AIB - बॉलीवूडी अश्लीलतेची नीचतम पातळी.

Submitted by ऋन्मेऽऽष on 4 February, 2015 - 05:17

.

AIB हा एक लाईव्ह स्टेज शो आहे, त्याचा फुल्लफॉर्म काय आहे हे तुम्ही गूगाळू शकता. तसेच यूट्यूब वर विडीओ देखील बघू शकता. किंवा कदाचित आपल्यातील काही जणांच्या व्हॉटसपवर एव्हाना त्यातील क्लिप्स फिरूही लागल्या असतील.

असो, पण थोडक्यात सांगायचे झाल्यास, बॉलीवूडमधील काही सेलिब्रटी स्टेजवर एकत्र जमून शेकडो प्रेक्षकांसमोर एकमेकांवर अश्लील शेरेबाजी करतात. ती किती अश्लील असू शकते याला काही म्हणजे अगदी काहीही लिमिट नाही. जे अपशब्द तुम्ही आजवर कोणत्याही चित्रपटात ऐकले नसतील ते इथे चण्याफुटाण्यासारखे तुम्हाला विखुरलेले दिसतील. मला स्वतःला याचा एपिसोड यूट्यूब वर बसून धक्का बसला. याला मान्यता देणारे सेन्सॉर कोणते आहे आणि ते भारतीय संस्कृतीचाच एक भाग आहे का हा प्रश्न पडला.

या कार्यक्रमाची तिकीट ४००० रुपये फक्त असून ते पैसे चॅरीटी साठी वापरले असा दावा करण्यात आला आहे, पण माझ्यामते ही होणार्‍या टिकेची धार कमी करायला वापरलेली तकलादू ढाल आहे.

आता, काही संघटनांनी जसे की मनसेने याला विरोध केला आहे. संबंधितांच्या चित्रपटावर बहिष्कार टाकू असा इशारा दिला आहे.
त्याचवेळी, ‘एआयबी’ या शोला योग्य प्रमाणपत्र मिळालं की नाही याबाबत फक्त चौकशी होऊ शकते, मात्र या शोला नियमानुसार परवानगी मिळाली असेल, तर हा शो मी रोखू शकत नाही, असं थेट आणि स्पष्ट मत राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केलं आहे.

हा झाला राजकारणाचा आणि कायद्याचा भाग, पण शेवटी पब्लिक काय विचार करते ते मॅटर करते. म्हणून हा धागा.

खरे तर त्या दिवशी हा कार्यक्रम पाहिल्यावर लागलीच मी हा धागा काढू शकलो असतो. पण मला या प्रकाराला प्रसिद्धीही द्यायची इच्छा नसल्याने तो मोह आवरला,

पण आज मात्र धागा काढला याची कारणे -

१) बातम्यांमधून याला प्रसिद्धी मिळायला सुरुवात झालीच आहे.
२) व्हॉटसपवर याच्या विडीओ क्लिप्स फिरायला लागल्याने अनेकांना यातील गंभीरता समजली असेल.
३) मायबोलीवर अल्पवयीन सभासद नसून सारे प्रौढ आहेत.
४) आज ट्रेनमध्ये एका ग्रूपच्या चर्चेत मी एका मुलीला तो शो ईंटरेस्टींग आहे असे बोलताना ऐकले. ती मुलगी मराठी होती. हा माझ्यासाठी धक्का होता. त्यामुळे अश्यांच्या पालकांना आपली मुले काय बघताहेत हे समजणे गरजेचे वाटले.

तळटीप - रणबीर सिंग, करन जोहार, अर्जुन कपूर, आलिया भट, दिपीका पदुकोन यांच्या चाहत्यांनी वा यांना गुणी बाळ समजणार्‍यांनी कृपया हा काय प्रकार आहे हे जाणून घ्यायच्या फंदात पडू नका. उगाच तुम्हाला ते नावडायला लागायचे !

खालील लिंकवर पोल सापडेल -

http://www.maayboli.com/node/52621

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ॠन्मेष: खुप छान मुद्दे आहेत.

