आयटेम साँगद्वारे स्त्रीचे भडक चित्रण करणे, द्वयर्थी किंवा उघड अश्लीलता दर्शवणे आणि चार सहा महिने ठेका धरायला पुरे होईल अशी ट्यून देणे ह्या गोष्टी आता सर्वच चित्रपट निर्माते हटकून करताना दिसत आहेत. अश्या आयटेम साँग्जचा जनमानसावर काय प्रभाव पडेल वगैरेचे कोणाला काही पडलेले नाही. करिना, कत्रिना, मल्लिका, मलाइका अश्या आघाडी-पिछाडीच्या नट्या उत्तान कपडे घालून स्वतःलाच तंदुरी मुर्गी वगैरे म्हणत नाचत आहेत. फोटोको सीनेसे, शीलाकी जवानी, जलेबीबाई, हलकट जवानी वगैरे गीते आता गणेशोत्सव व इतर नाचण्याच्या निमित्तांसाठीची मस्ट प्ले गीते झालेली आहेत.
आजमितीला आपल्याकडे वेगवेगळ्या व्यासपीठावर वेगवेगळे वाद रंगात येत आहेत. कालच हिंदू महासभेचे नितीन त्यागी म्हणाले की मुलींना स्कर्ट आणि जीन्स घालू दिले नाही पाहिजेत. ते असेही म्हणाले की आयटेम साँग करणार्या नट्यांना वेश्या म्हणायला हवे. संकेतस्थळे, सोशल मीडिया ह्यावर स्त्रीच्या बाजूने जनमानस तयार करण्याची प्रक्रिया वेगवान झालेली आहे. कायद्यांबाबतची जागरूकता वाढत आहे. एकीकडे खाप पंचायती मोबाईल फोनच्या वापरावर बंदी आणत आहेत आणि दुसरीकडे कोणत्याही क्षेत्रातील सर्वोच्च पद स्त्रिया भूषवत आहेत.
ही एक नेहमी असते तशीच ट्रान्झिशन फेज आहे. समाज हरघडीला थोडाथोडा व सर्वांगाने बदलत असतो तसेच आत्ताही बदलत आहे. ह्यावेळी होणारा बदल थोडा अधिक वेगवान व थोड्या अधिक चांगल्या गोष्टीसाठी होत आहे असे सेफली म्हणता येईल. म्हणजे स्त्री सक्षमीकरणासाठी सध्या थोडी अधिक पोषक वातावरण निर्मीती करण्याचा निदान हेतू असल्याचे दिसत आहे. गुन्हे उजेडात येण्याचे प्रमाण वाढणे हेही एक प्रकारे वाईटातून चांगले काढणे असले तरी बरेच आहे.
पण नितीन त्यागींचे आयटेम साँग करणार्या नट्यांबाबतचे दै. सकाळमधील मत वाचले आणि अनेक दिवस डोक्यात असलेला विषय पुन्हा प्रखरपणे जाणवला. उत्तम संवादकौशल्य लाभलेल्या, जनमानसात एक करिष्माई प्रतिमा असलेल्या, भारतीय कलाकारीचे जगासमोर प्रतिनिधित्व करणार्या, अभिनयनिपूण, प्रगत व स्त्रीसाठी अधिक चांगले दिवस आणणार्या जगात वाढलेल्या नट्या आयटेम साँग करताना जबाबदारीने का वागत नसतील? आपल्या गीताद्वारे आपण नकळत्या, उमलत्या पिढीसमोर स्त्रीचे चित्रण अयोग्य रीतीने करत आहोत हे भान त्यांना नसेल असे नक्कीच वाटत नाही. एक गाणे केले की अमाप पैसेही मिळतात आणि बाकी काही कमिटमेंटही नाही हे सोयीचे वाटत असेल का? ह्या प्रकारावर नियंत्रण यावे असे आपल्यापैकी काहींना वाटते का? की ह्यालाही स्त्रीचे व्यक्तीस्वातंत्र्य म्हणता येईल? अश्या आयटेम साँगमध्ये सहसा प्रमुख