बेक्ड बाकरवडी(फोटोसहित)

Submitted by देवीका on 4 December, 2014 - 14:51
baked bakarwadi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पारी:
१ वाटी बारीक बेसन,
पाव वाटी मूगाचे पीठ,
पाव वाटी बारीक कणीक,
१ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन,
चवीला मीठ,
चिमटीभर हिंग,
चिमटी भर हळद(रंगासाठी)
पाव चमचा लाल मिरची पूड(रंगासाठी),
पाणी लागेल तसे,

सारणः
ओले खोवलेले खोबरे पाव वाटी,
१ टेबलस्पून तीळ,
१ टेबलस्पून खसखस,
१ चमचा काळे मनुके भिजत घातलेले व निथळून घेतलेले,
१ चमचा भरड वाटलेली बडीशेप,
अर्धा चमचा भरड वाटलेले धणे,
१ चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्यांचे समप्रमाण घेवून केलेली पेस्ट,
१ चमचा ताजा गरम मसाला कच्चा बारीक वाटलेला( ४ काड्या लवंग, एक इंच दालचिनी काडी, पाव चमचा जीरं, १ लहानशी मसाला वेलची),
बुचकाभर धूवून, निथळून वाळवलेली कोंथिबीर बारीक कापून,
चवीला मीठ,

लडी बनवताना:
किंचितसे कोमट तेल,
२ चमचे गाळून घेतलेला चिंचेचा कोळ,त्यात पाव चमचा(लहान) गूळ विरघळून
१ चमचा बेसन पाण्यात भिजवून सरसरीत केलेली पेस्ट,

क्रमवार पाककृती: 

१. कडकडीत तेलाची मोहन घालून पारी एकदम घट्ट भिजवून झाकून ठेवावी.
२. सारणाचे जिन्नस कच्चेच घेवून एकत्र भरड वाटावे. मनुके वेगळी बारीक वाटावे व एकत्र करावे.
३. बडीशेप,धणे,हिआल पेस्ट, गरम मसाला व कोथिंबीर टाकून एकजीव करावे.

४.पीठ पुन्हा हाताने मळून घेवून त्याची मध्यम आकाराची(ना जाड काठ, ना बारीक काठ) अशी पोळी करवी.
५. जरासेच तेल हाताने पसरून लावावे. मी तेलाचा स्प्रे किंचितसा मारते.
६. चमच्याने चिंचेचा कोळ प्रमाणात पसरावा. एकदम ओतून पोळी फाडू नये.
७. आता मिश्रण समप्रमाणात पसरावे पोळीवर.
८. वरून बेसनाच्या पेस्टचा हात असा पसरावा की ते एकसंध होइल. खडबडीत दिसणार नाही.
९. आता पोळी वळत जावी. वळताना मध्ये मध्ये दाब द्यावा. व आपल्याला पाहिजे तसा आकार द्यावा. म्हणजे पिरॅमिड करायचा असेल तर तसा करत बंद करावी.
१०. धारदार सुरीन पातळ, एक साईजच्या वड्या करून बेकींग्च्या पसरट ट्रे वर तेलाचा स्प्रे मारून मग त्या मध्ये १० मिनीटे सुकायला ठेवाव्या.
११. तोवर अवन २३० डीग्री फॅरेन्हाईट तापवाव. दोन तासाचे सेटींग करावे.
१२. १० मिनिटाने ट्रे आत ठेवावा. दर अर्धा तासाने पलटून ठेवाव्या. दोन तासाने अवन बंद करून तश्याच अवनमध्ये आत ठेवाव्या.
मस्त कुरकुरीत वड्या तयार. फोटो थोड्याच वेळात टाकेन.

2014-12-04 002 (357x400).jpg2014-12-04 001 (300x400).jpg2014-11-13 002 (364x400).jpg2014-11-13 001 (400x370).jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ्या कमी
अधिक टिपा: 

पारीचे पीठ घट्ट असावे.
मोहन कडकडीत तेलाचे घालून पीठ झाकून ठेवावे. मग बेताचेच पाणी घालून घट्ट मिळावे.
करण्याआधी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावे पारीचे पीठ,
मूगाचे पीठ नसेल तर, तेवढेच बेसन वाढवावे. मूगाच्या पीठाने चव येते ज्यास्त. बाजारात बेसन कमी व मैदा ज्यास्त असतो. त्यापेक्षा मूग पीठ घातले तर ज्यास्त चवीष्ट होतात.
आतला मसाला नीट सुकला असला पाहिजे. तसे नसेल तर थोडा वेळ आणखी कमी तापमानावर ठेवा. नाहितर बुरशी येइल.
टीप हिच की, कमी तापमानावर ज्यास्त वेळ ठेवलयास कुरकुरीत होतात.

