आयटेम साँगद्वारे स्त्रीचे भडक चित्रण करणे, द्वयर्थी किंवा उघड अश्लीलता दर्शवणे आणि चार सहा महिने ठेका धरायला पुरे होईल अशी ट्यून देणे ह्या गोष्टी आता सर्वच चित्रपट निर्माते हटकून करताना दिसत आहेत. अश्या आयटेम साँग्जचा जनमानसावर काय प्रभाव पडेल वगैरेचे कोणाला काही पडलेले नाही. करिना, कत्रिना, मल्लिका, मलाइका अश्या आघाडी-पिछाडीच्या नट्या उत्तान कपडे घालून स्वतःलाच तंदुरी मुर्गी वगैरे म्हणत नाचत आहेत. फोटोको सीनेसे, शीलाकी जवानी, जलेबीबाई, हलकट जवानी वगैरे गीते आता गणेशोत्सव व इतर नाचण्याच्या निमित्तांसाठीची मस्ट प्ले गीते झालेली आहेत.
आजमितीला आपल्याकडे वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळे वाद रंगात येत आहेत. कालच हिंदू महासभेचे नितीन त्यागी म्हणाले की मुलींना स्कर्ट आणि जीन्स घालू दिले नाही पाहिजेत. ते असेही म्हणाले की आयटेम साँग करणार्या नट्यांना वेश्या म्हणायला हवे. संकेतस्थळे, सोशल मीडिया ह्यावर स्त्रीच्या बाजूने जनमानस तयार करण्याची प्रक्रिया वेगवान झालेली आहे. कायद्यांबाबतची जागरूकता वाढत आहे. एकीकडे खाप पंचायती मोबाईल फोनच्या वापरावर बंदी आणत आहेत आणि दुसरीकडे कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च पद स्त्रिया भूषवत आहेत.
ही एक नेहमी असते तशीच ट्रान्झिशन फेज आहे. समाज हरघडीला थोडाथोडा व सर्वांगाने बदलत असतो तसेच आत्ताही बदलत आहे. ह्यावेळी होणारा बदल थोडा अधिक वेगवान व थोड्या अधिक चांगल्या गोष्टीसाठी होत आहे असे सेफली म्हणता येईल. म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी सध्या थोडी अधिक पोषक वातावरण निर्मीती करण्याचा निदान हेतू असल्याचे दिसत आहे. गुन्हे उजेडात येण्याचे प्रमाण वाढणे हेही एक प्रकारे वाईटातून चांगले काढणे असले तरी बरेच आहे.
पण नितीन त्यागींचे आयटेम साँग करणार्या नट्यांबाबतचे दै. सकाळमधील मत वाचले आणि अनेक दिवस डोक्यात असलेला विषय पुन्हा प्रखरपणे जाणवला. उत्तम संवादकौशल्य लाभलेल्या, जनमानसात एक करिष्माई प्रतिमा असलेल्या, भारतीय कलाकारीचे जगासमोर प्रतिनिधित्व करणार्या, अभिनयनिपूण, प्रगत व स्त्रीसाठी अधिक चांगले दिवस आणणार्या जगात वाढलेल्या नट्या आयटेम साँग करताना जबाबदारीने का वागत नसतील? आपल्या गीताद्वारे आपण नकळत्या, उमलत्या पिढीसमोर स्त्रीचे चित्रण अयोग्य रीतीने करत आहोत हे भान त्यांना नसेल असे नक्कीच वाटत नाही. एक गाणे केले की अमाप पैसेही मिळतात आणि बाकी काही कमिटमेंटही नाही हे सोयीचे वाटत असेल का? ह्या प्रकारावर नियंत्रण यावे असे आपल्यापैकी काहींना वाटते का? की ह्यालाही स्त्रीचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणता येईल? अश्या आयटेम साँगमध्ये सहसा प्रमुख अभिनेत्रीच्या आजूबाजूला अनेक मद्यपी हावभाव करत नाचत असतात त्यांचे अनुकरण सडकछापांनी