आयटेम साँगद्वारे स्त्रीचे भडक चित्रण करणे, द्वयर्थी किंवा उघड अश्लीलता दर्शवणे आणि चार सहा महिने ठेका धरायला पुरे होईल अशी ट्यून देणे ह्या गोष्टी आता सर्वच चित्रपट निर्माते हटकून करताना दिसत आहेत. अश्या आयटेम साँग्जचा जनमानसावर काय प्रभाव पडेल वगैरेचे कोणाला काही पडलेले नाही. करिना, कत्रिना, मल्लिका, मलाइका अश्या आघाडी-पिछाडीच्या नट्या उत्तान कपडे घालून स्वतःलाच तंदुरी मुर्गी वगैरे म्हणत नाचत आहेत. फोटोको सीनेसे, शीलाकी जवानी, जलेबीबाई, हलकट जवानी वगैरे गीते आता गणेशोत्सव व इतर नाचण्याच्या निमित्तांसाठीची मस्ट प्ले गीते झालेली आहेत.
आजमितीला आपल्याकडे वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळे वाद रंगात येत आहेत. कालच हिंदू महासभेचे नितीन त्यागी म्हणाले की मुलींना स्कर्ट आणि जीन्स घालू दिले नाही पाहिजेत. ते असेही म्हणाले की आयटेम साँग करणार्या नट्यांना वेश्या म्हणायला हवे. संकेतस्थळे, सोशल मीडिया ह्यावर स्त्रीच्या बाजूने जनमानस तयार करण्याची प्रक्रिया वेगवान झालेली आहे. कायद्यांबाबतची जागरूकता वाढत आहे. एकीकडे खाप पंचायती मोबाईल फोनच्या वापरावर बंदी आणत आहेत आणि दुसरीकडे कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च पद स्त्रिया भूषवत आहेत.
ही एक नेहमी असते तशीच ट्रान्झिशन फेज आहे. समाज हरघडीला थोडाथोडा व सर्वांगाने बदलत असतो तसेच आत्ताही बदलत आहे. ह्यावेळी होणारा बदल थोडा अधिक वेगवान व थोड्या अधिक चांगल्या गोष्टीसाठी होत आहे असे सेफली म्हणता येईल. म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी सध्या थोडी अधिक पोषक वातावरण निर्मीती करण्याचा निदान हेतू असल्याचे दिसत आहे. गुन्हे उजेडात येण्याचे प्रमाण वाढणे हेही एक प्रकारे वाईटातून चांगले काढणे असले तरी बरेच आहे.
पण नितीन त्यागींचे आयटेम साँग करणार्या नट्यांबाबतचे दै. सकाळमधील मत वाचले आणि अनेक दिवस डोक्यात असलेला विषय पुन्हा प्रखरपणे जाणवला. उत्तम संवादकौशल्य लाभलेल्या, जनमानसात एक करिष्माई प्रतिमा असलेल्या, भारतीय कलाकारीचे जगासमोर प्रतिनिधित्व करणार्या, अभिनयनिपूण, प्रगत व स्त्रीसाठी अधिक चांगले दिवस आणणार्या जगात वाढलेल्या नट्या आयटेम साँग करताना जबाबदारीने का वागत नसतील? आपल्या गीताद्वारे आपण नकळत्या, उमलत्या पिढीसमोर स्त्रीचे चित्रण अयोग्य रीतीने करत आहोत हे भान त्यांना नसेल असे नक्कीच वाटत नाही. एक गाणे केले की अमाप पैसेही मिळतात आणि बाकी काही कमिटमेंटही नाही हे सोयीचे वाटत असेल का? ह्या प्रकारावर नियंत्रण यावे असे आपल्यापैकी काहींना वाटते का? की ह्यालाही स्त्रीचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणता येईल? अश्या आयटेम साँगमध्ये सहसा प्रमुख अभिनेत्रीच्या आजूबाजूला अनेक मद्यपी हावभाव करत नाचत असतात त्यांचे अनुकरण सडकछापांनी केले तर सगळा दोष त्या सडकछापांचा म्हणता येईल का? हेलनच्या जमान्यात असलेले उत्तान डान्सेस हे चित्रपटातील केवळ एक किरकोळ आकर्षण असायचे. त्याचसोबतीला प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय, वास्तव चित्रण, सशक्त कथानक, अर्थपूर्ण व कथेला पुढे नेणारी सुश्राव्य गीते हेही सगळे असायचे. आताच्या मारामार्या, सीन्स, विनोदांचे प्रकार, संवाद, अद्भुत कथानके हे सगळे मुळातच मन खिळवू शकत नाहीत, त्यात आणखीन ती निव्वळ घालायची म्हणून घातलेली आयटेम साँग्ज! आयटेम साँग नसेल तर चित्रपटात आपण काहीतरी मिस केले अशी भावना निर्माण होईल का? एखादे उत्तान दृष्य दाखवणे हे कदाचित कथानकाचा भाग म्हणता येईलही, पण आयटेम साँग हे कथानकाचा भाग असल्याची उदाहरणे अलीकडच्या चित्रपटात तरी दिसलेली नाहीत. शोलेमधील मेहबूबा आणि मै झंडू बाम हुई ह्यात हाच थेट फरक आहे.
