आतंकवाद-- जागतिक संकट

Submitted by विश्या on 16 December, 2014 - 06:20

मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील

rsz_303442-pakatc7.gif
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
10850314_10154960380600271_6758740036917295825_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पाकिस्तान नागरीकांचे स्टेटमेंट दुर्दैवी आहे, निंदनीय आहे, पण अनपेक्षित नाही. कारण भारतद्वेषावरच त्यांचे राजकारण, समाजकारण, जीवनमान चालते. आपल्यातल्या कोणीही आज पाकिस्तानात जन्म घेतला असता तर तो आज असाच विचार करत असता. लहानपणापासून मिळालेले बाळकडू आहेत ते..
असो, तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनाच सोडवायचा आहे.

आपण आपल्या पोराबाळांची सुरक्षितता बघण्याला प्राधान्य द्यायला हवे. ते तसे विचार करतात म्हणून आपणही बरे झाले मेले सपोले असा विचार करण्यात काही अर्थ नाही, आपण ज्या वैचारीक वातावरणात मोठे झालो ती विचारसरणी का झुगारून द्यायची. जर जगात कुठेही लहान मुलांच्या अश्या दुर्दैवी मृत्युने आपला जीव हळहळत असेल तर त्याबाबत प्रामाणिक राहिले पाहिजे.

अन्यथा कालपर्यंत आपण हळहळत होतो, आणि आज काही पाकिस्तानी नागरीकांनी असे स्टेटमेंट दिल्याने लगेच आपल्याला आपले हळहळणे मुर्खपणाचे वाटून आपले विचार बदलत असतील तर याचे दोनच अर्थ. १. आपण आपल्या भावनेशी प्रामाणिक नव्हतो. २. आपल्या भावना कोणीही सहज भडकवू शकते.

अन्यथा कालपर्यंत आपण हळहळत होतो, आणि आज काही पाकिस्तानी नागरीकांनी असे स्टेटमेंट दिल्याने लगेच आपल्याला आपले हळहळणे मुर्खपणाचे वाटून आपले विचार बदलत असतील तर याचे दोनच अर्थ. १. आपण आपल्या भावनेशी प्रामाणिक नव्हतो. २. आपल्या भावना कोणीही सहज भडकवू शकते...........>>>>>>>>>>>>>>.ग्रेट थॉट. १००+ अनुमोदन

हा दहशतवाद भारताच्या सर्व शहरात पोहोचलाय, पण तुम्ही काळजी करु नका !! कारण काळजी करणारे सुरक्षा अधिकारी त्यावर काम करत आहेतच, कुठल्या शहराच्या कुठल्या शाळेत असे हल्ले होतील याचा नेम नाही. कारण
कुठल्या शहरात कुणाच्या रुपात स्लिपर सेल आता कर्यरत होतील हे कोणालाही सांगता यायच नाही.

जर इंटीलिजंस मिळालाच नाही तर ?

पेशावर शाळेत त्या अतिरेक्यांनी मुलांवर गोळीबार केला ???

हे साफ चुकीच आहे !! त्या अतिरेक्यांनी त्या शाळेतल्या मुलांवर गोळ्या चालवल्या नाही तर त्या मुलांच्या
डोक्यात गोळ्या घातल्या पाँईट ब्लँक !!

काही मुलांना ह्या अतिरेक्यांनी आपली ढाल बनवले होते. एका अतिरेक्याने भरलेल्या वर्गात स्वताला बाँबने उडवले,

शाळेचा मुख्याध्यापक जो टॉईलेट मध्ये जाऊन लपला होता त्याच्या दारावरील वेंटीलेटरमधुन बॉम्ब आत टाकला !!

