Submitted by भगवती on 26 January, 2015 - 18:53
नुकतीच झी मराठीवर "असे हे कन्यादान" ही मालिका सुरु झाली आहे. सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वा सुरु झाली आहे.
बापलेकीच्या नात्याचे सुंदर पैलू आपल्याला बघायला मिळतील. तर ह्या निमित्ताने खुमासदार चर्चेला आता सुरुवात होऊ द्या. म्हणून हा नवीन धागा ….
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शिफ्ट की>>> अरे पण बघु नका
शिफ्ट की>>>
अरे पण बघु नका ना एवढा संताप होतोय तर. का इथे लिहिण्यासाठी सहन करताय?
बापरे! नायिकेची कॉलेजला जायची
बापरे! नायिकेची कॉलेजला जायची वेशभूषा व केशभूषा याबद्दलच वाचूनच मी अवाक झाले आहे. काही काय.
अगदीच रहावल नाही म्हनून
अगदीच रहावल नाही म्हनून बघितलाच
सस्मित आम्ही सगळ्या शिरेली
सस्मित आम्ही सगळ्या शिरेली त्यांची वाभाडी काधायला मिळावित म्हणून पाहतो.
माझे रात्री १ पर्यंत काम असते घरून. सो समोर टिव्ही सुरू ठेवून मी एकिकडे काम करते. या कन्यादाना नंतर आमच्या होणार्या सूनेत आणि आमच्यात 'दुरावा' आल्याने ती कुठेतरी दूर फेकली गेली आहे, त्यामुळे मला तिला पुरेसा पोष्टीक न्याय देता येणार नाहिये
(अरेरे)
नायिकेची कॉलेजला जायची
नायिकेची कॉलेजला जायची वेशभूषा व केशभूषा याबद्दलच वाचूनच मी अवाक झाले आहे. काही काय>>>यांच्यामुळेच आमच्या मुली बिघडतात नंतर
म्हणुनच, झी मराठी वाले तुनळी
म्हणुनच, झी मराठी वाले तुनळी वर या मालिकेचे संपुर्ण भाग टाकायला घाबरतात.
बघण्यासारखी किमान एकतरी मालिका दाखवता येत नाही का ह्या झी मराठी वाल्यांना!
बहुदा सासु, जावई नंतर कन्या वर आले असतिल हे झी मराठी वाले! आता पुढे काय…
तो किमो खान अक्षरश दोक्यात
तो किमो खान अक्षरश दोक्यात गेला मजह्या. दान्सर असो किम्वा फेशन दिझायनर ते लोक गे असतात असा सर्वमान्य समज का आहे? अ ओ, आता काय करायचं त्या पात्राच पार माकद करून ताकलय
बेफ़िकीर | 27 January, 2015 - 18:18
दक्षिणा,
संतापाच्या भरात शिफ्ट की दबायची राहतीय तुमची बहुतेक
>>>>> धो धो हसलेय!
एरवी खरंतर शिरेलिंच्या बाफांवर येतही नाही. पण कमी पोस्टी दिसल्या म्हणून म्हटलं बघुयात तरी. बेफींच्या कमेंटनं येण्याचं सार्थक झालं.
बाकी सगळ्या हिंदी-मराठी शिरेलींना कोपरापासून नमस्कार. का बघता? का बघता?? का बघता???
बर्फामुळे घरीच अडकल्याने एक
बर्फामुळे घरीच अडकल्याने एक भाग पाहिला. काय तो नयिकेचा ड्रेस, आंबाडीच्या चटणीत क्रीम रोल बुडवून खाल्यासारखा.
का बघता? का बघता?? का बघता???
का बघता? का बघता?? का बघता??? >> तु हसाविस म्हणून
(यक्कु गडगडाटी हास्य करणारी भावली :खोखो:)
त्या शिरेली पाहून होणार्या करमणूकिपेक्षा त्यांची चिरफाड करून अधिक आनंद मिळतो
रिपिट टेलिकास्ट सुरू झाला. बाय.
