बेक्ड बाकरवडी(फोटोसहित)

Submitted by देवीका on 4 December, 2014 - 14:51
baked bakarwadi
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

पारी:
१ वाटी बारीक बेसन,
पाव वाटी मूगाचे पीठ,
पाव वाटी बारीक कणीक,
१ टेबलस्पून कडकडीत तेलाचे मोहन,
चवीला मीठ,
चिमटीभर हिंग,
चिमटी भर हळद(रंगासाठी)
पाव चमचा लाल मिरची पूड(रंगासाठी),
पाणी लागेल तसे,

सारणः
ओले खोवलेले खोबरे पाव वाटी,
१ टेबलस्पून तीळ,
१ टेबलस्पून खसखस,
१ चमचा काळे मनुके भिजत घातलेले व निथळून घेतलेले,
१ चमचा भरड वाटलेली बडीशेप,
अर्धा चमचा भरड वाटलेले धणे,
१ चमचा हिरवी मिरची, आलं आणि लसूण ह्यांचे समप्रमाण घेवून केलेली पेस्ट,
१ चमचा ताजा गरम मसाला कच्चा बारीक वाटलेला( ४ काड्या लवंग, एक इंच दालचिनी काडी, पाव चमचा जीरं, १ लहानशी मसाला वेलची),
बुचकाभर धूवून, निथळून वाळवलेली कोंथिबीर बारीक कापून,
चवीला मीठ,

लडी बनवताना:
किंचितसे कोमट तेल,
२ चमचे गाळून घेतलेला चिंचेचा कोळ,त्यात पाव चमचा(लहान) गूळ विरघळून
१ चमचा बेसन पाण्यात भिजवून सरसरीत केलेली पेस्ट,

क्रमवार पाककृती: 

१. कडकडीत तेलाची मोहन घालून पारी एकदम घट्ट भिजवून झाकून ठेवावी.
२. सारणाचे जिन्नस कच्चेच घेवून एकत्र भरड वाटावे. मनुके वेगळी बारीक वाटावे व एकत्र करावे.
३. बडीशेप,धणे,हिआल पेस्ट, गरम मसाला व कोथिंबीर टाकून एकजीव करावे.

४.पीठ पुन्हा हाताने मळून घेवून त्याची मध्यम आकाराची(ना जाड काठ, ना बारीक काठ) अशी पोळी करवी.
५. जरासेच तेल हाताने पसरून लावावे. मी तेलाचा स्प्रे किंचितसा मारते.
६. चमच्याने चिंचेचा कोळ प्रमाणात पसरावा. एकदम ओतून पोळी फाडू नये.
७. आता मिश्रण समप्रमाणात पसरावे पोळीवर.
८. वरून बेसनाच्या पेस्टचा हात असा पसरावा की ते एकसंध होइल. खडबडीत दिसणार नाही.
९. आता पोळी वळत जावी. वळताना मध्ये मध्ये दाब द्यावा. व आपल्याला पाहिजे तसा आकार द्यावा. म्हणजे पिरॅमिड करायचा असेल तर तसा करत बंद करावी.
१०. धारदार सुरीन पातळ, एक साईजच्या वड्या करून बेकींग्च्या पसरट ट्रे वर तेलाचा स्प्रे मारून मग त्या मध्ये १० मिनीटे सुकायला ठेवाव्या.
११. तोवर अवन २३० डीग्री फॅरेन्हाईट तापवाव. दोन तासाचे सेटींग करावे.
१२. १० मिनिटाने ट्रे आत ठेवावा. दर अर्धा तासाने पलटून ठेवाव्या. दोन तासाने अवन बंद करून तश्याच अवनमध्ये आत ठेवाव्या.
मस्त कुरकुरीत वड्या तयार. फोटो थोड्याच वेळात टाकेन.

