आतंकवाद-- जागतिक संकट

Submitted by विश्या on 16 December, 2014 - 06:20

मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील

rsz_303442-pakatc7.gif
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
10850314_10154960380600271_6758740036917295825_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय वेदना सहन करत असेल, असे विचार फक्त तुमच्या आमच्या मनात. त्याची निरागसता इथल्यांना शिवतही नाही >>>>>>> तुमी समजत तसा नाही प्रत्येकाला जीव आणि संवेदना असतातच आता आसाम मध्ये झालेल्या गोळीबारात बरेच लोक मारले गेलेत पण ते काही नक्षलवाद्यांनी केले आहे आणि भारतीय प्रशासनाने त्या बद्दल सैन्यदल हि पाठवले आहे .

US gives Pakistan a free pass — and $1 billion — by ignoring LeT, LeJ

WASHINGTON: The United States may well have subscribed to Pakistan's policy of "bad terrorists" (from its Afghan front, who mostly attack Pakistan and US) versus "good terrorists" (from West Punjab, who mostly attack India).

A defence authorization bill signed by President Barack Obama last week that provides for $1 billion in aid to Pakistan in 2015 conditions it on Islamabad taking steps to disrupt the Haqqani Network and eliminating safe havens of al-Qaida and Tehrik-i-Taliban Pakistan.

However, it makes no mention of the Punjab-centric terror groups such as the Laskar-e-Taiba (LeT) aka Jamaat-ul-Dawa (JuD), Lashkar-e-Jhangvi (LeJ) and others that are considered proxies of the Pakistani state.

A review of the 1640-page text of S.1847, formally known as the Carl Levin and Howard P 'Buck' McKeon National Defense Authorization Act for Fiscal Year 2015, shows US emphasis on calling Pakistan to account for terrorist activity on its western flank, mainly through the Taliban, which impacts the US drawdown in Afghanistan.

प्रश्न हा आहे की पाकिस्तान सुधारणार नाही का अमेरिका ?

याच उत्तर जर द्यायच झाल तर एकच असेल भारतावर हल्ले करण्या अगोदरच त्यांना त्यांच्या देशात घुसुन ठोका !!

http://timesofindia.indiatimes.com/world/pakistan/US-gives-Pakistan-a-fr...

दि. दे. कृपया भाषा सभ्यतेची वापरा.... तुम्ही पुरावा मागितला होता म्हणुन ती बातमी कॉपी पेस्ट केली होती..... का उगाच वाद घालताय? खरेतर आपणच जास्त करुन झापडबंद झालात त्या पाकाड्याची बाजु घेऊन..... माझा या पोस्टवर हा शेवटचा प्रतिसाद आहे... उगाच वाद घालु नये...

विकास मी पुरावा कोणता मागितलेला आणि तुम्ही दिला कुठला आहे ?
पहिली गोष्ट मी भक्तांसारखा पुरावा मागितला नाही. मी फक्त बातमी कुठे आहे हे विचारले होते. कारण मी ते शोधुन ही सापडले नव्हते.
दुसरी गोष्ट त्या बातमीचा निषेध करुन देखील तुम्ही त्याकडे न बघता " त्यांच्यासारख्याच प्रतिसाद देणाऱ्या कंपनीसांठी" असे लिहुन काय साधण्याचा प्रयत्नात होतात हे स्पष्ट करा.
मी विचारली होती त्या माणसाच्या संभाषणाची लिंक आणि तुम्ही दिली हॉकीवरुन बोलणार्या अँकरची लिंक.

मुद्दा कळत नसेल तर तुमच्या इतर कंपुंसारखी सरमिसळ करुन लिहु नये.

