AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हणजे ही तुझी hypocrisy आहे. स्वता मान्य करायचे "मी खूप बॅड बॉय" आहे आणि दुसर्यानी केले तर गळे काढायचे.
>>>>>>>

माझा फंडा सांगतो.
मला दारू पिणार्‍यांबद्दल आक्षेप नाही, ते आपल्या कर्माने मरतील.
पण जे इतरांना दारू प्यायला उद्युक्त करतात, त्यावर मात्र मला ऐतराज आहे!

कोणी कितीही दावा करा की हा शो फक्त चार भिंतीच्या आड होता, खाजगी जागेत होता, पण हा समाजाला किड लावेल हे नक्की!

नंदीनी,
तुम्ही होळी, तमाशा वगैरेशी तुलना करताय. पण एक प्रश्ण विचारते,

तुमची नक्की खात्री आहे का की, होळीचे व तमाशाचे पारंपारीक स्वरूप असेच होते का? की हे स्वरूप तुम्ही पाहिलेल्या व एकलेल्या अलिकडच्या (३०-४० वर्षे मागे जा) काळापासूनचे आहे?
तुमचा अभ्यास आहे का तमाशा पुर्वीचा व आताचा? होळी पुर्वीची व आताची? तसे असेल तर रेफरेन्सेस द्या. आम्हालाहि शिक्कामोर्तब करायला बर पडेल हि किळसवाणे प्रकार (जे आताशा चालतात) ते पुर्वापासून आहेत. नाहितर हि अशी उदाहरणे का देताय त्याला उगाच संस्कृतीची जोड देवून?

-----------------------------------------

हे कोणाला उद्देशून नाही. पण खरा किस्सा आहे.

आताच्या काळातल्या १२ वर्षाच्या मुलाला विचारले, रंगपंचमी काय असते आणि तुला काय वाटते?
शी! I dont like it. people use eggs, dirty colors and gutter water. what a stupid traidtion.

झालं, त्याच्या डोक्यात एक प्रतिमा तयार झाली की रंगपंचमी अशीच खेळली जाते आणि हि एक घाणेरडी पद्धत आहे. Happy

हे असे त्याचे उत्तर. आणखी दहा वर्षाने, मायबोलीवर ऋन्मेषने बीबी काढला तर तिथे तो बारा वर्षाचा मुलगा जो २२ वर्षाचा असेल तो असेच प्रश्ण विचारेल, रंगपंचमी हि बेक्कार असते. त्यात संस्कृती बुडाली नाही का?( हा विचार करतेय.)
-----------------------------------------------------
अलीकडे, कुठल्याही सणाचे आपल्याला हवे तसे स्वरूप देवून मग इतर लोकं विचारतात की हिच का तुमची संस्कृती? पण हे माहितच नसते, खरा पारंपारीक प्रकार असा न्हवता. हे लोकांनी केलीली घाण आहे.

मूळात ऋन्मेष , तुम्ही सुद्धा ह्या टीवी शोला अवास्तव महत्व देवून उगाचच संस्कृतीशी जोडू नका. आधीच म्हटल्याप्रमाणे, its just a another show. जो मला बकवास वाटला. बराच ओढून ताणून काढलेला.
व उगाच हिंमत, संस्कृती वगैरे आता विशेषणे लावलेला.

आवरा बाबा ऋन्मेष! Lol

सध्या तरुण पबलिक च्या सेल फोन वरचं मट्रेल समाजाला भरपूर किड लावतय.

न्युजफ्लॅशः किड लागून समाज केव्हाच पोक्कळ झालाय आणि त्याचा पुरावा म्हणजेच संसकृतीच्या नावाखाली सतत बोंबा मारणारे तुमच्या सारखे लोकं!