काही कलावंतांनी खासगीत 'अशी गाणी निर्माण होऊ नयेत व निदान त्यावर लहान मुलांना स्पर्धेत नाचायला लावू नये' अशी खंत व्यक्त केली.
अशी आयटेम साँग्ज निर्माण होणे हे थेट पोर्नोग्राफीपेक्षा भयंकर असावे असे वाटते,
त्या त्या नट्या अडीच ते पाच लाखपर्यंत 'मान'धन स्वीकारून तेच आयटेम साँग एखाद्या समारंभातही सादर करताना दिसतात. म्हणजे जे आजवर चित्रपटात असल्याने अप्राप्य व काल्पनिक वाटण्याची एक किमान शक्यता होती तीही मावळू लागेल.
कृपया खालील काही मुद्यांवर चर्चा व्हावी:
१. मराठी चित्रपटातील लावणी / तमाशा ह्यांची तुलना आयटेम साँगशी करता काय साम्य / फरक वाटतात?
२. आयटेम साँगचे दुष्परिणाम होत असल्याचे तुमचे काही अनुभव आहेत काय? (सोसायटी / मित्रपरिवारात)
३. आपल्या पाल्यांना नृत्य शिकवताना किंवा स्पर्धांमध्ये धाडताना तुम्ही अश्या गीतांवर त्यांनी नृत्य करावे की नाही ह्याबाबत काय भूमिका बाळगता?
४. तुम्हाला स्वतःला एखाद्या पार्टीत नृत्य करण्याची वेळ आली तर एक पुरुष म्हणून / एक स्त्री म्हणून अश्या गीतांवर तुम्ही थिरकता का? तो आनंद मिळवणे वेगळे व अशी गीते बनू नयेत असे वाटणे वेगळे अशी द्विधा मनस्थिती काहींची होऊ शकते का?
वगैरे!
इतरही काही संबंधीत विषय मनात असतील तर अवश्य लिहावेत.
धन्यवाद!
=============
-'बेफिकीर'!
>>कन्फ्युझिंग स्टेट ही आहे
>>कन्फ्युझिंग स्टेट ही आहे की:
१. हिंदू महासभेचे त्यागी तोंडाला येईल ते बरळून वाटेल ती बंधने आणू इच्छितात
२. कायदा स्त्रीचे स्वातंत्र्य मान्य करतो
आणि त्याचवेळी
३. कलाक्षेत्र (विशेषतः चित्रपट) स्त्रीला उपभोग्य वस्तू म्हणून प्रदर्शीत करते.>>
कलाक्षेत्र स्त्रीला आयटम सॉन्गचा वापर करुन उपभोग्य वस्तू म्हणून प्रदर्शित करते याबाबत तक्रार नोंदवता येते का? सेन्सॉर बोर्डच्या अखत्यारीत या बाबी येतात का? तसे असेल तर कात्री लावता येवू शकते.
हिंदू महासभा आणि तत्सम कुणीही काही बरळले तरी कायदा स्त्री चे स्वातंत्र मान्य करत असल्याने अशा बरळण्याला मुद्दाम स्त्रीविरोधी चिथावणी समजून कायदेशीर कारवाईची मागणी करता येइल का?