माननीय admin: जे या शोच्या प्रेमात पडलेत त्यांच्यासाठी एकमेकांना चारचौघात गलिच्छ शिव्या देण्यासाठी एक सशुल्क धागा उघडावा, जेणेकरुन त्यांनाही "सुपरस्टार्स"च्या पदपथावर चालण्याची संधी मिळावी.

ते कायद्यात बसत असेल तर >>>>

बरेच जण कायद्याचा हवाला देत आहेत, त्यांनी उत्तर म्हणून माझा हा धागा आणि येथील चर्चा जरा बघा.

कायदेशीर, बेकायदेशीर आणि नैतिकता!

http://www.maayboli.com/node/51663

>>>> ते लोक या लोकाना कोर्टात खेचू शकतात का ? <<< केदार, चांगला प्रश्न.
बदनामी झाल्याच्या/केल्याच्या कारणाने खेचू शकतात.
पण त्यातिल मेख अशी की हा कार्यक्रम खाजगी होता असे सिद्ध "झाले" तर खाजगीरित्या कोणीही कुणाबद्दलही काहीही बोलण्यास, मत व्यक्त करण्यास बंदि नसल्याने बदनामी झाल्याचेच सिद्ध होणार नाही.
तरीही वकिली युक्तिवाद करुन, व नेटमिडीयावरिल प्रसिद्धी दिल्याचे सिद्ध करुन, हे प्रकरण "खाजगी " नव्हतेच नव्हते, व शिवाय, तिकीट वगैरे लावल्यामुळे "धंदा/बिझनेस फॉर प्रॉफिट" होता हे सिद्ध होऊ शकते, अन अशा वेळेस मात्र बदनामीचा कित्येक कोटी रुपयांचा दावा दाखल होऊन कदाचित वसुलीही होऊ शकते.
तरीही कोणीही माणूस, जरी भरडला गेला, तरीही "न्याय मिळविण्याकरताही" असल्या चिखलात दगड फेकू पहाणार नाही, कारण त्यामुळे त्यालाच जास्त मनःस्ताप/खर्च होईल, व चिखलात लोळणार्‍यांना धडा शिकवायला स्वतःलाही त्याच चिखलात उतरावे लागेल. त्यामुळे हे होणे नाही. शिवाय तथाकथित उच्चभ्रू/समंजस/विचारवंत/बुद्धिवादी/व्यक्तिस्वातंत्र्यप्रिय अशा व्यक्तिंचा अशा लिगल अ‍ॅक्शनलाही विरोधच असेल, तो वेगळाच.

अरे तुला काय म्हणायचे आहे ते येथेच सांग ना :). तिथली तीन पानी चर्चा तेवढ्यासाठी पुन्हा कशाला वाचा? इथल्या चर्चेच्या, मी जे लिहीले आहे त्याच्या संदर्भात तेथील काय लागू होते ते सांग.
(ही ऋन्मेषला उद्देशून पोस्ट आहे).

शिवाय तथाकथित उच्चभ्रू/समंजस/विचारवंत/बुद्धिवादी/व्यक्तिस्वातंत्र्यप्रिय अशा व्यक्तिंचा अशा लिगल अ‍ॅक्शनलाही विरोधच असेल, तो वेगळाच. >>> या अनुमानाने मी थक्क झालो :). लोकांचा कायदाबाह्य शक्तींनी हे "मॅटर" आपल्या हातात घ्यायला, कार्यक्रम उधळून वगैरे द्यायला विरोध आहे, म्हणजे ज्यांच्यावर विनोदी कॉमेण्ट्स मारल्या, ज्यांना आपला अपमान/बदनामी झाली असे वाटले, ते घेऊ शकणार्‍या लीगल अ‍ॅक्शनला ही विरोध आहे. जबरी अनुमान Happy