दि. दे. मला वरील लिंकवरुन असे म्हणायचे आहे की, कितीही झाले तरी सर्व पाकाडे वाकडे ते वाकडेच......
त्यांची बाजु घेऊन उगाच आपण वाद घालु नये....
..
.
अन, मुद्दा राहिला तो NDTV व व्हॉटसअप वरील बातमीचा....
तर त्यासाठी माझ्याकडे खुप बातम्या आहेत...
मी मायबोली मोबाईलवर नाही तर कॉम्प्युटरवर वापरतो त्यामुळे त्या येथे देता येत नाही...
.
.
.
अन आपल्याला बातम्यावर प्रतिक्रिया द्यावयाची असेल तर सकाळ पेपर खुप छान आहे. तिथे देऊ शकता, कारण आपल्या प्रतिसाद कोणाला आवडला व कोणाला नाही ते त्यावर चांगल्या रितीने समजु शकते....
.
कृपया, वाद घालु नये.... आभारी आहे आपला.....धन्यवाद

त्यांची बाजु घेऊन उगाच आपण वाद घालु नये..>>> वरील अथवा मागील एकाही प्रतिसादात पाकड्यांची बाजु घेउन लिहिलेले कुठे दिसले आपणास? बातमीची लिंक विचारणे म्हणजे बाजु घेणे असे आहे का ?

पण तसे विचारताना भाषा सभ्यतेची ठेवावी, उगाच चिडू नये हिच विनंती होती माझी, तसे कोणाला वाटु शकते.... बस्स दुसरे काहीच नाही.

मी नीट लिहिणार्‍यांवर अजिबात चिडत नाही. फक्त ते "तुमच्यासारख्या कंपनीचे" हे वापरल्याने भाषा बदलावीच लागली. क्षमस्व.

दहशतवादी वरासाठी ऑनलाइन मार्गदर्शन

लंडन - सिरीयामध्ये वरसंशोधन करणाऱ्या ब्रिटिश मुलींसाठी इसीस ही दहशतवादी संघटना ऑनलाइन मार्गदर्शन करत असून त्या माध्यमातून ब्रिटिश मुलींची फसवणूक करण्यात येत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

टुम्ब्लर या सोशल साइटवर अल-ब्रिटनी या नावाने लिहिलेल्या एका पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे. इसीसच्या दहशतवाद्यांसोबत विवाह करू इच्छिणाऱ्या मुलींसाठी मार्गदर्शन करण्यात येत असल्याचे म्हटले आहे. मुलींनी सुयोग्य वर शोधल्यानंतर दोघांची पाच मिनिटांची धावती भेट (स्पीड डेटिंग) घडवून आणली जाते. त्याचदरम्यान दोघे जण परस्परांना बोलू शकतात. तसेच मुलीला संबंधित वर पसंत पडला नाही तर त्याला नाकारून अन्य दहशतवादी वर सुचविला जातो. पुढे असेही म्हटले आहे की, नवविवाहित दांपत्यांना संघटनेच्या वतीने घर आणि रोख रक्कमही दिली जाते. यानिमित्ताने दहशतवादी संघटना अशा पद्धतीने मुलींची फसवणूक करत असल्याचे उघडकीस आले आहे.

गांधीधाममधील स्फोटप्रकरणी आरोप निश्‍चित

पटना (बिहार) - गुजरातचे पंतप्रधान असताना नरेंद्र मोदी यांच्या पटनामधील गांधीमैदान येथील "हुंकार रॅली‘ दरम्यान स्फोट घडविणाऱ्या 11 जणांविरुद्ध आरोप निश्‍चित केले आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष न्यायालयाने आज (मंगळवार) आरोप निश्‍चित केलेल्या 11 जणांमध्ये इंडियन मुजाहिदीन आणि सिमी या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेच्या संशयित सदस्यांचा समावेश आहे.

[संपूर्ण बातमी वरच्या दुव्यावर टिचकी मारून वाचावी]

यांच्यावर सिनेमाच सोडाच साधं कार्टून काढलं तर काय झालं पहा. आहे हिंमत आमीर खानची?

11 dead, 10 wounded in shooting at Paris headquarters of French satirical weekly Charlie Hebdo

PARIS: Masked gunmen stormed the offices of a French satirical newspaper on Wednesday, killing 11 people before escaping, police and a witness said. The weekly has previously drawn condemnation from Muslims.