केले तर सगळा दोष त्या सडकछापांचा म्हणता येईल का? हेलनच्या जमान्यात असलेले उत्तान डान्सेस हे चित्रपटातील केवळ एक किरकोळ आकर्षण असायचे. त्याचसोबतीला प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय, वास्तव चित्रण, सशक्त कथानक, अर्थपूर्ण व कथेला पुढे नेणारी सुश्राव्य गीते हेही सगळे असायचे. आताच्या मारामार्या, सीन्स, विनोदांचे प्रकार, संवाद, अद्भुत कथानके हे सगळे मुळातच मन खिळवू शकत नाहीत, त्यात आणखीन ती निव्वळ घालायची म्हणून घातलेली आयटेम साँग्ज! आयटेम साँग नसेल तर चित्रपटात आपण काहीतरी मिस केले अशी भावना निर्माण होईल का? एखादे उत्तान दृष्य दाखवणे हे कदाचित कथानकाचा भाग म्हणता येईलही, पण आयटेम साँग हे कथानकाचा भाग असल्याची उदाहरणे अलीकडच्या चित्रपटात तरी दिसलेली नाहीत. शोलेमधील मेहबूबा आणि मै झंडू बाम हुई ह्यात हाच थेट फरक आहे.
काही कलावंतांनी खासगीत 'अशी गाणी निर्माण होऊ नयेत व निदान त्यावर लहान मुलांना स्पर्धेत नाचायला लावू नये' अशी खंत व्यक्त केली.
अशी आयटेम साँग्ज निर्माण होणे हे थेट पोर्नोग्राफीपेक्षा भयंकर असावे असे वाटते,
त्या त्या नट्या अडीच ते पाच लाखपर्यंत 'मान'धन स्वीकारून तेच आयटेम साँग एखाद्या समारंभातही सादर करताना दिसतात. म्हणजे जे आजवर चित्रपटात असल्याने अप्राप्य व काल्पनिक वाटण्याची एक किमान शक्यता होती तीही मावळू लागेल.
कृपया खालील काही मुद्यांवर चर्चा व्हावी:
१. मराठी चित्रपटातील लावणी / तमाशा ह्यांची तुलना आयटेम साँगशी करता काय साम्य / फरक वाटतात?
२. आयटेम साँगचे दुष्परिणाम होत असल्याचे तुमचे काही अनुभव आहेत काय? (सोसायटी / मित्रपरिवारात)
३. आपल्या पाल्यांना नृत्य शिकवताना किंवा स्पर्धांमध्ये धाडताना तुम्ही अश्या गीतांवर त्यांनी नृत्य करावे की नाही ह्याबाबत काय भूमिका बाळगता?
४. तुम्हाला स्वतःला एखाद्या पार्टीत नृत्य करण्याची वेळ आली तर एक पुरुष म्हणून / एक स्त्री म्हणून अश्या गीतांवर तुम्ही थिरकता का? तो आनंद मिळवणे वेगळे व अशी गीते बनू नयेत असे वाटणे वेगळे अशी द्विधा मनस्थिती काहींची होऊ शकते का?
वगैरे!
इतरही काही संबंधीत विषय मनात असतील तर अवश्य लिहावेत.
धन्यवाद!
=============
-'बेफिकीर'!
रिया तु जो शेर चा किस्सा
रिया तु जो शेर चा किस्सा सांगितलायस तो बेस्टे
आताचा जमाना सनी लिऑन वगैरेंचा
आताचा जमाना सनी लिऑन वगैरेंचा असल्यामुळे मलायका कतरिना या आता काही वर्षांमधे सोज्ज्वळ आणि सुसंस्कृत वाटु लागतील
आणि हेलन ग्रेसफुल होती तर
आणि हेलन ग्रेसफुल होती तर रश्मी ला सुवर्ण सुंदरी का बघायला लावला?>>>>> माझ्या आई-वडिलाना शास्त्रोक्त सन्गीताची अतीशय आवड होती आणी आहे. पण अगबै तिसरी मन्झील नको बघुस, ती हेलन पाचकळ आहे असे नाही कधी ऐकले. पण आजकालच्या तरुण आया पण खाजगीत मान्य करतात की मुन्नी, शीला अश्लिल वाटते.
