वांगे फॅन क्लब : वांगे अमर रहे !

Submitted by काउ on 19 December, 2014 - 09:45

संक्रांती जवळ आली.

आज वांगे पावटे भाजी केली. तेलाच्या फोडणीत कढीपत्ता , लसुण ,कांदा , टोमटो यांचा किस घालुन त्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजत ठेवल्या. मग त्यात आधीच शिजवलेले पावटे घातले. थोडे पावटे क्रश करुन मिसळले. तिखट , मीठ, गूळ ,मसाला गरजेनुसार. शेवटी ग्यास बंद करताना दोन चमचे दही घालुन मिसळुन घेतले.

हा धागा वांगे फॅन क्लबसाठी.

वांग्याच्या भाज्या , भरीत , काप ..

इ इ

vangepavte.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वांग्या च्या भाजित लोखंडी फाटक सर्दि स्वल्प विराम अल्प विरा शेंडा बुडखा... काय काय चालय...
रेसिपी वाचायची करुन बघायची खायची.सर्दि काना, मात्रा कशाला बघायचा.
वडाच तेल वांग्यावर अशी म्हण आहे ना त्याचा प्रत्यय दुसर काय. पेरल ते उगवणार

वाग्यांची भाजी आणि वाग्यांचे काप दोन्ही प्रचि एकदम मस्त. ते काप बघुन तर आताच पटकन गट्टम करावेसे वाटतात.

वांगे, बटाटा आणि सुकट (सुका जवळा) यांची रस्साभाजी आणि त्याबरोबर तांदळाची भाकरी एकदम फ्रर्मास बेत. लाळगाळणारी बाहुली:

मला आठवताहेत ते वांग्याचे प्रकार

१) भरताचे काळे मोठे वांगे
२) जांभळे काळे लांबट वांगे ( वसईचे )
३) जांभळ्या पांढर्‍या रेषा असलेले ( मुंबईत हेच कॉमन )
४) हिरव्या पांढर्‍या रेषा असलेले ( विदर्भातल्या भरताचे )
५) उंधीयूसाठी वापरतात ते काळे लहान गोल वांगे
६) तसेच मोठे कृष्णाकाठचे वांगे
७) हिरवे लांबट आकाराचे.. खास करून भज्यांसाठी वापरतात
८) हिरवे लांबट पण परीघाने लहान
९) अंड्यासारखेच दिसणारे पांढरे
१०) बोराएवढी लहान.. थाई जेवणात वापरतात
११) काटेरी.. यातही हिरवे आणि काळे दोन्ही प्रकार आहेत
१२) चिवचिव वांगे ( खरे तर हे वांगे नव्हे )
१३) नायजेरियात टोमॅटोच्या आकाराचे वांगे मिळते. पिकल्यावर ते पिवळट केशरी होते.. ते कच्चेच खातात.

आणखी प्रकार आहेत का ?

पातळ भाजी करा, मसाला करा, फोडी करून करा, भरीत करा.....वांगे ऑलटाइम फेव्हरेट, सो मी पण या क्लबाचा मेंबर.

वांगे प्रिय एकदम
इथे मागे टाकलेल्या कृतीची भाजी जास्त आवडती
पण इतर रुपातही प्रियच !

जाई काप यम्मी दिसतायत एकदम,

पातळ भाजी करा, मसाला करा, फोडी करून करा, भरीत करा.....वांगे ऑलटाइम फेव्हरेट, सो मी पण या क्लबाचा मेंबर. >> नाहीतर मसालेदार वांगी काप करा +१

वांगे, बटाटा आणि सुकट (सुका जवळा) यांची रस्साभाजी>> आमच्याकडे सोडे (सोलून सुकवलेली कोलंबी! रायगड पब्लीकला माहीत असेलच!) घालून वांग्याचा थबथबीत कालवण (मालवणकरांनी चटणी म्हणा हवं तर) करतात यम्मी!! मऊ शिजवलेला केलेला भरपूर कांदा, टोमॅटो आणि सोडे व वांगी! मीठ, हळद व कोणताही मसाला शिजवताना व वरून बारीक चिरलेली भरपूर कोथींबीर भुरभुरायची! बस्स!!
याच पद्धतीने सोड्याऐवजी वाल घालायचे! (फक्त वाल+ वांग वातुळ असल्याने हिवाळ्यात वातवर्धन होत असल्याने चिमूटभर ओवा घालावा भाजीत!) शाकाहार्‍यांसाठी खास! (गूळ नाही वापरत पण चवीला घातला तरी हरकत नाही.. आवड आपली आपली)