अभिनेत्रीच्या आजूबाजूला अनेक मद्यपी हावभाव करत नाचत असतात त्यांचे अनुकरण सडकछापांनी केले तर सगळा दोष त्या सडकछापांचा म्हणता येईल का? हेलनच्या जमान्यात असलेले उत्तान डान्सेस हे चित्रपटातील केवळ एक किरकोळ आकर्षण असायचे. त्याचसोबतीला प्रमुख कलाकारांचा उत्तम अभिनय, वास्तव चित्रण, सशक्त कथानक, अर्थपूर्ण व कथेला पुढे नेणारी सुश्राव्य गीते हेही सगळे असायचे. आताच्या मारामार्या, सीन्स, विनोदांचे प्रकार, संवाद, अद्भुत कथानके हे सगळे मुळातच मन खिळवू शकत नाहीत, त्यात आणखीन ती निव्वळ घालायची म्हणून घातलेली आयटेम साँग्ज! आयटेम साँग नसेल तर चित्रपटात आपण काहीतरी मिस केले अशी भावना निर्माण होईल का? एखादे उत्तान दृष्य दाखवणे हे कदाचित कथानकाचा भाग म्हणता येईलही, पण आयटेम साँग हे कथानकाचा भाग असल्याची उदाहरणे अलीकडच्या चित्रपटात तरी दिसलेली नाहीत. शोलेमधील मेहबूबा आणि मै झंडू बाम हुई ह्यात हाच थेट फरक आहे.
काही कलावंतांनी खासगीत 'अशी गाणी निर्माण होऊ नयेत व निदान त्यावर लहान मुलांना स्पर्धेत नाचायला लावू नये' अशी खंत व्यक्त केली.
अशी आयटेम साँग्ज निर्माण होणे हे थेट पोर्नोग्राफीपेक्षा भयंकर असावे असे वाटते,
त्या त्या नट्या अडीच ते पाच लाखपर्यंत 'मान'धन स्वीकारून तेच आयटेम साँग एखाद्या समारंभातही सादर करताना दिसतात. म्हणजे जे आजवर चित्रपटात असल्याने अप्राप्य व काल्पनिक वाटण्याची एक किमान शक्यता होती तीही मावळू लागेल.
कृपया खालील काही मुद्यांवर चर्चा व्हावी:
१. मराठी चित्रपटातील लावणी / तमाशा ह्यांची तुलना आयटेम साँगशी करता काय साम्य / फरक वाटतात?
२. आयटेम साँगचे दुष्परिणाम होत असल्याचे तुमचे काही अनुभव आहेत काय? (सोसायटी / मित्रपरिवारात)
३. आपल्या पाल्यांना नृत्य शिकवताना किंवा स्पर्धांमध्ये धाडताना तुम्ही अश्या गीतांवर त्यांनी नृत्य करावे की नाही ह्याबाबत काय भूमिका बाळगता?
४. तुम्हाला स्वतःला एखाद्या पार्टीत नृत्य करण्याची वेळ आली तर एक पुरुष म्हणून / एक स्त्री म्हणून अश्या गीतांवर तुम्ही थिरकता का? तो आनंद मिळवणे वेगळे व अशी गीते बनू नयेत असे वाटणे वेगळे अशी द्विधा मनस्थिती काहींची होऊ शकते का?
वगैरे!
इतरही काही संबंधीत विषय मनात असतील तर अवश्य लिहावेत.
धन्यवाद!
=============
-'बेफिकीर'!
मी तर आयटम सॉग्च समजत होते
मी तर आयटम सॉग्च समजत होते आता उड्वु का ती पोस्ट???
'आयटेम' हा शब्द आयटेम साँग
'आयटेम' हा शब्द आयटेम साँग कोणते हे अधोरेखीत करतो.
ज्या गीतात नृत्यांगना एक 'आयटेम' म्हणून पेश केली जाते व जे गीत तिच्या 'आयटेम' असण्याशी संबंधीत असते ते आयटेम साँग म्हणता यावे.