चिकनी चमेली पौव्वा चढाके आयी हे गाणे सर्वान्ग रवि फिरवत का म्हणले देव जाणे.:अओ:
पण आजकालच्या तरुण आया पण
पण आजकालच्या तरुण आया पण खाजगीत मान्य करतात की मुन्नी, शीला अश्लिल वाटते.
>>
My point exactly.
रश्मि अनुमोदन. कोक्या तुला
रश्मि अनुमोदन. कोक्या तुला पण. तु हा मुद्दा नीट् मांडलायस आधीच्या पानावर पण लोकांनी सोयिस्कर दुर्लक्ष केले आहे.
ते हेलनचे फेमस १९७० मधले
ते हेलनचे फेमस १९७० मधले "शोला सा तन दहके आके बुझाजा" आणि " तन की ज्वाला ठंडी हो जा ऐसे गले लगा जा" हे गाणे मी २०१४ मधे सुद्धा माझ्या १३ वर्षाच्या मुलीच्या समोर म्हणुन शकत नाही.
पुन्हा आणि पुन्हा "हेलनची २-३ गाणी बघुन मते बनवू नका. समग्र हेलन बघा आणि मत बनवा"
कतरीना व्हल्गर म्हणजे तिचा नाच व्हल्गर. समजून घ्या.>>> मला कतरीना चा डान्स पण वल्गर वाटत नाही. आणि करीना इत्यादी इत्यादींचा सुद्धा.
मिनाक्षी शिरोडकरांनी ब्रह्मचारी नाटकात स्विमिंग सुट घातला त्याचा इश्यू झाला>>>>>>> डींपल नी बॉबी २ पीस घातला तसा अजुन पण कोणी घातला नाही. अगदी आयटम साँग मधे पण कोणी इतके कमी कपडे घातले नाहीत अजुन पर्यंत.
हेलन च्या कीती कॅब्रे मुळे सिनेमाची कथा पुढे सरकली हा पण संशोधनाचा विषय होऊ शकतो. पुन्हा २-३ उदाहरणे घेउ नका. २०० तरी कॅब्रे केले आहेत तिने.
आजकालच्या तरुण आया पण खाजगीत
आजकालच्या तरुण आया पण खाजगीत मान्य करतात की मुन्नी, शीला अश्लिल वाटते.>>>>>
@रश्मी - बायकांना वाटणारच ना अश्लील, ते जेलसी तुन येते. त्या तरुण आयांच्या तरुण नवर्यांना विचारा.
टोचा तुम्ही धन्य आहात.
टोचा तुम्ही धन्य आहात. तुमच्याशी कुठेच अॅग्री होता येणार नाही.
टोचा तुम्ही धन्य आहात.
टोचा तुम्ही धन्य आहात. तुमच्याशी कुठेच अॅग्री होता येणार नाही. > १०० प्रतिसाद आल्यानंतर आपल्याला कळले ?

कालच हिंदू महासभेचे नितीन
कालच हिंदू महासभेचे नितीन त्यागी म्हणाले की मुलींना स्कर्ट आणि जीन्स घालू दिले नाही पाहिजेत. ते असेही म्हणाले की आयटेम साँग करणार्या नट्यांना वेश्या म्हणायला हवे.
>>>>
ज्याच्यावरुन इतके रामायन महाभारत हा धागा चालु झालेला आहे. त्यावर देखील २ शब्द बोलायचे कष्ट घ्यावे
टोचा तुम्ही धन्य आहात.
