आतंकवाद-- जागतिक संकट

Submitted by विश्या on 16 December, 2014 - 06:20

मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील

rsz_303442-pakatc7.gif
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
10850314_10154960380600271_6758740036917295825_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफी.

१०००००००००००००००००००००००००००००००००००००% अनुमोदन !!!

हा धागा जो आहे तो फक्त आणि फक्त आतंकवाद विरोधी आहे येथे कोणत्याही धर्माचा अथवा जातीचा उल्लेख केलेला नाही व कुणी करू हि नये .

दहशतवाद आणि दहशतवादी यांना जात धर्म नसतो .त्यांना केवळ रक्ताची तहान असते ,हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.
पाकमध्ये दहशतवाद्यांच्या हल्ल्यात बळी पडलेल्या सर्व चिमुकल्यांना विनम्र आदरांजली

काल दुरदर्शनवर जेव्हा ही बातमी बघितली एकदम सुन्नच झालो. ह्या भेकड हल्ल्याचा तीव्र निषेध.

उपाययोजना साधी असते पण ती (१) सगळ्यांचे हितसंबंध जपणारी (२) राजकीय दृष्ट्या बरोबर (politically correct) असावी लागते. तशी ती नसली तर कितीही परिणामकारक असेल तरी अंमलात आणली जाऊ शकत नाही.

एखाद हत्याकांड जर मुस्लिम अतिरेक्यांनी घडवल तर " दशहतवाद्यांना धर्म नसतो. त्यांना कोणत्याही धर्माच लेबल लाउ नका हा आग्रह ". तथाकथीत सेक्युलर मंडळीचा असतो.

आज काँग्रेसचे आमदार निलेश राणे म्हणतात त्या प्रमाणे सर्व लोक जर हिंदु झाले तर दशहतवाद संपेल किंवा एम एम एस पासुन धोका आहे असे म्हणणार्‍या काँग्रेसी आमदार प्रणिती शिंदे यांना सुध्दा हा साक्षात्कार कसा झाला हे तथाकथित सेक्युलर मंडळीनी तपासुन बोध घेतला तर अश्या दशहतवादी घटना होणार नाहीत असा माझा विश्वास आहे.

नितीनचंद्र,

हा प्रतिसाद येथे देणे टाळता येईल का?

(अवांतर - तुम्ही तो संयत शैलीने लिहिला आहेत हे बघूनही असे विचारावेसे वाटले)

लोकहो,

निरपराध्यांना ठार मारणं हा भ्याडपणा आहेच. शिवाय लहान मुलांना मारणं हे अधिकच निषेधार्ह आहे. पण नेमकं हेच कृत्य पाकिस्तानी सैनिक वझिरीस्थानात करतात तेव्हा कोणी त्यांचा निषेध करत नाही. Sad

पेशावर हल्ल्याची दुसरी बाजू :

१. 'वेदना' कळण्यासाठी सूड

२. वझिरीस्तानातील कारवाईचा सूड

मी पेशावरातल्या वा वझिरीस्थानाच्या हल्ल्यांचं समर्थन करत नाहीये. केवळ दुसरी बाजू दाखवून देतोय. वाचकांनी आपापले निष्कर्ष काढावेत.

आ.न.,
-गा.पै.

नितीनचंद्र तुम्ही काय बोलत आहात कळतयं का?
अश्यात पण तुम्हाला हे सुचत असेल तर कठीण आहे

गामाबद्दल तर बोलायची सोय नाहीच

लहान मुलांची हत्या ही अतिशय निंदनीय आहे, त्याचा करावा तितका निषेध कमीच आहे. खुपच संतापजनक आहे हे.
पाकिस्तानने ज्या सापांना पाळलेत तेच पाकचे अस्तित्व मिटवतील.
पण अशी कोणतीही चर्चा जेव्हा हे अतिरेकी, नक्षलवादी, माओवादी आपल्या मातृभूमित हत्याकांड करतात तेव्हा क्वचितच दिसते. सोशल मीडियावर भावी पाकी सैनिकांसाठी सर्वांचे पाकिस्तानप्रेम ऊतू जात आहे.