स्वातीजी, >>>कलाक्षेत्र
स्वातीजी,
>>>कलाक्षेत्र स्त्रीला आयटम सॉन्गचा वापर करुन उपभोग्य वस्तू म्हणून प्रदर्शित करते याबाबत तक्रार नोंदवता येते का? सेन्सॉर बोर्डच्या अखत्यारीत या बाबी येतात का? तसे असेल तर कात्री लावता येवू शकते.
हिंदू महासभा आणि तत्सम कुणीही काही बरळले तरी कायदा स्त्री चे स्वातंत्र मान्य करत असल्याने अशा बरळण्याला मुद्दाम स्त्रीविरोधी चिथावणी समजून कायदेशीर कारवाईची मागणी करता येइल का?<<<
माझ्या माहितीप्रमाणे ठळक केलेल्या दोन्ही प्रश्नांचे उत्तर 'होय' असे आहे. तज्ञांनी अधिक माहिती द्यावी कृपया!
आताच्या मारामार्या, सीन्स,
आताच्या मारामार्या, सीन्स, विनोदांचे प्रकार, संवाद, अद्भुत कथानके हे सगळे मुळातच मन खिळवू शकत नाहीत,
वय झाले का हो?
आमच्या आधीच्या पिढीचे लोक असेच म्हणत असत - "काय हे, बाईचा पदर पडलेला दाखवला आहे चक्क!"
"आणि काय ती गाणी, काही अर्थ आहे का? म्हणे इना मीना डिका!"
"काय हे, बाईचा पदर पडलेला
"काय हे, बाईचा पदर पडलेला दाखवला आहे चक्क!">>> ती कथानकाची गरज असते हो
पंकज उदास ची पोस्ट >>> ते
पंकज उदास ची पोस्ट >>>
ते गाण किती भारी आहे. उडत्या चालीच तर अजिबातच नाही.
पंकज उदास >>
पंकज उदास >>
मुद्दाम लिहल आहे रे तस. बाकी
मुद्दाम लिहल आहे रे तस.
बाकी चालु द्या चर्चा.
कारण इथे चर्चा झालेल्या
कारण इथे चर्चा झालेल्या कोणत्याच निकषात ते बसत नसले, तरी पंकज उधास त्यात 'आयटम' म्हणूनच पडद्यावर प्रगटला का?>>>>>मुळात पन्कज उदास त्यात गझल गायक म्हणूनच दाखवलाय, त्यामुळे तो आयटेम बॉय्/मॅन म्हणून सम्बोधला जाउ शकणार नाही.
आता चिठ्ठी हा शब्द गाण्यात आल्याने तो शब्द आयटेम म्हणून वापरावा का या बद्दल जाणकारान्चे मत जाणुन घ्यायला आवडेल.
(No subject)
पंकज उदास हा आयटम रिपेलंट
पंकज उदास हा आयटम रिपेलंट असावा
हेलनचा कॅब्रे त्याकाळी
हेलनचा कॅब्रे त्याकाळी सहपरीवार पहाण्यालायक होता का? नाही (माझ मत)
तो पण दिवसातल्या २४ तास कधीही पहाणे शक्य होत का? नाही
आत्ताच्या आज्जी आजोबांनीच तो नाच फक्त चित्रपटगृहात जाउनच पाहिलेला होता.
सध्याच्या परीस्थीतीनुसार जर तिच गाणी आज्जी आजोबांना त्यांच्या आई वडील त्यांचे आज्जी आजोबा मुल नातवंड यांच्या सोबत बसुन त्या काळीच टिव्हीवर पहावे लागले असते तर ते त्याला नक्कीच ग्रेस्फुल म्हणाले नसते.
आताची ऐकंदरीत बहुतेक गाणी नकोशी वाटतात कारणं मला तरी
ऐकण्यासाठी
१. गाण्याच्या शब्दातल हरपलेल काव्य
२. गाण नक्की कोणत्या भाषेत आहे तेच न कळण
३. वाद्यांच्या आवाजात बोल ऐकुच न येण
४. गाण्यात मेलडी / लय नसण
पहाण्यासाठी
१. अति अंगप्रदर्शन
२. काही वेळेस केलेले आचकट विचकट हावभाव आणि पोझेस
चित्रपटातल कस दिसण कलाकारांच्या हातात किती आहे हा खुप मोठा प्रशन आहे. उदाहरणार्थ रंगिला मधे दिसलेली उर्मिला आणि सत्या मधे दिसलेली उर्मिला.