भरलेली शाकाहारी वांगी सगळ्यांनाच माहीत असतील पण नॉनव्हेज खाणार्‍यांसाठी सोडे (सुकट नव्हे!!) तव्यावर तेलात किंवा नुसतेच कुडकुडीत फ्राय करून मिक्सरला लावून खडबडीत वाटणे मग बाकीच्या कांदा, खोबरे, बारीक चिरलेली कोथींबीर व इतर मसाल्यात मिक्स करून वांगी व उकडलेल्या अंड्यांना चार उभे काप देऊन त्यात हा मसाला भरणे आणि मग मंदाग्नीवर नीट शिजू देणे! (उकडलेली अंडी मागाहून टाकावीत! वांगी अर्धवट शिजत आल्यावर) हे ही प्रक्रण चविष्ट लागते!

जाई काप एकदम तोंपासु. प्लीजच रेसिपी दे आणि मसाला कुठला वापरतेस ते ही सांग!! वांग्याचे नी सुरणाचे (मासे फ्राय केल्यासारखे) खमंग काप घरी खूप आवडतात! न-खाणार्‍या दिवसांची सोय!

मानखुर्दला भाजी स्वस्त मिळते !!

कुठून आणतात ही भाजी हे माहीत असेल तर नक्की भाजी मस्तच लागणार !!

:G:

:G:

dreamgirl >>> +१००००
सुकट वांग रस्सा , वाफाळता भात आणि भाजलेला उडिदाचा पापड = स्वर्गसुख

भरली वांगी करताना, ती कापल्यावर त्याच्या आता देठाजवळ थोडे मीठ टाकायचे मग मसाला भरायचा. नीट शिजतात. देठाकडचा भाग कापून त्या बाजूने चिरा दिल्या तर जास्त चांगले पण अशी वांगी जास्त ढवळली तर मोडतात.

काप करताना, कापांना हळद, मसाला आणि मीठ लावायचे . त्यांना पाणी सुटले कि ती तांदळाच्या कोरड्या पिठात दाबुन तळायची, कुरकुरीत होतात.

ड्रीमगर्ल , थँक्स फॉर काप कॉम्पलिमेंट Wink

मी वांग्याचे धुतलेले काप तिखट , हळद , मीठ , रवा , थोडस तांदुळ पीठ यांच्या मिश्रणात घोळवुन घेतले आणि तव्यावर टी
तेल टाकुन फ्राय केले. अगदी आपण माशांना करतो तसे .आच बारीक ठेवली होती .( आच मंद असण महत्वाच आहे नाहीतर करपतात ) नंतर गट्टम केले

सुरण / बटाट्याचेही असेच होतात . फक्त सुरणाचे करताना आधी काप करून कुकरमध्ये शिजवून घेते . सुरण पटकन वांग्याइतका शिजत नाही म्हणून :). नंतर थोड कोकमाच पाणी लावते

सुकट वांग रस्सा >> सुकट नव्हे! सोडे!! सुकटीला साल असते, सोडे सोललेले असतात. Happy
नंतर थोड कोकमाच पाणी लावते >> खाजू नये म्ह्णून ना? चिंचेचंही चालेल बहुदा! धन्स जाई वांग काप रेसिपीसाठी करून बघेन नक्कीच! याला धणे-बडीशेप पावडर्/गरम मसाला वै. लावायची गरज नसते ना?

हो , चिंचेचही चालेल

धणे-बडीशेप पावडर्/गरम मसाला वै. लावायची गरज नसते ना?>>>> मी तरी नाही लावत नाही ग . गरजही नसते . वर दिलेल्या मिश्रणात कुरकुरीत होतात

तू वर लिहिलेल तस वांग्याच्या भरितात सोडे टाकुन करते आई . कधी कधी चेंज म्हणुन सुका जवळा असतो

भारी लागत ते प्रकरण . सोबत तांदळाची भाकरी . अहाहा

ओ फाटकसाहेब जाऊ द्याना, तुम्ही पण काय..

