How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा

Submitted by Mother Warrior on 8 January, 2015 - 21:14

मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर कितीही प्रयत्न केला तरी मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोसेसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. Happy

हळूहळू ऑटीझमबद्दल वाचताना, सेन्सरी disorder कळली. व हाय एनर्जी सेन्सरी मुलांना शांत करण्यासाठी जराशी जड पांघरूण किंवा जड जाकेट इत्यादींचा वापर होतो हे हि वाचनात आले. proprioceptive तसेच tactile सेन्सेस ना उपयुक्त इनपुट देण्यासाठी तसेच डीप प्रेशरसाठी याचा चांगला फायदा होतो. अधिक माहिती या लिंकवर मिळेल: http://www.sensory-processing-disorder.com/weighted-blankets.html

परंतु हे सगळं स्पेशल असल्यामुळे महागही. चांगली वर्षभर डोळा ठेऊन होते मी, पण काहीच मनासारखे व खिशाला परवडेल असं पसंत पडेना. खरं सांगायचे तर मुलाची गोष्ट येते तेव्हा मी अमाप खर्च करते. पण छोट्याश्या जड पांघरूणासाठी ८०-100$ घालवणे काही बरोबर वाटत नव्हते. कारण मुलगा अगदी खात्रीने ते वापरेल याची शक्यता कमीच वाटत होती.

शेवटी गेल्या आठवड्यात http://www.pinterest.com/ वर एक पिन निदर्शनास आली. व अगदी युरेका मोमेंट वाटली मला ती. घरच्या घरी स्वस्तात जड पांघरूण बनवायचे! (हि pinterest साईट फारच उपयुक्त आहे. ऑटीझमबद्दल पुस्तकातून मिळणार नाही इतकी माहिती मला पिंटरेस्टवर मिळाली.)

साध्या Duct tape, तांदूळ व ९ sandwich size zip lock bags वापरून बनवले आहे. साधारण वजन असेल ५-६ पाउंड. आणि आकार आहे साधारण २ फुट x १.५ फुट. तुम्हाला आवड असेल व जमत असेल तर तुम्ही या ब्लांकेटला छान कापडी कव्हरही शिवू शकता. मला शिवणकाम येत नसल्याने मी केले नाही.

हि ती पिन: http://www.pinterest.com/pin/293508100690440961/

आणि हे मी बनवलेल्या वेटेड ब्लांकेटचे फोटो. आधल्या मधल्या स्टेपचे फोटो घ्यायला विसरले. परत बनवले तर अपडेट करीन. क्रमवार कृती तुम्हाला वरील ओरिजिनल पिनमध्ये मिळेल.

ही झिगझॅग नक्षीची डक्ट टेप:

wb1

अन हे तयार ब्लँकेट. आतमध्ये ९ तांदळाच्या झिपलॉक बॅगा ३x३ अशा ठेवून चिकटवल्या.

wb3

wb2

 

wb4

माझा मुलगा काल चक्क ५ मिनिटाच्या आत झोपला हे सांगायचे राहिले. Happy मला अजिबात खात्री नव्हती, परंतु मुलाला खूप आवडले!! मोहीम फत्ते! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवीनच माहिती माझ्याकरता. कधी ऐकलेलं नव्हतं. तुम्ही झिगझॅग डक्टटेप वापरलीत त्याऐवजी मुलांच्या आवडत्या कॅरेक्टरचीही वापरता येईल.

धन्यवाद!! Happy

सायो, त्याला असे झिगझॅग वगैरे पॅटर्न्स खूप आवडतात. म्हणूनच ही घेतली डक्ट टेप. अजुन कुठले कॅरॅक्टर्स मिळाले तर तसंही करून बघते. चांगली आयडीया आहे. थँक्स.

वा! तुमचे असे छोटे छोटे सक्सेस सांगणारे लेख वाचून चांगलं वाटत आहे. अशाच पॉझिटिव्ह राहा.

मला नं... खूप हेल्पलेस वाटायचं. वॉरियर मदरसाठी एखादा प्रतिसाद देण्यापलिकडे काहीच करू शकत नाहीये.. असं काहीसं.
पण तुझे हे लेख वाचून वाटतय... खूप छोटे आहोत आपण. तुझी जिद्दं, उर्जा इतकी उत्तुंग आहे की माझी नजरही पोचू शकत नाही.
खूप खूप शुभेच्छा तुला. खरतर तुझा झगडा असा म्हणायचा तर फक्तं परिस्थितीशी... बाकी सगळ्याशीच तू दोस्तीच करून राहिलियेस...
म्हण तू स्वतःला वॉरियर मदर... आधीच्या नावापेक्षा हे अधिक पसंत आहे आम्हा सगळ्यांना.
अगदी खरं सांगायचं तर तुझा लढा कशाशीच नाही. आहे ते समजून घेत त्यानुसार बदलत रहाण्याची, खळखळत रहाण्याची उर्मी, जिद्दं, उर्जा... कुठून आणतेस बयो?
जिथून कुठून आणते आहेस त्याला माझे लाख सलाम.