आयटम साँग याची कन्सेप्ट काय
आयटम साँग याची कन्सेप्ट काय होती ? चित्रपटात काहीच आगा-पिछा नसलेले गाणे केवळ मनोरंजणासाठी असणे. उदा. छम्मा छ्म्मा हे गाणे आयटम्स साँगची सुरुवात आहे असे म्हणतात. एखाद्या प्रसिद्ध कलाकारावर जो चित्रपटात नाही त्याला घेउन एखादे गाणे चित्रिकरण करायचे थोडे तडक फडक ठेवायचे (गरजेनुसार) आणि ते गाणे चित्रपटाच्या पब्लिसिटीसाठी वापरायचे. ही बेसिक कन्सेप्ट होती. चायना गेट चित्रपटात सगळेच सो-सो कलाकार असल्याने तेव्हाची प्रसिध्द(त्यामानाने) उर्मिलाची निवड करण्यात आली. टिव्हीवर चित्रपटाची जाहीरात करताना त्याचे इतर गाणे दाखवण्यापेक्षा हेच गाणे दाखवत होते. अर्थात याचा फायदा थोड्याफार प्रमाणात मिळाला. हे बघुन मग "शुल" चित्रपटात देखील हाच फॉर्मुला वापरुन "दिलवालो के दिल का करार" हे गाणे शिल्पा शेट्टीवर चित्रित केले. तेव्हा देखील मनोज वाजपेयी वगैरे मंडळी काही प्रसिध्द नव्हते की ज्यांच्यावर चित्रपट यशस्वी होईल. मुळात चित्रपट बघण्यासाठी तरी लोक यावीत या करिता अश्या गाण्यांची गरज त्यावेळेस निर्माण झाली. लोकांनी गाण्याच्या नादात चित्रपट येउन बघितला तर चित्रपट आवडेल. पण नंतर काही चित्रपटात आयटम्स साँगची गरज इतकी वाढली कि चित्रपटाची चर्चा कमी त्या गाण्यांचीच चर्चा पानभर होउ लागली याचे उत्तम उदा. चिकनी चमेली हे गाणे . अग्निपथच्या रिमेकची चर्चा झालीच नाही उलट कतरिना कैफ त्यागाण्यात किती मादक दिसली. वगैरे वगैरे वर जास्तच चर्चा झाली. निव्वळ त्या गाण्यासाठी देखील कित्येक पब्लिकने चित्रपट बघितला. ही बातमी देखील आलेली.
हीच लाट नंतर वाढत गेली यात निव्वळ अभिनेत्रीच नाहीत तर अभिनेते देखील ओढले गेले. प्रत्येकाला आपल्या चित्रपटात असे काहीतरी हवे वाटु लागले. शाहरुखने आधी "काल" चित्रपटात असे एक गाणे केले. नंतर स्वत:च्याच चित्रपटात "ओम शांती ओम" मधे केले. रितिक ने देखील "क्रेझी४" धूम२ मधे असे गाणे केले. काही आयटम्स साँग खरच चांगले असतात तर बरेच साँग हे अश्लिलकडे जास्त झुकणारे असतात.
पहिला आयटम बॉय अभिषेक बच्चनः
पहिला आयटम बॉय अभिषेक बच्चनः तेरेसंग एक सिंपलसी कॉफी भी किक देती है.
धन्यवाद.
बेफिकीर, आयटम गाणी आणि सर्वच
बेफिकीर,
आयटम गाणी आणि सर्वच अश्लील वाङ्मयाच्या बाबतीत एक गोष्ट विशेषत्वाने नमूद करावीशी वाटते. ती म्हणजे यांत उद्दीपन आहे मात्र शमन कसं करावं याबद्दल काहीच मार्गदर्शन नाही. प्रेक्षकांनी केवळ उद्दिपीत व्हावं आणि शमनाचे मार्ग स्वत:च शोधून काढावे अशी अपेक्षा आहे. हे एक प्रकारचं विसंवादास आमंत्रण आहे.