टोचा तुम्ही धन्य आहात. तुमच्याशी कुठेच अॅग्री होता येणार नाही. >> +१०००००००००
. > १०० प्रतिसाद आल्यानंतर आपल्याला कळले ?>> त्यांना काहीतरी समजेल अशी आशा होती हो
एकच उपाय बेबी डॉल हे गाणे
एकच उपाय बेबी डॉल हे गाणे दाखवा
( वैधानिक सुचना:- गाण्यात असणारे शब्द "सोने दी" याचा अर्थ सोन्याची / गोल्डन असा आहे आणि कृपया असाच घ्यावा )
धन्यवाद
>> ह्यालाही स्त्रीचे
>> ह्यालाही स्त्रीचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणता येईल?
हो.
मुलींनी (किंवा मुलांनी किंवा अमक्या गटाने) वैयक्तिक आयुष्यात अमके कपडे घालावेत/ घालू नयेत. हे सगळे व्यक्तिस्वातंत्र्याचा संकोच करणारे निर्बंध आहेत. कुठल्याच परिस्थितीत ते स्वीकारार्ह नाहीत.
तसेच इतरांच्या पर्सनल स्पेसचा आदर करणे हा महत्त्वाचा संस्कार प्रत्येकावर व्हायला हवा. कोणतेही कपडे घातले असतील, कोणत्याही स्तरातली व्यक्ती असेल तरी तिला तितकीच स्पेस द्यायला हवी असे मला वाटते.
दक्षिणा तुझा पहिला मोठा
दक्षिणा तुझा पहिला मोठा प्रतिसाद मस्त आहे
अहो दिवाकर आधी कळले होते हो,
अहो दिवाकर आधी कळले होते हो, पण टोचाना कळुन पण वळत नव्हते म्हणून प्रतीसाद लिहीत गेले.:फिदी:
मृदुला, माझा प्रश्न थोडा
मृदुला,
माझा प्रश्न थोडा निराळा आहे. आयटेम साँगमध्ये शोभतील असे कपडे घालून कोणी रस्त्यावर हिंडू लागले तर त्यावर प्रतिक्रिया यायच्या त्या येवोत पण ते त्या स्त्रीचे व्यक्तीस्वातंत्र्यच आहे ह्यात शंका नाही. पण आयटेम साँगच्या चित्रणात ते कपडे मुद्दाम घालून 'आयटेम' दिसणे व तो 'आयटेमपणा' विकू पाहणे ह्याला व्यक्तीस्वातंत्र्य असे संबोधून कानाडोळा व्हावा का असा प्रश्न आहे.
कोकणस्थ,
बीभत्स ह्या शब्दाचा अर्थ अश्लील ह्या शब्दाच्या अर्थापेक्षा वेगळा आहे. अश्लील म्हणजे त्या त्या समाजातील श्लील-अश्लीलतेच्या परिभाषांना न जुमानून केलेले वर्तन म्हणता येईल. बीभत्स म्हणजे गलिच्छ, ओंगळवाणे, तिरस्करणीय, अभिरुचीहीन, विकृतीदर्शक असे काहीतरी!
शब्दशः अर्थ येथील शब्दार्थ धाग्यावर वगैरे असेल बहुधा!
हेलनची नृत्ये ओंगळवाणी वाटायची. त्या बाबतीत मात्र आजकालच्या नट्या सुधारल्या आहेत. त्या अश्लील हावभाव करत असल्या तरी ते हावभाव करताना त्या निदान 'किमान आकर्षक' दिसतील हे बघतात. त्या बाबतीत एकुणच पिढी सुधारली आहे असेही म्हणता येईल. पूर्वीच्या काळच्या कॉलेज युवती बरेचदा बावळट, चप्प वगैरे वावरायच्या. आजकाल मुलेही जीम वगैरेला जाऊन, पार्लरमध्ये पैसे घालवून, अॅक्सेसरीज, सेलफोनबाबत वगैरे चोखंदळ राहून 'आपण बेस्ट पॉसीबल' दिसू हे नक्की करताना दिसतात.