बघितलस? माझे तेच तेच शब्दं तिथेच फिरताहेत गोल गोल... तू मात्रं नव्यानं झेप घेणार... पुन्हा पुन्हा.

मस्त!!
नवीन वर्षात तुमचे सकारात्मक लेख वाचून छान वाटतंय. हा उत्साह अखंड राहो, त्याला साजेसे फळ तुम्हाला या वर्षात मिळो. हॅपी न्यु इयर Happy

दाद अगदी बरोबर लिहीलेस!!

हे प्लास्टिक चे मटेरिअल तो तोंडावर घेत नाही ना? मध्येच फाटले तर तांदूळ सांडतात का? वरून एक कापडाची खोळ घातली तर जास्त सेफ होईल. तुम्ही चाइल्ड सेफ मटेरिअल वापरले आहे का? साधे जाडसर
कॉटनचे क्विल्ट वापरले तर उपयोग होत नाही का?

गोधडी भारी देखणी दिसतेय.
>>>> तुमचे असे छोटे छोटे सक्सेस सांगणारे लेख वाचून चांगलं वाटत आहे. अशाच पॉझिटिव्ह राहा. >>> + १

दाद च्या अख्ख्या पोस्टला +१
बाकी हे जड असल्याने मुल पटकन झोपते ह्यामागचे कारण काय बुवा? काहीच क्लु लागत नाहीये. अजुन थोडी माहिती देणार का?

मोनाली, मुलाला झोपवताना एका किंवा दोन्ही हातांनी थोपटतात. त्या लयीत आणि त्या हलक्या दाबाने/वजनाने मूल शांत होते आणि झोपते. जास्त हायपर मुलांना शांत करण्यासाठी, त्यांची वळवळ थांबवून झोपवण्यासाठी हे वजनदार ब्लँकेट असावे. हा आपला अंदाज हं! आणि वजनदार म्हणजे ओझं होईल असं नाही, थोडंसं जड असेल.

त्या लयीत आणि त्या हलक्या दाबाने/वजनाने मूल शांत होते आणि झोपते.>> हेच आलेले मनात. पण अजुन काय संदर्भ आहे ते हवे होते. Happy

धन्यवाद सर्वांना! Happy

दाद, तुमची दाद आवडली! Happy थँक्स. जिद्द कोठून येते? इतर कोणत्याही पालकांसारखीच , मोस्टली मुलाकडे बघून. पण खरं सांगू का? मी काहीच करत नाही हो. बाकीच्या ऑटीझम मॉम्स व डॅड जे माझ्या वाचनात आले आहेत ते देखील माझी इन्स्पिरेशन आहेत. याचसाठी, ऑटीझम्/सेन्सरी प्रोसिसिंग/स्पीच्/ओटी याबद्दलची पुस्तके वाचणे माझी गरज बनली आहे. मी मध्यंतरी जरा लो होते ना?, कारण मी ऑटीझमची पुस्तके वाचणे बंद केले होते. मुद्दाम ते परत चालू केले, तेव्हा कुठे मी जरा ट्रॅकवर आले.

अमा, इतर कुठल्याही वस्तू/खेळण्याप्रमाणेच हे ब्लँकेट दिले तरी मी तेथे त्याच्याबरोबर असते किंवा लक्ष ठेऊन असते. त्यामुळे ती भिती नाही.आत्ताच काही तासांपूर्वी मुलाने जरा शक्तीप्रयोग करून थोडे तांदूळ सांडले आहेत. :| डक्ट टेप संपत आल्याने एखाद दोन ठिकाणी टेप लावायची राहीली होती ती जागा मुलाने बरोबर पकडली. कापडी कव्हर किंवा अजुन चांगल्या रितीने चिकटवा - चिकटवीची गरज आहे. हे सध्या प्रायोगिक तत्वावर असल्याने चालून गेले.

मोनालीपी, अश्विनीके म्हणतात ते बरोबर आहे. लहान मुलांना आपण हलक्या हाताने थोपटून झोपवतो. माझ्या मुलाला त्याचा उपयोग होत नाही. शरीरात स्प्रिंग बसवली तर कशी तुडतुड करतील मुलं? तसा माझा मुलगा अखंड पळत असतो. आयपॅड घेऊन सोफ्यावर बसला तरी जागच्या जागी चुळबुळ असते सतत. त्यामुळे हे ब्लँकेट फक्त झोपवण्यासाठीच नव्हे, तर इव्हन टेबल खुर्चीवर बसून थेरपिस्टबरोबर काम करताना, आयपॅड पाहाताना इत्यादी वापरता येईल. थोडा शरीरावर भार पडला की सतत हालचाल करायची ऊर्मी कमी होते असं काहीसे. किंवा शरीरावर भार पडला की अचानक त्यांना आपल्या शरीराचे भान येते. जसं वर लिहीले तो प्रोप्रायोसेप्टीव्ह सेन्स थोडा जागृत होतो. प्रोप्रायोसेप्टीव्ह सेन्स = sense of the relative position of neighboring parts of the body.

बाकी सर्वांचे परत एकदा आभार! Happy

Pages