कोल्हापुरी पेशल शब्दकोष

Submitted by मन-कवडा on 31 March, 2009 - 01:22

फक्त कोल्हापुरचे असे काही विशेष शब्द आहेत आणि अतिशय फेमस आहेत.
त्यासाठीचा हा शब्दकोश!!!

कृपया, फक्त सेंसाँर्ड शब्द आणि त्यांचे अर्थ [आँप्शनल] सुचवावे!!!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ताक-तुंबा या नावाचा खेळ आम्ही खेळायचो.

च्यामारी,हितं येवडं दिवस कसा नाय आलो Happy
आता हा घ्या शब्द- 'धुरळा उडणे' - कामाची धांदल होणे
'विझवणे'- हरवणे; खास करुन इलेक्शनच्या निकाला दिवशी 'आबा पार विझलं तिच्या*** इ.इ.'
********************************
द मोअर यु राईट पर्सनल, द मोअर इट बिकम्स युनिवर्सल

आगाऊ, 'धुरळा उडणे' चा बोलण्यात वापर करताना उदाहरणादाखल असंही बोललं जातं...
"तेचा पार धुळ्ळा उडिवला." Happy

भावा!! मर्दा!! ( हे तर प्रेमळ विशेषण हाये!!)
झ्याक झालं! (चांगलं झालं)!!
नाद ब्रम्ह!! (नाद खुळा आणि नाद बाद यांची सुपरलेटिव डिग्री)
जगात भारी!!
कुठ हायसा! गेलायसा! (आहे, गेलाय)

गिच्चा (मी हा शब्द वापरलाय पण नेमका अर्थ माहिती नाही)
गट्टा मारणे (पोहताना विहिरीत उडी मारणे, शास्त्रशुद्ध्द सूर नाही, फ्रीस्टाइल उडी)

कोंबडी पकड! (क्रिकेट मधे क्षेत्ररक्षण करताना चेंडू न अडवल्यास)
**************************
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची!
महावंदनीय अतिप्राणप्रिय ही मायमराठी आमुची!!

माझा शिवाजी पेठेतला एक मित्राने या पेठेतील लोकांबद्दल सांगताना एक उदाहरण दिले:

'शिवाजी पेठेत मिसळीत (मिसळ मध्ये) कांदा घातला नाही म्हणून एकाचा तलवारीने भोसकून खून' अशी वर्तमानपत्रात बातमी येवू शकते. Lol

कोणी कोल्हापूरातील दादा लोकांची विशेष नावे लिहीली नाहीत. Wink
उदा. 'फाळकूट दादा'

**************************
ही मायभूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी आमुची!
महावंदनीय अतिप्राणप्रिय ही मायमराठी आमुची!!

कोल्हापुरात वेडा या शब्दासाठी खुळा हा शब्द वापरतात का?
माझा १ कोल्हापुरी मित्र हा शब्द फार वापरायचा..

कोल्हापुरात एका प्राथमिक शाळेतील मुलाकडून ऐकलेलं एक वाक्य..

जा रे! लई शिप्पारस करु नको !

अर्थातच कोल्हापुरात नवीन असल्यानं याचा अर्थ कळला नाही पण नंतर हापिसातील एकानं असा अर्थ
सांगितला की शिप्पारस करणं म्हणजे दादागिरी करणं. Happy

कालच बरेच दिवसानी एका कोलापुरी मित्राशी बोल्लो.. त्याने नेहेमीप्रमाणे प्रेमाची Proud तीन-चार वाक्य हाणली.. आणि म्हणाला.. काय रे गंजक्या ? इसरलास काय ?.. कुठ हाय पत्ता ?

तर गंजक्या हा खास कोल्लापुरी शब्द :)..

तसेच कोल्हापुरात मित्रमंडळी आपापसात बोलताना नेहेमी नावानेच हाक मारतात.. (म्हणजे एक शिवी + नाव.. तेही बाळ्या, अम्या, केद्या, सुन्या, मह्या, इक्या स्टाइल) पण आडनावाने कधीही हाक मारणार नाहीत....
मात्र मी पुण्यात आलो तेव्हा नेमकी उलटी परिस्थिती..
तिथे चड्डीतले पोर पण एकेमेकाना..आडनावानेच हाक मारतात.. ही मी स्वत: अनुभवले आहे..

