आतंकवाद-- जागतिक संकट

Submitted by विश्या on 16 December, 2014 - 06:20

मागच्याच आठवड्यात मलाला या १७ वर्षीय विद्यार्थिनीला नोबेल हा पुरस्कार भेटला तिने केलेला शिक्षण प्रचार व काम याचा बदलाच जणू आज आतंकवादी संघटनेने घेतला आहे .
अतिशय क्रूर व अमानवी असा भ्याड हल्ला आज पाकिस्तानातील पेशावर या ठिकाणी विद्यार्थ्यावर झाला, फक्त ऐकले तरी अंगावर काटा येतो. उद्याचे भविष्यच जणू संपवायचा विचाराने हा हल्ला पाकिस्तानात झाला .
मालालाने अतिशय प्रामाणिक पणे व कष्टाने शिक्षण व त्याचा प्रसार करण्याचे काम केले आहे पण अश्या हल्ल्याने उद्या पालक मुलांना शाळेत सोडताना विचार करतील

rsz_303442-pakatc7.gif
१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत . कालच सिडनी येथे आतंक माजवला होता ४० ते ५० नागरिकांना ओलिस ठेवले होतो , त्याच्याच दुसर्या दिवशी हा भ्याड हल्ला यावरून एकच सांगता येईल आतंकवाद हे जागतिक संकट आहे त्याचा बिमोड करण्यासाठी सर्व देशांनी एकत्र येउन पावले उचलली पाहिजेत . जर नैसर्गिक आपत्ती आली तर प्रत्येक देश आपल्या परीने मदत करतो तसेच आतंकवाद संपवण्यासाठी जागतिक स्तरावर काही तरी अश्या संघटना उभारल्या पाहिजेत ज्यांची भीती आतांक्वन्द्याना वाटली पाहिजे .
10850314_10154960380600271_6758740036917295825_n.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुल ही मुलच असतात मग ती या देशातील असो या इतर कोणत्याही देशातील

अतिशय निंदणीय कृत्य आहे भर रस्त्यात या अतिरेक्यांना जिवंत जाळले पाहिजे

ह्या क्रूर कृत्याचा तीव्र निषेध!

दहशतवाद ही वृत्ती आहे. फक्त दहशतवादी माणसे संपवून ती कधीच संपणार नाही. तिच्यावर कायमस्वरूपी अंकुश, वचक व लक्ष ठेवावे लागेल. त्यांना स्वतःला जबरदस्त दरारा व भीती बसेल अशी शिक्षा व्हायला हवी. धूर्तपणे त्यांची ताकद असलेला पैसा, शस्त्रे व 'आय हॅव नथिंग टू लूज' अ‍ॅटिट्यूडची माणसे त्यांच्यापासून तोडायला हवीत.

मला एकदा असे वाटते की तो फोटो असू द्यावा. ते एक दुर्दैवी सत्य आहे आणि ते दिसत राहिल्यास दहशतवादाचा सतत राग येत राहील व वाढत राहील.

नको राग मनात आहेच आणि तो वाढतच जाणार, फोटोची गरज नाही... फोटो बघून माझाच मुलगा आहे तिथे असे वाटत रहाते, नकोच फोटो, प्लीज!

पाकिस्तान हे जागतिक दहशतवादाचे केन्द्र आहे. करावे तसे भरावे याचा अनुभव पाकिस्तान घेत आहे. दुर्दैवाने यात लहान मुले या वेळी मोठ्या संख्येने भरडली गेली. तरीही पाकिस्तानला अक्कल येईल ही आशा नाहीच.

