खग ही जाने खग की भाषा -भाग ३ (कवडीपाट व कुंभारगाव भिगवण)

Submitted by कांदापोहे on 28 March, 2013 - 01:47

पुण्याजवळच्या पक्षीनिरीक्षणाच्या अतिशय जवळच्या अशा ४-५ जागा आहेत. पाषाण लेक, सिंहगड व्हॅली, कवडीपाट, भिगवण इ. या वर्षी अनेक दिवस जायचे जायचे करत कुंभारगाव, भिगवण इथे जाऊन आलो. त्यापैकी काही प्रकाशचित्रे इथे देत आहे. कुंभारगावला सकाळी ६-७ वाजेपर्यंत पोचल्यास उत्तम पक्षीनिरीक्षण होते म्हणुन ४ वाजताच पुण्यातुन निघालो. पोचल्यावर चहा नाष्टा उरकुन पक्षीनिरीक्षणाला निघाल्यावर पहीलेच दर्शन रस्त्यावर उभा असलेल्या चित्रबलाकाच्या (Painted Stork) मोठ्या थव्याचे झाले व दिवस चांगला जाणार याची खात्री पटली. Happy

बरीच नावे लिहीली आहेतच नंतर कंटाळाही आला व तुम्हाला काही काम नको का? सांगा बरे पटापट. Proud

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo
यांना उडताना बघणे म्हणजे खरच सुख असते. माणसांची चाहुल लागली की पाण्यावरच पाय मारणे चालु करत संपुर्ण थवा जेव्हा उडतो तेव्हा भान हरपुन जाते.

अग्निपंख, रोहीत - Greater Flamingo

चित्रबलाक - Painted Stork

कुदळ्या, पांढरा शराटी-Black-Headed Ibis

बंड्या - Common Kingfisher खरतर कॉमन नसणार्‍या या खंड्याला कुणी हे नाव दिले काय माहीत.

बगळा- Large Egret with catch

Seagull

मळगुजा - Black-tailed Godwit

तुरेवाला चंडोल - Oriental Skylark

स्वर्गीय नर्तक - Asian Paradise Flycatcher

स्वर्गीय नर्तक - Asian Paradise Flycatcher

चक्रवाक, ब्राह्मणी बदक - Rudy Shelduck

चमच्या - Eurasian SpoonBill

कांडेसर - Woolly-necked Stork

छोटा शराटी - Glossy Ibis

मुग्धबलाक - Open Billed Stork

राखी बगळा - Grey Heron

पावश्या - Common Hawk Cuckoo

खाटीक - Shrike

शिक्रा - Shikra

Northern Shoveler

तुतवार, तुतारी - Common Sandpiper

कबरा गप्पीदास - Pied Bushchat

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळेच फोटो मस्त रे एकदम....

खंड्या, बगळ्याचे भक्ष्यासकट्चे आणि नर्तकाचे फोटो पण छान...

(ते जरा श्राईकचे मराठीतले नाव खाटीक करणार का! धोबीला इंग्रजीत वॅगटेल म्ह्णतात )

केप्या... जबरीच फोटो..

परवा नदीपात्रात चित्रबलाक दिसला होता... मस्त लॅडींग बघायला मिळाले पण कॅमेरा नेमका नव्हता बरोबर..

हर्पेन धन्यवाद रे. करतो करतो. घाई झाली जास्तच.

परवा नदीपात्रात चित्रबलाक दिसला होता>>
हो मलाही बराच वेळ हवेत उडताना दिसला होता. मागे २-३ घारी लागलेल्या.

खुप मस्त आलेत फोटो... मी गेलो त्यावेळेस भान हरपुन फ्लेमिंगो पहात बसलो आणि फोटो काढायचच विसरलो. १०-१२ काढले पण तुमच्या फोटोपुढे ते अतिशय भंगार आहेत. पहिला दिवस माझा फ्लेमिंगोचा माग काढण्यातच गेले. त्यावेळेस शशांकला पण मी नक्की फ्लेमिंगोच्या जागांबद्दल विचारल होत. सुर्योदय आणि सुर्यास्ताला खुप पक्षि दिसतात. विशेषतः फ्लेमिंगो. दिवसा फ्लेमिंगो कुठ जातात ते तिथल्या नावाड्यांना पण माहीत नसत.

तो गप्पीदास स्लीपर वर उभा आहे>>
मॅक्स अरे ते खरे दु:ख आहे. कवडीपाटला प्लॅस्टीक, थर्मोकोल व इतर कचरा इतका असतो की बास. तरी तिथे एवढे पक्षी येतात. नुकतीच एका हौशी ग्रुपने तिथे साफसफाई केली. ते पण पक्षांनी बर्‍यापैकी स्थलांतर केल्यावर करावे लागते.

धन्यवाद लोक्स. Happy

Pages