च्याआईला- कोल्हापुरात सहज बोलतानाहि हा शब्द वापरतात.
भीकनिशि-- देव देतो आणि गुरव लाथा मारतो हे ह्याच्या बाबतित खरे असते.
कडु भाड्या- महिला टिंगल करणार्‍याला हि शिवि हासडतात.

कडु ह्या शब्दाला फारच वेगळी छटा आहे बर.
भाड्या ह्या शब्दाचा अर्थ तर बरेच जण जाणताच.
असो.
मला आठवत असलेल्या स्त्रियांच्या तोंडच्या काहि शिव्या इथे लिहितोय.
अशिक्षीत किंवा थोडीच शाळा शिकलेल्या स्त्रिया अशा शिव्या द्यायच्या. ह्यातल्या अनेक शिव्या मी देखील खाल्या आहेत. आताच्या वातावरणात काहि जहाल वाटु शकतील.

१) तुजा मुडदा बश्शिवला तुजा.
२) ये रक्ताड्या किंवा तुला रक्ताडी भरली तुला
३) पटकीचा फोड उठला तुला
४) भाड्या हा शब्द बर्‍याच वेळा वापरला जायचाच.

ह्या शिव्या प्रत्यक्ष एखादीच्या तोंडुन त्या टिपिकल टोन आणि आवाजात ऐकण हे जास्त ठसकेदार आहे.

कोलापुरी शब्द्कोश लय भारी हाय बगा.आग्दी वावराच्या बान्दावर बसुनशान कोंबडीचा रस्सा वरापल्यागत वाटुन र्ह्यायलै बगा. झकास!!!!

केरसुणी (झाडू) ला "साळुता" म्हंत्यात.
दोन समवयस्क संभाशणाला सुरवात करते वेळी " कायं मर्दा ..... " ने सुरु होतात.

कोल्हापूरात कोणताही जातिय असो, भाषा सर्वांची एकसारखीच, त्यामुळे मी पुण्यात आले सुरवातीला तेव्हा माझी भाषा ऐकून इथले लोक विश्वास ठेवायचे नाहीत की मी ब्राह्मण आहे म्हणून. तरी बरं कोल्हापूरच्या मानाने मी बरिच शुद्ध बोलायची Proud

माझ्या मामी नुकत्याच म्हणजे तरी २ वर्षं झाली पुण्यात कायमच्या शिफ्ट होऊन. माझ्या मामेभावाचं लग्न झालंय फेब मध्ये. परवा मी गेलेले तेव्हा म्हणलं सुन काय म्हणती? ठिक का? दोघांचा संसार कसा चाल्लांय?
तर मामी... दक्षे, फुरगी पार बाद झाल्या असं म्हणाल्या... मला काय झेपेचना... म्हणलं म्हण्जे? Uhoh

तर त्यांना म्हणायचं होतं की माझ्या भावाच्या प्रेमात पडली आहे.

कोल्हापूरात कोण प्रेमात पडलं की त्याला "बाद झालं' म्हणतात.... Proud

manakawadaa | 1 April, 2009 - 15:02

किर्‍यानिष्ट >>> circuit, psycho, कटकट करणार

किरेनिष्ट म्हणजे स्वार्थी self minded

दक्षिणा
"बाद झालं' शब्द फार आवडला.
खेळाच्या मैदानात बाद झालेवर च्या खेळाडूला मैदाना बाहेर काढतात. तसच काहीतरी वाटल.
कोल्हापुरी लोक पुण्यात भेटले अन आपल्याशी कोल्हापुरी बोलले नाहीत तर "कसनुसं" वाटतं.

फुरगी पार बाद झाल्या rofl.gif (वाक्यासाठीच नाही.. एक सासू आपल्या सुनेबद्दल बोलत आहे हे वाचून तर अजूनच हहपुवा)

Pages