काउ मस्त भाजी. पावटा घालुन करतात ते वाचले होते, आता पाहिले. छान रसरशीत दिसतीय, तवन्ग पण छान हलकासा आलाय. जरुर करणार. थोडी कोथिम्बीर पेरायची की वरुन. मला वान्ग्याच्या सुक्या वा रस्सा भाजीत कोथिम्बीर खूप आवडते. मी बचकाभर घालते नेहेमी.

तू वर लिहिलेल तस वांग्याच्या भरितात सोडे टाकुन करते आई . कधी कधी चेंज म्हणुन सुका जवळा असतो. भारी लागत ते प्रकरण . सोबत तांदळाची भाकरी . अहाहा >> अगदी अगदी... फक्त वांग्याच्या भरीतात नाही! भरलेल्या वांग्यात.
भरीत वांग भाजून मॅश करून कांदा, मिरची दही वै. टाकून करतात.

मला वान्ग्याच्या सुक्या वा रस्सा भाजीत कोथिम्बीर खूप आवडते. मी बचकाभर घालते नेहेमी.>> रश्मी टाळी!! डिट्टो!! कोथींबीर कशातही मस्तच लागते... उकड बटाट्याच्या भाजीला तर अप्रतिम!!

ड्रिमगर्ल अग फोडणीच्या साध्या वरणात ( नुसते तिखट+ मीठ व फोडणी) कोथिम्बीर टाकली तरी ते वरण अप्रतीम लागते. मात्र फोडणी सही झाली पाहीजे.:स्मित:

भरीत आणि भरले वांगे.. मी पण फॅन क्लबात.
कृष्णाकाठची काटेरी वांगी लहानपणी खाल्लीयेत.
त्याची भरली वांगी निव्वळ महान. दोन्ही पद्धतीने आवडतात.
घरातली नेहमीची पद्धत चिंच, गूळ, थोडे ओले खोबरे, गोडा मसाला, बारीक चिरलेला कांदा वगैरे एकत्र मळून वांग्यात भरायचे. फोडणीवर परतून मग वांगी शिजवायची.
दाण्याचे कूट घालून करायच्या मसाल्याची एक्झॅक्ट कृती माहित नाही पण ती पण भन्नाट असते.
वांग्याचे काप, वांग्याचे बंगाली काप (बेगून भाजा असे म्हणतात बहुतेक) दोन्ही आवडीचे.
आमटीतली वांगी, वांगं बटाटा भाजी एवढी आवडत नाही.

मुंबईत ती लांबुडकी काकडीच्या आकाराची वांगी मिळतात त्याचे काय करतात? भरल्या वांग्यांसाठी ती अगदीच उपयोगाची वाटत नाहीत.

इटालियन पदार्थांच्यातले एगप्लॅण्ट पार्मेजान (पार्मेशान!) मी करते. ते मुळात वांग्याचे काप बराच काय इटालियन मसाला आणि आवरणे घालून बेक करून पास्त्यावर घ्यायचे असला प्रकार असतो. माझा अति च शय आवडीचा प्रकार आहे.

केला की फोटु टाकेन.

वांग्याची एक बंगाली पाककृती - नीमपाता बेगून
कडुलिंबाची ताजी कोवळी पानं आणि वांग्याच्या फोडी साजुक तुपावर फक्त मीठ घालून कुरकुरीत परतून घ्यायचं. जेवणाच्या सुरुवातीला गरम भाताचे पहिले दोनतीन घास या 'भाजी'बरोबर खायचे.
ही चव थोडी सवयीची करून घ्यावी लागते. पण एकदा झाली की मस्त लागते. साजुक तुपाचा वास, कुरकुरीत कडवट कडूलिंबाची पानं आणी त्यांची चव आणि वांगी ... छानच लागतं प्रकरण

@ नितीनचंद्र..

पेरल ते उगवणार... + १...

आणि

आम्ही वड्याचे तेल वांग्यावर न काढता, वड्यावरच काढतो...

अर्थात आमची काउ तशी गुणाचीच पोर आहे..

आता उद्या मी आणि काउ अप्पम खाणार....

@ रश्मी ताई....

लोचट माणसांना लाथाच घालायला लागतात....

आणि

आंतरजालीय अवतारी मंडळींना, त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला लागते.

आँ ! अवतार घ्यायला तुमची पर्मिशन घ्यावी की काय ? आणि अवतार घेणारे इथे ढीगभर आहेत . तुमच्यी हांजी हांजीकरणार्‍यानी अवतार घेतले तर चालतात आणि ज्यांची तुमच्याशी मते जुळत नाहीत ते मात्र लोचट ठरतात की काय !