प्रतिक्रिया वाचून हिम्मत केलि
प्रतिक्रिया वाचून हिम्मत केलि बघण्याची....
हा किमोखान कोण आहे ओळखल नाहित ?? गेल्या जन्मीचा आशिश शिर्के...हो हो तोच बिंडोक मंजिरिचा साय्कोपाथ प्रियकर...
दिलेल काम चांगल केलय....
लोकं कारणं कशाला देताय की का
लोकं कारणं कशाला देताय की का बघितला म्हणून? (तुमची आवड कळली हो).
इतक्या पोस्टी बघून वाटले की पेटले की काय फक्त 'कन्यादान' शब्दावरून.. पण छे... कसलं काय...
<<तिचे 'पीके' डोळे आहेत, कायम
<<तिचे 'पीके' डोळे आहेत, कायम मोठेच!>>

<<सगळ्या सीरियली टाईम पास आणि वाभाडे काढायला बघत असतो >> +११११
पण या वेळी बघणार नाही . इथे वाभाडे वाचायला फेरी मारणार एवढ नक्की
आता मुली म्हणजे संस्काराचा
आता मुली म्हणजे संस्काराचा नमुना असला पहिजे, सतत अश्रू ढाळणारी, कुठल्याही सेकंदाला पाया पडणारी,
वडील म्हणतील त्या मुलाशी कुठल्याश्या जबाबदारीमुळे लग्न , काहीच मत नसलेली आणि हिच मुलगी सून म्हणून गेली की, सगळ्यांची मन जिंका मगच चांगली सून, त्याग करा मगच वडीलांचे संस्कार चांगले असे का? असे काहीतरी असणार.
का काढतात अश्या सिरियल्स आजच्या काळात? मुलींना सक्षम दाखवणार्या सिरियल्स काढायच्या सोडून हे असले आचरट प्रकार. काही पालथा घडा माणसं मग दुजोरे द्यायला लागतात असले काही बघून.
एखादी विनोदी सिरियल्स तरी काढायची.
भरमसाठ मारा असतो सगळ्या चॅनेल्स वर आजकाल.
>>>बहुदा सासु, जावई नंतर
>>>बहुदा सासु, जावई नंतर कन्या वर आले असतिल हे झी मराठी वाले! आता पुढे काय…<<
सासरा राहिला हो,. त्याला हि घ्या लिस्टीत.
दोन्ही भाग बघून काढले ऑनलाईन
दोन्ही भाग बघून काढले ऑनलाईन .
शपो सोडले तर बाकी सगळे नमुने आहेत .
हिरो दिसायला बरा आहे पण उगाचच कॅसेनोवा स्टाईल मारतोय.
अन्डरएज रोमियो वाटतोय .
हिरवीण जरा जास्तच बाबा करतिय , भाउ जास्त प्रॅक्टिकल वाटला .
बाकी आनंद
तो हिरो झी मराठीच्या दोन
तो हिरो झी मराठीच्या दोन शिरेलीत होता आधी. एक केकताची होती त्यात व्हिलन होता आणि एकात हिरो.
मला त्या गायत्रीच्या आईत,
मला त्या गायत्रीच्या आईत, आईपणा नाही वाटत.
अन्डरएज रोमियो >>>
अन्डरएज रोमियो >>>
अन्डरएज रोमियो >>> हिरवीन
अन्डरएज रोमियो >>>
हिरवीन हिरोची आई म्हणुन जास्त चांगली दिसेल..
किर्तने बायकोशी इतके प्रेमाने
किर्तने बायकोशी इतके प्रेमाने बोलतात अगदी खान्द्यावर हात वगैरे ठेउन , मुलांशी दोन शब्द गोड बोलायला काय ???
बादवे , हे कुठल्या शहरातलं कॉलेज आहे ?? त्या हिरविणीच्या मैत्रिणि साळकाया-माळकाया कसले कपडे घालतात ???