माफ करा जर कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर!!

दिवाकरजी,

दहशतवाद हा पुरस्करणिय नाही. लहान मुलांची हत्या झाली हे निंदनीय तिरस्करणिय आहे. आपण त्या मागची कारणे/ विचारधारा सोयिस्कर टाळु लागलो तर हे क्रुत्य पुन्हा होणार नाही यासाठी जागरुकता आणणे हीच खरी श्रध्दांजली माझ्या मते आहे.

हेच शब्द नितेश राणे बोलले. त्यांच्या मते मुस्लीमांना जर हिंदु करुन घेतले तर हे टळेल. प्रणिती शिंदे यांनी एम एम एस च्या प्रमुखाचे भाषण ऐकले असेल म्हणुन त्यांना हा पक्ष , ही विचारधारा जातिय वाटली. भारतात ही नौखालीला फाळणी काळात हेच घडले होते.

ज्यांना अनेक वर्षे हे समजले नाही त्यांची पुढची पिढी हे जाणिवपुर्वक बोलत आहेत . हे फक्त मी लिहले जे माझ्यामते विषयाला धरुन आहे.

प्रथम म्हात्रे,

>> ... भावी पाकी सैनिकांसाठी सर्वांचे पाकिस्तानप्रेम ऊतू जात आहे

हो, हाही एक महत्तवाचा मुद्दा आहेच. परदु:खशीतल या जाणीवेपेक्षा वेगळं काहीतरी या परिस्थितीत आहे. उद्या हीच मुलं मोठी होऊन भेकडकसाबसारखी बनली तर नसती, अशी शंका मनी येते. भाडखाऊ पाकी सैन्याने पूर्व पाकिस्तानात आणि काश्मिरात अस्सेच अत्याचार केले होते. तसेच परत होणार नाहीत याची काय हमी! Sad

आ.न.,
-गा.पै.

दिदे,

>> गामाबद्दल तर बोलायची सोय नाहीच

यू आर राईट सर! बाफचा विषय गामा पैलवान नसून आतंकवाद हा आहे. तर आपण आतंकवादावर चर्चा करूया का?

तुमच्या चिंतनासाठी हा इंग्रजी उतारा (मी पूर्ण लेख वाचला नाहीये) :

>> At the time of the Bannu Qurayza massacre, Prophet Mohammed ordered only those children
>> be killed whose pubic hairs have appeared," Umar Khurasani, spokesperson for the
>> Tehreek-e-Taliban Pakistan, is quoted as saying by the American website, examiner.com.
>> He said the Islamic terrorists only followed sunnat (actions of Prophet Mohammed) during
>> wars.

आ.न.,
-गा.पै.

तुमचे प्रतिसाद वाचुन "बावरा मन" यांचा प्रतिसाद १०००% बरोबर आहे असे नाईलाजाने नमुद करावेसे वाटते

उद्या हीच मुलं मोठी होऊन भेकडकसाबसारखी बनली तर नसती, अशी शंका मनी येते >>>>>

अतिशय बिनडोक आणि मुर्खपणाचे वाक्य याचा तीव्र निषेध

उद्या कुणाच्या घरी लहान मुल गेले तर तुम्ही तिथे जाउन काय हेच बोलतात ? "झाले ते चांगले झाले उद्या मोठेपणी तुम्हालाच घराबाहेर काढले असते" ??????? किती द्वेष भरला आहे आहे खरच तुमची कीव येते गामा
तुमच्या सारखे लोक या जगात राहतात हेच किळसवाणे आहे.

गापै, तुम्ही त्या सगळ्या लहान मुलाना सरसकट असे कसे मापदन्ड लावताय? एकदा स्वतःच विचार करुन बघा तुम्ही काय म्हणताय ते. अशा विचारान्मुळेच हिन्दु आणी मुस्लिम समाजात मोठी दरी निर्माण होत चाललीय आणी ते भारताकरता आणी सम्पूर्ण मानवतेकरता घातक आहे.

