण जितक्या मजेशीर लिंका आणि युक्तिवाद बी जे पी च्या विरोधात येथे केले जात आहेत तसेच सगळे आप आणि काँग्रेसच्या विरोधातही केले जाऊ शकतात, लोकांना तितका वेळ नसतो हे लक्षात घ्यायला पाहिजे.>>

लोकांना वेळ नसतो म्हणूनच तर साधू-साध्वी, बलात्काराचे आरोपी जाऊन बसलेत संसदेत. रच्याकने, लोकांना बाकी बरंच काही लिहायला वेळ असतो हे माहीत आहे Happy

असो, आत्ता महत्वाचे मुद्दे सविस्तर लिहायला मला वेळ नाही. Proud

कबीर, छान प्रतिसाद. Happy

महेश,
बरखा, यादव ह्यांचं नाही तर तुमचं मत विचारत होते मी. शक्य झालं तर लिहा.
<<सरळ सरळ अन्य पक्षांप्रमाणे फंड उभारून केवळ नियमाने आयटी फाईल करणे असे केले असते तरी ठीक होते.>>

ठळक केलेल्या शब्दांशी १००% असहमत. पुढच्या वाक्याशी सहमत.

पण जितक्या मजेशीर लिंका आणि युक्तिवाद बी जे पी च्या विरोधात येथे केले जात आहेत तसेच सगळे आप आणि काँग्रेसच्या विरोधातही केले जाऊ शकतात >> जाउ शकतात म्हणजे? लोकसभेच्या वेळी, इतर राज्यातल्या निवडणुकांच्या वेळी काय केलं होतं मग? व्यक्तिगत हल्ल्यांची, हेट्रेडची परिसिमा होती की तेव्हा तर. हाच डाव आता त्यांच्यावर उलटलाय.

आआप आणि भाजपाच्यां कार्यकत्यात दगडफेक दंगल, झी टिव्ही ६ फेब २०१५ दुपारी १.००

आज सकाळ पासुन आआपचे कार्यकत्ये दिल्लीच्या बॉर्डरवर (गुरगांव, हरियाणा सिमा) एकत्र येऊन घो षणा देत होते , प्रचार करत होते. त्यावर भाजपाच्या कर्यक त्यांनी विरोध दर्शवला तेंव्हा आ आपच्या कर्यकत्यांनी भाजपाच्या कार्यकत्यांवर दगडफेक केली. घटनास्थळी पोलिसांनी बल प्रयोग करुन शांतता प्रस्थापित केलेली आहे.

मनीष +१

रमाकांत

एक ट्विट

आप वालों! एबीपी, आज तक, एनडीटीव्ही देखो और खुश हो जावो!

बीजेपी वालों! आयबीएन ७, झी टीव्ही, इंडिया टीव्ही देखो और खुश हो जावो!

और कांग्रेस! पोगो है ना!

Happy

एकिकडे शाही इमाम यांनी स्वतःहुन आआप पक्षाला सपोर्ट देउ केला तो केजरीवाल यांनी स्वीकार केला नाही. "मला सर्व धर्मिय लोकांचा पाठिंबा आहे मला धार्मिक राजकारण करायचे नाही आहे." अश्या शब्दात पाठिंबा नाकारला आहे.

दुसरीकडे बाबा राम रहिम यांच्या कडे भाजपाचे नेते गेले होते आणि त्यानंतर राम रहिम यांनी भाजपाला पाठिंबा दिला आहे. आणि तो भाजपाने स्वीकारलेला आहे. भाजपाचे नेते आनंद व्यक्त करत आहे शहानवाझ हुसेन यांनी स्वत:च्या ट्विटर वरुन रामरहिम आणि स्वतःचा फोटो ट्विट केला आहे.

सीतारमण यांनी आज आआप वर Polarisचा आरोप लावला आहे. (या बाई नेहमी नळावर भांडायला आल्यासारखी का बडबड करत असतात? चेहरा नेहमी एकदम दातओठ खाल्ल्यासारखाच असतो.)

काय छान विरोधाभास आहे ना ? जनता सुज्ञ आहे/असेल Happy

कबीर. |>>> खुप छान विष्लेशण!!

अराजक आहात तर नक्षलवादी बना असा चुकिचा संदेश/वक्तव्य एका देशाच्या पंतप्रधानाने केले हे जगाच्या इतिहासात पहिले आणि शेवटचेच उदाहरण असावे>>>> +१०१
आता मोदिंचि भाषण ऐकताना लाज वाटु लागली आहे

भाजपाचे असे म्हणणे आहे आमची सत्ता राज्यात आली तरच केंद्राकडुन मदत मिळेल? >>> +१
मला याची प्रचंड चीड येत आहे...

बेफ़िकीर | 5 February, 2015 - 23:30
भाजपवर फारच रोष दिसत आहे सगळ्यांचा!
जरा रागवा बरे त्या लोकांना ज्यांनी वेड्यासारखी मते दिली ह्या पक्षाला!
काय चाललंय काय म्हणाव?
>>>>> अहो ३१% लोकांनी मत दिले होते.....त्यात माझ्यासारखे आणि mandard सारखे आहेत जे दिल्लीत आपला support करत आहेत.....

इमामचा सपोर्ट स्पष्ट शब्दांत नाकारल्यामुळे माझ्या मनातील आपबद्दलचा आदर आणखीन वाढला. वे टु गो आप ! Happy

<<सीतारमण यांनी आज आआप वर Polarisचा आरोप लावला आहे.>>

उल्टा चोर कोतवाल को डांटे !
हिंदू-मुस्लिम पोलरायझेशन करून मतं मिळवण्याचा भाजपाचा शेवटचा डेस्परेट प्रयत्न पण फसलाय.

आता & pictures channel वर TOMORROW NEVER DIES बघत होतो ब्रेक मधे इंडिया टीवी आणि झी न्युज बघितले

फरक समजत नाही सारखेच वाटत आहे

२००४ मध्ये इमामने भाजपाला सपोर्ट दिला होता. 'राष्ट्रवादी' भाजपाने तो नाकारल्याचं ऐकण्यात नाही.

स्पायकॅमसेना दारूवाटपावर लक्ष ठेऊन आहे. बर्‍याच ठिकाणी दारूवाटप चालू आहे. लोकांना ५००-१००० रूपये देऊन त्यांच्या बोटांना शाई लावणं, त्यांची मतदान ओळखपत्रे घेणं हे प्रकार चालू आहेत. निवड्णूक आयोगाला कळवत आहेत. पण नि आ मध्ये काही दम आहे असं वाट्त नाही. दिल्लीच्या पेप्रांमध्ये पहिल्या पानांवर पानभरून जाहिराती आल्या आहेत "चलो चले मोदी के साथ" Uhoh

जेजे कॉलनीतील दारूवाटपाला अडवल्याबद्दल आपचा उमेदवार- अखिलेश त्रिपाठी आणि स्वयंसेवकांना मारहाण झाली. अखिलेश त्रिपाठी वेण्टिलेटरवर आहे असं वाचलं.

उद्या आणखी काय काय प्रकार घडणार आहेत कोण जाणे.

Pages