म्हणजे मुळात स्त्रीला आयटेम समजूनच ते साँग डिझाईन, चित्रीत वगैरे केले जाते व प्रेक्षकांनी (निदान त्या गीतापुरते त्या) त्या स्त्रीला आयटेम समजावे हेच अपेक्षित असते.
हाच आधी एक प्रॉब्लेम आहे.
पुरुषाला जर बायकांनी आयटम
पुरुषाला जर बायकांनी आयटम म्हणुन समजले तर त्या पुरुषाला काही आक्षेप नसतो ( असे मला वाटते )
खरे तर तो खुषच होइल ( पुन्हा असे मला वाटते )
मग स्त्रीला आयटम समजले तर चुक वाटणे हे पुरुषी वर्चस्वाचे ( पुरुषसत्ताक संस्कृतीचे ) उदाहरण नाही का?
महत्वाचे म्हणजे ज्या स्त्रिला आयटम समजुन गाणे बसवले असते, तिला पण आक्षेप नसतो तिला आयटम समजण्यात. मग कोणाला काय प्रॉब्लेम आहे?
आँ???????????????????????????
आँ????????????????????????????????????????????????
माझ्यामते आतापर्यंत गाण्याला
माझ्यामते आतापर्यंत गाण्याला "आयटेम" हा शब्द वापरतात .हे तुम्ही वर दिलेली माहीती नवीन आहे माझ्यासाठी. हवं असल्यास आयट्म गर्ल हा वापरु शकतो पण तो ही गाण्यालाच नृत्यांगनेला नाही. बरोबर ???
आँ???????????????????????????
आँ????????????????????????????????????????????????>>>
@कोकणस्थ - तुमचा इतका मोठा का आ वासला आहे?
तुम्हाला तुमच्या स्त्री कलिग्स नी "आयटम" समजले ( बेफींच्या व्याख्येप्रमाणे ) तर आवडेल का राग येइल?
पुरुषाला जर बायकांनी आयटम
पुरुषाला जर बायकांनी आयटम म्हणुन समजले तर त्या पुरुषाला काही आक्षेप नसतो ( असे मला वाटते )
खरे तर तो खुषच होइल ( पुन्हा असे मला वाटते )>>>>>>>> टोच्या, आपण आयटम दिसतो, आपल्याला फटॅक समजतात हा विचार करुन खुष होणार्या मुली सुद्धा आहेत आजकल. आहात कुठे??
सस्मित + १
सस्मित + १
च्या, आपण आयटम दिसतो,
च्या, आपण आयटम दिसतो, आपल्याला फटॅक समजतात हा विचार करुन खुष होणार्या मुली सुद्धा आहेत आजकल. आहात कुठे?>>
टोचा, मग समजा मला स्त्री कलीग्सनी आयटम म्हटलेच आणि त्यांनी मला आयट्म म्हटल्यावर समजा मी खुष झालोच तर त्यात चूक काय?
टोच्या, आपण आयटम दिसतो,
टोच्या, आपण आयटम दिसतो, आपल्याला फटॅक समजतात हा विचार करुन खुष होणार्या मुली सुद्धा आहेत आजकल. आहात कुठे??>>>>>> माहीतिय ना, म्हणुन तर म्हणलो आयटम साँग बद्दल इतका गहजब करण्यासारखे काय आहे?
आणि हल्ली सर्व मुलांना नेट वर भरपूर पॉर्न मिळु शकते आणि त्यांना माहीती पण असते. आयटम साँग सोज्वळ वाटत असेल हल्लीच्या टीन एजर्स ना.
टोचा, मग समजा मला स्त्री
टोचा, मग समजा मला स्त्री कलीग्सनी आयटम म्हटलेच आणि त्यांनी मला आयट्म म्हटल्यावर समजा मी खुष झालोच तर त्यात चूक काय?>>>>>> चुक नाहीच, सर्वच पुरुषांना खुषी वाटेल. ( तुम्हीच मोठ्ठा आ केला होतात )
जर पुरुषांना स्त्रियांनी आयटम म्हणणे जर आवडत असेल तर बेफींना स्त्रीला पुरुषांनी आयटम म्हणण्यात काय आक्षेप आहे. ( ते सुद्धा त्या आयटम स्त्रीला "आयटम" ह्या पदवी बद्दल काही ही हरकत नसताना )
४० वर्षापूर्वी जे बिभत्स होते
४० वर्षापूर्वी जे बिभत्स होते ते आता मादक वाटतय.