फक्त दहशतवादी माणसे संपवून ती कधीच संपणार नाही. तिच्यावर कायमस्वरूपी अंकुश, वचक व लक्ष ठेवावे लागेल. त्यांना स्वतःला जबरदस्त दरारा व भीती बसेल अशी शिक्षा व्हायला हवी. धूर्तपणे त्यांची ताकद असलेला पैसा, शस्त्रे व 'आय हॅव नथिंग टू लूज' अ‍ॅटिट्यूडची माणसे त्यांच्यापासून तोडायला हवीत.<<<<<<<<<<< बरोबर आहे आणि म्हणूनच जागतिक स्तरावर अशी एकाधि संघटना तयार केली पाहिजे कि त्या संघटनेच्या भीतीने आतंकवादी जन्माला येण्यापुर्वीच जीव सोडेल , अशी रचना आणि कार्य या संघटनेच असायला हव .

जागतिक दहशतवादाचे केन्द्र आहे <<<<<<< पण आता आतंकवाद सिमेपुर्ता मर्यादित न राहता पूर्ण पणे जगभर स्वताचा विळाका घालत आहे .

>>>करावे तसे भरावे याचा अनुभव पाकिस्तान घेत आहे. <<<

आय अ‍ॅम शुअर कोकणस्थ, की आपल्याच देशातील काही मुले मेली ह्याचेसुद्धा तेथील मूर्ख राजकीय नेत्यांना (इकडे आपल्याला झाले आहे इतके) दु:ख झालेले नसेल. त्यांना ही बातमी जगभर पसरली ह्याचे अधिक वाईट वाटत असेल. त्यांच्याकडे लहान प्रमाणावर अशी अत्यंत क्रूर कृत्ये दररोज घडत असतात. दे आर यूझ्ड टू सच थिंग्ज रिअली!

Sad

बातमी कळल्यापासून अतिशय डिस्टर्ब झालो आहे. त्या मुलांच्या पालकांची काय अवस्था झाली असेल याचा विचारही करवत नाहीये. मोठ्या मुश्कीलीने डोळ्यातील अश्रू थांबवतोय.
काय अरे ही कसली माणसे...पशू यांच्यापेक्षा लाख पटीने बरे..कसली ही घृणास्पद मनोवृत्ती. निष्पाप लहान मुलांना रांगेत उभे राहून गोळ्या घालणे हा यांचा पुरुषार्थ...

जाम कसेतरी होतेय. आणि आता त्यांनी खुलासा केलाय म्हणे आर्मी आमच्या कुटुंबांवर हल्ला करते त्याचा बदला म्हणून. त्यांना आमचे दुख समजावे म्हणून...

म्हणून कोवळ्या मुलांना असे मारणार...यांना दगडाने ठेचून मारणे हीच शिक्षा योग्य. सर्व जगाने एकत्र येऊन या तालिबान्यांचा नायनाट केला पाहिजे नाहीतर सगळे जग हे पुन्हा मध्ययुगात घेऊन जातील. अतिशय घातकी जमात.

मला एकदा असे वाटते की तो फोटो असू द्यावा. ते एक दुर्दैवी सत्य आहे आणि ते दिसत राहिल्यास दहशतवादाचा सतत राग येत राहील व वाढत राहील.<<<<<<< पण admin आणि बरेच मा बो कर तो फोटो काढण्यासाठी सांगत होते त्यामुळे काढत आहे .

अ‍ॅडमीन ह्यांचे सांगणे योग्यच! माझी आधीची नोंद निव्वळ भावनिक होती इतके विचारात घेऊन कृपया कोणी गैरसमज करून घेऊ नयेत.

तालिबान काय, ISIS काय आणखी कुणी काय, ह्या संघटना आणि अतिरेकी असे उगवतच राहणार जो पर्यंत त्यांना पर्याप्त प्रमाणात काही लोकांचा पाठींबा आहे. कारण शेवटी हे अतिरेकी म्हणजे लोकच ना, आकाशातून तर नाही टपकलेले. लोकांनी असल्या माथेफिरू कृत्यात भाग घेणं आणि नैतिक आणि आर्थिक पाठींबा देणं सोडलं तर आपोआप या संघटना बाराच्या भावात जातील.