माहितीचा स्रोत: 
मोठी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नशीब, आईआजी नाही लिहिले. Proud

(सगळ्यांना नाही म्हटले तरी सिरियलीचे वेड आहे का?) दिवा घ्या. Happy

ह्यावरून आठवलं, मी बडी मां, छोटी मां, काकी मां असं नॉर्थ, बंगाली लोकांकडून एकलंय ज्यास्त.
मराठी लोकांमध्ये, फक्त आता सिरियलीतून एकलय.
तुम्ही खरच मोठी आई हाक मारता का?

मराठीत ही काही लोक वापरतात मोठ्या काकु ला मोठी आई असा शब्द!
असो!
मुगाचे पीठ नसल्याने करता येणार नाही Sad

माझ्याकडे आहे मुगाचे पिठ:स्मितः:

मावेमध्ये किती वेळ ठेवावे लागेल?

तुम्ही खरच मोठी आई हाक मारता का? >> आमच्याकडेतर (सासरी) मोठ्या काकुला सगळे मोठी आईच बोलतात म्हणजे त्या काकु म्हणवुन घेतात. माझ्या लेकीला एकुण ५ मोठ्या काकु, लेकीने काकु हाक मारली तर प्रत्येकजण मोठी आई' बोल गं म्हणुन दरडवायचे. लेक ४ वर्षाची झाली तरी अजुनही कन्फ्युज आहे ५-५ मोठ्या आईंमध्ये. आणि हो मोठ्या काकांना मोठे पप्पा किंवा मोठे आब्बा. Proud

बेक करायची छान आहे आयडीया.

मला नेहमीच बाकरवडी हा प्रकार खायला खुपच मस्त पण करायला खुप खटाटोपाचा आहे असे वाटत राहिले. रेसिपीच इतकी लांब असते त्याची. आता बेक्ड ऑप्शन मिळालाय तर एक्दा प्रयत्न करुन पाहिला पाहिजे.

बाकी सगळं जमेल पण "८. वरून बेसनाच्या पेस्टचा हात असा पसरावा की ते एकसंध होइल. खडबडीत दिसणार नाही." हा प्रकार जमणे कठिण दिसतेय. नक्की काय करायचे तेही निटसे कळले नाही. सारण पसरुन वर पुन्हा पेस्ट लावायची म्हणजे सारण एकत्र गोळा व्हायची खुप मोठी शक्यता.. परत नीटपणे सांगितले तर बरे होईल.

सिंडरेला, मूगाचे पीठ नसेल तर त्याच प्रमाणात आणखी बेसन घ्यावे.

साधना, बेसनाच्या पीठात हाताचा पंजा बुडवून अलगद पणे त्या सारणावर फिरवून सारण जरा दाबावे.
ह्यामुळे वरून लडी घातली की ती मस्त चिकटते.
जमेल तुम्हाला. Happy

झंपी, निलसनने तुमच्या प्रश्णाचे उत्तर दिलेय.

जागू,
मावेची माहीती नाही. म्हणजे तुमचा मावेचा काय सेटींग आहे हे साम्गू शकत नाही. सॉरी.
तुम्ही अवन असेल तर अवन मध्येच करून पहा. काहीही बघायला लागत नाही दोन तास. फक्त पलटाव्या लागतात.

व्वा! मस्तच झाल्यात. तळायची कटकट नको म्हणून बरेच दिवसात बाकरवड्या केल्या नाहित. आता या कृतीने नक्की करणार.

बेसनाला पर्याय?

मी तरी बेसन न वापरता केले नाहित. तरी अंदाजाने सांगेन की, कणीक वाढवून पहा.
नुसते मूगाचे पीठ व कणीक (बेसनाच्या बदल्यात) घेवून करून पहा व तुमचा अनुभव लिहा इथे.

मी चवीला मूगाचे पीठ घातलेय. ज्यास्त छान चव येते. नुसते कडकडीत वडी नाही लागत.

स्वाती२,

तळणं त्रासाचं आहे. तेल मधून मधून गाळून घ्यावं लागतं मसाला बाहेर आला की.

Pages