आतंकवाद-- जागतिक संकट

Submitted by विश्या on 16 December, 2014 - 06:20

मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील

rsz_303442-pakatc7.gif
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
10850314_10154960380600271_6758740036917295825_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

९१ प्रतिसाद येईपर्यंत ह्या धाग्याने निरनिराळी वळणे घेतली. कोणी हा धागा आपल्या आवडत्या राजकीय पक्षाच्या विचारधारणेकडे वळवायचा प्रयत्न केला तर कोणी 'पाकिस्तानचेच पाप पाकिस्तानला भोवले' असा रंग द्यायचा प्रयत्न केला. बहुतांशी प्रतिसाददात्यांनी सहृदयतेने ह्या नृशंस हत्याकांडात बळी पडलेल्यांचे नागरिकत्व, धर्म वगैरे बाबी विचारात न घेता तीव्र खेद प्रकट केला.

आता जवळपास सर्वच सक्रीय सदस्यांची सुस्पष्ट मते येथे आलेली आहेत व वादविवादही टळलेले आहेत, तेव्हा पाकिस्तानात घडलेल्या ह्या प्रकाराबाबत माझ्या मनात आलेले एक दोन विचार नोंदवायचे धाडस मनात गोळा करून हे पुढचे लिहीत आहे.

१. हे हत्याकांड निषेधार्ह आहे व ते घडवून आणणार्‍यांना जहालातील जहाल शिक्षा मिळायला हवी.

२. लहान मुलेच असे नव्हे तर निष्पाप सामान्य नागरिकांवर कधीच कोणताच हल्ला होऊ नये अशी प्रार्थना!

३. मात्र, आजवर भारतातही अनेक अतिरेकी हल्ले झाले व त्यापैकी काहींमध्ये तालिबानचा सहभागही होता. आपल्याकडेही निरपराध नागरीक मारले गेले व त्यात वृद्ध, स्त्रिया, मुले असे सर्वजण समाविष्ट होते. ह्या पाकिस्तानातील हत्याकांडाच्याच वेळी माध्यमे हे दाखवायला इतकी एक्सेसिव्हली फोकस्ड का झाली की किती अमानुष कृत्य तेथे घडलेले आहे? मीडिया आपले काम करत आहे हे मान्य आहे. पण आपली न्यायसंस्था अतिरेक्यांना वर्षानुवर्षे नुसते डांबून ठेवत असताना आणि आपल्याकडे कित्येक हल्ले झाले असताना कधी 'मार डालो उस कसाबको' सारखे आक्रोश मीडियाने का केले नाहीत? पकडलेल्या अतिरेक्यांविरुद्ध जनमत बनवून सरकारवर दबाव आणणे हेही त्यांचे काम नाही आहे का?

४. आर्मी स्कूलमधील मुलांवर हल्ला करण्याची तालिबानने हिडीस कारणमीमांसा दिली आहे. ती अशी, की तालिबान्यांचे संसार पाकिस्तानी आर्मीने असेच उद्ध्वस्त केलेले आहेत व ते दु:ख कसे असते हे त्या आर्मी अधिकार्‍यांना समजावे म्हणून हा हल्ला मुद्दाम करण्यात आला. जर कोणत्याही निष्पापांना कोणीही मारणे हा निषेधार्ह अपराधच असेल तर तालिबान्यांचे संसार उधळवताना आर्मीने देशसेवा केली असे कसे म्हणता येईल? आणि जर तसे पाकिस्तानी सरकार किंवा इतर देश म्हणत असतील तर जगाचे हे विचार न मानणारी विचारसरणी बाळगणारे तालिबानी तितक्याच जोरकसपणे त्याला अन्याय का समजणार नाहीत? मुळात पाकिस्तानने तालिबान निर्माण का होऊ दिले? ते अनियंत्रीत का होऊ दिले? त्यांची निष्पाप मुले का मरू दिली? ती मुले मरू देताना 'तालिबानी अतिरेक्यांचा वंशच खालसा व्हावा' हाच विचार होता का? तो विचार स्तुत्य होता का?