मला तर कतरीना, करीना, अनुष्का, दीपिका कोणीच बिभत्स वाटत नाहीत अगदी आयटम साँग मधे सुद्धा.>>>>.देवा! मग तुम्हाला खजुराहोवर सुद्धा प्रॉब्लेम असेल, ( मी ती शिल्पे पाहिलेली नाहीयेत, पण त्या काळात कला म्हणून वाखाणली गेलेली ती कला आहे, लहान मुलान्ची ट्रिप तिथे नेऊ नका, बास!)
मला वाटते ज्यांना आयांनी टेम
मला वाटते ज्यांना आयांनी टेम केलेले नसते ते लोक आयटेम होत असावेत

गम्मत म्हणुन कोटी केली आहे इतकेच
( तुम्हीच मोठ्ठा आ केला होतात
( तुम्हीच मोठ्ठा आ केला होतात )>> ते त्या आधीच्या तुमच्या पोष्टीतल्या दोन विधानात विसंगती आढळली म्हणून. किंवा माझा गोंधळ झाला म्हणा.
तुम्हाला खजुराहोवर सुद्धा
तुम्हाला खजुराहोवर सुद्धा प्रॉब्लेम असेल>>>>> असेल का नसेल? तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे रश्मी.
मी खजुराओ काही प्रत्यक्ष बघितले नाही पण इकडे तिकडे फोटो बघितले आहेत. ते सरळ सरळ पॉर्न आहे, त्यामुळे मुलांची ट्रीप नेवु नये ह्या मता बद्दल सहमत. कारण ती गोष्ट कुटुंबातल्या सदस्यांनी एकत्र एंजॉय करावी अशी नाही. ( सेपरेटली करु शकतात आवडी निवडी नुसार )
मला वाटते ज्यांना आयांनी टेम
मला वाटते ज्यांना आयांनी टेम केलेले नसते ते लोक आयटेम होत असावेत >>
महेश, कहर आहेस
( सेपरेटली करु शकतात आवडी
( सेपरेटली करु शकतात आवडी निवडी नुसार )>>
सेपरेट म्हणजे एकएकट्याने की नवरा-बायको एकत्र चालतील?
सेपरेट म्हणजे एकएकट्याने की
सेपरेट म्हणजे एकएकट्याने की नवरा-बायको एकत्र चालतील?>>>> सेपरेटली म्हणजे मुले वेगळी आणि आई वडील वेगळे.
मुले आणि पालक एकत्र नकोत एव्हडेच. पालकांनी एकत्र बघावे किंवा वेगवेगळे बघावे कींवा अजुन कोणाबरोबर बघावे.
तुम्ही थोडे समजुन घ्या हो. सर्व डीटेल मधे टाइप करणे कंटाळवाणे होते.
टोचा, ते पॉर्न आहेत हे खरे.
टोचा, ते पॉर्न आहेत हे खरे. पण नग्नता म्हणल्यावर लोक त्या शिल्पाचाच विचार करतात तसे आयटेम सॉन्ग म्हणल्यावर लोक त्या काळात हेलनचा व आता कतरीना, मलाईकाचा विचार करतात.
पण हेलनचे गाणे व त्यातील शब्द थिल्लर नव्हते, आजकालची गाणी बघा व शब्द बघा. लहान मुलाना पण कळतात.
हेलनचे ये मेरा दिल ( डॉन ) आणी मुन्नी बदनाम हुई ( दबन्ग ) यात तुम्हाला काहीच फरक दिसत नाही?:अओ:
माझ्या लहानपणी मला आईने
माझ्या लहानपणी मला आईने सुवर्ण सुन्दरी, चितचोर सारखे ग्रेट सिनेमे दाखवलेत, पण आज मला मात्र मुलीसाठी कुठलाच हिन्दी चॉइस नाहीये. मुलीला सिन्घम आवडला, तो बरा आहे यातच काय ते समाधान.