परवा ए बी पी माझा वरच्या चर्चेत भाऊ तोरसेकरांनी दोन चांगले मुद्दे मांडले.
१ सुप्रसिद्ध असे इस्लामचे मराठी अभ्यासक अब्दुल कादर मुकादम यांच्या सकाळ मधील लेखाचा उल्लेख त्यांनी केला.अब्दुल कादर मुकादम हे मुस्लिम समाज व इस्लामचे गाढे अभ्यासक मानले जातात, तेव्हा त्यांच्या अशा लिखाणाकडे कोणीतरी मूर्ख लिहितो, म्हणून दुर्लक्ष सुद्धा करता येत नाही. त्या लेखात अब्दुल कादर मुकादम विचारतात "जगात बिगर मुस्लिमांची संख्या मुस्लिमांपेक्षा जास्त आहे. बिगर मुस्लिमांना मुस्लिम करण्या चे त्यांचे प्रयत्न सुरु असतात.(हे प्रत्येक मुस्लिमाचे धार्मिक कर्तव्य ही आहे) परंतु त्यात सर्वात मोठा अडथळा हा आहे की बिगर मुस्लिमांचे मुस्लिम नसण्याचे स्वातंत्र्य मुस्लिमांना मान्य आहे का ? हा प्रश्न !" ( या लेखा बद्दल जरूर वाचावी अशी चिकित्सा तोरसेकरांनी त्यांच्या ब्लॉगवर http://bhautorsekar.blogspot.com/2012/10/blog-post _20.html इथे केली आहे )
२ कुराण हे मुहम्मद पैगंबरांना जी दर्शने झाली तेव्हा त्यांना स्फुरलेल्या आयती संकलित होउन तयार झाल. ही दर्शने अर्थातच त्यांच्या आयुष्यातील एका कालखंडात वेगवगळ्या दिवशी झाली. यातील मक्का येथील वास्तव्यात ज्या आयती सांगितल्या गेल्या त्या शांती, सद्भाव, जीवनात माणूसकीनी, नीतीपूर्वक कस वागाव वगैरे सदुपदेश करणार्‍या आहेत. तर (विरोधकांवर मात व स्वमतप्रसार करण्याच्या हेतूने असेल म्हणा पण) मदीना येथील वास्तव्यात सांगितलेल्या आयती या अन्यमतावलंबन करणार्‍यांप्रती हिंसेच समर्थन करणार्‍या आहेत . जेव्हा आतंकवादी स्वरूपाच्या घटना घडतात तेव्हा -आतंकवादाला धर्म नसतो रंग नसतो - हा खरा इस्लाम नाही - हे आतंकवादी खरे मुस्लीम नाहीत - त्यांना इस्लामचा अर्थ कळलेला नाही- टीकाकार हे इस्लामचा चुकीचा अर्थ लोकांपुढे मांडत आहेत - अशी अनेक वक्तव्ये केली जातात. समस्या ही आहे की ज्या लोकांचा या सार्‍यात जीव जातो त्यांनी काय करायच? त्यांना आपल्या जीवाच्या मालमत्तेच्या अब्रूच्या रक्षणाचा बंदोबस्त करणे क्रमप्राप्तच नाही काय ? का तुम्हाला इस्लामचा योग्य अर्थ कळत नाही म्हणून लोकांनी प्राण अब्रू व मालमत्ता गमवायची?