५. तालिबान्यांच्या संसारातील निष्पाप व आंतरराष्ट्रीय राजकारण / दहशतवाद ह्याच्याशी सुतराम संबंध नसलेल्या सदस्यांना मारणारे आर्मी अधिकारी होते. हे अधिकारी, अधिकारी होण्याआधी ज्या प्रशिक्षण केंद्रातून शिक्षण व वैचारीक संस्करण प्राप्त करत असत ते प्रशिक्षण केंद्र तालिबान्यांसाठी आगामी काळातील सर्वात मोठा धोका ठरला असता. तालिबान्यांची निष्पाप मुले कदाचित अनाथ होऊन सरकारला शरण गेलीही असती, पण ह्या आर्मी प्रशिक्षण केंद्रातील मुले तालिबान्यांच्या बाबतीत कधीच मानतावादी विचार जोपासू शकली नसती. ती लहान मुले होती हे मान्यच, पण तालिबान्यांचीही मुले लहानच होती. 'एका देशातील निरागस मुले मेली' असे ह्या प्रकाराचे स्वरूप आहे हा आपला सगळ्यांचा दृष्टिकोन आहे. तालिबान्यांचा दृष्टिकोन 'आमचा आगामी काळातील शत्रू आम्ही खालसा केला' असा आहे व तो आपल्या सर्वांच्या दृष्टीने अत्यंत विकृत असला तरी त्यांच्यामते तो उचित आहे. म्हणजेच हा प्रश्न युद्ध, स्फोट, जीव घेणे, कत्तली, राजकारण, सीमारेषा अश्या सर्वांचा नसून वैचारीकतेचा, कोण कुठले आदर्श मानतो ह्याचा आहे. असे प्रश्न समूळ निपटण्यासाठी अत्यंत प्रदीर्घकाळ चालणार्‍या उपाययोजना कराव्या लागतात ज्यात 'संस्करण - समूपदेशन - शासन' हे महत्वाचे ठरतात. नुसतेच 'बिचारी लहान मुले, बिचारी लहान मुले' असे म्हणून आपण भारतीय ज्या पाकिस्तान्यांच्या दु:खात मोठ्य माणूसकीने सामील होत आहोत त्या पाकिस्तान्यांनी उभे केलेले तालिबान आपल्याला गिळंकृत करायला जन्माला आलेले आहे ह्याचा इतक्या लगेच का विसर पडला? दु:ख व्यक्त करून झाले, निषेध झाला, हळहळ झाली पण आता भानावर येऊन हे बघायला काय हरकत आहे की आजवर आपण काय काय सोसले? तेव्हा पाकिस्तानी माध्यमांनी आणि नागरिकांनी किती हळहळ व्यक्त केली? पाकिस्तान सरकारने काय उपाययोजना केल्या? अमेरिकेने पाकिस्तानला न चुचकारता आपल्यासाठी एक तरी पाऊल उचलले का?

आपण इतके खच्चीकरण केलेल्या खोजांसारखे का भावना व्यक्त करून स्वतःला मोठे मानवतावादी समजत आहोत? आपण तर ह्याहून कैकपटीने अधिक सोसलेले आहे. तेव्हा हे जग कुठे होते जे आज पाकिस्तानातील मुलांसाठी चोवीस तास अश्रू ढाळत आहे?

देवकी,

>> अशावेळी असे तुम्ही बोलू शकता याचे दु:ख वाटते.

आपल्या मुलांवर अशी वेळ एकदा नव्हे तर अनेकदा येऊन गेलीये. ती पुन्हा येऊ नये म्हणूनच हे असं स्पष्टपणे बोलावं लागतंय. घडलं ते चांगलं का वाईट त्याच्याशी मला कर्तव्य नाही. आपल्या मुलांच्या बाबतीत हे टळायला व/वा टाळायला हवंय इतकंच मला माहितीये.

आ.न.,
-गा.पै.

पाकिस्तानातील जीवनशैलीची लक्षणे उद्धृत करणार्‍या तीन क्रूर सत्यकथा:

१. फाळणीच्या वेळी - (एका पुस्तकातून) - पाकिस्तानात राहणारा एक शीख आपल्या अंगणात एक बकरे कापत होता. त्याने ते हलाल पद्धतीने कापले नाही हे पाहून जमाव जमला व त्या शिखाला धमक्या दिल्या. नंतर स्थानिक कोर्टाने त्या शिखाला बोलावून बकरे कापण्याची पद्धत पाळायचा आदेश दिला व आधी ती पद्धत न पाळल्याबद्दल त्याचा रोजीरोटीचा व्यवसाय बंद करण्यास सांगितले. गयावया करणार्‍या त्या शिखाच्या कुटुंबियांचे नंतर हाल करण्यात आले.