>>>>>> महित आहेत, याचा अर्थ आजुबाजुला ऐकुनच माहित झाल्या असतील ना? पण जसे आपण म्हणालात, संस्कार असल्यामुळे त्या देण्याची हिम्मत होत नाही. याचा अर्थ शिव्या देणे वा ना देणे हे त्या व्यक्तिवर अवलंबून आहे. फक्त AIB टीमने असे शब्द वापरले याचा अर्थ सर्व तरुणवर्ग अश्या गोष्टी अंगीकारेलच असे नाही. <<<<<
तरुणवर्ग बहुसंख्येने अंगिकारेल! अंगिकारणार नाही हा गोड भ्रम असेल.
सिगारेट पिऊ नका, त्याने कॅन्सर होतो हे सिगारेटच्याच प्रत्येक पाकिटावर छापुन सिगारेटचे व्यसन लागणार नाही अशी अपेक्षा करणे जसे व्यर्थ आहे, तसेच सर्रास जे जे गैर असुनही प्रचलित "केले" जाते त्याचे अनुकरण करू नयेच हा संस्कार जर विरोध वा तत्सम मार्गाने केला गेला तरी कुणी बोम्ब मारू नये असे माझे मत.

>>>>> महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आया - बहिणींच्या शिव्यांवरूनच मैत्रीतला सच्चेपणा ठरवला जातो. आणि तिकडचे लोक हा आपला 'अभिमान' असल्यासारखे, जगात भारी... म्हणून ही गोष्ट मिरवतात. आणि या अस्सल, मराठमोळ्या शिव्या (ज्या पांढरपेशा समाजात ban आहेत) त्या आपण ऐकून घेतो. याचा अर्थ पूर्ण महाराष्ट्र ही गोष्ट थोड़ीच अंगीकारतो? <<<<<
आम्हि ऐकून घेत नाही! निदान मी तरी नाहीच नाही.... (आम्ही म्हणजे पेठी हे वेगळे सांगायला नको ना?) भले असले मित्र मिळाले नाही तरी बेहत्तर, काही बिघडत नाही, पण आजही अशा कुणालाही जिथल्या तिथे दाबले जाते.

>>>> म्हणजे आपल्याला मराठी शिव्या चालतात फ़क्त इंग्लिश शिव्या चालत नाहीत, असे आहे का? <<<<
हा अर्थ तुम्ही नुस्ता काढत नाही तर लादूही पहाताय ! आम्हाला कोणत्याच भाषेतील शिव्या चालत नाहीत... ! भले आम्ही अल्पसंख्य असू !

फारेण्ड,
अरे तुझ्याएकट्याच्याच पोस्टला असे नाही, बरेच जण कायद्यात बसत असेल तर कोणाला काय हरकत असा युक्तीवाद करत आहेत, पण कायदा काय स्वर्गातून बनून येत नाही, तो ही गाढव असतोच. कायद्याचे आणि नैतिकतेचे निकष तर नक्कीच वेगवेगळे असू शकतात.

म्हणजे आपल्याला मराठी शिव्या चालतात फ़क्त इंग्लिश शिव्या चालत नाहीत, असे आहे का?>>>>> आम्हाला मराठीच काय हिंदी, पंजाबी, मल्याळी आणि इतर कोणत्याही भाषेतील शिव्या कोण कोणाला देतो याबद्दल काहीही आक्षेप नाही आहे. शिव्या सर्व भाषांमध्ये आहेत आणि त्या एकमेकांना देतात हे सुध्दा सर्वांना माहित आहे. पण जाहिर कार्यक्रम लावुन एकमेकांना शिव्या देण्याचा एकही कार्यक्रम माझ्या पाहण्यात आतापर्यंत नव्हता.

तर असा एक कार्यक्रम ज्याबद्दल येथे चर्चा चालू झाली तो भारतात पहिल्यांदा प्रदर्शित झाला त्यावरून सर्व विचारमंथन चालू आहे. बाकी चालू द्या.

ण जाहिर कार्यक्रम लावुन एकमेकांना शिव्या देण्याचा एकही कार्यक्रम माझ्या पाहण्यात आतापर्यंत नव्हता.>>>>> होळीच्या अथवा शिमग्याच्या कार्यक्रमांबद्दल आपले मत काय आहे? तिथे साधारण कशापद्धतीच्या धिव्या दिल्या जातात याबद्दल तुम्हाला काय म्हणणे आहे?

नंदिनी, मी जाहिर कार्यक्रम लावुन असे लिहिले आहे. होळी आणि शिमग्याला पैसे घेऊन स्वत:ला शिव्या घालतात का लोकं.