2014-12-04 002 (357x400).jpg2014-12-04 001 (300x400).jpg2014-11-13 002 (364x400).jpg2014-11-13 001 (400x370).jpg

वाढणी/प्रमाण: 
खाल तेवढ्या कमी
अधिक टिपा: 

पारीचे पीठ घट्ट असावे.
मोहन कडकडीत तेलाचे घालून पीठ झाकून ठेवावे. मग बेताचेच पाणी घालून घट्ट मिळावे.
करण्याआधी थोडा वेळ फ्रीज मध्ये ठेवावे पारीचे पीठ,
मूगाचे पीठ नसेल तर, तेवढेच बेसन वाढवावे. मूगाच्या पीठाने चव येते ज्यास्त. बाजारात बेसन कमी व मैदा ज्यास्त असतो. त्यापेक्षा मूग पीठ घातले तर ज्यास्त चवीष्ट होतात.
आतला मसाला नीट सुकला असला पाहिजे. तसे नसेल तर थोडा वेळ आणखी कमी तापमानावर ठेवा. नाहितर बुरशी येइल.
टीप हिच की, कमी तापमानावर ज्यास्त वेळ ठेवलयास कुरकुरीत होतात.

माहितीचा स्रोत: 
मोठी आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद देविका. मला बाकरवड्या खुप आवडतात पण आजवर हिंमत केली नाही. परत ते तळताना सारण बाहेर पडायची देखिल भिती. पण आता करुन पाहिन.

फोटो अगदी चितळ्यांच्या बाकरवडीसारखा आलाय. Happy

(तसा घरुन सल्ला मिळालाय की उगीच आता तु कशाला ह्या भानगडीत पडतेयस.....चितळे बिचारे कष्ट उपसताहेत तुझ्यासाठी Happy )

काळ्या द्राक्षांपासून बनवतात त्याला मनुके आणि हिरव्या द्राक्षांपासून बनवलेले ते बेदाणे. इथे अमेरिकेत सहसा ब्राउन द्राक्षांपासून बनवलेला एकच प्रकार 'रेझिन्स' मिळतो.

वॉव! मस्त दिसताहेत बाकरवड्या. मागे एकदाच तळून केल्या होत्या पण ते सारण तेलात पसरणे वगैरे प्रकार झाल्याने परत कधी त्या वाटेला गेले नाही.

अदीती,
खसखस नाहि घातली तर तुम्हाला चालत असेल तर चालेल ना. Happy

मनुका ह्या काळ्या असतात. (तुम्हाला सिंडरेलानी उत्तर दिलेय).

साधना, अगदी तासाभरात होतात. एकच पोळी करायची व अगदी लहान लहान वडी कापायची. अगदी चितळें सारखी.

फोटोत मोठया दिसल्या तरी वड्या लहानच आहेत त्या.

मी गेल्या रविवारी अशक्य माकाचू केले.
देविका यांची रेसिपी वाचून बेक्ड बाकरवडी बनवायचा प्रयत्न केला. त्यांनी २३० फॅ. ला दोन तास ओवन मधे ठेवायला सांगितले होते. मी ओवनचे सेटींग करून आरामात आंघोळीला गेलो. तज्ञ लोकांना सांगितले होते दोन तास लागतील म्हणून. मधून मधून पलटावे लागेल वगैरे.
त्यांनी मधेच २० -२५ मिनिटात मला हाक मारून सांगितले ते आता काढायला पाहिजे जळल्याचा वास येतोय. आणि मला न विचारता काढले पण ओवन मधून. खरेच काही ठिकाणी काळे झाले होते. एकदम टणक झाल्या होत्या बाकरवड्या. पण चावता येत होत्या. करपल्या नाहीत पण चव बंडल झाली होती.
आता माकाचू.
चव बंडल होण्याचे कारण : माझ प्रमाण काहितरी गंडल होत. धन्याची चव जास्त प्रॉमिनंट होती.
टणक आणि लवकर होण्याचे कारण : मी २३० सें ला सेटींग केले होते. Happy

११. तोवर अवन २३० डीग्री फॅरेन्हाईट तापवाव. दोन तासाचे सेटींग करावे.

२३० डीग्री सें vs २३० डीग्री फॅरेन्हाईट

Pages