२. कारगिल युद्ध - चार की सहा भारतीय जवान पाकिस्तानच्या हाती लागले. ह्या जवानांपैकी प्रत्येकाच्या चेहर्‍यावरील पत्येक अवयव कापून त्यांना जिवंत ठेवण्यात आले. दरम्यान त्यांना चटके देण्यात आले. त्यानंतर त्यांचे इतर अवयव व शेवटी इंद्रिय कापण्यात आले. त्यानंतर हे जवान कसेबसे मृत्यू प्राप्त करू शकले. त्यांचे मृतदेह भारतात पाठवले गेले व भारताने निषेध व्यक्त केला. (त्याकाळच्या सर्व वर्तमानपत्रांत प्रकाशित)

३. एका खेड्यातील तरुणांनी दुसर्‍या खेड्यातील एका तरुणीची छेड काढल्यावरून झालेल्या वादंगात तरुणी ज्या खेड्याची होती त्या खेड्याचा विजय झाला. तेथील मुल्ला मौलवींनी छेडछाड करणार्‍या तरुणांच्या खेड्यातील नऊ कुमारिका स्वतःच्या सेवेसाठी मागीतल्या व ह्या कुमारिका मिळाल्यास झालेला प्रकार विसरून जाऊ असे आश्वासन दिले. त्यानुसार त्यांना नऊ मुली पुरवण्यात आल्या. (वर्तमानपत्रात प्रकाशित)

पाकिस्तानी मुळातच क्रूर असतात किंवा प्रसंगी तसे होऊ शकतात किंवा त्यातील काहींना क्रूर होण्याचे जाणीवपूर्वक प्रशिक्षणही देण्यात येते. म्हणूनच पहिल्या पानावरील प्रतिसादात असे म्हणालो होतो की नवाज शरीफला झालेले दु:ख हे मुले मेल्यापेक्षा बातमी जगभर पसरल्याचेच अधिक असावे. अन्यथा हा महाभाग आजवर कधी असे म्हणाल्याचे ऐकिवात नाही की 'आता तालिबानला संपवू तेव्हाच दम खाऊ'!

बेफ़िकीर |

पाकिस्तानातील जीवनशैलीची लक्षणे उद्धृत करणार्‍या तीन क्रूर सत्यकथा:ज्या तुम्ही लिहल्या आहेत.या तर आपल्या
देशात एक बांधव जातियतेच्या नावाखालि दुसर्‍या बांधवावर करतो की!.मी हिंदू-मुस्लिम ची बात करत नाहिय हिंदू-हिंदू चीच करतिय.डोळे उघडे ठेउन बघा.ज्यांना स्वःताच्या बांधवाची दया आली नाही येत नाही त्यांना त्या निष्पाप मुलांची काय येनार.संवेदनक्षम मनाची लोक असे बोलु शकनार नाहित आणी संवेद्ना हे जिवंतपणाच लक्षण आहे.

द्वेष करताना नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा एक दिवस आपणही तसेच बनतो ज्यांचा आपण द्वेष करत असतो.

ईथे कोण काय लिहितेय ते त्याचे खरेखोटे विचार हे सांगता येत नाहीत, पण स्वत:च आत्मपरीक्षण करा. जर आज तुमच्या मनाला त्या कोवळ्या जीवांची हत्या त्रास देत नसेल, वा ती त्रास देतेय असे तोंडदेखल बोलत ईतर संदर्भ देत येण केन प्रकारे तुम्ही त्याचे समर्थनच करत असाल, तर उद्या अशी संधी मिळताच तुम्हीही अश्या हत्याकांडात सक्रिय सहभाग नोंदवाल. दहशतवादी होण्यासाठी बस्स याच एका क्वालिटीची गरज असते. द्वेष. मग त्याला फुंकर देऊन पराकोटीचा करायला फार वेळ लागत नाही.

हे कोणा एकाला उद्देशून नाही तर एकंदरच आजूबाजुला सर्वत्र मी जी चर्चा ऐकतोय त्यावर माझे मांडलेले मत आहे.