नृशंसकृत्ये करणारे हे लोक स्वतः च हा आमचा इस्लामीक जिहाद आहे अस म्हणत असतात. किंबहुना त्यांना ती गर्वाची बाब वाटते. आम्ही कुराणात जे सांगितलय तेच करतोय आम्ही पैगंबरानी जीवनात जे केल त्याच अनुकरण करतोय असच ते म्हणतात. पाकीस्तानातील अनेक पिढ्या भारत द्वेशावर पोसल्या गेल्यात .किंबहुना भारतात जस --जो कुणी हिंदुत्ववादी/ रा स्व संघ / मोदी / संघपरीवार यांचा अधिकाधिक धिक्कार करेल तो खरा धर्म निरपेक्ष, मुस्लिम तुष्टीकरण- मुस्लिमांचे प्रत्यक्ष भले काहीही न करता - करणारी वक्तव्ये निर्णय करेल तो अधिक सेक्यूलर - मेरा सेक्यूलॅरिझम तेरेसे हरा कैसे ? अशी जणू स्पर्धाच सुरु असते-- त्या चालीवर जो कुणी अधिकाधिक भारतद्वेश पर्यायाने हिंदूंप्रती द्वेश मग ते हिंदू पाकीस्तानचे राहीवासी त्यांचे देशबांधव का असेनात- अस राजकाराणात समाजात वागेल तो खरा देश भक्त पाकी ! अशीकृत्ये जी दहशतवादी संघटना करेल ती खरी इस्लामची पाईक ! भारतीयांना काहीही वाटो पाकीस्तान्यांसाठी व मुस्लीम जगासाठी तरी भारत हे हिंदूराष्ट्रच आहे. अस सगळ पाकीस्तानात सुरु असत. आम्हीच काय ते इस्लामचे खरे पाईक या नादात हे मुस्लीमांमधील वेगवेगळ्या पंथांनाही मग आपल लक्ष्य बनवायला मागेपुढे पहात नाहीत. मग ते पाक मधे शिया असोत अहमदीया असोत वा सूफी असोत अथवा इराक सीरीयातले याझिदी असोत. आंतरराष्ट्रीय राजकारण व खनिज तेलाच अर्थकारण या परिस्थितीला खतपाणी घालतं व वेगवेगळे देश वेगवेगळे धार्मिक जनसमूह दहशतवादी गट आपला स्वार्थ साधत असतात हा याचा आणखी एक पैलू.
आतंकवादी घटनांच्या संदर्भात "आतंकवादी मुस्लीमांवर " टीका करण हे भारतातल्या सेक्यूलर लोकांकरता फार कठीण काम. ते जरी तोंडाने आतंकवादाला धर्म नसतो अस म्हणत असले तरी दहशत वादी हा त्यांच्या करताही पहीले मुस्लीमच असतो व मुस्लीमांवर कशी टीका करायची? इस्लामची कठोर चिकीत्सा कशी करायची? .....ही समस्या मग ते हिंदुत्ववाद्यांना/ संघपरिवाराला/मोदीला ए के ४७ ए के ५६ रायफली, बाँब वगैरे मुक्तपणे वापरणार्‍यांच्या समकक्ष आणून टीका करीत सोडवण्याचा प्रयत्न करतात त्या विना त्यांच सेक्यूलॅरिझम सिध्द होत नाही वरवर ते आम्ही लोकांना सावधान करतोय की द्वेशाच्या आहारी गेलात तर अस होत असा इशारा देतोय अस म्हणतात. पण इस्लामची कठोर चिकीत्सा ? छे ! बातच नको. हमीद दलवाईंच्या नंतर तेवढी वैचारिक कुवत व हिंमत असलेल कुणी आहे का आज? तुम्ही मला कम्यूनल लेबल लावाल ते वेगळच अशी ही सारी मानसिकता आहे. निखील वागळे, सागरिका घोष, बाची करकारीया यांची सोशल मीडीयात फिरणारी वक्तव्य हे याच मासले वाईक उदाहरण. राजकारणी मग ते अगदी भा ज पा सकट कुठल्या ही पक्षाचे असोत सगळे या बाबत एका माळेचे मणी. नब्रूयात सत्यम् अप्रियम् !!कटू सत्य बोलू नये याच सगळे पालन करीत असतात. पण लोक ही सगळ बघत असतात अनुभवत असतात.

काळ जाईल तसा भावनांचा पूर ओसरेल. लोक सगळा समग्र विचार करतील. मी ही हे अस सगळ लिहिल म्हणजे माझ्या शरीरात हृदयाच्या जागी कोकणातला जांभा दगड अथवा देशावरील पठाराचा काळा बसाल्ट दगड आहे अस नाही याची कृपया नोंद घ्यावी ही नम्र विनंती आहे.

त्या आंतक वाद्याबरोबरच वरील प्रतिसादामध्ये जे काही सेक्युलर मंडळीनी ज्ञान पाजळलेत त्यांचापण जाहिर निषेध......!!!

च्यायला इथे नुसतीच वांझोटी बडबड करण्यापेक्षा काहीतरी करा..
जर खरेच त्यांनी धमकी दिली असेल तर शासनावर दबाव आणून आपल्या शाळांना किमान संरक्षण देता येईल असे काही तरी करा. पालकगट तयार करा.

अजून बाळांना असल्या कसायांच्या हातून मरू देणे सहन होण्यापलिकडचे आहे.

कुणाला एकमेकांवर दोषारोप आणि फालतूच्या चर्चेचे गुर्हाळ घालणे सोडून काय सुचत असेल तर बोला.

आशुचॅंप, माझ्यामते प्रत्येक शाळेला फूलप्रूफ स्वतंत्र संरक्षण पुरवणे कठीण आहे. तसेही हा कायमस्वरूपी उपाय नाही. सुरक्षित तर देशच करणे गरजेचे आहे, अन्यथा पुढचा स्फोट लोकल ट्रेन वा सिनेमाघरातही होऊ शकतो, तिथेही तसेच निष्पाप जीव जाणार.
एक करू शकतो ते, म्हणजे अश्या परिस्थितीत कसे सामोरे जावे. जसे आग लागल्यावर फायर एक्झिटचे प्रशिक्षण असते तसा काही या हल्ल्यांच्यावेळीही आपातकालीन प्लान आणि त्या अनुषंगाने सूचना विद्यार्थ्यांना देऊन ठेवता येतील. अर्थात हे गरजेचे ठरणे खरेच दुर्दैवी ठरेल, तसेच आपण एखाद्या असुरक्षित देशात राहत आहोत अशी घातक मानसिकताही लहान वयाच्या मुलांमध्ये तयार होईल. ते तसे होऊ न देताच उपाययोजना करावी लागेल.