ती सिनेमे पाहुया असे म्हणत नाही हेच काय ते समाधान.
ओक्के टोचा
ओक्के टोचा
टोचा, खजुराहोबद्दल +१०१, सहमत
टोचा, खजुराहोबद्दल +१०१, सहमत !
पेटला धागा.. आयटम साँग आणि
पेटला धागा..
आयटम साँग आणि मुलींना आयटम म्हणून बघणे/संबोधणे यांचा संबंध जोडणे गंमतीशीर.
आयटम म्हणजे त्याचा चित्रपटाच्या कथानकशी फारसा संबंध नसून एक स्वतंत्र गाणे बघा असा अर्थ ढोबळमानाने बरेपैकी होतो.
त्यापुढे ते आयटम साँग सादर करणारी ती आयटम गर्ल हा सोयीने आलेला शब्द आहे.
हेलनचे ये मेरा दिल ( डॉन )
हेलनचे ये मेरा दिल ( डॉन ) आणी मुन्नी बदनाम हुई ( दबन्ग ) यात तुम्हाला काहीच फरक दिसत नाही? >>>>>>> रश्मी - ह्यात तुम्हाला फरक वाटतो कारण तुम्ही हेलन ला आत्ताच्या चश्म्यातुन बघत आहात. सद्ध्याचे कपड्यांची मापे बघता हेलन बुरख्यातली वाटत असेल. ( हेही सत्य नाहीये )
४०-५० वर्षापूर्वी हेलन पण तितकीच शॉकींग होती.
आणि हेलन नी २०० कॅब्रे केले असतील, त्यातले ३-४ च निवडुन बोलताय, दुसर्या, तिसर्या दर्जाच्या सिनेमातले बघाकी.
पण हेलनचे गाणे व त्यातील शब्द
पण हेलनचे गाणे व त्यातील शब्द थिल्लर नव्हते,
>>>
यात हेलनचे काय कर्तुत्व ?
आयटम गर्ल ही द्वीरुक्ती आहे.
आयटम गर्ल ही द्वीरुक्ती आहे.
स्लँग मधे आयटम म्हणजेच बाई हे अध्यारत आहे.
यात हेलनचे काय कर्तुत्व ?>>> सत्य आहे. दुर्दैवाने गीतकार आणि संगीतकारांनी केलेल्या चांगल्या कामाचे क्रेडीट हेलन ला मिळते आहे.
यात हेलनचे काय कर्तुत्व
यात हेलनचे काय कर्तुत्व ?
>>
कर्तुत्व नव्हते म्हणून महत्व कमी होते का? किंवा ती अधिक अश्लील होते का?
कर्तुत्व नव्हते म्हणून महत्व
कर्तुत्व नव्हते म्हणून महत्व कमी होते का?>>>>>>> त्या काळात, हेलन ही आजची मलाईका अरोरा च होती.
वेगळे काही नाही.
आणि आता हेलन मलाईका ची सासू झालीय ही तर कीती मजेची गोष्ट.
यात हेलनचे काय कर्तुत्व ?>>>
यात हेलनचे काय कर्तुत्व ?>>> सत्य आहे. दुर्दैवाने गीतकार आणि संगीतकारांनी केलेल्या चांगल्या कामाचे क्रेडीट हेलन ला मिळते आहे.>>
हेलनच्या ऐवजी सलमा आगा असती तर गीतकार आणि संगीतकारांनी चांगलं काम केलं नसतं तरी चाललं असतं असं म्हणायचंय का?
हेलनच्या ऐवजी सलमा आगा असती
हेलनच्या ऐवजी सलमा आगा असती तर गीतकार आणि संगीतकारांनी चांगलं काम केलं नसतं तरी चाललं असतं असं म्हणायचंय का?>>>>>>> सलमा आगा चे कशाला नाव घेताय, पण कतरीना, अनुष्का, करीना असतीत तर चालेल काय पळेल.
Pages