Great !!! limbutimbu जी,

तरुणवर्ग बहुसंख्येने अंगिकारेल! अंगिकारणार नाही हा गोड भ्रम असेल.
सिगारेट पिऊ नका, त्याने कॅन्सर होतो हे सिगारेटच्याच प्रत्येक पाकिटावर छापुन सिगारेटचे व्यसन लागणार नाही अशी अपेक्षा करणे जसे व्यर्थ आहे, तसेच सर्रास जे जे गैर असुनही प्रचलित "केले" जाते त्याचे अनुकरण करू नयेच हा संस्कार जर विरोध वा तत्सम मार्गाने केला गेला तरी कुणी बोम्ब मारू नये असे माझे मत.
आम्हि ऐकून घेत नाही! निदान मी तरी नाहीच नाही.... (आम्ही म्हणजे पेठी हे वेगळे सांगायला नको ना?) भले असले मित्र मिळाले नाही तरी बेहत्तर, काही बिघडत नाही, पण आजही अशा कुणालाही जिथल्या तिथे दाबले जाते.
हा अर्थ तुम्ही नुस्ता काढत नाही तर लादूही पहाताय ! आम्हाला कोणत्याच भाषेतील शिव्या चालत नाहीत... ! भले आम्ही अल्पसंख्य असू !
>>>>>>>>>>>>>>

म्हणुनच तुम्ही त्या कार्यक्रमाला गेला नव्हता, आणि तुम्ही तो you tube वर देखील पहिला नाहीत. म्हणजे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. कार्यक्रमाआधी त्याचे स्वरुप काय असणार आहे हे त्या कार्यक्रमाला जाणाऱ्या लोकांना (तुमच्या उलट ज्यांचे विचार आणि मत असतील) माहित होतेच तरीही ते गेले. करण ने डेस्क्लेमर देऊन सुद्धा तो पाहिला गेला. जे या कार्यक्रमाला नाही गेले, त्यांनी you tube वर पाहिला. म्हणजे आता कोणी काय पहायचे हे पण समाज ठरवणार?

>>>> म्हणजे हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. <<<< नाही. इथेच मतभेद आहेत.
प्रदुषणानिमित्ताने, धूर ओकणारी गाडी वा सर्रास (स्वतः लावलेली असली तरी) झाडे तोडणे हे जसे ज्याचा त्याचा (व्यक्तिस्वातंत्र्याचा) प्रश्न म्हणून सोडून देण्यासारखे (कायद्याने) नाहीये, तद्वतच, वैचारिक/सांस्कृतिक प्रदुषणास आळा घालण्याचा यच्चयावत प्रयत्न करणे हा प्रत्येक नागरिकाचा निव्वळ नागरिकधर्मच नव्हे तर अधिकारही आहे. विरोध करणारे त्याच नागरिकधर्म/अधिकाराचा वापर करताहेत. शिव्यांचे पैसे लावुन असोत वा फुकट असोत, असे कार्यक्रम वैचारिक प्रदुषणच आहेत असे माझे मत.

रहाता राहिला "शिमग्यातील शिव्यांचा" प्रश्न. त्याबद्दल "सनातनप्रभातचे" विश्लेषण पुरेसे नाहीये का? Proud
अन तिथेही "आईमाईवरुन" व "शिव्याच" द्याव्यात असे कोणतेही शास्त्र सांगत नाही. व या कार्यक्रमात आम्ही सहभागी झालो नाही, होतही नाही. तेथिल शिव्यांचाही निषेधच करतो.

वैचारिक/सांस्कृतिक प्रदुषणास आळा घालण्याचा यच्चयावत प्रयत्न करणे हा प्रत्येक नागरिकाचा निव्वळ नागरिकधर्मच नव्हे तर अधिकारही आहे. विरोध करणारे त्याच नागरिकधर्म/अधिकाराचा वापर करताहेत. असे माझे मत.
<<<<<<<
but again वैचारिक/ सांस्कृतिक प्रदूषणाची डेफिनेशन काय आहे?