इतर बर्‍याच लोकांनी लिहिलय ते परत सांगतो. प्रश्न इथे हा कार्यक्रम आवडावा की नाही हा नाहीये. ज्या कारणांकरता काही लोकांना (इन्क्लुडिंग तुला) हा आवडत नाहीये ती कारणं अत्यंत हास्यास्पद आहेत. बोंब मारायच्या आधी समाजाला किड कशा कशाने लागते ह्याची तरी समज आहे का? की तुम्हाला नाही आवडली नाही/समजली नाही एखादी गोष्ट की लगेच त्यानी समाजाला किड लागते का??
इथे मराठी मुलीनी ह्या रोस्ट विषयी चर्चा केली हे बघून तुम्हाला फेफरं आलं अन तिकडे त्या बेफिकिरांना हाप्पँट मधल्या मुली बघून फेफरं येतं अन तुम्ही कुठे चाललात समाजाची किड आवरायला?
आधी जरा तुमच्या भेज्यामधले बंद दारं/खिडक्या आहेत ते उघडा, जरा ज्ञानाची, अ‍ॅक्सेप्टन्स, टॉलरन्स्ची हवा येऊन द्या आत. मग बोलू.

तुमची नक्की खात्री आहे का की, होळीचे व तमाशाचे पारंपारीक स्वरूप असेच होते का? की हे स्वरूप तुम्ही पाहिलेल्या व एकलेल्या अलिकडच्या (३०-४० वर्षे मागे जा) काळापासूनचे आहे?>>> शंभर वर्षे मागे जाऊया. तेव्हाही "तमाशा" अथवा अनेक लोककलांमध्ये अश्लील गोष्टी चिक्कार सापडतील.

मला होळीमध्ये शिव्या देतात म्हणून ते वाईट आणि एआयीबीमध्ये दिल्या ते चांगल्या अस्लं अजिबात म्हणायचं नाही. शिव्या देणं ही वाईट गोष्ट आहे असंच मी म्हणत नाहीये ना!!!! शिव्या देणं ही एखाद्याची स्वाभाविक प्रतिक्रिया असू शकतेच की.

शिव्या होळीमध्ये देतात तशाच एआयबीमध्ये पण दिल्या. व्हॉट्स द बिग डील? होळीमध्ये इतकी वर्षं शिव्या देत असून संस्कृती बुडाली नाही, अश्लील वाडःमयाचे इतके प्रकार असून संस्कृती बुडाली नाही आणि एआयबीच्या एका फालतू प्रोग्रामने तुमची ही महान संस्कृती बुडते होय? आम्ही शो पाहिला, काही जोक्स वर हसलो, काही आवडले नाहीत आणि काही पटले नाहीत (काही समजलेसुद्धा नाहीत!!) झालं विषय मिटला. त्यावरून "अश्लीलतेची नीचतम पातळी" अथवा "मराठी मुलीनं शो पाहिला" म्हणून फेफरं वगैरे भरली नाहीत.

आणि समाजाला डोंबल कीड लागतेय? आम्ही कॉलेज्तमध्ये असताना शिव्या वापरायला शिकलो. आजही वापरतो. तरी जगतोच आहोत ना? का कीडे लागून मेलोय??

इथे मराठी मुलीनी ह्या रोस्ट विषयी चर्चा केली हे बघून तुम्हाला फेफरं आलं अन तिकडे त्या बेफिकिरांना हाप्पँट मधल्या मुली बघून फेफरं येतं अन तुम्ही कुठे चाललात समाजाची किड आवरायला?<<<

Uhoh

आधी जरा तुमच्या भेज्याला मधले बंद दारं/खिडक्या आहेत ते उघडा, जरा ज्ञानीची, अ‍ॅक्सेप्टन्स, टॉलरन्स्ची हवा येऊन द्या आत. मग बोलू.<<< Sad

(ज्ञानी?)

चांगली पोस्ट नंदिनी! Happy

टायपो होता बेफिकिर. धन्यवाद लक्षात आणून दिल्याबद्दल. बदल केला आहे.