बोलले दुढ्दाचार्य,

नितीनचंद्र, गापै, व आद्य अनुमोदक कोकणस्थ, यांचे विचार त्या तालिबानी अतिरेक्यांपेक्षा वेगळे दिसत नाहीत, कारण यांच्याही विचारांनुसार ती 'शत्रू'ची मुले होती.

अरेरे! हे सुशिक्षित? हे सुसंस्कृत?? असले संस्कार???

जेवण नाही का जात आमची नाव घेतल्या शिवाय. माझ्या लेखनावर शिव्या न घालता प्रतिवाद करुन दाखवा. मी फक्त मा. नितेश राणे आणि मा. प्रणिती शिंदे यांना जे जाणिवपुर्वक कबुल करावेसे वाटले त्याचे समर्थन केले. पुन्हा लिहतो यात मी स्वतः काहिच लिहले नाही.

आज पर्यंत मायबोलीवर मुर्ख, नालायक अशी विशेषणे आपण सरसकट वापरली ती कोणत्या संस्क्रूतीत बसत होती ? आपल्याला शिव्या घालायचा मुक्त परवाना आहे का ? तुम्हाला मुद्यावर लिहता येत नसेल तर माझे नाव नाही लिहलेत तर काही फरक पडणार नाही.

आपल्या मुलांच्या बाबतीत हे टळायला व/वा टाळायला हवंय इतकंच मला माहितीये.>>> गामा, आधी भारतात राहायला आणि मग "आपल्या" मुलांच्या बाबतीत गळे काढा!

बाकी कंपुबाबत काही बोलणेच नको.

बेफिकीर जी - तुमी पाकिस्तानातील जीवन शैली बद्दल लिहिले आहे आणि तसे आहे पण , मला वाटत आतंकवाद या एकाच गोष्टीवर मला सांगायचे होते . आज या तालिबानी असो व आणकी कोणतीही आतंकी संघटना यांची धाडस इतकी वाढली आहे ते कधीही व कोणत्याही देशात सहजच घुसतात व आपल्या कामाला पूर्णत्वाकडे नेतात यासाठी जेवढे आतंकी आता जेल मध्ये असतील त्या सर्वाना कोणतीही दया माया न दाखवता सरळ सरळ फासावर लटकावले पाहिजे . संख्या कितीही असो पण एकदामात पूर्ण जगातील सर्व ठिकाणी हि कार्यवाही व्हायला हवी म्हणजे हे लोक थोडेशे तरी थांबतील .

.

आत्ता पाकिस्तानी नागरिकांचे स्टेटमेंट आले.

आमच्या मुलांना का मारले? हिंदुस्तानी मुले मारली असती तर काहीतरी अर्थ होता.

एन डी टी व्ही वर दाखवत आहेत.

पाकिस्तानी जनतेचा त्रिवार निषेध!

Angry

मी फक्त मा. नितेश राणे आणि मा. प्रणिती शिंदे यांना जे जाणिवपुर्वक कबुल करावेसे वाटले त्याचे समर्थन केले. पुन्हा लिहतो यात मी स्वतः काहिच लिहले नाही

......

किती हास्यास्पद लिहिताय नितीनचंद्र !

पहिल्या वाक्यात समर्थन.

दुसर्‍या वाक्यात पळवाट !

संघ व भाजपा यांचे मूलभूत लक्षण !

ता . क. ...आमचे अन्न कष्टाचे आहे. तुमचे नाव घेतले / न घेतले तरी गोडच लागते. नस्ते प्रश्न विचारु नयेत.

आत्ता पाकिस्तानी नागरिकांचे स्टेटमेंट आले. अरेरे, सापाला दुध पाजले तरी गरळ ओकणार हे कधी समजणार तथाकथित समधर्म समभाव वाद्यांना ?

ही सरळ सरळ भारतीय शाळांमध्ये अतिरेकी कारवाया करा अशी चिथावणी पाकिस्थानी जनता अतिरेक्यांना देत आहे. हीच वेळ आहे आता पाकिस्थानला दशहतवादी राष्ट्र घोषित करण्याची.