इंग्लिश अथवा भारतीयेतर फिल्म्स, सीरीज आम्ही पाहतो (आपण पाहता का माहित नाही, पण ज्या फिल्म अथवा सीरीज मध्ये एकही किस अथवा शिवि अथवा भारतीय समाजमान्य नसलेली गोष्ट नाही अशाच गोष्टी आपण पाहत असाल असे ग्रुहीत धरतो). मग ज्या फिल्म्स अथवा सीरीजमध्ये, भारतीय सेंसर बोर्डच्या नियमांच्या विरूद्ध असणाऱ्या गोष्टी असतात (व त्या जे लोक पाहतात) आपल्यामते अशा गोष्टही वैचारिक/सांस्कृतिक प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत?
(Best example- Game of thrones)

काही लोकांच्या मते असे "पैसा आणि सवंग प्रसिद्धीसाठी का असेना" पण असे फिक्स असलेल्या कार्यक्रमात स्वतावर अश्लील विनोद होऊ देणे मोठे धैर्याचे लक्षण आहे आणि या हिंमतीचे कौतुकही होतेय.

पण या कार्यक्रमाव्यतिरीक्त प्रत्यक्ष आयुष्यात होणार्‍या शिवीगाळ वा टिकेला हे लोक तितकेच धैर्याने सामोरे जातील का?

कदाचित हो, कदाचित नाही... पण ते प्रत्यक्ष आयुष्यातले जास्त महत्वाचे नाही का?

उलट या अश्या कार्यक्रमात तुम्ही शेरेबाजी करण्याला प्रोत्साहन देत आहात, न की ते सहन करायचे धैर्याची भलामन करत आहात.!!!!

ऋन्मेऽऽष कार्यक्रमात जे दाखवल गेल ते Already सर्वाना माहीत आहे.
About karans orientation, ranabirs sluty nature and all. सो याच गोष्टींवर ते विनोद होते ते सहन करायला धैर्याची काय गरज?

>>> but again वैचारिक/ सांस्कृतिक प्रदूषणाची डेफिनेशन काय आहे? <<<< तो विचार करताना तिथे हिंदू धर्माने शिकवलेली नितीमुल्ये विचारात घ्यावी लागतील व धर्म मधे येईलच येईल. (उदाहरणार्थ सख्या वा चुलत भावाबहिणीचे लग्न हिंदू धर्माधारित कायद्याने निषिद्ध मानले गेले आहे, हिंदू धर्माने व कायद्यानेही, तसेच धर्माधारित मुस्लिम लॉ प्रमाणे चुलत भावाबहिणींचे लग्न ग्राह्य मानले आहे. )

>>> मग ज्या फिल्म्स अथवा सीरीजमध्ये, भारतीय सेंसर बोर्डच्या नियमांच्या विरूद्ध असणाऱ्या गोष्टी असतात (व त्या जे लोक पाहतात) आपल्यामते अशा गोष्टही वैचारिक/सांस्कृतिक प्रदूषणासाठी कारणीभूत आहेत? <<<<
जर सेन्सॉर बोर्डाची परवानगी नसलेल्या तरी बघत असू, तर तो देखिल गुन्हाच असेल का? निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी असतो. अन अर्थातच केवळ तशाच फिल्म्स नव्हे तर कित्येकदा सेन्सॉर बोर्डाने संमत केलेली दृष्ये देखिल प्रदुषणास जबाबदार असतात, कारण बोर्डावरही माणसेच आहेत, विविध विचारप्रवृत्तीची.

आवडले:

आदिती मित्तलचे केस.
दीपिका फार छान दिसत होती.
काही विनोद मस्त होते. दीपिका यू हॅव टेकन वन फॉर द टीम. आणि करण स्क्रिप्ट रायटर का नाही घेत. आणि इतर विनोद.
मी ह्यांचे कार्यक्रम पहिल्यापासून पाहात आले आहे. विनोदी टिप्पणी असते. एक मारियो इंडियन स्वरूपात असा व्हिडीओ आहे तो फार मस्त आहे.
रोडीज वगैरे आधी पासून फॉलो केले असेल तर कार्यक्र्मातले जोक्स नीट अपील होतील.
अबीश खंबा, तन्मय, आशीष कार्यक्रम बघायच्या आधी पासून माहीत होते व त्यांची लेव्हल माहीत होती.
इंग्रजी विनोद तसे सुद्ध्हा आव्डतात. ह्यातील सर्व विनोद स्क्रिपटेड असून अर्जून रणवीर, करण ह्यांना त्याची पूर्वकल्पना होती.
नेट वर प्रचलित काही संकल्पना माहीत असतील तर विनोद एव्ढे आउट्रेजिअस वाट्णार नाहीत.
करण जोहर आउट झाला असेच मला वाटले बघून . किंवा त्यासाठीच हा कार्यक्रम आहे कि काय असे वाटले.