एक करू शकतो ते, म्हणजे अश्या परिस्थितीत कसे सामोरे जावे. जसे आग लागल्यावर फायर एक्झिटचे प्रशिक्षण असते तसा काही या हल्ल्यांच्यावेळीही आपातकालीन प्लान आणि त्या अनुषंगाने सूचना विद्यार्थ्यांना देऊन ठेवता येतील. अर्थात हे गरजेचे ठरणे खरेच दुर्दैवी ठरेल, तसेच आपण एखाद्या असुरक्षित देशात राहत आहोत अशी घातक मानसिकताही लहान वयाच्या मुलांमध्ये तयार होईल. ते तसे होऊ न देताच उपाययोजना करावी लागेल.

अगदी मला हेच म्हणायचे होते. दुर्दैवी तर आहेच पण सगळे काही ठिक आहे असा भाबडेपणा राहण्यापेक्षा सावधान असलेले कधीही चांगले.

माझ्यामते प्रत्येक शाळेला फूलप्रूफ स्वतंत्र संरक्षण पुरवणे कठीण आहे. तसेही हा कायमस्वरूपी उपाय नाही.

हो मागेच या धाग्यावर म्हणल्याप्रमाणे, किमान सुविधा अजून आपल्या शाळांपर्यंत पोहचल्या नाहीत तर त्याचे संरक्षण ही फार लांबची गोष्ट आहे. पण काहीतरी केले जाणे आवश्यक आहे. नुसतेच हातावर हात धरून बसून नशिबाला दोष देण्यापेक्षा.

श्रीमान सत्यवादी,

>> गामा, आधी भारतात राहायला आणि मग "आपल्या" मुलांच्या बाबतीत गळे काढा!

विषयांतर!

मात्र 'तुम्हाला पाकी पोरांचा एव्हढा उमाळा आलाय तर तुम्ही तिकडे का राहायला जात नाही ?' असा प्रश्न माझ्याकडून उपस्थित करवून घेण्याच्या काडीघालू खटपटीबद्दल अभिनंदन!

आ.न.,
-गा.पै.

आशुचँप,

>> दुर्दैवी तर आहेच पण सगळे काही ठिक आहे असा भाबडेपणा राहण्यापेक्षा सावधान असलेले कधीही चांगले.

मन सदैव सावधान ठेवायचं असेल तर नामस्मरण हा सोपा आणि सहज उपाय आहे. बघा पटतंय का! मी सदैव साधना करायचा आग्रह धरतो तो मनाचा तल्लखपणा कायम राहण्यासाठी! आगाऊ पूर्वसूचनेचा मनाशी खूप जवळचा संबंध आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

पेशावर हल्ल्यानंतर भारतातील शाळेची सेक्युरीटीत वाढ ,

भारतीय सुरक्षा सल्लागारांनी शाळेसाठी नविन नियमावली आणली आहे. त्या नुसार,
प्रत्येक शाळेने कुंपणाची भींत ८ फुटाची बांधणे, त्यात येजा करण्यासाठी ४ - ५ दरवाजे, प्रत्येक शाळेसाठी एक
सेक्युरीटी ऑफिसर आणि त्याला असिस्टंट. त्यांच्या साठी वॉकी टॉकी सारखी साधने, प्रत्येक जागी कॅमेरे,

पण,
ज्या देशात आपली मुले मोठ्या शाळेत शिकावी हे प्रत्येक पालकाच स्वप्न असत पण शाळेत जाण्यासाठीच्या
सुयोग्य गाडीला पैसे देण्याची त्यांची तयारी नसते !!.

तुम्हाला माहीत आहे का ? ज्या बसने मुले शाळेत जातात त्या गाड्या मुळात छोट्या चासिसच्या असतात पण त्यांच गाड्यांना ईथुन तिथुन जोड देऊन बस बनवले जाते. मग अश्या बसेसना छोटा अपघातही खुप घातक असु शकतो. हे सत्यमेव जयते बघितलेल्या लोकांच्या लक्षात आले असेल.

तेंव्हा सेक्युरीटीसाठी लागणारा खर्च कोण देणार ?

एक WhatsApp वर आलेला आणि मनाला पटलेला मेसेज

NDTV बघा !!!!
पाकिस्तानी मुलांच्या आईबापाचे Statements बघा !!!
" हमारे बच्चो को क्यो मारा ? हिंदुस्थानियो के
बच्चो को मारते तो बात होती !!!!!! ????
काढा अजून गळे त्यांच्या मुलांसाठी , त्याच
मुलांसाठी जे उद्या त्यातलेच काही आतंकवादी बनून
आपल्यावरच हमला करणारे
आणि ऐका त्यांचे आईबाप काय म्हणत आहेत ते.
लावा profile pic ला मेणबत्या.. Whats app DP ला पण
लावा मेणबत्या..