आज काल मुली कॉलेजात मेकप करून जातात पण तो फारच सटल असतो ... फार्फार तर गडद लायनर आणि लिप्स्टिक.
कपडे रॅम्पवरचे नसतात ..बोहो स्टाईल नाहितर सिम्पल स्टायलिश टीज .
काल या मालिकेचा प्रोमो
काल या मालिकेचा प्रोमो पाहिला. ती मुलगी डान्सर वगैरे दाखवली आहे का? काय तरी नाचत होती बया. वर तो डान्सर तिला म्हणे तू आत हवी होतीस इथं काय नाचतेस? (रत्नागिरीमधे हा विनोद चांगला एप्रीशीएट होइल. तिथं आम्ही "आत टाका रे याला" म्हटलं की "आत" म्हणजे प्रादेशिक मनोरूग्णालय!!!! असो) तिचे नृत्यातले हावभाव बघून तिला खरंच आत टाकायची गरज आहे असं वाटलं.
ती माबोप्रसिद्ध वेशभूषादेखील पाहिली. ते हाततली पुस्तकं पडल्यावर कावरीबावरी होणारी पीढी साधना राजेंद्रकुमारसोबत अस्तंगत झाली असं वाटलं होतं. पण आहेत अजूनही तसे काही नमुने आहेत या जगात.
म्हणजे प्रादेशिक
म्हणजे प्रादेशिक मनोरूग्णालय!!!! >>
पहिला एपिसोड बघुन मी मुहुर्त केलाय .. आता बाकींच्यानी बघुन इथे चिरफाड कराच
बेफिकीर
बेफिकीर
आता बाबापण नाचगाण्याच्या
आता बाबापण नाचगाण्याच्या तयारीला येऊन बसणार
तिला बापाची माया देऊ
तिला बापाची माया देऊ शकशील>>>

भयानक मोठा जोक .
ह्यानं तिच्या बापाला विचारायचं तिला नवऱ्याची माया देवू शकशील ??
सगळ्याच मराठी आणि हिंदी मालिका सुधा भयानक irritating असतात . (एखादा अपवाद वगळता) लोक कसे काय बघतात देव जाने
हातातली पुस्तकं पडल्यावर ती
हातातली पुस्तकं पडल्यावर ती उचलायची सोडून १० मिंट नुसती बावळंटा सारखी बघत बसते. जणू काही आभाळच कोसळलंय.

काय तो नयिकेचा ड्रेस, आंबाडीच्या चटणीत क्रीम रोल बुडवून खाल्यासारखा.>>>
आणि तशीच hairstyle . मालिका बघणार नाही पण इथे येवून पोस्टी मात्र वाचणार.
आणि कालच्या भागात एक्स्क्युज
आणि कालच्या भागात एक्स्क्युज मी च्या ऐवजी दोघंही नुसतंच "स्क्युज मी' स्क्युज मी' म्हणत आहेत असं ऐकू येतं होतं. माझ्या कानाचा दोष का?
इथलं वाचून इतकंच! शीरेल
टीव्हीच्या रिमोटवर माझी कसलीच
टीव्हीच्या रिमोटवर माझी कसलीच हुकमत चालत नाही. सबब समोर जे काही अचाट/अतर्क्य/बाश्कळ दिसत रहाते ते बघावे/ऐकावे लागते. दुर्दैवाने डोळेकान उघडे ठेवून झोप काढायची कला मला अवगत झालेली नाही.
बाकी यांचे कपडे बघता मनात केवळ एकच विचार आला की "काऽऽश.... आमच्या काळच्या कॉलेजकन्या असे कपडे घालुन येत असत्या तर? "
मला पहिल्या एपिसोडचा ड्रेस
मला पहिल्या एपिसोडचा ड्रेस बघून आशा वाटली होती की कॉलेजातून परस्पर लग्नाला जायचंय म्हणून पळतीये. पण ही तर घरीच आली!
Pages