[संपूर्ण बातमी वरच्या दुव्यावर टिचकी मारून वाचावी]

लोकहो,

हा बरोब्बर एक वर्षापूर्वी प्रकाशित झालेला लेख आहे : http://www.gatestoneinstitute.org/4120/islamization-france

लेखातले संदर्भ २०१३ सालचे आहेत. या लेखात अतिरेकी हल्ल्याचं लक्ष्य झालेल्या चार्ली हेबडो या नियतकालिकाचं नाव आलंय. Sad

लेखातली तथ्ये आणि आकडेवारी धक्कादायक आहे. थोडी झलक :

१. फ्रान्समध्ये लोकसंख्येच्या अंदाजे १०% मुस्लिम आहेत. अंदाजे अशासाठी की कायद्याने अधिकृत गणनेस प्रतिबंध आहे. भारतातही सुमारे १५% च्या आसपास मुस्लिम आहेत.

२. फ्रेंच तुरुंगांत मुस्लिम कैद्यांचे प्रमाण अंदाजे ५०% च्या वर आहे. ही टक्केवारीही भारताशी जुळते.

३. फ्रान्समध्ये दरवर्षी ४०००० (होय चाळीस हज्जार) वाहने मुस्लिम झुंडीकडून जाळण्यात येतात.

तूर्तास इथेच थांबतो. ब्रिटीश जिहाद्यांनी फ्रान्सच्या अध्यक्षांना दिलेली धमकी वाचनीय आहे. त्यातली काही मुक्ताफळे :

१.
>> Our eyes are on Paris…We will not stop, as Muslims, until the whole world is governed
>> by Islam.

२.
>> This [Muslim] nation is like a tidal wave. When it starts, it doesn't stop. It will conquer the
>> east of the East and the west of the West, because that is the prophecy of our Prophet
>> Mohammed.

३.
>> François Hollande, you must understand a few facts of life: You are a son of Pharaoh.

४.
>> Your wife, French women, the people of France, will live under the Islamic movement,
>> even if you don't like it.

असो.

भारतीयांनी योग्य तो बोध घेऊन जागं व्हायला हवंय.

आ.न.,
-गा.पै.

फ्रांसची बातमी वाचली. हे भयंकर आहे! मुर्खपणा आहे सगळा..पीकेला विरोध, ह्या चार्ली हेबडो ला (फ्रेंच मासिकाला)विरोध. केवळ मी म्हणतो ते बरोबर ही प्रवृत्ती नाहीशी केली पाहिजे. सहिष्णुता नावाची भावना राहिलीच नाहीये Sad भारतीयांनीच नाही तर सगळ्याच देशांनी जागं व्हायला हवं!

पुण्यप्रसुन वाजपेयींनी फ्रान्स मधील घटने बद्दल आज तक वर चर्चा करतांना शिवसेनेला मधे आणल, वागळेंबरोबर मी मराठी वर बोलतांना डाव्या विचारांच्या कुणी किरण मोघे होत्या, त्या म्हणाल्या हिंदू धर्मा इतका हिंसक धर्म नाही दुसरा. सागरिका घोष बाईंनी सॅफ्रन टेरर असा शब्द मागेच जन्माला घातला, राजदीप , बरखा, दीपक, आशुतोष, प्रसन्न ... जाउ दे .... उडदा माजी काळेगोरे काय निवडावे ?
ए के ४७ / ए के ५६ या सारख्या क्लाष्नीकोव्ह रायफली, आर डी एक्स सारखी विस्फोटके वापरून तयार केले जाणारे बॉम्ब, इण्टरनेट सारख्या आधुनिक संपर्क व्यवस्था, आंतरराष्ट्रीय नेटवर्किंग, पेट्रोडॉलर्स चा वर्षानुवर्षे सुरु असलेला ओघ, अन एक कट्टर विचारधारा या सगळ्यांचा वापर करून घडवून आणल्या जाणार्‍या नृशंस घटना, त्यांची स्केल ऑफ ऑपरेशन वगैरेचा विचारही न करता याची तुलना करीत लोक आपल्या देशातील घटनांबद्दल "पण वृत्ती तीच... तालीबानी ! " वगैरे म्हणत "हिंदु दहशतवाद" वगैरे शब्द कॉईन करत बोलू लागतात तेव्हा मला खरच काही सुचत नाही. मी तरी माठ आहे किंवा ते ... रांजण आहेत....अक्कल ओसंडून वाहणारे ! ( पहीलीच शक्यता जास्त ! अस मी आधीच लिहुन टाकतो म्हणजे कुणाला तस वाटत असेल तर त्याचे टंकण्याचे श्रम तरी वाचतील )