तुमची नक्की खात्री आहे का की, होळीचे व तमाशाचे पारंपारीक स्वरूप असेच होते का? की हे स्वरूप तुम्ही पाहिलेल्या व एकलेल्या अलिकडच्या (३०-४० वर्षे मागे जा) काळापासूनचे आहे?>>> शंभर वर्षे मागे जाऊया. तेव्हाही "तमाशा" अथवा अनेक लोककलांमध्ये अश्लील गोष्टी चिक्कार सापडतील.>>>

किरण शान्ताराम काळे यान्च "कोल्ह्याटयाच पोर" पुस्तक वाचल तर समजेल पुर्वीच्या तमाशाच स्वरुप,,भाषा तमाशा ही लोककला असेल्/आहे पण तिच स्वरुप पुर्वीच्या मराठी सिनेमात दाखवायचे तितक गोन्डस नाही!

बाकी AIB roasting विषयी! पाश्च्यात देशात अनेक वर्श राहुनही असा काही प्रकार असतो हे माहितही नव्हते, प्रोग्रॅम बघितल्यावर लक्षात आले " this is not my cup of tea" so be it! पण म्हणजे त्यामुळे त्यावर बन्दि आणा, सन्स्कुती ( ची घागर (आभार दक्षिणा) बुडेल बिडेल अस अजिबात वाटल नाही!

अरे बाबा मी स्माईली टाकलीय त्यापुढे, आणि मला तसे ध्वनित करायचे नसून माझा मुद्दा हा होता की कायदा हातात घेऊ नका वगैरे मुद्दे इथे एआयबीला विरोध करणार्‍यांच्या तोंडी बळेच मारले जात आहेत. >>> ऋन्मेष, कोठे मारले जात आहेत? इथली चर्चा वाचून मला जे वाटले ते मी लिहीले. त्यावर तूच नैतिकता, कायदा गाढव वगैरे त्यात आणलेस. तरीही इथे विरोध करणारे कायदा हातात घेउ पाहात आहेत असे मी म्हणत नव्हतो, अजूनही म्हणत नाही. मला अनेक संघटना ते म्हणताना दिसत आहेत, त्यावर ती कॉमेन्ट होती.

आणि - हे सगळे मी पहिल्यांदा कंटेण्ट बद्दल बोलूनच लिहीले होते की!

अगदी अगदी नंदिनी. कोकणातील एक आत्याआजी आठवली आणि तिच्या (शहरी पांढरपेशी दृष्टीने) शिव्या. अगदी चार चौघात प्रेमळपणे पाठीत धपाटा मारून दिलेल्या.

फारेण्ड ओके.. मिसकम्युनिकेशन नको.. जरी मी ते वाक्य पटकन तुझ्या पोस्टमधून कॉप्पीप्पेस्ट केले असले तरी ती एक जनरल पोस्ट होती.. सर्वांसाठीच.. याचसाठी की त्या कार्यक्रमात जे दाखवले गेले ते चूक की बरोबर या चर्चेला बाजूला टाकून त्याला विरोध कायदा हातात न घेता करायचा वगैरे वगैरे वर चर्चा जाऊ नये. आणि म्हणूनच मी लिहिले की इथे आपण इथे कायदेशीररीत्या धागा काढून चर्चा करतोय ना, मग तर झाले.
बाहेर कुठल्या संघटनेने कायदा हातात घेण्याची चूक केली म्हणून एआयबी चूक वा बरोबर ठरणार नाहीच. पण मग उगाच त्याचे भांडवल करायला एक मुद्दा मिळतो.

अवांतर - तुझ्या पोस्ट बरेचदा संतुलितच असतात. त्यात इथून तिथून दोन्ही बाजूंना खुसपट काढायला काही मिळत नाही हे देखील नमूद करतो.

आम्ही शो पाहिला, काही जोक्स वर हसलो, काही आवडले नाहीत आणि काही पटले नाहीत (काही समजलेसुद्धा नाहीत!!) झालं विषय मिटला. त्यावरून "अश्लीलतेची नीचतम पातळी" अथवा "मराठी मुलीनं शो पाहिला" म्हणून फेफरं वगैरे भरली नाहीत.
>>>>>>>
नक्कीच, आपले आणि माझी विचारसरणी वेगळी आहे, प्रत्येकाची आपापली असते, म्हणून तर चर्चेत वेगवेगळी मते येतात Happy
..