हे स्टेटमेंट कुठे वाचले नाही गुगल मधे देखील नाही लिंक द्या
या स्टेटमेंटचा निषेध आधीच केला आहे बोंबलु नये

दिवाकरसाहेब,

आजचे मी पाहिलेले वर्तमान पत्र - महाराष्ट्र टाईम्स आणि लोकसत्ता फक्त आतंकवाद या विषयावरच्या लेखांनी भरलेले आहेत. यात कुठेही भारतात आतंकवाद जोपासला जातो उल्लेख नाही.

जे लोक चर्चा करत आहेत ते असे संकट भारतावर येऊ नये या संदर्भात जनजागृती व्हावी आणि अतिरेक्यांविरुध्द मनोबल आणि जनमत जागृत व्हावे यासाठीच आहे.

तुम्हाला फक्त आपल्या भुमीकेची पडली आहे म्हणुन इतरांना " बोंबलणे" शब्द प्रयोग वापरता ? किती हिन मानसीकता आहे तुमची ? चर्चा करणे, जनमत तयार करणे ही लोकशाहीची साधी प्रार्थमिक प्रक्रिया आहे. तुम्ही हुकुमशाही मनोवृत्तीचे दिसता. जर भारत सरकारने शाळांसाठी नविन नियमावली आधीच लागु केली आहे. हे संकट दिसते आहे अश्यावेळी सर्वाची एकजुट दिसायला हवी हे सोडुन गळचेपी करता का?

निषेध आहे तुमचा.

नितिनचंद्रसाहेब
नीट वाचा आधी काय लिहिले आहे. मी फक्त विचारले की ते वाक्य गुगल करुन देखील सापडले नाही कोणत्या वृत्तपत्रात आलेले आहे. ते काय आहे ना इथला कंपु नीट वाचण्याआधीच आरडाओरडा करायला लागतो. त्या वाक्याचे मी समर्थनच करत आहे असा अर्थ कोणी घेउन इतरांच्या "विपुत" जाउन ओरडु नये म्हणुन मला परत लिहावे लागले की त्या वाक्याचे निषेध केला आहे. हे लक्षात घ्यावे.

जरा नीट वाचुन मग लिहा. तुमच्या फुकाच्या निषेधाला किंमत देत नाही.
आणि राहिले मानसिकता तुमची किती आहे हे तुम्ही काढलेल्या धाग्यांवरुन दिसुन येते
तुमच्या प्रिय नितिन गडकरींना कोर्टाकडुन फटकारले आणि दंड देखील भरायला लावला. बातमी वाचली असेल तर काढा धागा Lol

दिवाकरजी साहेब,

गडकरींना देशापुढे काहीच किंमत नाही. मुद्दा भरकट्वण्यात यश येणार नाही.

म्हात्रे यांनी एन डी टी व्ही चा उल्लेख केला आहे तेव्हढा बास.

एखादी व्यक्ती पुरावा देऊ शकत नसेल तर तो आग्रहाने मागा. भाषा संयमित ठेवा. लोकशाहीत हे बसत नाही.

तुम्ही कोणालाच किंमत देऊ नका काही फरक पडत नाही. किंमत दिली तर मिळते.

मी म्हात्रेंकडुन नाही बेफींकडुन मागितला आहे त्यांनी ती बातमी आधी लिहिलेली होती. अर्थात त्यांच्याकडे लिंक नसेलच. Happy एखाद्याने वक्तव्य केल्यावर सगळ्यांना जर तसेच समजायचे असेल तर इथे बर्‍याच जणांनी तशी वक्तव्य केली आहेत. काहींनी आडुन तर काहींनी सरळ (संभाव्य शब्दासकट) मग काय फरक राहिला त्यांच्यात आणि आपल्यात.? मला या लोकांचे माहीत नाही पण माझ्यात आणि त्यांच्यात बराच फरक आहे. फुकाचा अभिमान राष्ट्रवाद करण्यापेक्षा आणि तथाकथित लाटेत वाहुन जाण्यापेक्षा योग्य काय आहे ते कळत.

राहिले गडकरी यांचा मुद्दा तुम्हीच तिवारींनी माफी मागितल्यावर धागा काढलेला म्हणुन तुम्हाला निव्वळ बातमी दिली. Wink

Pages