सहमत....
या हल्ल्यांची तुलना तथाकथित हिंदु दहशतवादाशी करणे म्हणजेच अकलेचे दिवाळे वाजले आहेत.

बाकी या दहशतवाद्यांना मोठे करणारी दुसरी कोण नाही अमेरिकाच आहे. एवढा हल्ला झाल्यानंतरही त्यांचा मदतीचा ओघ काय थांबलेला नाही.

इसिस पण त्यांचेच अपत्य असणार. एक बिन लादेन तयार करून त्यांचे भागले नाही आता पुन्हा तोच खेळ. अचानक हे लोक कसे काय पुढे आले. एवढा इम्पॅक्ट कसा काय वाढला.

जगाच्या पटावरचे हे खेळ आपल्या आकलनापलीकडचे आहेत

आशुचँप,

>> इसिस पण त्यांचेच अपत्य असणार.

असणार काय म्हणताय, अहो, ते आहेच मुळी. अमेरिकेच्या तालावर नाचणारे दोन देश आहेत मध्यपूर्वेत. पहिला सौदी अरेबिया आणि दुसरा इस्रायल. या दोघांविरुद्ध ब्र तरी उच्चारलाय का आयसिसने?

आ.न.,
-गा.पै.

पॅरीस मध्ये झालेल्या हल्ल्याच "जमोप्या उर्फ काउ" यांनी काल मायबोलीवर समर्थन केल आहे.
ते म्हणतात की असे हल्ले व्हायला पाहीजेत, हे हल्ले म्हणजे त्या मुसलमान लोकांच्या भावनेचा उद्रेक आहे आ णि तो नैसर्गीकच आहे. अश्या प्रकारे कोणाचा ही भावनीक उद्रेक हा नैसर्गीकच असेल आणि तो कायदेशीर ही असावा !!

त्यांचे यापुढे असेही म्हणणे आहे की जर का डॉक्टरकडून एखाद्या पेशंट दगावला तर त्या डॉक्टरला ही जीवे सोडू नये तिथल्या तिथे सजा द्यावी, या प्रकारात श्री ज मो प्या पुर्ण पणे सहकार्य करायला तयार आहेत.

?

भारतात आता सुमारे सकाळचे साडेतीन वाजले आहेत. श्री मधुकर बनसोडे यान्नी साधारण पहाटे एक - दीड वाजता जामोप्या उर्फ काउ यांचे स्मरण केलेले दिसते आहे.

अआम्हाला प्रातःस्मरणीय दर्जा दिल्याबद्दल बनसोडेंना धन्यवाद

Proud

बनसोडे झोपा आता . शेजारती करुन घेउन सगळे हिंदु देव कधीच झोपी गेलेत !

बाळासाहेब ठाकरे मणी शंकर अय्यरला फुटका मणी का म्हणत ते काल समजले. लहान मुलाच्या नाकातुन मोती सहजपणे बाहेर यावा तसा मणी शंकर अय्यर पॅरीसमधे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनार्थ बोलला. अजुन एका मुस्लीमनेते - माजी सदस्य लोकसभा की राज्यसभा ( बहुजन समाजवादी पार्टी ) अशीच मुक्ताफळे उधळली आहेत.

Pages