पाकिस्थानी जनतेला भारतात प्रवेश करायला बंदी घालायला हवी. नको ते मुशायरे, नको ते क्रिकेटचे सामने आणि समझोता एक्सप्रेस. हे बाळासाहेब ठाकरे का म्हणायचे ते आज पटले.

आता त्या सगळ्या महाभागांना येथे एकत्र जमवून विचारा काय काय तारे तोडलेत ते!

कोणी मोदींवर घसरला, कोणी सो कॉल्ड भक्तांवर, कोणी आतंकवादावर जागतिक उपायांचा धागा काढला तर कोणी मानभावी व साळसूदपणे मानवता दाखवली.

पाकिस्तानी नागरिकांना ऐकवा आता तुमची मते!

Angry

अरेरे ! पाकिस्तानच्या लोकान्नी असे बोलायला नको होते.

दोघानाही अश्वत्थाम्याची गोष्ट वाचायला द्यायला हवी.

इब्लीस म्हणजे काऊ हे सिध्द झाले आहे. वांग आणि पावटे कष्टाचे असले तरी वातुळ असते. डायरेक्ट डोक्यात जातो असला वात. सुंठ खा जरा आयुर्वेदीक असली तरी गुणकारी असते.

पाकिस्तानी जनतेला भारताविरुद्ध भडकावण्यात तेथील काही गटांचा, व्यक्तींचा स्वार्थ आहेच. पण पाकिस्तानी जनतेने त्यांना बळी न पडण्यातच पाकिस्तानचे आणि भारताचेही हित आहे.

पाकिस्तानी वृत्तपत्राचा संकेतस्थळावरील या काही पाकिस्तानी आणि त्याहून अधिक भारतीयांच्याच प्रतिक्रिया.

http://www.dawn.com/news/1151402#comments

http://www.dawn.com/news/1151599/peshawar-attack-as-india-mourns-with-pa...

http://www.dawn.com/news/1151602#comments

आतंकवादावर जागतिक उपायांचा धागा काढला <<<<<< पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या विधानाचा तीव्र निषेध आहे . हा धागा फक्त पेशावर मध्ये झालेल्या घटनेला अनुसरून नसून आतंकवाद्याच्या सर्व कार्यावायाबद्दल एकाधि जागतिक संघटना उभारून आतंकवाद मुळापासून उपटून टाकावा यासाठी आहे .

यांची मानसिकता कधी बदलणार नाही
आणि इथल्या अतिरेक्यांना समर्थन देणार्‍यांची देखील मानसिकता बदलणार नाही

आत्ता पाकिस्तानी नागरिकांचे स्टेटमेंट आले.

आमच्या मुलांना का मारले? हिंदुस्तानी मुले मारली असती तर काहीतरी अर्थ होता. >>>>>

पाकिस्तानी जनतेने आपले खरे रंग दाखवलेच. काही माबोकर जे म्हणत होते ते आता पटायला लागलंय की शत्रु तो शत्रुच. पेशावर घटनेनंतर भारतातील संसदेपासुन शाळेतील मुलांनीसुध्दा दोन मिनिटे शांतता पाळुन त्या मुलांना श्रध्दांजली वाहिली होती आणि पाकडे भारतीय मुलांना मारण्याची चिथावणी देत आहेत. पाकिस्तानी जनतेचा त्रिवार निषेध!!!

डॉ. उस्मान, अर्शद मेहमूदला फाशी देण्यात आली. पाकिस्तानचे स्वागत करु या.

===
टीटीपी व तालिबान दोन्ही एकच संघटना नाहियेत. भारतीय मिडियाचा मुर्खपणा परत एकदा अधोरेखीत झाला.

तालिबान ही अफगानी कट्टरपंथीयांची आतंकवादी संघटना असून तेहरिक-ए- तालिबान-पाकिस्तान (टीटीपी) ही पाकिस्तानी कट्टरपंथीयांची संघटना आहे.

--------
तालिबानः तालिबानचा संस्थापक - मुल्ला मो. ओमर,
स्थापना: १९९४, हेडक्वार्टर्स- कंधार.
फायनान्सर/सपोर्टरः- अल-कायदा व लादेन (आता अरब संघटना).
विरोधकः अफगाण सरकार.