धागा बराच पुढे गेलाय, पण
धागा बराच पुढे गेलाय, पण चुकीच्या दिशेने, म्हणून मी तिथूनच सुरुवात करतो जिथे मी सोडून गेलो होतो...
हेलन हि ग्रेसफुल्ल होती, कमालीची सुंदर नृत्यांगणा होती, लाजवाब डान्सर होती, तिची कामावरची निष्ठा.. लाब लाब लाब.. सारे कबूल!
पण या सर्वांने तिच्या अंगावरचे तोकडे कपडे मोठे होणार नव्हते.
जर तिचा अंगप्रदर्शनाचा काहीही हेतू नव्हता तर ती असे तोकडे कपडे का घालायची? उष्माघाताचा त्रास होता का?
त्या पिढीला ती अश्लील वगैरे वाटायची नाही, ते देखील कर्मठ लोकांनाही नाही, हे ऐकून तर मी कन्फ्यूज झालोय, कारण या पिढीतल्या मला तर हे अश्लील वाटतेय..
तर मग अश्लीलता आता वाढलीय की तेव्हाच जास्त होती जे तेव्हाच्या लोकांना हे सारे नॉर्मल वाटायचे..
थिंक अगेन..............
अहो हेलन ही जरी त्या
अहो हेलन ही जरी त्या काळातल्या जुन्या लोकांना फारच आधुनिक, अश्लिल, इ. इ. वाटली असली तरी
त्या काळातली ती आधुनिकता आणि या काळातली ही आधुनिकता यात देखील महदंतर आहे.
विचारा बर जुन्या लोकांना जे आज साधारण ५० / ६० च्या पुढे आहेत, ते सांगू शकतील तुलना करून.
या असल्या गीतांवर त्यावेळी जरी टिका झाली असली तरी ती अगदीच पातळी सोडून नव्हती (काही अपवाद वगळता) तेव्हा ते अपवादच जरा जास्त चर्चिले जात असत (आठवा "ब्रह्मचारी" मधील मिनाक्षीबाई)
पण आता हे प्रमाण एवढे वाढले आहे की जेवणात भाजीच्या ऐवजी लोणच्याचेच प्रमाण जास्त होत आहे असे वाटते .
यावर अशोकजीं सारख्या जाणकारांची मते काय आहेत ते पहाणे उद्बोधक ठरेल.
अशोककुमार यांनी एका मुलाखतीत
अशोककुमार यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की
सिनेमात काळाच्या पुढचे वेगळे हे नेहेमीच येत असते.
पहले उसमे भी एक भद्रपन था. लेकिन अब नंगापन जादाही बढ रहा हैं !
पण या सर्वांने तिच्या
पण या सर्वांने तिच्या अंगावरचे तोकडे कपडे मोठे होणार नव्हते.
जर तिचा अंगप्रदर्शनाचा काहीही हेतू नव्हता तर ती असे तोकडे कपडे का घालायची? उष्माघाताचा त्रास होता का?>>>>> मग करीना आणी कतरीना तोकडे कपडे का घालतात? घरातले चान्गले कपडे गरीबान्मध्ये वाटुन सत्कार्य करायचे आहे का? आणी या पोरीन्च्या अन्गावर कुणी खाजकुयली टाकलीय का, की कपड्यान्मध्ये पिसवा शिरल्यात? म्हणून सर्वान्ग हलवत हातवारे करीत असतात?
रश्मी, मी कुठे सध्याच्या
रश्मी,
मी कुठे सध्याच्या अश्लीलतेचे समर्थन करतोय. फक्त ते आज आहे तर तेव्हाही होते. महेश भटने केला तो ##त्कार, आणि राज कपूरने केला तर चमत्कार असे कसे चालेल..
ऋन्मेष पण विनयभंग आणि xxकार
ऋन्मेष पण विनयभंग आणि xxकार मधे फरक असतो ना ?