आणि समाजाला डोंबल कीड लागतेय? आम्ही कॉलेज्तमध्ये असताना शिव्या वापरायला शिकलो. आजही वापरतो. तरी जगतोच आहोत ना? का कीडे लागून मेलोय??
>>>>>>
जगण्यामरण्याचा वा किड लागण्याचा संबंध नाही समजला.
राहिला प्रश्न शिव्यांचा, त्या मी इयत्ता पाचवीत शिकलोय. कॉलेज सुटेपर्यंत वापरायचो. अर्थात स्थळकाळाचे भान ठेऊनच. पण जॉबला लागलो तसे आजूबाजुचे वातावरण बदलले, अन शिव्या आपसूक बंद झाल्या. जेव्हा द्यायचो तेव्हाही मला भान होते, व्यसन नव्हते, घरी वा तश्याच सिमिलर वातावरणात तेव्हाही कधीच नाही द्यायचो. त्यामुळे आजच्या तारखेला शिव्यांचा वापर न करताही जगणे जड नाही जात.

तर,
जे भान माझ्यासारख्या वाह्यात मुलालाही होते ते आजच्या सरळसाध्या मुलांनाही उरतेय की नाही अशी परिस्थिती या प्रकारच्या कार्यक्रमांमुळे निर्माण व्हायला वेळ नाही लागणार.

ऋन्मेषा आता ह्या विषयावर एक झक्कास पोल काढ बघु.
>>>
हा पर्याय माझ्याकडे धागा उघडतानाच होता. मात्र ते मुद्दाम टाळलेले. कारण तेव्हा मला वाटलेले की कोणीतरी मुद्दाम प्रवाहाविरुद्ध प्रतिसाद देणारा असतो तसा अपवाद वगळता या कार्यक्रमावर चोहोबाजूंनी टिकाच होईल.
पण असो,
इथला संमिश्र प्रतिसाद पाहता काल रात्री झोपताना मनात विचार आला की शिर्षकात पुढे ?? प्रश्नचिन्ह टाकावे का.. पण राहू दे म्हटले, आपणच आपल्या विचारांवर डळमळीत झाल्यासारखे वाटले असते ते.. Happy

म्हणजे तीच जूनी ओरड - आजकालची पिढी बिघडत चालाली आहे>>>>> हौ! आणि ह्यांची पिढी अजून जिमिनीतून ३-४ इंचच वर आलीये आत्ता आणि उगा आपलं पेन्शनर झाल्यागत खुर्चीत बसून समाजकारण करायला बघतात.
खेळण्या बागड्ण्याच्या दिवसांमध्ये काय उगाचच इतक्या शिरेस गोष्टींवर धाबे... आपलं धागे काढत राहायचे?

श्री | 5 February, 2015 - 10:35
ऋन्मेषा आता ह्या विषयावर एक झक्कास पोल काढ बघु.

खालिल पोल

१) असे रोस्ट सतत व्हावेत. मायबोलीवर पण व्हावेत. बी, चि. रुन्मेश
या दिग्गज व्यक्ति.ने ते करावेत. फक्त १८ वर्षावरील लोका.ना त्यात भाग घेता यावा.

२) असे रोस्ट पहायला मस्त असतात पण त्यात भाग घेणे म्हणजे नामुष्की, सो अन्कुल!

३) असे रोस्ट पाहु नयेत आणि त्यात भाग घेउ
नये पण असे रोस्ट करण्याचा करण जोकरचा हक्क जपण्यासाठी मायबोलीकर आपले प्राण पण देतिल.
(वैद्यबुवा आप आगे हम आपके पीछे है धोतर पकडके)

४) असे रोस्ट अजिबात करु नयेत पाहु नयेत अगदी सहन होत नसेल तर गुलमोहरमध्ये इतर काही(!) कथा वाचाव्यात.

