गेली काही वर्ष पक्षीनिरीक्षण करताना मिळालेले निवडक पक्षी मायबोलीवर प्रकाशचित्रणात डकवावेसे वाटत होते पण लिमीटेड नेट व इथे प्रकाशचित्र देणे हे सोप्पे काम नोहे हे कळुन चुकल्यामुळे केलेला कंटाळा यामुळे ते जमत नव्हते. इथे २० च्या वर प्रकाशचित्र टाकणार्या सर्व छायाचित्रकारांना हॅटस ऑफ.
याआधीचे काही प्रयत्न खाली बघता येतील.
उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.
असो जास्ती पाल्हाळ न लावता आता जमतंय तर हे काम फत्तेच करुन टाकतो.
हुमा घुबड Indian Eagle Owl (मयुरेश्वर पक्षी अभयारण्य) साधारण खडकाळ भागात दिसते. आकार खुपच मोठा असतो.
नेपाळी गरुड Steppe Eagle (सासवड) गवताळ प्र्देशात सापडतो. अग्नेय युरोप, दक्षिण रशिया, ईशान्य चीन, पूर्व मंगोलिया येथे वीण. हिवाळ्यात मध्यपूर्व भागात, पूर्व व दक्षिण आफ्रिकेत व दक्षिण आशियात स्थलांतर. भारतीय उपखंडात तो पाकिस्तान,नेपाळ व उत्तर भारतात येतो
देवससाणा Common Kestrel (ARAI टेकडी)
सुभग Common Iora पिल्लु (सिंहगड पायथा)
सुभग Common Iora सुभग व सुगरण हे वेगवेगळे पक्षी आहेत.
चित्रबलाक Painted Stork (कुंभारगाव भिगवण)
कांडेसर Wooley Necked Stork (कुंभारगाव भिगवण) कांडेसर करकोचा आकाराने साधारण गिधाडा एवढा असतो. हा करकोचा तलावांचे काठ, नद्या, भातखाचरं आणि दलदलीच्या प्रदेशात आढळतो. या करकोच्याची मान पांढरी शुभ्र आणि डोकं व शरीर काळं असतं. मासे, बेडूक, पाणसाप हे त्याचं खाद्य
Scaly Brested Munia हे पक्षी साधारण ज्वारी बाजरीची शेते किंवा उसाची शेते इथे नक्की दिसतात.
Spotted Owlet (मगरपट्टा सिटी व ARAI)
पाणकोंबडी White Breasted Waterhen ही अतिशय लाजाळु असते. थोडा जरी जवळ जाण्याचा प्रयत्न केलात तर उडुन किंबा पळुन जाळुन लपुन बसते. शक्यतो पाणथळीच्या ठिकाणी सापडते.
Bar-Headed Geese पट्टकादंब हंस (वीर धरण) हे दर वर्षी मंगोलियातून उडतात आणि काही लहान मोठे थांबे घेऊन पुण्यातील खडकवासला, कवडीपाट अशा काही मोजक्या पाणवठ्यांवरही ते दिसतात.
White-throated fantail
Spot Billed Duck खुपच कॉमन व शक्यतो पाणथळीच्या ठिकाणी सापडते.
लाल मुनिया Red Adavat
साळुंकी Jungle Myna
सुगरण Baya Weaver (सिहगड पायथा)
अनेक जणांनी लिहीले आहे की सुररणीची हिरवे घरट पहिल्यांदाच बघीतले. घरटे हिरवे दिसत आहे कारण ते शिवणे चालु होते. तुम्ही बघीतलेले घरटे हे बांधुन राहुन पिल्ले झाल्यावर बघितले असेल. तेव्हा ते वाळते. या पक्षाच्या नर हे घरटे नारळाच्या झावळीची पाने तोडुन मस्तपेकी विणत जातो. पूर्ण घरटे बांधुन झाले की मॅडम सुररण ते आतमधे जाऊन तपासतात व घरटे पसंत झाले की वराला पसंत करतात. मादीला ते पसंत नाही पडले तर नर ते क्वचित उसवुन परत विणायला घेतो. माझ्याकडे असा उसवतानाचा फोटो पण आहे. जमले तर टाकतो. अनेकदा ही घरटी झाडाखाला पडलेली दिसतात ती उसवलेली असतात.
हुश्श!! जमले एकदाचे.
सर्व फोटो अशक्य सुंदर आहेत !
सर्व फोटो अशक्य सुंदर आहेत !
अप्रतिम! एकसे बढ़कर एक देखणे
अप्रतिम! एकसे बढ़कर एक देखणे फोटो आहेत.
पहिल्या फोटोतलं घुबड शिष्ठ वाटतं.