१०० ते १२० विधार्थ्याना आपला जीव गमवावा लागला आहे तर तितकेच विध्यार्थी जखमी अवस्तेत जीवन मरण्याच्या उंबरठ्यावर झुंज देत आहेत .
>>>>>
बापरे... हा आकडा एवढा झाला

एखाद्या नैसर्गिक आपत्तीत हजारो मरतात तेव्हा आयुष्याचाच भाग म्हणून त्याकडे बघता येत, मात्र माणसेच जेव्हा माणसांना नाहक मारतात तेव्हा जीवाला त्रास होतोच. मुर्ख पाकिस्तान स्वताच वाट लावलीय त्यांनी..

ह्या दहशतवादी कृत्याचा तीव्र निषेध !
चिड , संताप , घृणा सर्व काही दाटून आलय मनात . त्या लहान मुलांनी काय बिघडवल आहे तुमच . माणस नाहीत ही राक्षस आहेत Angry

आशुचैम्प +1

आर्थिक पाठींबा देणं सोडलं तर आपोआप या संघटना बाराच्या भावात जातील.>>>> आता तरी हे शक्य नाही असाच वाटतंय कारण हे लोक इतके ताकतवर झालेत कि कोणत्याही देशात अगदी आरामात आतंक करत आहेत . यांचा बिमोड करणे हे खूप गरजेचे आहे .

भारतच ह्या हल्याच्या मागे !! भारताने १६ डिसेंबर हा दिवस निवडला आहे.

झाईद हमिद, ट्विटर अकाँऊट भारताविरुद्ध प्रचार करतोय.

झैद हमिद हा पोलिटीकल कॉमेंटेटर आहे. त्या च्या ट्विटर अकाँऊट ला लाख भर लोक फॉलो करतात,

तीव्र निषेध !..
राष्ट्रापेक्षा धर्माला महत्त्व दिलं कि असे भ्याड ह्ल्ले होतात.आणी निरपराध माणसांचेच बळी जातात !

http://maharashtratimes.indiatimes.com/international/Pakistan-running-sp...

आजचा दिवस म्हणजे मानवी इतिहासातील काळा दिवस आहे. अतिशय वाईट घटना आहे ही. त्या निरागस बालकांचा काय अपराध होता. पाकिस्तानने कायमच छुप्या दहशतवादाचा पुरस्कार केला मग तो लादेन असो वा दाउद. २-३ पिढ्या या दहशत वादाने खाऊन टाकल्या आहेत. ही घटना म्हणजेच पेरलेले उगवल्याची नांदी आहे. राष्ट्रापेक्षा धर्माला महत्त्व दिलं कि काय होतं समाजाचं .....हे दिसून येतंय ..... जे पेराल तेच उगवेल...आता स्वत पाकिस्तानच्या हातात पण काही राहिलेले नाही...वेळ कधीच निघून गेली आहे...वेळीच आवर घातला असता कट्टरपंथीयांना तर हि वेळ कधीच आली नसती...

तरीही त्या लहान मुलांबद्दल वाईट वाटते. ईश्वर मृतात्म्यांना शांती देवो.

आतंकवाद आता सीमेपार गेलाय.. एरवी शांत असणार्‍या स्विसमधेही झुरीक विमानतळावर बाँब ठेवल्याची आवई उठली होती, असे पेपरमधे वाचले.

आता हा भस्मासूर कुणाच्याच ताब्यात राहिलेला नाही. सर्व जग एकवटून प्रतिकार करेल तरच काहीतरी आशा आहे.

एखाद्या नैसर्गिक आपत्तीत हजारो मरतात तेव्हा आयुष्याचाच भाग म्हणून त्याकडे बघता येत, मात्र माणसेच जेव्हा माणसांना नाहक मारतात तेव्हा जीवाला त्रास होतोच. मुर्ख पाकिस्तान स्वताच वाट लावलीय त्यांनी..>>>>>>>>>>>>>>>१००० अनुमोदन.

Pages