५) असे रोस्ट करण्यावर सरकारी ब.न्दी आणली पाहिजे.

६) आयसिस मोड! रोस्ट द रोस्टर्स!

हलकेच घ्या!

बुवा, या आयडीने हे राहिलं. झगा उतरवून काढा हो ऋन्मेऽऽष तुम्ही.
भारी पोल... असे पोल तरी व्हावेच. :p

३) असे रोस्ट पाहु नयेत आणि त्यात भाग घेउ नये पण असे रोस्ट करण्याचा करण जोकरचा हक्क जपण्यासाठी मायबोलीकर आपले प्राण पण देतिल.
>>>
मजेशीर पण खरेय, मलाही हा प्रश्न जास्त छळतोय. म्हणजे त्याला विरोध करणार्‍यांच्या (ज्यात मी सुद्धा एक) भावना दुखावल्यात किंवा त्यांना समाज बिघडण्याची भिती आहे असे एखादे त्यामागे कारण आहे.
पण करन जोहरचा (आपल्या पोस्टमध्ये जोकर मुद्दाम की टायपो आहे?) हक्क वा व्यक्तीस्वातंत्र्य जपण्याची धडपड का? आणि हक्कही कसला तर अश्लील विनोद, हावभाव आणि चाळे करण्याचा.... स्ट्रेंज!!!

अश्लीलता जपणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे वगैरेचे फिलींग येऊ लागलेय मला आताशा.. मस्करी नाही सिरीअसली Sad

साती तुमचा प्रतीसाद योग्य वाटला. सवंग गोंधळ

गामा - तुमच्या प्रतिसादातील शेवटचे वाक्य आवडले. पण सध्या सार्वजनीक मनोरंजनामधे हा एक नविन रस आला आहे. त्याचे अंधानुकरण, प्रसिद्धीकरण करणे यासही विरोध करणे हे अरसिकपणाचे लक्षण आहे. त्यामुळे समस्त स्त्रीजातीचा (किंवा पुरुषजातीचा) किंवा एखाद्या स्त्रीचा (किंवा पुरुषाचा) मुद्दामहून अपमान (तो अपमान नव्हताच पण...) आणि वस्तुकरण (objectification) केले तरी चालते. Happy

असो पण तो विनोदी (भले खूप जाणानाही वाटत नसला तरी) प्रकार असल्याने त्या प्रकारात थोडेफार एकडेतिकडे होणार हे समजून घेऊन विरोध केला पाहीजे. टोकाचा विरोध अधिक प्रसिद्धी देतोच आणि ईतर वेळ्च्या अभीव्यक्ती स्वातंत्र्यावर निर्बंध आणू शकतो.

अश्लीलता जपणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे वगैरेचे फिलींग येऊ लागलेय मला आताशा.. मस्करी नाही सिरीअसली

>>
नाहीरे मायबोलीच्या रोस्ट वर पैसे मिळणार नाहित म्हणुन
शिव्या साध्या अस्तील बदमाष , हलकट इतपर्य.न्तच
अरे साधा ब्रिटीश रोस्ट आहे त.न्दुरी नाही काही!

(या क्रोमवर अनुस्वार काही येत नाही तेव्हा माफ करा)
__________________________________________________________
पण करन जोहरचा (आपल्या पोस्टमध्ये जोकर मुद्दाम की टायपो आहे?)

तुला काय वाटते ते महत्वाचे. हसु आले तर ठीक नाहीतर टाय्पो समज.

>>शंभर वर्षे मागे जाऊया. तेव्हाही "तमाशा" अथवा अनेक लोककलांमध्ये अश्लील गोष्टी चिक्कार सापडतील.>><<
मुद्दा हा आहे की, एक टुकार शो(ज्याची entertainment value लो वाटली) आणि तमाशा ह्याची तुलना हि एक सफरचंद आणि संत्रं अशी वाटली.

आता दोन्ही मध्ये(तमाशा व AIB) शिव्या हे एकच साम्य आहे म्हणून तुलना करता आहात का?

