परवा एक माणूस ढग डोक्यावर घेऊन विकायला निघाला होता. मला बुकित बातोक MRT स्टेशन जवळ भेटला. '5 सेंटला एक कला ढग. कुठला हि घ्या' म्हणत त्याने ओझं खाली ठेवल.
छोटा ढग, मोठा ढग, काळा ढग, पंधरा ढग, बरेच ढग त्याने कच कचून बांधून ठेवले होते. त्यातूनच एक छोटासा ढग निसटू पाहत होता. वळवळून वळवळून त्याचे अंग सोलवटले होते. ढग पूर्ण काळा न्हवता... त्याची किनार काहीशी गुलाबी होती.
माझं लक्ष त्या ढगाकडे आहे असे कळताच तो गुप्पचूप बसला. ढग विकणाऱ्या माणसाच्या हि लक्षात आल. तो म्हणाला "ताई तुम्ही हा लहानुसा ढग घ्या. सकाळीच पकडलाय त्याला समुद्रावर गुलाबी होताना. आजून गुलाबी किनारीचा रंग हि उतरला नाही त्याच्या".
मी हसून पाकीट उघडले. पैसे देऊन छोटा ढग काढून घेतला. पर्स मधे ठेऊन दिला. त्याची चुळबुळ चालूच राहिली. MRT मध्ये त्याने पळून जायचा प्रयत्न हि केला पण AC असल्या मुळे तो शेजारी बसलेल्या माणसावर मुसु मुसु बरसू लागला. माणूस चिडला. 'तुम्हारा ढग काही और ले जाओ' असा चियनीज मध्ये म्हणत त्याने ढगाला झिडकारून दिले. बिचारा माझा ढग हिरमुसला. पर्सच्या आतल्या कप्यात जाऊन बसला. थोड्या वेळाने पर्स उघडली तर सांगायला लागला सिंगापोरात कोणाला पाऊस आवडतच नाही. नुसता चिक चिक करतो. कधी हि बरसतो म्हणून सगळे लोक राग राग करतात ढगांचा.
त्याच सार बोलण ऐकून घेतला तेव्हा ढग थोडा शांत झाला. आमची मग मस्त मैत्री झाली.रात्री जेवण झाल्यावर आम्ही ढगाला पुन्हा समुद्रावर सोडून आलो. सोडला तेव्हा त्याला काही कळेच ना... कावरा बावरा होऊन आमच्याच भोवती बराच वेळ गिरक्या घेत बसला. मग मीच म्हंटल.. 'जा बाबा आता... मोठ्ठा झालास कि बरस माझ्या घरावर. मला आवडतो पाऊस. पुण्यातला घरावर कधी हि कोसळणाऱ्या पावसावर मनापासून प्रेम केलय मी'.तो हसत, बागडत समुद्रावर निघून गेला.
दोन दिवस त्याची परतून यायची वाट पहिली. नाही आला तेव्हा मीच मनाला समजावलं ... हरवला असेल चुकून वाटेत. कोणीतरी भेटला असेल जुन्या ओळखीचा. बरसला हि असेल कोणाच्यातरी लाडक्या आठवणींवर.
मन सावरते तोच आईचा फोन आला. पाऊस पडतोय म्हणाली. पुण्यात. रात्री पासून एक क्षण उसंत घेतली नाही. आई इमोशनल झाली. म्हणाली डिसेंबर मधला पाऊस आवडला असता तुला.
मी हसून, डोक्याला हात लावला. पत्ता न सांगता माझं घर कसं बर सापडल असेल माझ्या ढगाला?
सिमंतिनी , मस्तं चित्रं. ढग
सिमंतिनी , मस्तं चित्रं.
ढग आणि तो घेऊन येणारी गिरीजा, अगदी परफेक्ट 'मायूस' दिसतायत.
सिमंतिनी, चित्र मस्तच आहे.
सिमंतिनी, चित्र मस्तच आहे. ढगाची किनार गुलाबी काढ की पण.
फार आवडले.
फार आवडले.
खूप सुंदर लिहिलंय. खूप छान
खूप सुंदर लिहिलंय. खूप छान वाटले वाचून
सुरेख लिहिलयं. आवडल.
सुरेख लिहिलयं. आवडल.
आवडलंय !
आवडलंय !
सहीच लिहिलंय. विचार करतोय तसं
सहीच लिहिलंय.
विचार करतोय तसं वेगवेगळ इंटरप्रीटेशन दिसतयं मस्तच...
खरच सुंदर कल्पना आहे एकदम
खरच सुंदर कल्पना आहे
एकदम मस्त....
थोडी अजुन वाढवायला पाहीजे होतं हरवुन जायला मजा आली असती
ए कित्ती छान लिहिलयसं, खुप
ए कित्ती छान लिहिलयसं, खुप आवडलं.
खरच इमॅजिन करतो आपण हे चित्र
खरच इमॅजिन करतो आपण हे चित्र ढगाचं. परत एकदा वाचला लेख ,मस्तच .:स्मित:
गोड लिहीले आहे.
गोड लिहीले आहे.
गोड लिहीले आहे.
गोड लिहीले आहे.
वाह !!!
वाह !!!
कित्ती गोडूलं लिहलयस गं, खूपच
कित्ती गोडूलं लिहलयस गं, खूपच आवडलं.
हिंदीत बोलणारा 'चियनिज' सुद्धा पर्फेक्ट आहे एकदम>>+१११११
किती ते गोड. खुपच आवडलं
मस्तं लिहिलंय.
मस्तं लिहिलंय.
कित्ती गोड !!!
कित्ती गोड !!!

Pages