How to make Weighted Blanket - जड पांघरूण बनवा

Submitted by Mother Warrior on 8 January, 2015 - 21:14

मी कायम लिहिते त्याप्रमाणे माझा मुलगा नुसता पळत असतो. सतत. खरं सांगायचे तर कितीही प्रयत्न केला तरी मला काही त्यामागचे सायन्स समजू शकत नाही. (कारण माझे सेन्सरी प्रोसेसिंग मुलापेक्षा वेगळे आहे) पण त्याला सतत पळायचे असते हे मात्र खरे. मी तर गमतीत म्हणते, माझा मुलगा चालायला कधी शिकलाच नाही, तो रांगता-रांगता पळायलाच शिकला एकदम. Happy

हळूहळू ऑटीझमबद्दल वाचताना, सेन्सरी disorder कळली. व हाय एनर्जी सेन्सरी मुलांना शांत करण्यासाठी जराशी जड पांघरूण किंवा जड जाकेट इत्यादींचा वापर होतो हे हि वाचनात आले. proprioceptive तसेच tactile सेन्सेस ना उपयुक्त इनपुट देण्यासाठी तसेच डीप प्रेशरसाठी याचा चांगला फायदा होतो. अधिक माहिती या लिंकवर मिळेल: http://www.sensory-processing-disorder.com/weighted-blankets.html

परंतु हे सगळं स्पेशल असल्यामुळे महागही. चांगली वर्षभर डोळा ठेऊन होते मी, पण काहीच मनासारखे व खिशाला परवडेल असं पसंत पडेना. खरं सांगायचे तर मुलाची गोष्ट येते तेव्हा मी अमाप खर्च करते. पण छोट्याश्या जड पांघरूणासाठी ८०-100$ घालवणे काही बरोबर वाटत नव्हते. कारण मुलगा अगदी खात्रीने ते वापरेल याची शक्यता कमीच वाटत होती.

शेवटी गेल्या आठवड्यात http://www.pinterest.com/ वर एक पिन निदर्शनास आली. व अगदी युरेका मोमेंट वाटली मला ती. घरच्या घरी स्वस्तात जड पांघरूण बनवायचे! (हि pinterest साईट फारच उपयुक्त आहे. ऑटीझमबद्दल पुस्तकातून मिळणार नाही इतकी माहिती मला पिंटरेस्टवर मिळाली.)

साध्या Duct tape, तांदूळ व ९ sandwich size zip lock bags वापरून बनवले आहे. साधारण वजन असेल ५-६ पाउंड. आणि आकार आहे साधारण २ फुट x १.५ फुट. तुम्हाला आवड असेल व जमत असेल तर तुम्ही या ब्लांकेटला छान कापडी कव्हरही शिवू शकता. मला शिवणकाम येत नसल्याने मी केले नाही.

हि ती पिन: http://www.pinterest.com/pin/293508100690440961/

आणि हे मी बनवलेल्या वेटेड ब्लांकेटचे फोटो. आधल्या मधल्या स्टेपचे फोटो घ्यायला विसरले. परत बनवले तर अपडेट करीन. क्रमवार कृती तुम्हाला वरील ओरिजिनल पिनमध्ये मिळेल.

ही झिगझॅग नक्षीची डक्ट टेप:

wb1

अन हे तयार ब्लँकेट. आतमध्ये ९ तांदळाच्या झिपलॉक बॅगा ३x३ अशा ठेवून चिकटवल्या.

wb3

wb2

 

wb4

माझा मुलगा काल चक्क ५ मिनिटाच्या आत झोपला हे सांगायचे राहिले. Happy मला अजिबात खात्री नव्हती, परंतु मुलाला खूप आवडले!! मोहीम फत्ते! Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ मदर वॉरियर, अ बिग हग तुम्हाला. किती छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यातुनही तुम्हाला नवनवीन शिकायला मिळ्तय. माझ्या डोक्यावर जरा हात ठेवा ओ. फालतु गोष्टींसाठी पण दिप्रेस होत असते मी. तुमचा हातातुन थोडी स्प्रिरिट मिळेल या पामराला. Wink ...
तुमच्या बाळाला गोड गोड पापा.

तांदुळांऐवजी चांगली वाळू किंवा तत्सम काही खराब न होणारी वस्तू वापरता येईल का? कापडाच्या खोळीत ह्या वाळूच्या झिपलॉक पिशव्या शिवून बघा.

जाड प्लॅस्टीक शीट वर अशी बारीक वाळु चिकटवुन मग वरुन कापडी कव्हर कसे होईल?
हलण्याचा व खराब होण्याचा प्रश्ण नाही वाळु व तीपण चिकटवलेली असेल तर.

मदर तुम्ही रागवला नाहीत ना मी असे प्रश्न विचारले तर. माझ्याकडे हे शीट्स फाटणे कापूस बाहेर येणे ठिगळे लावणे वगैरे कायमची कामे आहेत म्हणून मी शंका विचारली. मला देखील क्विल्टिंग आवडते.

