खग ही जाने खग की भाषा - भाग ४

Submitted by कांदापोहे on 16 December, 2014 - 00:16

गेली काही वर्ष पक्षीनिरीक्षण करताना मिळालेले निवडक पक्षी मायबोलीवर प्रकाशचित्रणात डकवावेसे वाटत होते पण लिमीटेड नेट व इथे प्रकाशचित्र देणे हे सोप्पे काम नोहे हे कळुन चुकल्यामुळे केलेला कंटाळा यामुळे ते जमत नव्हते. इथे २० च्या वर प्रकाशचित्र टाकणार्‍या सर्व छायाचित्रकारांना हॅटस ऑफ. Happy

याआधीचे काही प्रयत्न खाली बघता येतील. Happy

उडान - भिगवण पक्षीनिरीक्षण इथे http://www.maayboli.com/node/22764 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 1 इथे http://www.maayboli.com/node/26925 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग 2 इथे http://www.maayboli.com/node/32865 बघता येईल.
खग ही जाने खग की भाषा -भाग ३ इथे http://www.maayboli.com/node/42131 बघता येईल.

असो जास्ती पाल्हाळ न लावता आता जमतंय तर हे काम फत्तेच करुन टाकतो.

हुमा घुबड Indian Eagle Owl (मयुरेश्वर पक्षी अभयारण्य) साधारण खडकाळ भागात दिसते. आकार खुपच मोठा असतो.

नेपाळी गरुड Steppe Eagle (सासवड) गवताळ प्र्देशात सापडतो. अग्नेय युरोप, दक्षिण रशिया, ईशान्य चीन, पूर्व मंगोलिया येथे वीण. हिवाळ्यात मध्यपूर्व भागात, पूर्व व दक्षिण आफ्रिकेत व दक्षिण आशियात स्थलांतर. भारतीय उपखंडात तो पाकिस्तान,नेपाळ व उत्तर भारतात येतो

देवससाणा Common Kestrel (ARAI टेकडी)

सुभग Common Iora पिल्लु (सिंहगड पायथा)

सुभग Common Iora सुभग व सुगरण हे वेगवेगळे पक्षी आहेत. Happy

चित्रबलाक Painted Stork (कुंभारगाव भिगवण)


कांडेसर Wooley Necked Stork (कुंभारगाव भिगवण) कांडेसर करकोचा आकाराने साधारण गिधाडा एवढा असतो. हा करकोचा तलावांचे काठ, नद्या, भातखाचरं आणि दलदलीच्या प्रदेशात आढळतो. या करकोच्याची मान पांढरी शुभ्र आणि डोकं व शरीर काळं असतं. मासे, बेडूक, पाणसाप हे त्याचं खाद्य

Scaly Brested Munia हे पक्षी साधारण ज्वारी बाजरीची शेते किंवा उसाची शेते इथे नक्की दिसतात.

Spotted Owlet (मगरपट्टा सिटी व ARAI)

पाणकोंबडी White Breasted Waterhen ही अतिशय लाजाळु असते. थोडा जरी जवळ जाण्याचा प्रयत्न केलात तर उडुन किंबा पळुन जाळुन लपुन बसते. शक्यतो पाणथळीच्या ठिकाणी सापडते.

Bar-Headed Geese पट्टकादंब हंस (वीर धरण) हे दर वर्षी मंगोलियातून उडतात आणि काही लहान मोठे थांबे घेऊन पुण्यातील खडकवासला, कवडीपाट अशा काही मोजक्या पाणवठ्यांवरही ते दिसतात.

White-throated fantail

Spot Billed Duck खुपच कॉमन व शक्यतो पाणथळीच्या ठिकाणी सापडते.

लाल मुनिया Red Adavat

साळुंकी Jungle Myna

सुगरण Baya Weaver (सिहगड पायथा)

अनेक जणांनी लिहीले आहे की सुररणीची हिरवे घरट पहिल्यांदाच बघीतले. घरटे हिरवे दिसत आहे कारण ते शिवणे चालु होते. तुम्ही बघीतलेले घरटे हे बांधुन राहुन पिल्ले झाल्यावर बघितले असेल. तेव्हा ते वाळते. या पक्षाच्या नर हे घरटे नारळाच्या झावळीची पाने तोडुन मस्तपेकी विणत जातो. पूर्ण घरटे बांधुन झाले की मॅडम सुररण ते आतमधे जाऊन तपासतात व घरटे पसंत झाले की वराला पसंत करतात. मादीला ते पसंत नाही पडले तर नर ते क्वचित उसवुन परत विणायला घेतो. माझ्याकडे असा उसवतानाचा फोटो पण आहे. जमले तर टाकतो. अनेकदा ही घरटी झाडाखाला पडलेली दिसतात ती उसवलेली असतात.

हुश्श!! जमले एकदाचे. Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अप्रतिम! एकसे बढ़कर एक देखणे फोटो आहेत.

पहिल्या फोटोतलं घुबड शिष्ठ वाटतं. Happy

उडत्या पक्षांचे आणि हिरव्या घरट्याचे फोटो खूप आवडले.

लोकहो सुगरण व सुभग ची दुस्रस्ती केली आहे. सुभग वायली व सुगरण (सुईण) वायली थोडी माहीती देण्याचाही प्रयत्न केला आहे. Happy

ग्रेट ग्रेट ग्रेट... Happy

नवीन लेन्स वै घेतलीस काय भात्यात?

फोटु टाकायला सोपी मेथड विपुत लिहितो. Happy

झकासा ओक्के रे. Happy

शशांक पुरंदरे धन्यवाद. केला बदल.

बाकी सर्व लोक्स. धन्यवाद. Happy

श प्प थ्थ्थ ......_____/\____
हे मी कसं काय मिसलेलं? एकसे एक फोटो आहेत. पक्षांचे फोटो काढणं मला कधी जमेल बरं? कँमेरा, फोटोचे डिटेल्स देशील का? आणि क्लास घे ना माझा Happy

पीसन पीस मोजता येतय. इतकच कशाला, त्या पकडलेल्या माशाचे खवलेपण दिसताहेत . कसले क्रिस्पी, क्लिअर फोटो आहेत. हात प्रचंड स्टेडी आहे तुझा. ग्रेट

धन्यवाद लोक्स. Happy

अवल क्लास कसला घेतोय. मलाच जमत नाहीये अजुन.

असो. यातील काही फोटो Nikon D40x + 55-200 ने काढेलेले आहेत जो माझ्यकडे पूर्वी होता. तो विकुन आता D7100 + Tamron 150-600 घेतली आहे. यापेक्षा डिटेल यायला हवेत खरेतर. ट्रायपॉड न वापरता काढले आहेत. नंतर नंतर मुव्हमेंट कॅच करायच्या नादात हात थरथरतो व घाम फुटतोय. Happy

जबरीच. फार भारी. देवससाणा पंख फडकवताना काय सुरेख दिसतोय. घुबड, बगळा, सुभग खूपच छान आलेत. गरूडाचा फोटो पाहून पुन्हा एकदा रंगरूपाबाबत निसर्गाने बहाल केलेले सुरक्षाकवच जाणवले. त्या खडकाच्या रंगात तो किती बेमालूम मिसळलाय! Happy

जबरा फोटो आहेत राव केपी _/\_
तो चित्रबलाकाचा (चोचीत मासा पकडलेला) फोटो कसला शॉल्लेट आलाय राव.

Pages