आधीच शाकाहार, त्यात वांगे !! Angry

एकदम अप्रिय भाजी.. ऑफिसमध्ये कोणी आणली तर मला चिडवायला मुद्दाम डबा माझ्या तोंडासमोर धरणार..
पण काय कसे ठाऊक यातील बटाटा मात्र आवडतो.. वेचून वेचून खातो..

बाकी या वांग्याच्या फ्यानक्लबाला मिळालेला प्रतिसाद पाहून, माझ्या सईच्या धाग्याला बघून सई न आवडणार्‍या लोकांच्या मनात उमडलेल्या भावना आज समजू येताहेत Happy

असो, पुराणातील धागे पुराणात, वांग्याला शुभेच्छा!

@ काउ...

तुमच्या आणि माझ्या विचारसरणीत हाच तर फरक आहे...आम्हाला हाजी-हाजी करणार्‍या लोकांचा तिटकारा आहे.तसेच तुमच्या सारख्या विषय भरकटवणार्‍या माणसांचा देखील तिटकारा आहे.

गेली ६ वर्षे इथे आहे पण आम्हाला अवतार घ्यायला लागला नाही पण तुम्हाला मात्र परत-परत अवतार घ्यायला लागतात.

आता ते का?

हे मुळातच तुम्हाला समजलेले नाही....किंवा मुद्दाम समजून पण तुम्ही काना-डोळा करत आहात.

माणुस बदलतो हे जितके सत्य तितकेच सुंभ जळला तरी पीळ जात नाही हे पण सत्यच.

तुमच्या बाबतीत तरी "सुंभ जळला तरी पीळ जात नाही." हेच सत्य...

कारण एखादा मुद्दा तुम्हाला पटला नाही तर, तुम्ही एखाद्याच्या आडनावावर तरी घसरणार किंवा मग वैयक्तिक टीका तरी करणार.

तुमचा हा लोचटपणा आणि स्वतः बद्दल असणारा अहंगंड, दुसर्‍या व्यक्तीला तूच्छ लेखणारा स्वभाव, जोपर्यंत तुम्ही बदलणार नाही, तोपर्यंत तुम्हाला प्रत्येक ठिकाणी असेच अवतार घ्यायला लागणार.

असो,

कणखर असणे वेगळे आणि लोचट असणे वेगळे.

कणखर मनुष्य कधीच लोचट नसतो.

" जे का रंजले गांजले, त्यास म्हणी जो आपले, तोची साधू ओळखावा , देव तेथेची जाणावा."

तुम्ही स्वतः डॉक्टर आहात.तुमच्या सारख्या उत्तम शिकलेल्या व्यक्तींकडून माझ्या तरी फार अपेक्षा आहेत.जाती-भेद, धर्म-भेद आणि राजकारण ह्यातच तुम्हाला जास्त रस.तुमच्या व्यवसायाच्या निमीत्त्ताने तुम्हाला बर्‍याच प्रकारची माणसे नक्कीच भेटत असणार.तुम्ही कधी त्यांचे दोष किंवा एखादा आजार कसा टाळता येईल? ह्याबद्दल लिहीलेले मला तरी आठवत नाही.आधी लिहीले असेल तर मला जरूर लिंक द्या. मला आवडेलच.

तुमचा प्रेमळ स्वभाव पण मला कधी-काधी भावतो.समाजाबद्दलची कणव पण जाणवते.तुम्ही नक्कीच एखादे आरोग्य शिबीर आयोजीत करत असणार.त्या शिबीरांविषयी वाचायला तर नक्कीच आवडेल. पण तुमचे असे तुमच्या डॉक्टरकी पेशातले लेख मला वाचायला मिळाले नाहीत.

त्यामुळे तुम्ही जे विचार मांडता त्यात निदान आम्हाला तरी तुमच्यातला डॉक्टर कधीच दिसला नाही.

परत एकदा विनंती करतो,

तुम्ही तुमच्या डॉक्टरकी पेशातले लेख ह्याआधी लिहीले असतील तर मला जरूर लिंक द्या.मी नक्कीच वाचीन आणि मला खात्री आहे की तुम्ही ह्या छोट्याश्या विनंतीला नक्कीच मान द्याल.

Pages