आ.न.,
-गा.पै.
चायना गेट चित्रपटात सगळेच
चायना गेट चित्रपटात सगळेच सो-सो कलाकार असल्याने तेव्हाची प्रसिध्द(त्यामानाने) उर्मिलाची निवड करण्यात आली. >>>>> नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, डॅनी, अनुपम खेर, परेश रावल हे कलाकार सो-सो होते?
पहिला आयटम बॉय अभिषेक बच्चनः
पहिला आयटम बॉय अभिषेक बच्चनः तेरेसंग एक सिंपलसी कॉफी भी किक देती है.
>>>>>
नाही, त्याच्या कित्येक वर्षे आधी त्याच्याच वडीलांनी एक आयटम साँग सादर केले होते.
मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है.... हे एक `आयटम' साँगच होते
अवांतर - अभिषेक "वन लव" या
अवांतर - अभिषेक "वन लव" या आयटमसॉंगमध्ये खूप सही वाटलेला. बिपाशा पाणीकम वाटलेली त्याच्या हॉटनेसपुढे..
नसिरुद्दीन शाह, ओम पुरी,
नसिरुद्दीन शाह, ओम पुरी, अमरीश पुरी, डॅनी, अनुपम खेर, परेश रावल हे कलाकार सो-सो होते?
>>>>>
ये एकेक कलाकार सो-सो के बराबर असे काहीसे म्हणायचे असेल त्यांना
>>>प्रेक्षकांनी केवळ उद्दिपीत
>>>प्रेक्षकांनी केवळ उद्दिपीत व्हावं आणि शमनाचे मार्ग स्वत:च शोधून काढावे अशी अपेक्षा आहे.<<<
परफेक्ट
चित्रपट चालवण्याबाबतीत
चित्रपट चालवण्याबाबतीत आहे
इतका साधा अर्थ काढता येत नसेल तर पुढे बोलणेच खुंटले
सुपरहिट झाला का? हिट तरी झाला का? तुम्ही आवर्जून थेटर मधे जाऊन बघितलात का? उगाच कैच्याकै अर्थ काढायचे
मेरे अंगणे मे तुम्हारा क्या
मेरे अंगणे मे तुम्हारा क्या काम है.... हे एक `आयटम' साँगच होते>>> माझ्या माहितीप्रमाणे अमिताभ बच्चन लावारिसचा हीरो होता. प्रमुख नायक अथवा नायिक जे काही करतात त्याला आयटम साँग म्हणत नाहीत.
आणि आयटम साँग शोलेमध्ये पण होतंच की.
>>>>>प्रमुख नायक अथवा नायिक
>>>>>प्रमुख नायक अथवा नायिक जे काही करतात त्याला आयटम साँग म्हणत नाहीत<<<<
मुन्नी बदनाम मध्ये सललू नाचतोय की..
गा.पै.
गा.पै.
झंपी. त्या गाण्यामध्ये सल्लू
झंपी. त्या गाण्यामध्ये सल्लू आयटम आहे की मलाईका आयटम आहे?
>>>झंपी. त्या गाण्यामध्ये
>>>झंपी. त्या गाण्यामध्ये सल्लू आयटम आहे की मलाईका आयटम आहे? अ ओ, आता काय करायचं<<<
लिंगसापेक्ष आयटेम असतात बहुधा आता गाण्यात!
प्रमुख नायक अथवा नायिक जे
प्रमुख नायक अथवा नायिक जे काही करतात त्याला आयटम साँग म्हणत नाहीत.
>>>>>>
ढोबळमानाने,
पण असा रूल नाही.
शाहरूकचे ओम शांती ओम मधील दर्दे डिस्को आयटम साँगच होते.
त्या गाण्यामध्ये सल्लू आयटम
त्या गाण्यामध्ये सल्लू आयटम आहे की मलाईका आयटम आहे? > अपनी अपनी नजर का सवाल है किसी को सल्लु आयटम लगता है तो किसीको मलाईका
शाहरूकचे ओम शांती ओम मधील दर्दे डिस्को आयटम साँगच होते.> हो कारण ते गाणे दाखवुनच जास्त पब्लिसिटी केली होती. विशेषतः सिक्सपॅक्स वगैरे
शाहरूखने बिल्लो मध्येही २-३
शाहरूखने बिल्लो मध्येही २-३ आयटम साँगच केले होते.. चित्रपटात बरेपैकी भुमिकाही होतीच.. किंबहुना मार्केटींग त्याच्या नावावरच होती..