ऋन्मेष मी ते मजेतच लिहीले
ऋन्मेष मी ते मजेतच लिहीले होते, कारण मला डिस्को गाणी आवडायची तेव्हा माझा भाऊ म्हणायचा की हिरोच्या पॅन्ट मध्ये झुरळ शिरलय त्यामुळे तो असा डान्स करतोय किन्वा घाईची लागलीय, आणी टॉयलेट बिझी आहे म्हणून असे हावभाव करतोय.:फिदी:
आधी सविनय कायदेभंग होता. आता
आधी सविनय कायदेभंग होता. आता विनयभंग आणि कायदेभंग वेगवेगळे होतात. :कैच्याकै:
आयटम... कडे एक करमणुक म्हणुन
आयटम... कडे एक करमणुक म्हणुन बघु शकता... पण त्यासाठी मन तेवढे खंबीर हवे... पाहले एक "Beauty stall" म्हणुन तर हे जमु शकते.
आयटेम सॉन्ग हे चार दिनकी
आयटेम सॉन्ग हे चार दिनकी चान्दनी असतात, त्यान्चे आयुष्य तेवढेच. येऊन जाऊन एखाद्या पार्टीत्/लग्नात वाजतात. आणी पिट्टाल्या पोर पोरी स्टेज शो करताना वापरतात.
माझ्या मुलीच्या गॅदरीन्गच्या वेळी टिचरने मुलाना ब्लु है पानी पानी वर नाच बसवायचा आहे असे सान्गीतले. मला मुलीने सान्गीतल्यावर तिला आधी यु ट्युबवर दाखवले. आता ते पाहुन मुलगी म्हणाली आई या बायका अशा नन्गु नन्गु का पाण्यात नाचतात?:हाहा: मी कपाळावर हात मारला कारण मला हे गाण माहीत नव्हते. मुळात माझा आता पिक्चरशी सम्बन्ध नसल्यात जमा. माबोवर काय ते कळते. शेवटी तिला सान्गीतले की तुझ्या टिचरला जाऊन सान्ग दुसरे गाणे निवडायला. आता खरच दुसरे गाणे घेतलय.
जूनी गाणी (आपल्याही काळात नसलेली) लक्षात रहातात, पण ही आयटेम लक्षात रहाणार नाही हे नक्की. चार चौघात आपण चिकनी चमेली किन्वा मै झन्डु बाम हुई म्हणणार आहोत का? अन्ताक्षरी खेळताना म्हणू कदाचीत.
>> 'आयटेमपणा' विकू पाहणे
>> 'आयटेमपणा' विकू पाहणे ह्याला व्यक्तीस्वातंत्र्य
हा चांगला मुद्दा आहे.
:थोडा विचार करून: काय विकायचे / काय विकत घ्यायचे हे तसे ठरवू म्हटले तरी ठरवणे अवघड. त्यावर बंदी घालणेही अवघड.
जाहीर रीत्या केवळ समोर दिसणार्या कलाकार स्त्रीला टार्गेट करणे सोपे आणि टाळ्याघेऊ असू शकते, आयटमपणाचे पॅकेजिंग करून विकणे हे टीमवर्क आहे. त्या आख्ख्या टीमला दोष किंवा काय द्यायचे ते क्रेडीट द्यायला हवे.
माझा विरोध तथाकथित संस्कृतीरक्षकांना आहे. ज्यांना संस्कृती स्त्रियांच्या कपड्यातच दिसते अश्यांना विशेषत्वाने.
>>>आता खरच दुसरे गाणे
>>>आता खरच दुसरे गाणे घेतलय<<<
शिक्षकांनी काय निवडावे हे विद्यार्थ्यांना सांगावे लागत आहे (भले पालकांच्या सूचनेनुसार असेल) हे अतिशय दुर्दैवी आणि लज्जास्पद आहे.
रश्मी, तुम्ही हसत हसत सांगितलेला हा प्रसंग आपल्या सध्याच्या बेजबाबदार व दंडनीय वर्तनावर नकळतपणे आवश्यक ते ताशेरे ओढत आहे.