न आवडलेले:

शिव्यांचा भडिमार. तो ही लास्ट सेशन मध्ये. जरा जास्त केले आहे पण अतिशयोक्ती अलंकार वापरला आहे.

------------------------
त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा सन्मान आहे. बंद पाडणे वगैरे फक्त घाबरलेल्या इन्सेक्युअर मानसिकतेतूनच होउ शकते.

>>> बंद पाडणे वगैरे फक्त घाबरलेल्या इन्सेक्युअर मानसिकतेतूनच होउ शकते. <<<
मामी, हाच न्याय "संरक्षण सिद्धतेबाबत" स्वातंत्र्योत्तर काळात लावला गेला की सैन्य बाळगणे म्हणजे इन्सेक्युअर मानसिकता.....
त्यामुळे देशात "डिफेन्स अ‍ॅकॅडमी" आहे "अ‍ॅटॅक अ‍ॅकॅडमी" नाही! Proud

माबो वर गजलाकारांनी ज्या दर्जाच्या गजला पाडल्या आहेत त्याने सो कॉल्ड संस्कृतीचे जास्त नुकसान झाले आहे.

तो विचार करताना तिथे हिंदू धर्माने शिकवलेली नितीमुल्ये विचारात घ्यावी लागतील >>>>>>> माझ्या मते भारत सेक्युलर(निधर्मी) देश आहे.
आणि हिंदू धर्माने शिकवलेलीच का? (मग पुराणातल्या गोष्टी आपण का नाही फॉलो करत?)

जर सेन्सॉर बोर्डाची परवानगी नसलेल्या तरी बघत असू, तर तो देखिल गुन्हाच असेल का? निदान माझ्या माहितीप्रमाणे तरी असतो. अन अर्थातच केवळ तशाच फिल्म्स नव्हे तर कित्येकदा सेन्सॉर बोर्डाने संमत केलेली दृष्ये देखिल प्रदुषणास जबाबदार असतात >>>>>>
अहो, लोकांना किती suppress कराल? जितके तुम्ही suppress कराल, तितके ते दुसऱ्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने उफाळून येणार. (उदा. रेप)
आणि जी नीतिमुल्ये माणसाला माणसासारखी वागवत नाहीत ती काय कामाची? (उदा. हिंदू धर्माने लादलेली caste system)

मामी, हाच न्याय "संरक्षण सिद्धतेबाबत" स्वातंत्र्योत्तर काळात लावला गेला की सैन्य बाळगणे म्हणजे इन्सेक्युअर मानसिकता.....>> नाही तो वेगळा मुद्दा आहे. पूर्वीच्या काळात ज्या भीतीने घाशिराम, सखाराम बाइंडर वगैरे ला विरोध झाला तो ह्या असुरक्षित मानसिकतेतूनच. वैयक्तिक आयुष्यात आम्ही शिव्या घालणार पण त्याचे प्रकटीकरण झाले कि असुरक्षित वाटणार. त्यात शरीरसंबंधाच्या संदर्भाने काहीही बोलले गेले कि मने लगेच बंद होतात व असुरक्षित होतात. नैतिकतेचे फिल्टर लागतात.

बुरा न मानो होली है. म्हणून सोडून् द्या. नवे बाफ काढायची वेळ झाली.

ग्रेट !!

काही लोक पैसे घेउन स्वतःची हेटाळ्णी करुन घेतात तेही अश्या भाषेत आणि अशा पातळीची आणि हसतात आणि स्पोरटींगली घेतात हे बघुन काही लोकांना काय आनंद मिळ्त असेल? तेही इतके पैसे मोजुन.

वैयक्तिक आयुष्यात आम्ही शिव्या घालणार पण त्याचे प्रकटीकरण झाले कि असुरक्षित वाटणार.
>>

नक्की कसली असुरक्षितता ? म्हणजे ज्यांना असुरक्षितता वाटत असावी त्यांना नक्की काय होण्याची भिती वाटत असावी ??