-------

तेहरिक-ए तालिबान पाकिस्तान (टीटीपी):
संस्थापकः- बैतुल्लाह मसूद. (आजचा कमांडर- मौलाना फजल उल्लाह)
स्थापना: २००७, हेडक्वार्टर्सः- नॉर्थ वजिरीस्तान(पाकिस्तान)
फायनान्सर/सपोर्टरः- (?)
विरोधकः- पाकिस्तान सरकार व आय.एस.आय. पाकिस्तान आर्मी.

मुख्य मागणी: पाकिस्तानची फाडणी करुन वजीरिस्तान/खैबर-पक्तून्ख्वा प्रांत वेगळा हवा आहे.
------

टीटीपीचे एकूण स्वरुप पाहिल्यास या संघटने चा सर्वात जास्त फायदा कोणाला होत असेल हे सुज्ञाना सांगणे न लगे. त्याच बरोबर यांना फंडीग करणे व शस्त्र पुरविण्याचे काम कोण करत असेल याचाही जरा विचार करुन पहा. पाकिस्तान आर्मी फक्त टीटीपीच्या मागे लागली आहे तालिबानच्या नाही हे ही लक्षात असू द्या.

तालिबानचे सगळे मोठे म्होरके पाकिस्तान आर्मीच्या आश्रयाला आहेत. जमात-उद-दावाचा सईद, अजहर मेहमूद व दाऊद इब्राहीम असे सगळे नामी आतंकवादी पाकिस्तान आर्मीचे पाहुणे आहेत. फक्त टीटीपी एकटाच त्यांचा शत्रू आहे.

आपले पेपर्वाले मात्र दोघानाही एकच समजून बातम्या छापत आहेत. निव्वड मुर्खपणा!

इब्लिस व काउ वेगळे.आहेत.

इब्लिस. सर्जन अहेत. काउ जी पी

>>>पाकिस्तानी नागरिकांनी केलेल्या विधानाचा तीव्र निषेध आहे . हा धागा फक्त पेशावर मध्ये झालेल्या घटनेला अनुसरून नसून आतंकवाद्याच्या सर्व कार्यावायाबद्दल एकाधि जागतिक संघटना उभारून आतंकवाद मुळापासून उपटून टाकावा यासाठी आहे <<<

विश्या, ते वाक्य तुम्हाला नव्हे तर पगारेसाहेबांना उद्देशून आहे.

++++++आत्ता पाकिस्तानी नागरिकांचे स्टेटमेंट आले.
आमच्या मुलांना का मारले? हिंदुस्तानी मुले मारली असती तर काहीतरी अर्थ होता ++++

हे नुस्तेच स्टेटमेंट नाही, सध्या सिमीचे अतिरेकी आता पेशावर सारखा अतिरेकी हल्ला दिल्लीतील शाळेत
करण्याचा प्लान करताहेत, त्यात सिमीचे अतिरेकी आणि बाकीचे स्लिपर सेलस ह्यात सहभागी होतील
अश्या प्रकारची इंटीलिजंस आपल्या सुरक्षा व्यवस्थेला मिळालेली आहे.

हे सिमीचे अतिरेकी अगोदरच जेल मधुन पळुन गेले होते.

हे सर्व भारतीय आहेत, आणि ह्या सिमीच्या अतिरेक्यांच्या मुलांना भारतीय सैन्याने मारलेले नाही

शांताराम कागाळे,

तुम्ही आणि मी एकच आहोत असा एक समज पसरवण्यात काहीजण आनंद मानत आहेत.

दोघांच्याही पोस्ट्स ११.३८ ला आलेल्या पाहूनही ते तेच करत राहतील.

त्यांचा अनुल्लेख केलेला उत्तम!

सुरेख: अगदी बरोबर म्हणताय आपण! जवखेडा हत्याकांडात अपराधी आणि हत्या झालेले सर्वच बौद्ध बांधव होते. पण त्याला राजकारण्यांनी जातिय रंग देण्याचा प्रयत्न केला.

पण इथे पाकिस्तानी हत्याकांडाला खुपच जास्त TRP दिला जात आहे. याच अतिरेक्यांनी जेव्हा सुदान आणि दक्षिण आफ्रीकेत शाळांमधे घुसून जेव्हा निष्पाप शाळकरी मुलांना हालहाल करुन मारले, तेव्हा हे मिडियावाले कुठे गेले होते?

Pages