वांगे फॅन क्लब : वांगे अमर रहे !

Submitted by काउ on 19 December, 2014 - 09:45

संक्रांती जवळ आली.

आज वांगे पावटे भाजी केली. तेलाच्या फोडणीत कढीपत्ता , लसुण ,कांदा , टोमटो यांचा किस घालुन त्यात वांग्याच्या फोडी थोडे पाणी घालुन शिजत ठेवल्या. मग त्यात आधीच शिजवलेले पावटे घातले. थोडे पावटे क्रश करुन मिसळले. तिखट , मीठ, गूळ ,मसाला गरजेनुसार. शेवटी ग्यास बंद करताना दोन चमचे दही घालुन मिसळुन घेतले.

हा धागा वांगे फॅन क्लबसाठी.

वांग्याच्या भाज्या , भरीत , काप ..

इ इ

vangepavte.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

दही न घालतादेखिल चविष्ट भरीत होतं. कांदा-टोमॅटो-लसूण्-हिरव्या मिर्च्यांच्या फोडणीत, भाजून सोललेलं वांगं, हळद, तिखट, मीठ आणि भरपूर कोथंबीर घालायची. चिंच-गूळ घालून भरीत करतात असं मायबोलीतच कुठेतरी वाचलं होतं. चव माहिती नाही.

दही न घालता चांगलं लागेल का?>> दही न घालताही छान लागते भरीत .

इथे आहे रेसीपी दही न घालता केलेले भरीत - http://www.maayboli.com/node/36696 या रेसिपी नुसार केलं तरी किंवा आधी भरिताचे मोठे वांगे भाजुन घेतले तर जास्त छान चव लागते. भाजुन मग सालं काढुन केलेले भरीत "वांग्याचं झटपट भरीत" या रेसीपीनुसार मी खाल्ले आहे भाकरी सोबत ,छान चव लागते.

वांगे भाजी, आमटी आमच्याकडे गावी मे मधे एक दिवसाआड बनते कधीकधी पण त्याची चव छान असते.(तीथल्याच शेतातली असतात त्यामुळे असेल कदाचित) भरपुर शेंगदाणे कुट्,लसुन घालुन केलेली भरली वांगी ही मस्त लागतात.भरिताचे मोठे वांगे भाजुन केलेलं भरीत मात्र ऑल टाईम फेवरेट आहे. Happy

काउ ,तुमची वरची रेसिपी मस्त.
जाई ,वांग्याचे काप, फोटो छान आहे.

.

कल्पना करा बरं... की तुम्ही सहकुटुंब एखाद्या हॉटेलात गेला आहात... आणि ऑर्डर केली आहे की आम्हाला सुरुवातीला दोन सोलकढी, एक मुगाचे कळण - दोघांत एक, सोबत एक प्लेट कोथिंबीर वडी, एक प्लेट अळूवडी द्या. नंतर जेवणासाठी एक प्लेट अळूची पातळ भाजी, एक प्लेट डाळींब्यांची उसळ, चार घडीच्या पोळ्या, मसाले भात, दोन बाजरीच्या भाकर्‍या आणि एक वांग्याचे भरीत द्या. सर्वात शेवटी आंबा पियुष व रस शेवई दोघांमध्ये चार द्या !
तिथला स्टिवर्ड तुम्हाला सुचवतोय की कधीतरी त्यांच्याकडच्या कोळाचे पोहे, केळ्याची तिखटगोड भजी, शहाळ्याची भाजी, मुगाची सावजी उसळ, कुळथाचं पिठलं, पाकातल्या पुर्‍या, रताळ्याचा कीस अशा 'मेतकूट खास' पदार्थांचाही तुम्ही आस्वाद घ्यावा...
तुम्ही म्हणाल, काय राव..... आज भंकस करायला दुसरं कोणी भेटलं नाही का?
आहो... ही आता कल्पनेतली गोष्ट नाही. ठाण्यात सुरु झाले आहे. मराठी आहारसंस्कृतीचे खाद्यपीठ ! कोकण, कोल्हापूर, मराठवाडा, विदर्भ, नाशिक अशा ठिकठिकाणचे पारंपरिक खाद्यपदार्थ आता मिळतील ... ‘मेतकूट’™ - Culinary Heritage of Maharashtra मध्ये.
नवीन वर्षात १ जानेवारी रोजी शुभारंभ होत असलेल्या या नवीन खानपानगृहास आवर्जून सहकुटुंब, सहपरिवार भेट द्या. आपल्या सोसायटीमधील, कार्यालयातील खन्ना, गिडवानी, अय्यर, चटर्जी यांनाही घेऊन जा. त्यांनाही कळूदे अस्सल चव महाराष्ट्राची !
पत्ता - १,२, वाटीका सोसायटी, घंटाळी देवी पथ, नौपाडा, ठाणे (प) संपर्क - ०२२२५४१०८२१
किरण भिडे यांनी हे हाॅटेल सुरु केलं आहे. ही कल्पना आवडल्यास इतरांकडे हे मेसेज पाठवा. आवर्जून 'मेतकूट'ला भेट द्या.
C/P-Suruchi Gurjar

हे वाचून आता फ्रिजमधली जांभळी पांढरी वांगी बाहेर काढली.. संध्याकाळी कांदा, टोमॅटो वालं वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकरी.. माझा पाच वर्षांचा लेक सुद्धा चाटून पुसून खातो..

Pages