लिंबूदा, क्या बात हैं ! Happy
सद्ध्या येथे फारसे लिहू शकत नाहीये, पण वाचत नक्की आहे.
वेळ मिळेल तसे लिहायचा प्रयत्न राहील.

इतकी छान (??) भारतीय संस्कृती असताना सुद्धा बलात्कार तर दररोज होतच आहेत, मग असे का होत आहे ? हा कार्यक्रम तर अर्थात भारताची लपलेली संस्कृती समोर आणत आहे, माझा विरोधही नाही आणि समर्थन पण नाही याला कारण जे सत्य आहे ते नेहमी समोरच असले पाहिजे, सोडा आता खोट्या संस्कृतीचे धिंडोरे पिटवने म्हणजे तोंडावर पडण्यापासून वाचाल!

अमा, मलाही काही कोट्स एकदम witty वाटले. you have taken one for the team त्यातलाच. इतर अनेक एकदम ओंगळ वाटले. कुत्र्यासारखी पोझिशन वगैरे, आयसिस चा उल्लेख It's not funny कॅटेगरीत मोडतो (असे मला वाटले). बाकी शो पाहूनच ठरवता येइल.

अशा विनोदांत सुद्धा एक 'क्लास' असायला हवा. नाहीतर गल्लीच्या कोपर्‍यावर केवळ गलिच्छ शब्द पेरल्याने, व काही विशिष्ठ "अ‍ॅक्शन्स" करण्याने आपण भारी विनोद करत आहोत असे वाटून हसणारे लोक आणि यांच्या दर्जात काहीच फरक होणार नाही. अर्थात विनोदात क्लास आहे की नाही हे ठरवण्याची लेव्हल प्रत्येकाची सारखी असेलच असे नाही.

हा कार्यक्रम तर अर्थात भारताची लपलेली संस्कृती समोर आणत आहे,
>>>>

हि लपलेली भारताची संस्कृती आहे की पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण हा चर्चेचा विषय होऊ शकेल.

बाकी बलात्कार हे संस्कृती नाही तर वृत्ती दर्शवते.

अरे तुझ्याएकट्याच्याच पोस्टला असे नाही, बरेच जण कायद्यात बसत असेल तर कोणाला काय हरकत असा युक्तीवाद करत आहेत, पण कायदा काय स्वर्गातून बनून येत नाही, तो ही गाढव असतोच. कायद्याचे आणि नैतिकतेचे निकष तर नक्कीच वेगवेगळे असू शकतात. >>>> पुन्हा सांगतो, कारण 'कोणाला काय हरकत' हे मी म्हणत नाहीये. हरकत असणे, किळस येणे, टीका करणे, स्वाभाविक आहे. पण त्यापुढे विरोध करायचा तर कायदेशीर मार्गाने करा, एवढेच.

हायला, इथल्या बहुतेकांनी कधी तमाशा पाहिला नाही का? तमाशामध्ये असलंच प्रचंड अश्लील बोललं जातं आणि तेही पैसे लावूनच केलेले कार्यक्रम आसतत (तमाशा म्हणजे फक्त लावणी नव्हे, इतरही प्रकार असतात!)

कधीतरी तमाशा हा प्रकार बघ, ए आय बी सेमटूसेम त्यातलाच प्रकार वाटायला लागेल. आता तमाशा इतकी शतकं असूनदेखील आपली संस्कृती शाबूत राहिलीच आहे ना? मग या एक दोन ए आय बी मुळं काय होणार आहे???

आयसिस चा उल्लेख It's not funny कॅटेगरीत मोडतो (असे मला वाटले). <<< त्याचा राजीव मसंद वर केलेले वन लाईन र ठिक होते, आलियाला घेऊन जे केले ते मात्र आवडलं नाही.

अजून एक बेस्ट: इट टेक्स समथिंग टू बी लिस्ट टॅलेण्टेड इन द फॅमिली व्हीच हॅज संजय अँड सोनम !!!!! (यात कुठंही शिव्या नाहीत पण सणसणीत इन्सल्ट मात्र आहे. आवडलं ब्वा)

Pages