पण एकदंरीत (तमाशा व हा शो) स्वरूप व त्याची existence (मराठी शब्द?) कारणं खचितच वेगळी वाट्ली.
होळीचेही तसेच, संदर्भ वेगळे आहेत.
प्रत्येक गावानुसार तमाशाचे स्वरूप बदलले असायचे हे मी एकलेले आणि वाचलेले हि आहे. आणि विशिष्ट जातीतली (त्याकाळानुसार ठरलेली ) कोल्हाटी,महार, वंझारी लोकं तमाशा करत असत. प्रत्येकांचे सादरीकरण वेगळे असायचे. तेव्हा नुसता अर्वाच्य शिव्या हा एकच मुद्दा न्हव्ता किंवा शिव्या देवूनच विनोद निर्माण होतात असे तरी वाटत नाही वाचलेल्या माहितीनुसार व शिव्या देवूनच सादर करायचे हा हेतु न्हवता. त्याकाळी सर्वमान्य (रां*च्या, भोस** , हरा*** वगैरे) असलेली बोलीभाषा हि आता वापरात नाही शक्यतो स्थळ, काळ ,स्थिती आणि त्या माणसाची आवडी नुसार. :).

BTW, तमाशाला हि मान्यता न्हवतीच. त्याची कारणं आहेतच. पण एकंदरीत प्रथेचा वापर करून त्याला हिडिस स्वरूप द्यायचे प्रकार काळानुसार चालतच आलेत.

अगदी पुर्वीच्या आज्या वगैरे, रां* आली नाही बाळंतपणाला असे ठणकावून लहान बहिणीला विचारी.
आता सहज म्हणून आणि कितीही नात्यात खुलेपणा असला तरी कमीच असे बोलतील लहान बहिणीशी अशी आशा आहे.(खात्री नाही, कारण प्रत्येकाची आवड असते) Wink

मी जवळच्या मैत्रीणीला, रं* क्या बोल रहिली है रे तु.. असे बहुधा नाही म्हणणार. Happy
जरी मुद्दा इथे काय चांगल आणि वाईटचा नसला तरी .

शिव्या द्यायला ज्याला आवडतात , त्याने द्याव्या ; ती त्याची आवड असेल व त्याबद्दल काहीच म्हणणे नाही.
पण सरसकट होळी, तमाशा व हा शो सारखाच हे पटले नाही.

---------------
BTW, बंदी वगैरे आणा, संस्कृती बिघडते वगैरे मुर्खपणा आहे हे व संस्कृतीच्या नावाखाली हिडीस प्रकार वाढलेत त्याची तुलना करून हे मात्र नमूद करेन. तसेही प्रत्येकाची आवड असते. ज्याला आवडतं त्याने एकावं, पहावं, बोलावं शिव्या देत. लपून, छपून करणारे होतेच आत उघड होइल. पण डोंबलाची आलीय हिंमत हे खरं आहे. स्टेज्ड शोला कसली आलीय हिंमत... Wink

निलिमा, अहो तुमच्या पोस्टला उद्देशून नव्हते ते, ते मी गंमतीनेच घेतले. पण एकंदरीतच या धाग्यावरची आतापर्यंतची या प्रकारालाही व्यक्तीस्वातंत्र्यात मोजत ते जपण्याचे जे प्रयत्न चालू आहेत ते पाहता असे वाटले.

माबोवर तुम्ही म्हणता तसा रोस्ट झालाच तर करण जोहार, रणवीर सिंग, आणि अर्जुन कपूर या तिघांनी मिळून दाखवलेली सो कॉल्ड हिंमत मी एकटा हसत हसत दाखवेन .. त्यात काहीही हिंमतेचे नाहीये हे सिद्धही होऊन जाईल..