दुसरे सुरक्षितता हे जास्त महत्त्वाचे कन्सर्न आहे. प्लास्टिक तोंडावर आल्यास श्वास घ्यायला त्रास होउ शकतो. तांदूळही तोंड उघडे असले झोपेत तर तोंडात जाउ शकतात. वाळू वगिअरेचा तर विचारही करू नका. त्याचे बारीक पार्टिकल्स नाकात जाउन श्वासाला त्रास होउ शकतो. म्हणूनच चाइल्ड सेफ मटेरिअल ह्या बद्दल जरा जास्त सर्च करून बनवा. भारतात असतात तर मी खोळ शिवून तुम्हाला आणून दिली असते. चोकिन्ग हॅझार्ड वाली कोणतीही मटेरिअल वापरू नये. बेस्ट विशेस अ‍ॅन्ड लव्ह टु मस्तिखोर मुलगा. Happy

मोहरीचे अंथरूण आणि डोक्याला उशी करतात असे ऐकले होते.>>>> मी पण.>> माझ्याकडे एक उशी आहे.
पण वजनाला हलकी तामुळे आत मोहरी असण्याची शक्यता कमीच.

मदर, ही लिंक बघून घ्या. पीडीएफ फाइल आहे.
http://www.articles.complexchild.com/june2009/00130.pdf

मुलाच्या वजनाच्या १०% ते ब्लँकेट्चे वजन हवे. पॉली प्रोपीलिन पेलेट्स वापरा असे सांगितले आहे. जे वॉशर ड्रायर सेफ आहे. अन्न पदार्थ घातले तर धुतल्यावर त्याला बुरशी येण्याची शक्यता आहे. ती श्वासाद्वारे आत गेल्यास इन्फेक्षन होउ शकते. तसेच एक लॅप शीट पण आहे. काही प्रॉजेक्ट वगैरे करताना मांडीवर ठेवल्याने मूल शांत होउन ती अ‍ॅक्टिविटी कंप्लीट करील. अशी कल्पना आहे.
पॉलीस्टायरीन बीड्स वापरू नये

अमा, नाही. मी रागावीन कशाला? थँक्स फॉर द कन्सर्न.
मुलाला ऑटिझम झाला, त्याला अजुन संवाद साधता येत नाही, धोका त्याला समजत नाही हे कळ्ल्यापासून माझे डोके सतत वर्स्ट सिनारिओंचा विचार करते व मुलाला धोक्यापासून कसे लांब ठेवायचे याचाच विचार करते. त्याच्याबाबतीत करणार्या प्रत्येक गोष्टीमध्ये किमान २० मिनिटाचा तरी रिसर्च माझ्याकडून झालेलाच असतो. सवयच लागली आहे. Happy

हे ब्लँकेट मी त्याला साधारण झोप लागेस्तोवर- १० मिनिटं त्याला घातले होते. नंतर काढून घेतले. तसंही त्याने खूप गरम झाले असते. हे लौकिकार्थाने पांघरूण नाही. Happy

मोनालीपी तांदूळ/ वाळू/ बीन्स जे काही वापराल ते हलणंच अपेक्षित आहे. सेन्सरी इन्पुट्साठी ते गरजेचे आहे. त्यामुळे चिकटवलं तर त्यातली मजा निघून जाईल.

बाकी सर्वांना धन्यवाद! Happy

रात्रभर ही जड चादर मूलाच्या अंगावर टाकून ठेवायची की तो झोपेपर्यंत? तूम्ही लिहिलेले सर्व लेख वाचलेले नाहीत पण एकंदरीत प्रतिसादावरून कळतयं तुम्ही खरच मदर वॉरिअर आहात. Happy

मूजरा स्विकारा... Happy

नाही सेनापती, रात्रभर नव्हे. शांत होईपर्यंत. तसेच हे काही लौकीकार्थाने पांघरूण नाही. अशाच प्रकारचे जॅकेट, शॉर्ट्स किंवा नुसतं मांडीवर ठेवायला बेल्ट्स देखील असतात. याचा उपयोग मुख्यत्वेकरून ऑटीझम, अटेंशन डेफिसिट हायपरअ‍ॅक्टीव्ह डीसॉर्डर किंवा सेन्सरी प्रोसेसिंग डिसॉर्डरसाठी therapeutic असा आहे. टेबल खुर्चीवर बसून काही अ‍ॅक्टीव्हिटीज करताना, जिथे कॉन्सन्ट्रेशन्ची गरज आहे तिथे अशा गोष्टींचा वापर होऊ शकतो.

मस्त कल्पना आहे. वरून जाड कापडी खोळ घालावी असं मलाही वाटतंय. त्याने ते 'ठरेल'ही अंगावर (स्लिप होणार नाही). कापडाच्या बीन बॅग्ज करतातच तसंच गोधडीत धान्य भरता येऊ शकेल असं वाटतं.

मस्तच! तुम्ही खरच खुप प्रेरणादायी आहात.

त्याला नुस्तं बसताना अंगावर, मांडिवर ठेवण्यासाठी ankle weights वापरता येतिल का? म्हणजे स्पेशल मिळणारे उगा महाग असतील तर? हे असे, यात भरपूर प्रकार आहेत.

http://www.amazon.com/Hausmann-Wrist-Ankle-Weight-Individually/dp/B000PK...

मस्त आयडीया .:स्मित: तुम्ही लेखात दिलेली साईट मलाही फार आवडते.फारच इनोवेटीव्ह कल्पना आणि सुंदर फोटो असतात.

Pages