उडत्या पक्षांचे आणि हिरव्या घरट्याचे फोटो खूप आवडले.
एक्दम मस्त फोटो. काही झकास
एक्दम मस्त फोटो. काही झकास शार्प आहेत.
लोकहो सुगरण व सुभग ची
लोकहो सुगरण व सुभग ची दुस्रस्ती केली आहे. सुभग वायली व सुगरण (सुईण) वायली थोडी माहीती देण्याचाही प्रयत्न केला आहे.
सर्वच फोटो सुंदर! मी पण
सर्वच फोटो सुंदर!
मी पण सुगरणीचं हिरवं घरटं प्रथमच पाहिलं.
ग्रेट ग्रेट ग्रेट... नवीन
ग्रेट ग्रेट ग्रेट...
नवीन लेन्स वै घेतलीस काय भात्यात?
फोटु टाकायला सोपी मेथड विपुत लिहितो.
कां पो - केवळ अप्रतिम फोटो
कां पो - केवळ अप्रतिम फोटो ....
झकासा ओक्के रे. शशांक
झकासा ओक्के रे.
शशांक पुरंदरे धन्यवाद. केला बदल.
बाकी सर्व लोक्स. धन्यवाद.
पक्षीचित्रण जबरी झालयं...
पक्षीचित्रण जबरी झालयं... माहितीसकट सगळेच आवडले.
सगळॅच फोटो मस्त. सुभग कसला
सगळॅच फोटो मस्त. सुभग कसला गोडूला आहे
एकदम भारी
एकदम भारी
एकदम भारी
एकदम भारी
मस्त फोटो!
मस्त फोटो!
धन्यवाद. इंदा माहीती खरतर
धन्यवाद.
इंदा माहीती खरतर कमी पडते आहे रे.
कसले अप्रतिम सुंदर आलेत रे
कसले अप्रतिम सुंदर आलेत रे सगळेच फोटो. मस्त!!
सर्व फोटोज एकदम
सर्व फोटोज एकदम जबरदस्त!!!!!!!
व्वा! सुंदर फ़ोटो आणि माहिती
व्वा! सुंदर फ़ोटो आणि माहिती
ऑस्सम केपी ! क्लास !
ऑस्सम केपी ! क्लास !
सगळेच सुंदर !!!!!
सगळेच सुंदर !!!!!
श प्प थ्थ्थ
श प्प थ्थ्थ ......_____/\____
हे मी कसं काय मिसलेलं? एकसे एक फोटो आहेत. पक्षांचे फोटो काढणं मला कधी जमेल बरं? कँमेरा, फोटोचे डिटेल्स देशील का? आणि क्लास घे ना माझा
पीसन पीस मोजता येतय. इतकच
पीसन पीस मोजता येतय. इतकच कशाला, त्या पकडलेल्या माशाचे खवलेपण दिसताहेत . कसले क्रिस्पी, क्लिअर फोटो आहेत. हात प्रचंड स्टेडी आहे तुझा. ग्रेट
अप्रतिम .. सुंदर
अप्रतिम .. सुंदर
मस्त आलेत फोटो. सुगरणीचा तर
मस्त आलेत फोटो.
सुगरणीचा तर मस्तच आहे.
धन्यवाद लोक्स. अवल क्लास
धन्यवाद लोक्स.
अवल क्लास कसला घेतोय. मलाच जमत नाहीये अजुन.
असो. यातील काही फोटो Nikon D40x + 55-200 ने काढेलेले आहेत जो माझ्यकडे पूर्वी होता. तो विकुन आता D7100 + Tamron 150-600 घेतली आहे. यापेक्षा डिटेल यायला हवेत खरेतर. ट्रायपॉड न वापरता काढले आहेत. नंतर नंतर मुव्हमेंट कॅच करायच्या नादात हात थरथरतो व घाम फुटतोय.
जबरीच. फार भारी. देवससाणा पंख
जबरीच. फार भारी. देवससाणा पंख फडकवताना काय सुरेख दिसतोय. घुबड, बगळा, सुभग खूपच छान आलेत. गरूडाचा फोटो पाहून पुन्हा एकदा रंगरूपाबाबत निसर्गाने बहाल केलेले सुरक्षाकवच जाणवले. त्या खडकाच्या रंगात तो किती बेमालूम मिसळलाय!
जबरा फोटो आहेत राव केपी
जबरा फोटो आहेत राव केपी _/\_
तो चित्रबलाकाचा (चोचीत मासा पकडलेला) फोटो कसला शॉल्लेट आलाय राव.
धन्यवाद. विशाल जुना फोटो आहे
धन्यवाद.
विशाल जुना फोटो आहे तो. आधीच्या कॅमेराने काढलेला आहे.
Pages