झंपी,
आपल्या ज्या पोस्ट पडत आहेत त्यांच्याशी सहमत आहे.
होळीला जय जय शिव शंकर म्हणत भांग घेतली जाते ते चालते आणि रेव्ह पार्ट्या केल्या तर त्या खुपतात या युक्तीवादाला माझ्यामतेही काही अर्थ नाही.
तरीही मतभिन्नता आणि जमल्यास व्यक्तीसापेक्षता म्हणत याबाबत आपले मत नोंदवून सोडून देणेच दोन्हीही बाजूंसाठी योग्य.

निलिमा,
या केसमध्ये तरी ते जोकर जमलेय. टायपो नाही हे समजलेय Happy

चला,आता चर्चा, 'ते तितकसं काही चांगलं होतच असं नाही, थोडं आवडलं, सगळच आवडलं असही नाही, पण त्याने संस्कृती वगैरे बुडत नाही' ह्या टोनपर्यंत आलेली पाहून बरं वाटलं.

संस्कृती वगैरे फार मोठ्या गोष्टी आहेत, आणी संस्कृती ही सतत बदलत जाणारी गोष्ट आहे (कृषी-संस्कृती, औद्योगिक संस्कृती वगैरे). तसं तर तुकारामाच्या अभंगात देखील (भले त्यासी देऊ) अत्र्यांनी तत्कालीन समाजाला मानवेल असा बदल केलाच होता ना. त्याच्या आधीच्या पिढ्यांना नाही ते आक्षेपार्ह वाटलं (बदलायच्या आधीचा शब्द), पण अत्र्यांना वाटलं. so be it.

अशा एखाद्या शो मुळे संस्कृती वगैरे बुडेल ह्यावर माझा तरी विश्वास नाही. पण असे विनोद is not my cup of tea / मला आवडत नाहीत हे देखील तितकच खरय. मग मी त्यांच्या वाटेलाच जात नाही. ईतरांनी काय करावं / बघावं / ऐकावं / वाचावं (ईतरांना त्रास न देता) हा त्यांचा प्रश्न आहे.

>>होळीला जय जय शिव शंकर म्हणत भांग घेतली जाते ते चालते आणि रेव्ह पार्ट्या केल्या तर त्या खुपतात या युक्तीवादाला माझ्यामतेही काही अर्थ नाही>><<
Proud

ऋन्मेष,
ह्या वरच्या जोडीला,

हळदीकुंकू आणि रंगीत पाणी
करवा चौथ आणि आयटम डान्स
बॅचलर पार्टी (मराठीत केळवण?) आणि स्ट्रीप डान्स.

हे सर्व प्रत्येकाच्या आवडीनुसार व (पैसे, प्रकृती)एपतीनुसार असलेलं स्वरूप आहे हो. तुम्ही सवय करून घ्या. Proud

तुम्हाला मी हे बीबी साठी विषय दिलेत असे समजलात तर तो तुमचा प्रश्ण/आवड आहे असे मी समजेन. आमचं काय , येवुच खरडंवायला. Wink

पण नावं जरा तुमची कळवळ जाणवेल अशे असु द्या आणि व्यक्त व्हा.....

रसातळाला गेलेल्या समाजाचं लक्षण- मराठी बायका, हळदीकुंकू आणि ....
मजबूत समाजाचं लक्षण- पंजाबी बायका, करवा चौथ आणि...
वगैरे वगैरे...

(ह. घ्या.)

>>हळदीकुंकू आणि रंगीत पाणी
यावर पुर्वी एक धागा होऊन गेलेला आहे Wink
मनरंग यांचे प्रतिसाद भारी आहेत.
लिहा रे लिहा चांगल्या संस्कारांच्या बाजुने जास्तीत जास्त लिहा. Happy

>>>> तुलना ईंटरेस्टींग वाटली.
१२ वर्षाच्या मुलाचे बसमध्ये पुर्ण तिकीट घेतात तर त्याला बीअर प्यायला दिली तर काय हरकत आहे... असे काहीसे <<<<
झक्कास ऋन्मेष, अगदी अचूक!
सस्मित, मनरंग, साती, झंपी अनुमोदन तुम्हाला.

Pages