दिदे,

>> उद्या कुणाच्या घरी लहान मुल गेले तर तुम्ही तिथे जाउन काय हेच बोलतात ? "झाले ते चांगले झाले उद्या मोठेपणी
>> तुम्हालाच घराबाहेर काढले असते" ??????? किती द्वेष भरला आहे आहे खरच तुमची कीव येते गामा

मी गेलो तर आप्तेष्टांकडे जातो. त्यांच्या घरी जाऊन तुम्ही म्हणता ते अकलेचे तारे तोडायला मी काय मूर्ख वाटलो! पाकिस्तान शत्रू आहे हेही सांगायलाच हवं का?

आ.न.,
-गा.पै.

कळलं

रश्मी..,

>> गापै, तुम्ही त्या सगळ्या लहान मुलाना सरसकट असे कसे मापदन्ड लावताय?

झालं ते फार वाईट आहे. मी त्याविषयी काहीच करू शकत नाही. फक्त भारताला भविष्यात असलेला संभाव्य धोका थोडा कमी झाला इतकंच दु:खात सुख (कन्सोलेशन) आहे. Sad

आ.न.,
-गा.पै.

त्या अतिरेक्यांच्या विचारांनुसार, ती त्यांच्या शत्रूंची मुले होती. व केवळ बदला घेण्यासाठी कापून टाकलेल्या शत्रूच्या मालकीच्या काही गुराढोरांपेक्षा त्यांना किंमत नव्हती.

नितीनचंद्र, गापै, व आद्य अनुमोदक कोकणस्थ, यांचे विचार त्या तालिबानी अतिरेक्यांपेक्षा वेगळे दिसत नाहीत, कारण यांच्याही विचारांनुसार ती 'शत्रू'ची मुले होती.

अरेरे! हे सुशिक्षित? हे सुसंस्कृत?? असले संस्कार???

<<उद्या कुणाच्या घरी लहान मुल गेले तर तुम्ही तिथे जाउन काय हेच बोलतात ? "झाले ते चांगले झाले उद्या मोठेपणी तुम्हालाच घराबाहेर काढले असते" ??????? किती द्वेष भरला आहे आहे खरच तुमची कीव येते गामा
तुमच्या सारखे लोक या जगात राहतात हेच किळसवाणे आहे.>>

आभारी आहोत आम्ही आमच्या आई-वडिलांचे, परमेश्वराचे आम्हाला असे संस्कार मिळाले नाहित आणि आम्ही आमच्या मुलांना असे संस्कार दिले नाहित.

अरेरे गा पै.
तुम्ही पूर्वी आध्यात्मिक लिखाण केलेले आहे त्यावरून माझा असा (बहुतेक गैर)समज झाला होता की तुम्हांला अध्यात्मातले थोडे फार कळते. पण अवस्था फारच वाईट दिसतेय.

"कोणाही जीवाचा न घडो मत्सर
वर्म सर्वेश्वर पूजनाचे"

लोकहो,

श्री इब्लिस यांचं एक रोचक विधान :

>> नितीनचंद्र, गापै, व आद्य अनुमोदक कोकणस्थ, यांचे विचार त्या तालिबानी अतिरेक्यांपेक्षा वेगळे दिसत नाहीत,
>> कारण यांच्याही विचारांनुसार ती 'शत्रू'ची मुले होती.

लहान मुलांचे खून समर्थनीय नाहीत. जे झालं ते मला भारतात व्हायला नकोय. अर्थात पेशावरच्या सैनिकी शाळेत काय भारतप्रेमाचं शिक्षण मिळतं नसतं. जोवर ते भारतद्वेष सोडत नाहीत, तोवर ते माझे मित्र नाहीत. त्यांच्याकरिता मी अश्रू ढाळत बसणार नाही. माझे अश्रू भारताच्या मित्रांसाठी आहेत.

आ.न.,
-गा.पै.

क्ष,

>> "कोणाही जीवाचा न घडो मत्सर
>> वर्म सर्वेश्वर पूजनाचे"

हे भगवद्भक्तीसाठी ठीक आहे. प्रस्तुत प्रसंगात कुठेही भगवंतांची भक्ती दिसत नाही.

आ.न.,
-गा.पै.

Pages