>>>आयटमपणाचे पॅकेजिंग करून
>>>आयटमपणाचे पॅकेजिंग करून विकणे हे टीमवर्क आहे. त्या आख्ख्या टीमला दोष किंवा काय द्यायचे ते क्रेडीट द्यायला हवे. <<<
पूर्णतः सहमत! लेखात कदाचित हे मांडलेच गेले नसेल किंवा नीट मांडले गेले नसेल, पण फक्त स्त्री कलाकाराला दोषी मानण्याचा माझा निश्चीतच अजिबातच हेतू नाही / नव्हता. ऋन्मेऽऽष ह्यांच्या एका प्रतिसादाचा प्रतिवाद करतानाही मी तसे नोंदवलेले आहे.
>>>माझा विरोध तथाकथित संस्कृतीरक्षकांना आहे. ज्यांना संस्कृती स्त्रियांच्या कपड्यातच दिसते अश्यांना विशेषत्वाने.<<<
पण मृदुला ह्या विशिष्ट धाग्यासंदर्भात तो मुद्दा निर्माणच होत नाही ना? आयटेम साँग म्हणजे निव्वळ कपडे किंवा ते कपडे घालणार्या स्त्रीचा ते कपडे घालण्याचा निर्णय इतकेच नव्हे. निदान हे तरी धाग्यात स्पष्ट झालेले असावे अशी आशा आहे. आयटेम साँग ह्या धाग्यान्वये खालील सर्वच गोष्टी 'एक पॅकेज' म्हणून विचारात आणण्याचा हेतू आहे.
१. पेहराव
२. हावभाव
३. आंबटशौकीनांना टारगेट करणार्या नृत्यमुद्रा
४. गीताची शब्दरचना
५. विशिष्ट शब्दांचे निघू शकणारे इतर अर्थ व ते निघावेत असा उघड हेतू असणे
६. एक स्त्री नाचत आहे व बाजूने अनेक मद्यपी तिच्याशी जवळीक साधू पाहात आहेत हे मुद्दाम दर्शवणे
७. स्त्री ही शरीरसुखाचे साधन आहे हे हेतूपुरस्पर नोंदवणे
आणि
८. हे सगळे मुद्दाम व व्यावसायिक कारणाने करणे!
अतिशय क्लिष्ट, जटिल अश्या कायद्याच्या व्याख्येतही काही धुरिणांना 'नेमके विकाऊ काय आणि नेमके नैसर्गीक काय' हा शोध नक्की लावता येईल असे मला वाटते व 'निव्वळ विकाऊ' असलेल्या गोष्टी कात्रीत पकडताही येतील.
कन्फ्युझिंग स्टेट ही आहे की:
१. हिंदू महासभेचे त्यागी तोंडाला येईल ते बरळून वाटेल ती बंधने आणू इच्छितात
२. कायदा स्त्रीचे स्वातंत्र्य मान्य करतो
आणि त्याचवेळी
३. कलाक्षेत्र (विशेषतः चित्रपट) स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून प्रदर्शीत करते.
ह्या तीनही गोष्टी एकाच भौगोलीक प्रदेशात घडतात जेथे एकच कायदा, एकच संस्कृती व एकच नीतीमत्ता अपेक्षित आहे.
असेच असले तर ह्यावर कोणत्यातरी शासकीय संस्थेचा अंकुश नक्कीच असू शकेल ना? तो अंकुश त्यागींच्या तोंडालाही कुलूप लावेल आणि आयटेम साँग्जमधील स्त्रीचे 'तसे' पेंट केले जाणे ह्यावरही नियंत्रण आणेल?
नाम मधले पंकज उधासचे चिठ्ठी
नाम मधले पंकज उधासचे चिठ्ठी आई है हे आयटम साँग म्हणून गणले जावे काय?
कारण इथे चर्चा झालेल्या कोणत्याच निकषात ते बसत नसले, तरी पंकज उधास त्यात 'आयटम' म्हणूनच पडद्यावर प्रगटला का?
Pages