>>झंपी. त्या गाण्यामध्ये
>>झंपी. त्या गाण्यामध्ये सल्लू आयटम आहे की मलाईका आयटम आहे?<<
अहो इतके डोळे निळे करु नका हो.
तुम्ही म्हणालात नायक नायिका जे काही करतात त्याला आयटम साँग नाही म्हणत.
तर, पहिलं म्हणजे हे कोणी ठरवलं? म्हणून म्हटलं की आयटम साँग मध्ये कोणीही नाचतं आजकाल. अगदी आयटम गर्ल च नाचते असे नाही काही.. मूवी मध्ये धागंड धिंगाणा गाणं हिट होइल असे कुठलेही फालतु गाणं घालून मग नाचतात सगळे. अगदी नायक सुद्धा.
आणि, आयटम कोण हे प्रत्येकाच्या नजरेवर आहे. कोणाला सल्लू आयटम तर मल्लायका.
तरी आजकालची कित्येक सल्लूची गाणी तर आयटम टाईपच आहे. जुम्मे कि रात सुद्धा तसेच वाटते.
शारूकचे उदाहरण दिलेय सुद्धा दिलेय.
हर एक का सोचने का स्टाईल है. और देखनेका भी. उसमे क्या?
मध्यंतरी बालगंधर्वला जाऊन
मध्यंतरी बालगंधर्वला जाऊन मुद्दाम 'मदमस्त अप्सरा' नावाचा एक कार्यक्रम पाहिला. अतिशय सामान्य सूत्रसंचालन होते. नर्तिकांकडे नृत्यकला अर्थातच असायला हवी तितकी होतीच, पण त्यांचे दिलखेचक (!) हावभाव, मुद्राभिनय, प्रत्येक गाण्याला प्रेक्षकांमधील दोघा-तिघांना निवडून खाणाखुणा करणे वगैरे प्रकार अधिक होते. हे दोघे-तिघे कोणी ठरलेले वगैरे नसून ते प्रत्येक गाण्याला बदलत असत. तसेच, प्रत्येक नर्तिका दरवेळी कोणा नव्याकडेच पाहून हावभाव करत असे. थोडक्यात एकुणच प्रेक्षागृहाला घायाळ वगैरे करण्याचा प्रकार! मग ते आधीच घायाळ असल्यामुळे तिकिट काढून आत आलेले लोक, नुसते नृत्य पाहून अधिकच घायाळ झालेले असताना, खासगी खाणाखुणांनी अक्षरशः 'कलेजा खलास' अवस्थेत येऊन नाचत सुटायचे. मी अगदी पुढचे तिकिट घेतले होते. कार्यक्रम अर्धा तास उशीरा सुरू झाला. कार्यक्रम सुरू होईपर्यंत अक्षरशः पंधरा ते वीसच्या वर प्रेक्षकांची संख्या नव्हती. कार्यक्रम सुरू झाल्यानंतर मागे वळून पाहिले तर अख्खे प्रेक्षागृह तुडुंब! त्यातच काही मद्यपीही थेट मदिरागृहातून तिथे आलेले होते. काहींबरोबर काही घरंदाज महिला 'असते तरी काय लावणी' हे बघायला आलेल्या होत्या व त्यांच्या आगमनाबद्दल सूत्रसंचालकाने धन्यवादही मानले. काहींबरोबर शरीरविक्रय करणार्या मुली आलेल्या होत्या. एकुण माहौल म्हणजे डान्स बारच्या खालोखालच होता. कसाबसा चाळीस मिनिटे तो कार्यक्रम पाहून मी बाहेर पडलो. कान किटलेले होते. डोके दुखत होते.
हा एक लोककलेचा प्रकार असून ह्याला शासनातर्फे मान्यता आहे. मात्र ह्याला सेन्सॉर तेवढे लागू नाही. हा ह्यात आणि आयटेम साँग्जमधील एक फरक!
Pages